konkandhara.com

कोकणची बातमी

चिपळूण : येथील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी झालेली निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली. सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे सूर्यकांत खेतले तर उपसभापतीपदी शिवसेना (शिंदे गट) चे संदेश आयरे यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीवर १४ जागा जिंकणाऱ्या महायुतीचा झेंडा फडकला आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सूर्यकांत खेतले तर उपसभापतीपदासाठी शिवसेनेचे संदेश आयरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या दोघांचेच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी सभापती धनश्री शिंदे, जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप तसेच महाविकास आघाडी आणि महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिपळूण पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदारांनी त्रिशंकू कौल दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने स्वतंत्रपणे निवडणूक लढवत ७ जागा जिंकल्या होत्या, तर भाजप-शिवसेना युतीत शिवसेनेला ४ आणि भाजपला ३ जागा मिळाल्या होत्या. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ४ जागा मिळाल्याने सत्ता स्थापनेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. सुरुवातीला आमदार शेखर निकम हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा होती. मात्र जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेत सत्ता स्थापनेत सहभाग घेतला आणि सभापतीपद आपल्या पारड्यात पाडले. नवनिर्वाचित सभापती सूर्यकांत खेतले आणि उपसभापती संदेश आयरे यांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.

चिपळूण पंचायत समिती सभापतीपदी सूर्यकांत खेतले, उपसभापतीपदी संदेश आयरे बिनविरोध

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : येथील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी झालेली निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली. सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे सूर्यकांत खेतले तर उपसभापतीपदी शिवसेना (शिंदे गट) चे संदेश आयरे यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीवर १४ जागा जिंकणाऱ्या महायुतीचा झेंडा फडकला आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सूर्यकांत खेतले तर उपसभापतीपदासाठी शिवसेनेचे संदेश आयरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या दोघांचेच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली.यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी सभापती धनश्री शिंदे, जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप तसेच महाविकास आघाडी आणि महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिपळूण पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदारांनी त्रिशंकू कौल दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने स्वतंत्रपणे निवडणूक लढवत ७ जागा जिंकल्या होत्या, तर भाजप-शिवसेना युतीत शिवसेनेला ४ आणि भाजपला ३ जागा मिळाल्या होत्या. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ४ जागा मिळाल्याने सत्ता स्थापनेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. सुरुवातीला आमदार शेखर निकम हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा होती. मात्र जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेत सत्ता स्थापनेत सहभाग घेतला आणि सभापतीपद आपल्या पारड्यात पाडले.नवनिर्वाचित सभापती सूर्यकांत खेतले आणि उपसभापती संदेश आयरे यांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.

चिपळूण पंचायत समिती सभापतीपदी सूर्यकांत खेतले, उपसभापतीपदी संदेश आयरे बिनविरोध Read More »

प्रतिनिधी : कोकणधारा

गुहागर पंचायत समिती सभापतीपदी प्रणव पोळेकर; उपसभापतीपदी निलेश सुर्वे बिनविरोध

प्रतिनिधी : कोकणधारा गुहागर : गुहागर पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे प्रणव पोळेकर तर उपसभापतीपदी भाजपचे निलेश सुर्वे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर तालुक्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोंडकारुळ गावचे सुपुत्र असलेले प्रणव पोळेकर हे शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते असून त्यांच्या सभापतीपदाच्या निवडीने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर भाजपचे निलेश सुर्वे यांची उपसभापतीपदी निवड झाल्याने महायुतीची ताकद पंचायत समितीत अधिक दृढ झाल्याचे मानले जात आहे. गुहागर पंचायत समितीत शिवसेना-भाजप महायुतीची सत्ता असून शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. विजयानंतर पोळेकर आणि सुर्वे यांनी अल्पावधीतच आपली कार्यक्षमता, नेतृत्वगुण आणि जनसंपर्क यामुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीची दखल घेत त्यांना ही जबाबदारी देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नूतन सभापती प्रणव पोळेकर आणि उपसभापती निलेश सुर्वे यांच्यावर तालुक्यातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

गुहागर पंचायत समिती सभापतीपदी प्रणव पोळेकर; उपसभापतीपदी निलेश सुर्वे बिनविरोध Read More »

दोडामार्ग पंचायत समिती सभापतीपदासाठी पार्वती गवस तर उपसभापतीपदी गणेशप्रसाद गवस

दोडामार्ग पंचायत समिती सभापतीपदासाठी पार्वती गवस तर उपसभापतीपदी गणेशप्रसाद गवस

प्रतिनिधी : कोकणधारा दोडामार्ग : दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये भाजपच्या माटणे पंचायत समिती सदस्या सौ.पार्वती महादेव गवस यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदी त्यांची निवड होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. सभापतीपदासाठी भाजपच्या माटणे येथील पंचायत समिती सदस्या सौ. पार्वती महादेव गवस आणि मणेरी पंचायत समिती सदस्या सौ. सोनिया अंकुश नाईक यांची नावे चर्चेत होती. महायुतीमध्ये झालेल्या चर्चेनंतर या दोघींमधील कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार पार्वती गवस यांचे नाव पुढे आले असून त्यांच्याच गळ्यात सभापतीपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदाचा कार्यकाळ सव्वा वर्ष (१५ महिने) इतका निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक सदस्याला ठराविक कालावधीसाठी संधी देण्याचे नियोजन महायुतीकडून करण्यात आले आहे. दरम्यान, शिंदे गटाच्या शिवसेनेचे कोलझर पंचायत समिती सदस्य गणेशप्रसाद गवस यांची उपसभापतीपदी निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. ते बिनविरोध निवडून येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत असून, या निवडीकडेही तालुक्याचे लक्ष लागले आहे.दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापती पदासाठी सौ.पार्वती महादेव गवस तर उपसभापती पदासाठी गणेशप्रसाद गवस या दोघांचे एकमेव अर्ज दाखल झाले आहेत

दोडामार्ग पंचायत समिती सभापतीपदासाठी पार्वती गवस तर उपसभापतीपदी गणेशप्रसाद गवस Read More »

mumbai-goa-highway-three-toll-plaza-issue

रस्ता अपूर्ण… तरी तीन टोल! मुंबई- गोवा महामार्गावर प्रवाशांचा संताप उफाळला

प्रतिनिधी : कोकणधारा माणगाव : मुंबई–गोवा महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसताना प्रवाशांवर तीन टोल नाक्यांचा भार टाकण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आधीच अपूर्ण रस्ता, निकृष्ट दर्जाचे जोडरस्ते आणि अपुऱ्या सुविधांमुळे त्रस्त असलेल्या वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर या सुमारे ९० किलोमीटरच्या अंतरात खारपाडा आणि खांब येथे दोन टोल नाके उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना एका प्रवासात दोन ठिकाणी टोल भरावा लागण्याची शक्यता आहे. याशिवाय पुढील टप्प्यात पोलादपूरजवळ लोहारे येथेही टोल वसुली सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या ठिकाणी टोल नाका उभारण्यात आला असून सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे “रस्ता पूर्ण नसताना टोल कशासाठी?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. १६ वर्षांपासून रखडलेले काम मुंबई–गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम २०११ साली सुरू झाले. मात्र निधीअभावी, पर्यावरणीय परवानग्या, भूसंपादनातील अडचणी तसेच ठेकेदारांच्या निष्क्रियतेमुळे हे काम वर्षानुवर्षे रखडत गेले. तब्बल १६ वर्षांनंतरही महामार्गाचे अनेक भाग अपूर्ण असून काही ठिकाणी अजूनही काम सुरू आहे. नागोठणे आणि कोलाड परिसरातील पुलांची कामे सुरूच आहेत, तर माणगाव आणि इंदापूर बायपासही अद्याप पूर्ण झालेले नाहीत. अनेक ठिकाणी अपूर्ण रस्त्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत टोल वसुलीची तयारी सुरू झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे. टोल दर अद्याप जाहीर नाहीत टोलचे दर किती असतील याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र लवकरच यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध होण्याची शक्यता असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. टोल सुरू झाल्यास वाहनधारकांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गावांकडे जाणारे रस्ते निकृष्ट पळस्पे ते इंदापूर या टप्प्यात अनेक गावांना जोडणारे रस्ते आहेत. मात्र हे जोडरस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे. काही ठिकाणी ब्लॉक टाकून तात्पुरते रस्ते तयार करण्यात आले असून त्यामुळे ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. सुविधा अपुऱ्या, नागरिकांचा सवाल महामार्गाचे काम पूर्ण झालेले नसताना टोल वसुलीची घाई का केली जात आहे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. अनेक ठिकाणी खड्डे, अपूर्ण पूल, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या सुविधा असताना प्रवाशांकडून टोल आकारणे योग्य नसल्याचे मत व्यक्त होत आहे. मुंबई–गोवा महामार्ग हा कोकणातील लाखो नागरिकांसाठी जीवनरेखा मानला जातो. पर्यटन, व्यापार आणि दैनंदिन प्रवासासाठी या मार्गाचे मोठे महत्त्व आहे. त्यामुळे महामार्ग पूर्ण, सुरक्षित आणि दर्जेदार झाल्यानंतरच टोल आकारणी करावी तसेच सुलभ शौचालय, स्ट्रीट लाईट, चार्जिंग आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अपूर्ण महामार्गावर टोल आकारणीचा निर्णय घेतल्यास तो कोकणवासीयांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरेल, अशी भावना सध्या सर्वत्र व्यक्त होत आहे. तसेच याविरोधात विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

रस्ता अपूर्ण… तरी तीन टोल! मुंबई- गोवा महामार्गावर प्रवाशांचा संताप उफाळला Read More »

हजारो लोकांना मनसेचे सदस्य व्हायचे; मनसैनिकांनी पुढाकार घ्यावा : राज ठाकरे

हजारो लोकांना मनसेचे सदस्य व्हायचे; मनसैनिकांनी पुढाकार घ्यावा : राज ठाकरे, मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाची रायगडावरून सुरुवात

विशेष प्रतिनिधी : कोकणधारा रायगड : “आज महाराष्ट्रात हजारो लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सदस्य व्हायचे आहे. फक्त सदस्य नव्हे तर सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यामुळे मनसैनिकांनी पुढे येत राज्यभर सदस्य नोंदणी मोहीम राबवावी,” असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २० वा वर्धापन दिन किल्ले रायगडाच्या पायथ्याशी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला राज ठाकरे पत्नी शर्मिला ठाकरे आणि पुत्र अमित ठाकरे यांच्यासह सहकुटुंब उपस्थित होते. यावेळी त्यांनी रोपवेने रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत अभिवादन केले. वर्धापन दिनानिमित्त मनसेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, “९ मार्चला वर्धापन दिन आणि १९ मार्चला गुढीपाडव्याचा मेळावा असल्यामुळे दोनदा भाषण करण्यापेक्षा सर्व मुद्द्यांवर गुढीपाडव्याच्या मेळाव्यात सविस्तर बोलणार आहे. मात्र आजपासून पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करत आहोत.” ते पुढे म्हणाले की, राज्यभरातील वर्दळीच्या ठिकाणी मनसेच्या सदस्य नोंदणीचे स्टॉल्स उभारावेत. मनसैनिकांनी लोकांपर्यंत जाऊन संवाद साधावा आणि इच्छुकांना पक्षाचे सदस्य करून घ्यावे. “आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने रायगडावरून पक्षाच्या सदस्य नोंदणीची सुरुवात करत आहोत. महाराजांचा आशीर्वाद घेऊन ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रभर राबवा,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.तसेच १९ मार्च रोजी होणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी सर्व मनसैनिकांनी आणि महाराष्ट्राच्या हितचिंतकांनी शिवतीर्थावर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असेही त्यांनी सांगितले.

हजारो लोकांना मनसेचे सदस्य व्हायचे; मनसैनिकांनी पुढाकार घ्यावा : राज ठाकरे, मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाची रायगडावरून सुरुवात Read More »

चिपळूणच्या प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाला बाधित व्यापारी-नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद

चिपळूणच्या प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाला बाधित व्यापारी-नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद

विशेष प्रतिनिधी : कोकणधारा १०५ कोटींचा प्रकल्प; शहराच्या विकासासाठी सहकार्याची ग्वाही चिपळूण : चिपळूण नगर परिषदेने शहरातील चिंचनाका ते पॉवर हाऊस, तसेच मध्यवर्ती बसस्थानक ते खेंड बावशेवाडी या प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकल्पामुळे बाधित होणारे व्यापारी व नागरिक यांची बैठक सोमवारी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठकीत बाधित व्यापारी व नागरिकांनी शहराच्या विकासासाठी सहकार्य करण्याची भूमिका घेतली. या बैठकीत नगर परिषदेचे सल्लागार व आर्किटेक्ट नागेश देशपांडे यांनी पीपीटीच्या माध्यमातून रस्ते कशा पद्धतीने उभारले जातील, गटारांची व्यवस्था, रस्त्यांचा दर्जा, फुटपाथ, तसेच संपूर्ण आराखड्याची सविस्तर माहिती दिली. या रस्ते रुंदीकरणासाठी सुमारे १०५ कोटी रुपयांचा प्रकल्प प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर व्यापारी व नागरिकांनी आपल्या शंका व प्रश्न मांडले. या प्रश्नांना नगराध्यक्ष उमेश सकपाळ, मुख्याधिकारी संजय जाधव, तसेच नगररचना विभागाच्या श्रीमती खैरमोडे यांनी समर्पक उत्तरे दिली.या वेळी बोलताना नगराध्यक्ष सकपाळ म्हणाले की, रस्ते रुंद झाल्यास शहर अधिक सुंदर होईल तसेच दळणवळणाची सुविधा सुधारेल. त्यामुळे चिपळूणची बाजारपेठ अधिक सक्षम होईल आणि व्यापाराला चालना मिळेल. नगर पालिका ‘ब’ वर्गात असल्याने उत्पन्न मर्यादित असले, तरी शहराच्या विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीत डॉ. रत्नाकर घाणेकर यांनी रस्ते रुंदीकरणासाठी निधी व अंडरग्राउंड गटार यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. त्यावर नगराध्यक्षांनी आपण हाती घेतलेले काम अर्धवट सोडणार नाही, अशी ग्वाही दिली. डॉ. प्रकाश पाटणकर यांनी रेड लाईन व ब्ल्यू लाईन संदर्भात प्रश्न उपस्थित केला. त्यावर नगराध्यक्षांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले.अभय चितळे यांनी या रस्ता प्रकल्पाला शंभर टक्के पाठिंबा असल्याचे सांगितले. तसेच टीडीआर प्रमाणपत्र तीन महिन्यांच्या आत मिळावे, अशी मागणी करण्यात आली. त्यावर नगराध्यक्षांनी तीन महिन्यांच्या आत प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले. नकाशे विनामूल्य उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी मान्य केली. नगरसेवक फैसल कासकर यांनी रस्ते रुंदीकरणाची आवश्यकता स्पष्ट करत शहराच्या भविष्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे सांगितले. राजू भागवत यांनी विकासासाठी काही काळ त्रास सहन करावा लागेल, असे मत व्यक्त केले. डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी वृक्षसंवर्धनाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर नगराध्यक्षांनी या ४.४१ किलोमीटरच्या रस्त्यांवर सुमारे ४५० वृक्ष लागवडीची तरतूद करण्यात आल्याचे सांगितले. राजू भागवत यांच्या सूचनेनुसार काही वृक्ष नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मुळासकट उचलून अन्य ठिकाणी लावण्याबाबतही विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले. या बैठकीला मुख्याधिकारी संजय जाधव, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, आरोग्य विभागाचे वैभव निवाते, सुजित जाधव, उद्यान विभागाचे बापू साडविलकर, पाणीपुरवठा विभागाचे रोहित खाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर यांच्यासह नगरसेवक मिस्बाह नाखुदा, उदय जुवळे, सफा गोठे, प्रमोद बुरटे, अजय भालेकर, वैशाली कदम, निहार कोवळे, नसरीन खडस, वैशाली निमकर, संजय गोताड, संदीप भिसे, हर्षाली पवार, शैनाज वांगडे, योगेश पवार, अंजली कदम, शशिकांत मोदी, रसिका देवळेकर, विक्रांत उर्फ कपिल शिर्के, निलम जाधव, अंकुश आवले, उमा उर्फ शिल्पा देसाई, शुभम पिसे, गणेश आग्रे, पल्लवी महाडिक, कांचन शिंदे, मिथिलेश नरळकर, शितल रानडे, विकी लवेकर आदी उपस्थित होते.

