konkandhara.com

  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठा आरक्षणावरून छगन भुजबळांचा अजित पवारांना कडाडून विरोध
Image

मराठा आरक्षणावरून छगन भुजबळांचा अजित पवारांना कडाडून विरोध


🌧️ “या वर्षी शेतकऱ्यांचे नुकसानभरपाईचे पैसे थेट नाहीत!” – अतिवृष्टीमुळे शेतकरी नारा

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेती, गुरं आणि घर-दार गमावलेल्या शेतकरी कुटुंबांवर संकटाचं विळखं वाढलं आहे. मात्र आता शेतकऱ्यांसाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे.

छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सांगितले की, यंदाच्या अतिवृष्टीसाठी शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळणार नाहीत. पीकविम्याच्या नव्या नियमानुसार केवळ कापणीअंती उत्पादनावर आधारित नुकसानभरपाई मिळू शकते. त्यामुळे आताच्या अतिवृष्टीतून नुकसान भरपाई मिळणे शक्य नाही. यासाठी शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार मदत करण्यात येईल, असे पापळकर यांनी स्पष्ट केले.

याबाबत त्यांनी पंचनाम्यांबाबतही माहिती दिली. जुलै आणि ऑगस्ट महिन्यापर्यंतचे पंचनामे पूर्ण करून त्याचे अंतिम अहवाल सरकारला सादर केले गेले आहेत. आतापर्यंत नुकसानभरपाईसाठी 697 कोटी रुपये मिळाले असून, उर्वरित 721 कोटी रुपये येत्या काही दिवसांत प्राप्त होणार आहेत.

जुन्या योजनेत पाच घटकांवर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत होती – उगवण न होणे, स्थानिक आपत्ती, मिड अॅडव्हर्सिटी, पोस्ट हार्व्हेस्टिंग आणि उत्पादन आधारित नुकसान. मात्र नव्या योजनेत केवळ उत्पादनावर आधारित नुकसानभरपाई मिळेल आणि मर्यादा 50 टक्क्यांपर्यंत आहे. या कारणास्तव पूर्वीच्या योजनेप्रमाणे आजच्या अतिवृष्टीसाठी मोठ्या प्रमाणात नुकसानभरपाई मिळणे शक्य नाही.

शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई लवकर मिळवण्यासाठी काही महत्त्वाचे पावले उचलली पाहिजेत. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, त्यांनी आपले ई-केवायसी करणे आवश्यक आहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तातडीने नुकसानभरपाई जमा होईल. सरकारकडून आलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यासाठी तालुका पातळीवर कार्यरत एक टीम काम करत आहे.

या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना भरलेल्या आर्थिक संकटात या नव्या नियमांनी आणखी मोठा ताण निर्माण केला आहे, त्यामुळे शेतकरी आता सरकारी मदतीवरच अवलंबून आहेत.

Releated Posts

सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; सरकारकडून सकारात्मक आश्वासनानंतर निर्णय

मुंबई : सुधारीत निवृत्ती वेतन योजनेसह विविध १८ मागण्यांसाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला…

ByByEditorial अप्रैल 26, 2026

मोदी सरकारचा महिला आरक्षणाचा बनाव उघडा; देशाचे तुकडे पाडण्याचे होते कारस्थान – खासदार संजय सिंह

नवी दिल्ली: “देशातील जनतेची दिशाभूल करणे थांबवा आणि गोदी मीडियाचा वापर करून खोट्या बातम्या पसरवणे बंद करा,” अशा…

ByByEditorial अप्रैल 19, 2026

शेकडो कार्यकर्त्यांसह उमेश खताते यांचा शिंदे गट शिवसेनेत प्रवेश, चिपळुणात ठाकरे गटाला मोठा धक्का

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : तालुक्यातील खेर्डी परिसरात तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणीच्या वेळी धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून…

ByByEditorial अप्रैल 8, 2026

रईस अलवी यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या अल्पसंख्याक विभागाची संघटनात्मक आढावा बैठक सोमवार, दि.…

ByByEditorial अप्रैल 8, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान