konkandhara.com

राजकारण

WhatsApp Image 2025 09 26 at 3.56.03 AM

मराठा आरक्षणावरून छगन भुजबळांचा अजित पवारांना कडाडून विरोध

🌧️ “या वर्षी शेतकऱ्यांचे नुकसानभरपाईचे पैसे थेट नाहीत!” – अतिवृष्टीमुळे शेतकरी नारा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेती, गुरं आणि घर-दार गमावलेल्या शेतकरी कुटुंबांवर संकटाचं विळखं वाढलं आहे. मात्र आता शेतकऱ्यांसाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सांगितले की, यंदाच्या अतिवृष्टीसाठी शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळणार नाहीत. पीकविम्याच्या नव्या नियमानुसार केवळ कापणीअंती उत्पादनावर आधारित नुकसानभरपाई मिळू शकते. त्यामुळे आताच्या अतिवृष्टीतून नुकसान भरपाई मिळणे शक्य नाही. यासाठी शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार मदत करण्यात येईल, असे पापळकर यांनी स्पष्ट केले. याबाबत त्यांनी पंचनाम्यांबाबतही माहिती दिली. जुलै आणि ऑगस्ट महिन्यापर्यंतचे पंचनामे पूर्ण करून त्याचे अंतिम अहवाल सरकारला सादर केले गेले आहेत. आतापर्यंत नुकसानभरपाईसाठी 697 कोटी रुपये मिळाले असून, उर्वरित 721 कोटी रुपये येत्या काही दिवसांत प्राप्त होणार आहेत. जुन्या योजनेत पाच घटकांवर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत होती – उगवण न होणे, स्थानिक आपत्ती, मिड अॅडव्हर्सिटी, पोस्ट हार्व्हेस्टिंग आणि उत्पादन आधारित नुकसान. मात्र नव्या योजनेत केवळ उत्पादनावर आधारित नुकसानभरपाई मिळेल आणि मर्यादा 50 टक्क्यांपर्यंत आहे. या कारणास्तव पूर्वीच्या योजनेप्रमाणे आजच्या अतिवृष्टीसाठी मोठ्या प्रमाणात नुकसानभरपाई मिळणे शक्य नाही. शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई लवकर मिळवण्यासाठी काही महत्त्वाचे पावले उचलली पाहिजेत. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, त्यांनी आपले ई-केवायसी करणे आवश्यक आहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तातडीने नुकसानभरपाई जमा होईल. सरकारकडून आलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यासाठी तालुका पातळीवर कार्यरत एक टीम काम करत आहे. या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना भरलेल्या आर्थिक संकटात या नव्या नियमांनी आणखी मोठा ताण निर्माण केला आहे, त्यामुळे शेतकरी आता सरकारी मदतीवरच अवलंबून आहेत.

मराठा आरक्षणावरून छगन भुजबळांचा अजित पवारांना कडाडून विरोध Read More »

WhatsApp Image 2025 09 26 at 3.31.25 AM

बार्शीत 76 हजार हेक्टर पिकांचे नुकसान; संतप्त शेतकऱ्यांनी भरत गोगावले यांचा ताफा अडवला

सोलापूर : राज्यात सलग मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे. नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री पूरग्रस्त भागांच्या पाहणीसाठी रवाना झाले. या पार्श्वभूमीवर, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात आज शिवसेना मंत्री भरत गोगावले यांच्या ताफ्याला संतप्त शेतकऱ्यांनी अडवत सरकारच्या मदतीवर जोरदार नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2215 कोटींची मदत जाहीर केली आहे. मात्र, ती मदत तुटपुंजी असल्याचा आरोप शेतकरी सातत्याने करत आहेत. विरोधी पक्षाने हेक्टरी 30 ते 50 हजार रुपयांची मागणी केली आहे. त्याच धर्तीवर बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनीही सरकारने जाहीर केलेली मदत नगण्य असल्याचे सांगत संताप व्यक्त केला. कारी गावातील एका शेतकऱ्याने थेट भरत गोगावले यांना उद्देशून, “गोगावले शेठ, आमच्या तळवटाचे पैसे निघत नाहीत. एकरी फक्त 3400 रुपये सरकार देतंय, सोयाबिनला 6 हजार रुपयांचा भाव आहे, हे आम्ही टिंगल नाही म्हणणार तर काय?” अशा शब्दांत रोष व्यक्त केला. यावेळी, शेतकऱ्यांनी एकमुखीपणे सरकारने हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी केली. दरम्यान, माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी संतप्त शेतकऱ्यांशी चर्चा केली, तर मंत्री भरत गोगावले यांनीही गाडीतून उतरून शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. “निवडणुका झाल्या की मदतीच्या निकषात बदल करता. फुकटातील विमा बंद करून शेतकऱ्यांचं नुकसान केलं,” असा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केला. 🌧️ अतिवृष्टीचे प्रमाणबार्शी तालुक्यात यंदा मे महिन्यापासूनच पावसाळा सुरू झाला. मे महिन्यात सरासरीच्या 12 पट पाऊस झाला. सप्टेंबरअखेर तालुक्यात 980 मिलिमीटर पावसाची नोंद झाली, जी सरासरीपेक्षा दुप्पट आहे. सततच्या पावसामुळे सर्व प्रमुख नद्यांना पूर आला असून 35 गावांतील नागरिकांना मोठा फटका बसला. 🌾 पिकांचे व जनावरांचे मोठे नुकसानतहसील प्रशासनाच्या आकडेवारीनुसार बार्शी तालुक्यातील 78 हजार शेतकऱ्यांच्या 75 हजार 874 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबिनसह फळबागा, द्राक्षबागा यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याशिवाय, 155 घरांची पडझड झाली, 40 जनावरे व 18 हजार कोंबड्या वाहून गेल्या. एकीकडे शेतकरी अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाले आहेत, तर दुसरीकडे सरकारच्या मदतीवर असमाधान व्यक्त करून ते आंदोलनाच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे.

बार्शीत 76 हजार हेक्टर पिकांचे नुकसान; संतप्त शेतकऱ्यांनी भरत गोगावले यांचा ताफा अडवला Read More »

Web Banner 8

तर सरकारला स्वस्त बसू देणार – बच्चू कडूंचा इशारा

चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा सरकारला कठोर शब्दांत इशारा देत माजी आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. “जोपर्यंत शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, तोपर्यंत सरकारला स्वस्त बसू देणार नाही. वेळ आली तर नेपाळसारखे घरात घुसू,” अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला. चंद्रपूर जिल्ह्यातील पाथरी गावात झालेल्या जनसभेत ते बोलत होते. या सभेत कडू यांनी शेतकरी आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. “सरकार शेतकऱ्यांना सातत्याने लुटत आहे. आम्हाला पेटवणं जमणार नाही, पण घरात बांधून ठेवण्याची ताकद आहे,” असं म्हणत त्यांनी सरकारला लक्ष्य केलं. यावेळी कडू यांनी शेतकऱ्यांसाठी 28 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आंदोलनाची रूपरेषाही स्पष्ट केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, शेतमालाला भाव द्यावा यासाठी ते गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मागणी करत आहेत. “देशातील 200 उद्योगपत्यांचे 18 ते 24 लाख कोटी कर्ज सरकार माफ करू शकते, पण शेतकऱ्यांचे 30–40 हजार कोटींचं कर्ज माफ करायला तयार नाही. सोयाबीन, तूर, धान याला 20 टक्के बोनस आणि जीएसटीचा परतावा द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी इशारा दिला की, “15 ऑक्टोबरच्या आत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाली नाही, तर आम्ही सोयाबीन कलेक्टर आणि पालकमंत्र्यांच्या घरात नेऊन ठेवणार.” सभाेत बोलताना बच्चू कडू यांनी पुढे सांगितले, “मी कुठल्याही जातीसाठी बोलणार नाही. प्रत्येक जातीने आपले आरक्षणासाठी लढावं, पण मी फक्त शेतकऱ्यांसाठी लढणार. शेतकरी हा प्रत्येक जाती-धर्मात आहे. त्यांच्यासाठी मी आयुष्य वाहणार आहे.” गोरक्षणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली. “गोरक्षणाच्या नावाखाली काही गुंड-कार्यकर्त्यांचे पोट भरते, पण गाईला शेतकऱ्यांकडे ठेवलं तर काहीच मदत मिळत नाही. गोरक्षकांना अनुदान देता, मग शेतकऱ्यांना का नाही?” असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, गोदावरी पट्टा पूरग्रस्त असतानाही मुख्यमंत्री फडणवीस दौऱ्यावर गेले नाहीत, अशी टीकाही कडू यांनी यावेळी केली. “हेच लोक उद्धव ठाकरेंना नाव ठेवत होते, पण आता स्वतः ऑनलाईन झाले आहेत,” असे म्हणत त्यांनी टोला लगावला.

तर सरकारला स्वस्त बसू देणार – बच्चू कडूंचा इशारा Read More »

Web Banner 7

मुंबई : सदा सरवणकर यांच्या वक्तव्यावरून गदारोळ; महेश सावंतांची शिंदेंसमोर आक्रमक भूमिका

मुंबई : शिवसेना नेते आणि माजी आमदार सदा सरवणकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून मुंबई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शनिवारी मोठा गदारोळ झाला. शिवसेना (ठाकरे गट) आमदार महेश सावंत यांनी थेट पोस्टर दाखवत सरवणकरांच्या दोन दिवसांपूर्वीच्या वक्तव्याचा उल्लेख केला आणि सरकारवर जोरदार टीका केली. सरवणकर यांनी नुकतंच, “आमदारांना दोन कोटी निधी मिळतो, पण मी आमदार नसतानाही मला 20 कोटींचा निधी मिळतो,” असं विधान केलं होतं. याच पार्श्वभूमीवर सावंत यांनी बैठकीत संताप व्यक्त केला. “तुमच्या आमदारांना तुम्ही निधी दिलात आणि त्यांनी स्वतःचा विकास केला. पण आम्हाला निधी मिळत नाही. माजी आमदार बोलत आहेत की त्यांना 20 कोटी निधी मिळतो, आणि आम्हाला निधी मिळत नाही,” असा सवाल सावंतांनी थेट पालकमंत्री एकनाथ शिंदेंसमोर केला. यावेळी सावंतांनी आणखी कठोर शब्दांत इशारा दिला – “तुमच्या नावाने दादागिरी सुरू आहे, पण आम्हीही ‘दादा’गिरीतून आलो आहोत. माजी आमदारांना खूप निधी दिला, पण कामे झाली नाहीत. त्यांनी तो निधी स्वतःचा विकास करण्यासाठी वापरला आहे. त्यामुळे साहेब, तुम्ही तुमच्या माजी आमदारांना समज द्यावी, त्यांना कानमंत्र द्यावा.” दरम्यान, सावंत यांनी स्थानिक विकासाच्या विविध मागण्याही पुढे केल्या. माहिम किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी निधी द्यावा, माहिममध्ये सायकलिंग ट्रॅक उभारावा, तसेच जीर्ण अवस्थेतील शाळांची डागडुजी करून विद्यार्थ्यांना वर्ग मिळावेत, अशी मागणी त्यांनी केली. सिद्धिविनायक मेट्रो स्थानकासमोरील आकर्षक हत्तीचा पुतळा आजही बसविला गेला नाही, कारण मेट्रो आणि पालिकेत ताळमेळ नाही, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. याशिवाय, दादर विभागातील पोलीस स्थानक म्हाडाच्या इमारतीत कार्यरत आहे, त्याला स्वतंत्र जागा द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. तसेच, मुंबईतील सर्व पुतळ्यांजवळ सीसीटीव्ही बसविण्याचं आवाहनही त्यांनी केलं. या सर्व प्रकरणामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वातावरण तापलं आणि विरोधी पक्षाचा आमदार निधी या प्रश्नावरून आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

मुंबई : सदा सरवणकर यांच्या वक्तव्यावरून गदारोळ; महेश सावंतांची शिंदेंसमोर आक्रमक भूमिका Read More »

Web Banner 3

महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा – सांगलीत डॉ. अमोल कोल्हेंचा जोरदार इशारा!

सांगलीत महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा: डॉ. अमोल कोल्हे यांचा सडेतोड इशारा सांगली – महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाच्या निमित्ताने सांगलीत उत्स्फूर्त जनसमुदाय एकत्र आला होता. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आ. जयंतराव पाटील यांचा वारसा आणि संस्कृत परंपरा यांचा गौरव करण्यात आला. मोर्चात भाषण करताना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अलीकडच्या राजकीय वातावरणावर थेट हल्ला चढवला. त्यांनी सांगितले की, “महाराष्ट्राची भूमी ही शिव्यांचा नाही तर ओव्यांचा वारसा सांगणारी आहे. स्व. यशवंतराव चव्हाणपासून शरद पवार साहेबांपर्यंतच्या सर्व नेत्यांनी ही सुसंस्कृत परंपरा जपली. मात्र काही स्वयंघोषित नेत्यांनी वाचाळवीरांचा आधार घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात गोंधळ माजवला आहे.” यावेळी डॉ. कोल्हे यांनी विशेषतः स्व. राजारामबापू पाटील यांचा अपमान केल्याचा निषेध नोंदवला. सहकार चळवळीतील त्यांचे योगदान, शेतकऱ्यांना दिलेला समृद्धीचा मार्ग हा महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले. “महाराष्ट्र हे सहन करणार नाही. तुमच्या सत्तेपेक्षा, राजकीय अस्तित्वापेक्षा महाराष्ट्राची संस्कृती मोठी आहे. या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सक्षम आहे, हेच सांगलीत अनुभवले.” – डॉ. अमोल कोल्हे मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते, नागरिक आणि सांस्कृतिक कार्यकर्त्यांचा सहभाग होता. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय वारशाचे रक्षण करण्याचा निर्धार या मोर्चातून व्यक्त करण्यात आला.

महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा – सांगलीत डॉ. अमोल कोल्हेंचा जोरदार इशारा! Read More »

Web Banner 1 1

हाके यांचा ऑडिओ क्लिप वाद | नितीन गडकरींच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया

ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनात आघाडीवर असलेले नेते लक्ष्मण हाके पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांचा एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यात एका तरुणाशी झालेल्या संभाषणात हाके यांनी आपला ड्रायव्हरचा यूपीआय नंबर देऊन पैसे घेण्याची तयारी दाखवल्याचा आरोप आहे. या संभाषणात तरुणाने “तुम्ही समाजासाठी एवढं धावताय, पेट्रोलसाठी मदत करतो” असं सांगत एक लाख रुपयांपर्यंत UPI द्वारे पाठवण्याची तयारी दर्शवली. त्यावर हाके यांनी “मी अकाउंटवर पैसे घेत नाही, ड्रायव्हरचा नंबर देतो” असं म्हटल्याचं ऐकायला मिळतं. परंतु शेवटी त्याच तरुणाने हाके यांना सुनावत, “तुम्ही सुपाऱ्या घेऊन समाजविरोधी काम करता, लाज कशी वाटत नाही?” अशी टीका करत फोन कट केल्याचं क्लिपमध्ये आहे. या क्लिपवर प्रतिक्रिया देताना हाके म्हणाले, “हा माझा नव्हे तर मला पैसे देणाऱ्या व्यक्तीचा हेतू संशयास्पद आहे. मला मुद्दाम बदनाम करण्यासाठी अशा क्लिप्स व्हायरल केल्या जात आहेत. ओबीसींचा आवाज दाबण्यासाठी हे षडयंत्र आहे, पण माझं आंदोलन थांबणार नाही.” दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात “मी ब्राह्मण जातीचा आहे, आमच्यावर परमेश्वराने सर्वात मोठा उपकार केला तर तो म्हणजे आम्हाला आरक्षण नाही” असे वक्तव्य केले होते. यावर हाके यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, “मीही देवाला प्रार्थना करीन की पुढच्या जन्मी मला ब्राह्मण समाजात जन्म द्या, तेव्हाच त्यांना कळेल.” हाके यांनी पुढे मनोज जरांगेवरही टीका करत, “जरांगे यांनी दिल्ली नाही तर आफ्रिकेत आंदोलन करायला हवं, तिथे जास्त गरज आहे” असं म्हटलं.

हाके यांचा ऑडिओ क्लिप वाद | नितीन गडकरींच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया Read More »

Web Banner 2

सदा सरवणकर यांच्या वक्तव्याने खळबळ!

सदा सरवणकर यांचे वादग्रस्त वक्तव्य | आमदार निधी वाटपावरून माहिममध्ये राजकीय खळबळ मी आमदार नसतानाही मला 20 कोटी मिळतात” – माहिममधून नवा वाद पेटला मुंबई :माहिम मतदारसंघाचे माजी आमदार व शिवसेना (शिंदे गट) उमेदवार सदा सरवणकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वादंग निर्माण झाले आहे. सरवणकर यांनी स्पष्टपणे सांगितले – “आजचा आमदार फक्त 2 कोटी रुपयांचा निधी घेतो. पण मी आमदार नसतानाही मला 20 कोटी रुपयांचा निधी मिळतो. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्या मागे ठामपणे उभे आहेत.” त्यांनी पुढे बोलताना दावा केला की, “काम करणाऱ्यांना पराभव पत्करावा लागतो, पण काम न करणारे जाती-पातीच्या आधारावर जिंकतात. माझा पिंड हा कामाचा असल्यामुळे मी सतत विविध कामांच्या उद्घाटनासाठी दिसतो.” 🔥 विरोधकांचा पलटवार सरवणकर यांच्या वक्तव्यावर शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाला आहे. माहिमचे विद्यमान आमदार महेश सावंत यांनी पलटवार करत विचारले – “जनतेने पराभूत केलेल्या माजी आमदाराला 20 कोटी निधी देणे हा मतदारांचा अपमान आहे. निवडून दिलेल्या आमदारांना निधी न देणे हा सरळसरळ अन्याय आहे. आतापर्यंत त्यांना 500 कोटींपेक्षा जास्त निधी मिळाला. हा पैसा गेला कुठे?” सावंत यांनी जाहीर केले की, ते विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांच्याकडे औपचारिक तक्रार करणार आहेत. तर ठाकरे गटाचे अखिल चित्रे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले –“सत्ताधाऱ्यांना मुजोरी चढली आहे. आमदार निधी वाटपाची पद्धत चुकीची आहे. या प्रकरणाची चौकशी ईडीकडून व्हावी.” 📌 पार्श्वभूमी आमदार निधी हा स्थानिक विकासासाठी देण्यात येणारा निधी असून, त्याचा वापर मतदारसंघातील सार्वजनिक कामांसाठी करणे अपेक्षित असते. पण अनेकदा या निधीचे वाटप सत्ताधारी- विरोधी गटातील भेदभावावर अवलंबून असल्याचे आरोप होत असतात. सरवणकर यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा निधी वाटपातील पारदर्शकता व न्याय्यतेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. या घडामोडींमुळे माहिम मतदारसंघासोबतच संपूर्ण राज्यातील आमदार निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विरोधी पक्ष आता या मुद्यावरून सरकारला घेरण्याच्या तयारीत असून, पुढील काही दिवसांत हा वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

सदा सरवणकर यांच्या वक्तव्याने खळबळ! Read More »

Web Banner 16

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांना थेट प्रत्युत्तर दिलं

शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ‘अर्धे पाकिस्तानी’ अशी जहरी टीका केली होती. राऊतांच्या या वक्तव्यावरून राज्यात मोठी खळबळ उडाली असून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांना थेट प्रत्युत्तर दिलं आहे. मिटकरी यांनी अत्यंत संतप्त भाषेत राऊतांवर घणाघाती हल्ला चढवत म्हटलं की, “संजय राऊतांचा बापच दाऊद इब्राहिम असल्याने ते अशी भाषा वापरतात. अजित पवारांवर बोलायची राऊतांची लायकीच नाही. त्यांच्या जीभेला हासडले पाहिजे.” 👉 नेमकं काय म्हणाले राऊत?पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना खेळण्याला विरोध करताना राऊतांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. “अजित पवारांच्या अंगात पाकड्यांचे रक्त आहे, ते अर्धे पाकिस्तानी आहेत. जर महाराष्ट्रातील एका मंत्र्यांची ही भाषा असेल, तर ती राष्ट्रभक्त नागरिकाची नाही,” असे ते म्हणाले होते. 👉 अजित पवारांचं स्पष्टीकरणखेळाकडे खेळाच्या नजरेतून पाहणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं होतं. तसेच, विरोधक फक्त सत्ताधाऱ्यांना विरोध करण्यासाठी मुद्दाम भावनिक विषयांचा वापर करतात, अशी टीकाही त्यांनी केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांना थेट प्रत्युत्तर दिलं Read More »

WhatsApp Image 2025 09 12 at 10.34.27 AM

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता विजयी, राष्ट्रवादीचा पाठिंबा निर्णायक

पाली (10 सप्टेंबर) – अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पराग मेहता विजयी झाले आहेत. 15 पैकी 9 मते मिळवत त्यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवार कल्याणी दबके यांचा पराभव केला. तर एक मत तटस्थ राहिले. सुरुवातीला तिरंगी लढतीचे चित्र होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नलिनी म्हात्रे यांनी आपला अर्ज मागे घेत मेहता यांना पाठिंबा दिला. अखेरच्या क्षणी झालेल्या या राजकीय हालचालींमुळे भाजप-राष्ट्रवादी आघाडीला बळ मिळाले. निवडणुकीच्या निकालानंतर ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत मोठा जल्लोष साजरा झाला. या विजयानंतर भाजप आणि राष्ट्रवादी आघाडीला महत्त्वाचा राजकीय टप्पा गाठता आला असून आगामी काळात पाली नगरपंचायतीचे राजकारण याच निकालाच्या छायेत ठरणार आहे. खासदार धैर्यशील पाटील यांनी पालीच्या शाश्वत विकासाची ग्वाही दिली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे, भाजप नेते वैकुंठ पाटील, प्रकाशभाऊ देसाई यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते .

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता विजयी, राष्ट्रवादीचा पाठिंबा निर्णायक Read More »

WhatsApp Image 2025 09 12 at 10.34.26 AM

म्हसळा नगराध्यक्षपदी फरीन बशारत, उपनगराध्यक्षपदी अनिकेत पानसरे – अधिकृत घोषणा

म्हसळा : म्हसळा नगरपंचायत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची अधिकृत घोषणा बुधवारी करण्यात आली. उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांनी नगराध्यक्षपदी नगरसेविका फरीन अ. अजीज बशारत तर उपनगराध्यक्षपदी नगरसेवक अनिकेत पानसरे यांच्या नावाची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसची म्हसळा नगरपंचायतीत एकहाती सत्ता असून मावळते नगराध्यक्ष संजय कर्णिक आणि उपनगराध्यक्ष संजय दिवेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांना संधी मिळावी म्हणून राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत दोघांचेही अर्ज एकमेव दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार नगराध्यक्षपदी फरीन बशारत आणि उपनगराध्यक्षपदी अनिकेत पानसरे यांना संधी देण्यात आली. या निवडीच्या वेळी शहराध्यक्ष रियाज घराडे, मावळते नगराध्यक्ष संजय कर्णिक, माजी उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, तसेच नगरसेवक-नगरसेविका आणि पदाधिकारी उपस्थित होते.

म्हसळा नगराध्यक्षपदी फरीन बशारत, उपनगराध्यक्षपदी अनिकेत पानसरे – अधिकृत घोषणा Read More »