चिपळूणच्या प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाला बाधित व्यापारी-नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद Read More »

दोडामार्ग पंचायत समिती सभापती निवड आज; भाजपच्या पार्वती गवस की सोनिया नाईक?

दोडामार्ग पंचायत समिती सभापती निवड आज; भाजपच्या पार्वती गवस की सोनिया नाईक?

दोडामार्ग : भूषण सावंत  दोडामार्ग : पंचायत समिती दोडामार्ग येथे आज सभापती आणि उपसभापती पदाची निवड होणार असून या निवडीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. महायुतीच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी पहिल्या टप्प्यात भाजपला संधी मिळणार आहे. त्यामुळे भाजपच्या दोन महिला सदस्यांपैकी सभापतीपदाची संधी नेमकी कुणाला मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. सभापतीपदासाठी भाजपच्या माटणे पंचायत समिती सदस्य सौ. पार्वती महादेव गवस आणि मणेरी पंचायत समिती सदस्य सौ. सोनिया अंकुश नाईक यांची नावे चर्चेत आहेत. विजयानंतर या दोघींमधील कोणाला सभापतीपदाची संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदाचा कार्यकाळ सव्वा वर्ष (१५ महिने) असा राहणार आहे. त्यानुसार प्रत्येक सदस्याला ठराविक कालावधीसाठी संधी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, शिंदे गटाच्या शिवसेनेचे बिनविरोध कोलझर पंचायत समिती सदस्य गणेशप्रसाद गवस यांची उपसभापतीपदी निवड जवळपास निश्चित मानली जात असून ते बिनविरोध निवडून येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आज होणाऱ्या या निवड प्रक्रियेनंतर दोडामार्ग पंचायत समितीच्या नेतृत्वाची दिशा स्पष्ट होणार असून तालुक्यातील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.  

दोडामार्ग पंचायत समिती सभापती निवड आज; भाजपच्या पार्वती गवस की सोनिया नाईक? Read More »

मुंबई–गोवा महामार्गावर दुचाकी अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

मुंबई–गोवा महामार्गावर दुचाकी अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा खेड : मुंबई–गोवा महामार्गावर भरणे शिंदेवाडी येथे भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना शनिवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अद्वैत प्रवीण गीते हा तरुण आपल्या मित्रासह रॉयल एनफिल्ड जीटी ६५० (एमएच ०८ बीबी ५७९०) या दुचाकीवरून मुंबई–गोवा महामार्गावरून कळंबनीच्या दिशेने जात होता. भरणे गावाच्या हद्दीत शिंदेवाडी परिसरात दुचाकी भरधाव वेगात असताना चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकी महामार्गावर घसरली. या अपघातात अद्वैत महामार्गाच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरवर जोरात आपटला. डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेला अद्वैतचा मित्रही गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ कळंबनी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अद्वैत गीते हा नवभारत हायस्कूलचे शिक्षक प्रवीण गीते यांचा मुलगा असून त्यांचे मूळ गाव खेड तालुक्यातील तिसंगी आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नातेवाईक, हितचिंतक आणि मित्रपरिवाराने घटनास्थळी धाव घेतली. मात्र अद्वैतचा जागीच मृत्यू झाल्याचे समजताच परिसरात शोककळा पसरली.दरम्यान, अद्वैत आपल्या मित्रांसोबत जेवणासाठी महामार्गावरून कळंबनीच्या दिशेने जात असताना हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

मुंबई–गोवा महामार्गावर दुचाकी अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू Read More »

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातील अत्याधुनिक सभागृह कलाकारांसाठी खुले – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातील अत्याधुनिक सभागृह कलाकारांसाठी खुले – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा रत्नागिरी : रत्नागिरीतील स्थानिक कलाकारांच्या हक्काच्या व्यासपीठाची प्रतीक्षा आता संपली असून रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातील नूतनीकृत आणि अत्याधुनिक सभागृह स्थानिक कलाकारांसाठी समर्पित करण्यात आले आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्रात शनिवारी रात्री या नूतनीकृत सभागृहाचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला.उद्घाटन प्रसंगी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आणि वेदपाठशाळेतील विद्यार्थ्यांच्या मंगल मंत्रोच्चारात कोनशिलेचे अनावरण व दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. कार्यक्रमात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या बी.ए. परफॉर्मिंग आर्ट्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्रा. आनंद आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोककला, भारुड आणि लोकगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर केला. तसेच नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या मीनार गजानन पाटील यांचे पालकमंत्री डॉ. सामंत यांनी विशेष कौतुक केले. तसेच प्रा. आनंद आंबेकर आणि डॉ. शशांक पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. उदय सामंत म्हणाले की, “रत्नागिरीत कलाकारांसाठी अत्याधुनिक सभागृहाची गरज होती. ही गरज ओळखून अत्यंत कमी कालावधीत हे सभागृह सज्ज करण्यात आले असून या माध्यमातून रत्नागिरीच्या समृद्ध संस्कृतीला आणि कलाविश्वाला नवे बळ मिळेल.” या कार्यक्रमाला नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे, डॉ. राजश्री देशपांडे, प्राचार्य कीर्तीकुमार भोसले, समीर इंदुलकर, अनिल दांडेकर यांच्यासह नगरसेवक, कलाकार आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिनकर मराठे यांनी केले. तसेच पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या कार्याचा गौरव करणारे पद्यरूप गौरवपत्र यावेळी त्यांना प्रदान करण्यात आले.

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातील अत्याधुनिक सभागृह कलाकारांसाठी खुले – पालकमंत्री डॉ. उदय सामंत Read More »

kajal-shirsat-bds-dentist-pal-punarvasan-dodamarg

पाल पुनर्वसनच्या काजल शिरसाट दंतवैद्य बनल्या ; BDS पदवी संपादन करून तालुक्याचा मान उंचावला

दोडामार्ग / भूषण सावंत दोडामार्ग : पाल पुनर्वसन (ता. दोडामार्ग) येथील शरद कृष्णा शिरसाट यांची कन्या काजल शरद शिरसाट हिने Pandit Deendayal Upadhyay Dental College, सोलापूर येथून BDS (Bachelor of Dental Surgery) हा ४+१ वर्षांचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून दंतवैद्य ही पदवी संपादन केली आहे. सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पदवी प्रदान समारंभात तिला अधिकृतरीत्या ही पदवी बहाल करण्यात आली. काजल शिरसाट हिने कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दंतवैद्यकीय शिक्षण पूर्ण करत आपल्या कुटुंबाचे तसेच पाल पुनर्वसन परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे. BDS हा पाच वर्षांचा अभ्यासक्रम असून त्यामध्ये चार वर्षांचा शैक्षणिक अभ्यासक्रम आणि एक वर्षाची अनिवार्य इंटर्नशिप असते. या कालावधीत विद्यार्थ्यांना दातांचे विविध आजार, त्यांचे निदान, उपचार पद्धती, शस्त्रक्रिया तसेच आधुनिक दंतवैद्यकीय तंत्रज्ञानाचे सखोल प्रशिक्षण दिले जाते. सोलापूर येथील Pandit Deendayal Upadhyay Dental College हे दंतवैद्यकीय शिक्षणासाठी प्रसिद्ध महाविद्यालय मानले जाते. येथे आधुनिक साधनसामग्री आणि अनुभवी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जाते. या महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करून काजल शिरसाट आता समाजसेवेसाठी सज्ज झाल्या आहेत. काजल शिरसाट यांच्या या यशामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह पाल पुनर्वसन व परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक मान्यवर व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर उच्च शिक्षण घेऊन यश संपादन करावे, यासाठी काजल शिरसाट या प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत. त्यांच्या या यशामुळे पाल पुनर्वसनसह दोडामार्ग तालुक्याचा अभिमान अधिक उंचावला आहे.  

पाल पुनर्वसनच्या काजल शिरसाट दंतवैद्य बनल्या ; BDS पदवी संपादन करून तालुक्याचा मान उंचावला Read More »