konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • दोडामार्ग पंचायत समिती सभापतीपदासाठी पार्वती गवस तर उपसभापतीपदी गणेशप्रसाद गवस
दोडामार्ग पंचायत समिती सभापतीपदासाठी पार्वती गवस तर उपसभापतीपदी गणेशप्रसाद गवस

दोडामार्ग पंचायत समिती सभापतीपदासाठी पार्वती गवस तर उपसभापतीपदी गणेशप्रसाद गवस

प्रतिनिधी : कोकणधारा

दोडामार्ग : दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये भाजपच्या माटणे पंचायत समिती सदस्या सौ.पार्वती महादेव गवस यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदी त्यांची निवड होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.


सभापतीपदासाठी भाजपच्या माटणे येथील पंचायत समिती सदस्या सौ. पार्वती महादेव गवस आणि मणेरी पंचायत समिती सदस्या सौ. सोनिया अंकुश नाईक यांची नावे चर्चेत होती.


महायुतीमध्ये झालेल्या चर्चेनंतर या दोघींमधील कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार पार्वती गवस यांचे नाव पुढे आले असून त्यांच्याच गळ्यात सभापतीपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


महायुतीच्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदाचा कार्यकाळ सव्वा वर्ष (१५ महिने) इतका निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक सदस्याला ठराविक कालावधीसाठी संधी देण्याचे नियोजन महायुतीकडून करण्यात आले आहे.


दरम्यान, शिंदे गटाच्या शिवसेनेचे कोलझर पंचायत समिती सदस्य गणेशप्रसाद गवस यांची उपसभापतीपदी निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. ते बिनविरोध निवडून येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत असून, या निवडीकडेही तालुक्याचे लक्ष लागले आहे.
दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापती पदासाठी सौ.पार्वती महादेव गवस तर उपसभापती पदासाठी गणेशप्रसाद गवस या दोघांचे एकमेव अर्ज दाखल झाले आहेत

Releated Posts

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार

रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध…

ByByEditorial मई 15, 2026

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी

प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर सावंतवाडी : भूषण…

ByByEditorial मई 15, 2026

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा सिंधुदुर्ग : भूषण सावंत : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना…

ByByEditorial मई 15, 2026

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे

तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद कोलाड (शरद जाधव ) जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील…

ByByEditorial मई 15, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान