konkandhara.com

  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठा आरक्षणावरून चिघळलं राजकारण! मनोज जरांगे – छगन भुजबळ आमनेसामने
मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात मराठा आरक्षणावरून वाद

मराठा आरक्षणावरून चिघळलं राजकारण! मनोज जरांगे – छगन भुजबळ आमनेसामने

मराठा आरक्षणाच्या सरकारी निर्णयावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना जरांगे यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेत भुजबळ आणि ओबीसी नेत्यांवर थेट हल्लाबोल केला. “भुजबळांमुळे ओबीसींचं वाटोळं होणार,” असा आरोप त्यांनी केला.

मराठा आरक्षणावर राज्य सरकारने जाहीर केलेल्या नवीन जीआरनंतर समाजात असंतोष वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी “जरांगे हे मराठ्यांचे नेते नाहीत” अशी टीका करत त्यांचा शैक्षणिक आणि सामाजिक दर्जा विचारला.
या वक्तव्यानंतर मराठा आंदोलन पुन्हा तापले असून जरांगे यांच्या समर्थकांनी राज्यभर निदर्शने सुरू केली आहेत.

ओबीसी व मराठा आरक्षण प्रश्न आता केवळ सामाजिक नव्हे, तर राजकीय चढाओढीचा केंद्रबिंदू बनला आहे. भुजबळ यांचे वक्तव्य आणि जरांगेंचा प्रत्युत्तर या दोन्ही घटनांमुळे आगामी निवडणुकांपूर्वी राज्यातील ओबीसी–मराठा समीकरण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता आहे.
सरकारकडून मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे.


मराठा आरक्षणाचा वाद आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांच्या पातळीवर पोहोचला आहे. मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्या वादामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले असून, या संघर्षाचा शेवट कधी आणि कसा होईल हे सांगता येत नाही. सरकारसमोर सामाजिक तणाव शमवण्याचे आणि दोन्ही समाजांमध्ये समन्वय प्रस्थापित करण्याचे मोठे आव्हान आहे.

Releated Posts

सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; सरकारकडून सकारात्मक आश्वासनानंतर निर्णय

मुंबई : सुधारीत निवृत्ती वेतन योजनेसह विविध १८ मागण्यांसाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला…

ByByEditorial अप्रैल 26, 2026

वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत;केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे,

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई :दि .23 :महाराष्ट्रातील मच्छीमारांना वाढत्या डिझेल दरांमुळे मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून,…

ByByEditorial मार्च 23, 2026

१७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये २७ ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली…

ByByEditorial मार्च 13, 2026

व्यावसायिक गॅस टंचाईमुळे हॉस्टेल-पीजी, हॉटेल व्यवसाय अडचणीत, अभिनेता हेमंत ढोमे यांची प्रतिक्रिया

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : बाजारात व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे हॉस्टेल्स, पेइंग गेस्ट (PG) व्यवस्था आणि हॉटेल…

ByByEditorial मार्च 11, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे