konkandhara.com

  • Home
  • मराठवाडा
  • बार्शीत 76 हजार हेक्टर पिकांचे नुकसान; संतप्त शेतकऱ्यांनी भरत गोगावले यांचा ताफा अडवला
Image

बार्शीत 76 हजार हेक्टर पिकांचे नुकसान; संतप्त शेतकऱ्यांनी भरत गोगावले यांचा ताफा अडवला

सोलापूर : राज्यात सलग मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे. नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री पूरग्रस्त भागांच्या पाहणीसाठी रवाना झाले. या पार्श्वभूमीवर, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात आज शिवसेना मंत्री भरत गोगावले यांच्या ताफ्याला संतप्त शेतकऱ्यांनी अडवत सरकारच्या मदतीवर जोरदार नाराजी व्यक्त केली.

राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2215 कोटींची मदत जाहीर केली आहे. मात्र, ती मदत तुटपुंजी असल्याचा आरोप शेतकरी सातत्याने करत आहेत. विरोधी पक्षाने हेक्टरी 30 ते 50 हजार रुपयांची मागणी केली आहे. त्याच धर्तीवर बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनीही सरकारने जाहीर केलेली मदत नगण्य असल्याचे सांगत संताप व्यक्त केला.

कारी गावातील एका शेतकऱ्याने थेट भरत गोगावले यांना उद्देशून, “गोगावले शेठ, आमच्या तळवटाचे पैसे निघत नाहीत. एकरी फक्त 3400 रुपये सरकार देतंय, सोयाबिनला 6 हजार रुपयांचा भाव आहे, हे आम्ही टिंगल नाही म्हणणार तर काय?” अशा शब्दांत रोष व्यक्त केला. यावेळी, शेतकऱ्यांनी एकमुखीपणे सरकारने हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी केली.

दरम्यान, माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी संतप्त शेतकऱ्यांशी चर्चा केली, तर मंत्री भरत गोगावले यांनीही गाडीतून उतरून शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. “निवडणुका झाल्या की मदतीच्या निकषात बदल करता. फुकटातील विमा बंद करून शेतकऱ्यांचं नुकसान केलं,” असा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केला.

🌧️ अतिवृष्टीचे प्रमाण
बार्शी तालुक्यात यंदा मे महिन्यापासूनच पावसाळा सुरू झाला. मे महिन्यात सरासरीच्या 12 पट पाऊस झाला. सप्टेंबरअखेर तालुक्यात 980 मिलिमीटर पावसाची नोंद झाली, जी सरासरीपेक्षा दुप्पट आहे. सततच्या पावसामुळे सर्व प्रमुख नद्यांना पूर आला असून 35 गावांतील नागरिकांना मोठा फटका बसला.

🌾 पिकांचे व जनावरांचे मोठे नुकसान
तहसील प्रशासनाच्या आकडेवारीनुसार बार्शी तालुक्यातील 78 हजार शेतकऱ्यांच्या 75 हजार 874 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबिनसह फळबागा, द्राक्षबागा यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याशिवाय, 155 घरांची पडझड झाली, 40 जनावरे व 18 हजार कोंबड्या वाहून गेल्या.

एकीकडे शेतकरी अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाले आहेत, तर दुसरीकडे सरकारच्या मदतीवर असमाधान व्यक्त करून ते आंदोलनाच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Releated Posts

मोदी सरकारचा महिला आरक्षणाचा बनाव उघडा; देशाचे तुकडे पाडण्याचे होते कारस्थान – खासदार संजय सिंह

नवी दिल्ली: “देशातील जनतेची दिशाभूल करणे थांबवा आणि गोदी मीडियाचा वापर करून खोट्या बातम्या पसरवणे बंद करा,” अशा…

ByByEditorial अप्रैल 19, 2026

शेकडो कार्यकर्त्यांसह उमेश खताते यांचा शिंदे गट शिवसेनेत प्रवेश, चिपळुणात ठाकरे गटाला मोठा धक्का

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : तालुक्यातील खेर्डी परिसरात तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणीच्या वेळी धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून…

ByByEditorial अप्रैल 8, 2026

रईस अलवी यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या अल्पसंख्याक विभागाची संघटनात्मक आढावा बैठक सोमवार, दि.…

ByByEditorial अप्रैल 8, 2026

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ

खेर्डीतील उमेश खताते शिंदे गटात प्रवेश करणार; स्थानिक राजकारणात खळबळ खेर्डी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे स्थानिक पातळीवरील…

ByByEditorial अप्रैल 5, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे