konkandhara.com

  • Home
  • महाराष्ट्र
  • मुंबई महापौर निवडणूक बिनविरोध नाही; ठाकरे गटाचा उमेदवार देण्याचा विचार
Image

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोध नाही; ठाकरे गटाचा उमेदवार देण्याचा विचार

मुंबई | कोंकणधारा डेस्क:
राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) महापौर निवडणुकीबाबत महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या महापौरपदी ११ फेब्रुवारी रोजी पदभार स्वीकारला जाणार असून, ७ फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आल्याने ही निवडणूक आता चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाची रणनीती चर्चेत

सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आणि काही अनुभवी नगरसेवकांमध्ये यासंदर्भात चर्चा झाली आहे. त्यामुळे महापौरपदासाठी ठाकरे गट थेट मैदानात उतरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील सहकार्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक अधिकच लक्षवेधी बनली आहे.

आदित्य ठाकरेंनी सस्पेन्स कायम ठेवला

या सगळ्या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट भूमिका मांडण्याऐवजी सस्पेन्स कायम ठेवला आहे. “आमची तयारी सुरू आहे. आम्ही उमेदवार देणार की नाही, हे तुम्हाला लवकरच समजेल. याबाबत आत्ता काही बोलणार नाही,” असे म्हणत त्यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, “बीएमसीची निवडणूक होऊन गेली आहे. आता शहराशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. राजकीय विषय बाजूला ठेवा; आमच्या पक्षाची माणसं कामाला लागली आहेत.” त्यांच्या या वक्तव्यामुळे महापौर निवडणुकीचा तिढा आणखी वाढल्याचे मानले जात आहे.

आरक्षण सोडतीनंतर समीकरण बदलले

मुंबई महापालिकेच्या निकालानंतर महापौरपद कोणत्या पक्षाकडे जाणार, यावरून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी “देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होईल,” असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.
दरम्यान, महापौरपदाचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर भाजपचा महापौर होण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र, ठाकरे गट उमेदवार देणार असल्यास ही निवडणूक थेट लढतीत जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ट्रॅफिकवरही भाष्य

दरम्यान, मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावरही आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. “पत्रव्यवहार करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी थेट आदेश द्यायला हवेत. एमएसआरडीसी कोणाकडे आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांचे ऐकत नसतील,” असा टोला त्यांनी लगावला.

“३२ तास लोक वाहतूक कोंडीत अडकले होते. फोटो काढायला पुढे असणारे मंत्री त्या दिवशी कुठे होते?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी टोल ऑपरेटरांनी रिफंड आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही केली. चौकशी आणि क्लीन चिट देण्याची प्रथा मागील चार वर्षांपासून सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.

आदित्य ठाकरे म्हणाले की, किमान प्रवाशांपर्यंत मदत पोहोचवणे, पर्यायी लेन सुरू करणे किंवा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होते. “हेलिकॉप्टरचा वापर मंत्री प्रचारासाठी करतात; त्याच माध्यमातून अडकलेल्या प्रवाशांना मदत करता आली असती,” असेही त्यांनी नमूद केले.

मुंबई महापालिकेच्या महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या हालचालींमुळे राजकीय सस्पेन्स वाढला आहे. बिनविरोध निवडणूक होणार की थेट लढत पाहायला मिळणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. दरम्यान, शहराच्या प्रशासकीय आणि वाहतूक प्रश्नांवरून सुरू असलेल्या राजकीय आरोप–प्रत्यारोपांमुळे मुंबईचे राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

✍️ लेखक : कोंकणधारा डेस्क

Releated Posts

सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; सरकारकडून सकारात्मक आश्वासनानंतर निर्णय

मुंबई : सुधारीत निवृत्ती वेतन योजनेसह विविध १८ मागण्यांसाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला…

ByByEditorial अप्रैल 26, 2026

मोदी सरकारचा महिला आरक्षणाचा बनाव उघडा; देशाचे तुकडे पाडण्याचे होते कारस्थान – खासदार संजय सिंह

नवी दिल्ली: “देशातील जनतेची दिशाभूल करणे थांबवा आणि गोदी मीडियाचा वापर करून खोट्या बातम्या पसरवणे बंद करा,” अशा…

ByByEditorial अप्रैल 19, 2026

शेकडो कार्यकर्त्यांसह उमेश खताते यांचा शिंदे गट शिवसेनेत प्रवेश, चिपळुणात ठाकरे गटाला मोठा धक्का

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : तालुक्यातील खेर्डी परिसरात तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणीच्या वेळी धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून…

ByByEditorial अप्रैल 8, 2026

रईस अलवी यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या अल्पसंख्याक विभागाची संघटनात्मक आढावा बैठक सोमवार, दि.…

ByByEditorial अप्रैल 8, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे