konkandhara.com

Editorial

konkandhara 53

खेर्डीत भव्य कबड्डी स्पर्धेचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : दिशा फाऊंडेशन पुरस्कृत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी, खेर्डी यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन चिपळूण–संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. श्री. अनिल शेठ दाभोळकर यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून खेर्डी परिसरात या क्रीडा सोहळ्याबद्दल विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. उद्घाटन प्रसंगी श्री. अनिल शेठ दाभोळकर, श्री. जयेंद्रथ शेठ खताते, सौ. दिशाताई दाभोळकर, श्री. नितीनजी (अबूशेठ) ठसाळे, श्री. प्रकाश शेठ साळवी, श्री. विश्वनाथजी (बाबुशेठ) साळवी, श्री. जमालुद्दीनजी बंदरकर, सौ. निनाताई दाभोळकर, श्री. राकेशजी दाभोळकर, श्री. सचिनजी भोसले यांच्यासह दिशा फाऊंडेशन व राष्ट्रवादी युवक काँग्रेस खेर्डीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही स्पर्धा सोमवार दि. 30 मार्च 2026 ते बुधवार दि. 1 एप्रिल 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आली असून एकूण 16 संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी कबड्डीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. खेळाडूंनीही चुरशीच्या लढती सादर करत प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. स्पर्धेच्या अंतिम दिवशी मा. श्री. अनिल शेठ दाभोळकर यांचा 70 वा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात येणार असून त्यावेळी विजेत्या संघांना पारितोषिक वितरण सोहळाही पार पडणार आहे. खेर्डी व चिपळूण तालुक्यातील सर्व कबड्डी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद लुटावा, असे आवाहन दिशा फाऊंडेशन व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

खेर्डीत भव्य कबड्डी स्पर्धेचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन Read More »

किरण सामंत यांची शिवसेना रत्नागिरी–सिंधुदुर्ग संपर्कप्रमुखपदी नियुक्ती

शिवसेना रत्नागिरी–सिंधुदुर्ग विभागीय संपर्कप्रमुखपदी आमदार किरण सामंत यांची नियुक्ती

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी रत्नागिरी–सिंधुदुर्ग विभागात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. राजापूर–लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत (भैय्या सामंत) यांची शिवसेना रत्नागिरी–सिंधुदुर्ग विभागीय संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे कोकणातील पक्ष संघटना अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी चांगला संपर्क, विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग आणि संघटन कौशल्य या बाबींमुळे किरण सामंत यांची निवड करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पक्षाची ताकद वाढवणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखणे तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती अधिक प्रभावीपणे राबवणे ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. या निवडीबद्दल स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली कोकणात शिवसेनेला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शिवसेना रत्नागिरी–सिंधुदुर्ग विभागीय संपर्कप्रमुखपदी आमदार किरण सामंत यांची नियुक्ती Read More »

गावाच्या विश्वासाला उतराई व्हा : बबन बांडागळे | मुरादपूरमध्ये मंगेश बांडागळे यांचा सत्कार

गावाच्या विश्वासाला उतराई व्हा, विकासाची नवी दिशा द्या : बबन बांडागळे, मुरादपूरमध्ये पं. स. सदस्य मंगेश बांडागळे यांचा सत्कार; कांचन बोरे हिचाही गौरव

प्रतिनिधी : कोकणधारा देवरुख : “गावाने दाखवलेला विश्वास हा केवळ सन्मान नसून मोठी जबाबदारी आहे. त्या विश्वासाला उतराई होत विकासाची नवी दिशा देणे, हेच खरे नेतृत्वाचे लक्षण आहे,” असे प्रतिपादन शिक्षक नेते बबन बांडागळे यांनी केले. देवरुख लगतच्या मुरादपूर गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य मंगेश बांडागळे हे पंचायत समिती निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल श्री सोमेश्वर ग्रामविकास मंडळ, मुरादपूर यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या वेळी महाराष्ट्र सुरक्षा दलात नियुक्ती झाल्याबद्दल कांचन बोरे हिचाही सन्मान करण्यात आला. मुरादपूर ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात फौजदार गणेश बांडागळे, रवींद्र बांडागळे, रवींद्र बांडागळे गुरुजी, सरपंच दीक्षा बांडागळे, माजी उपसरपंच नंदकिशोर बांडागळे, माजी सरपंच अनिल बांडागळे, मुजीब साटविलकर, वासुदेव नार्वेकर, स्वरा बांडागळे, दत्ताराम चोगुले, शशिकांत कापदुले, गायत्री बांडागळे, श्रीकृष्णा बांडागळे, रमेश बांडागळे, महेश बांडागळे, ग्रामसेविका तृप्ती कुलकर्णी, खैरून फकीर, तसेच मुरादपूरच्या पहिल्या सरपंच सुप्रिया चौगुले, राजेंद्र महाडिक, नितीन बांडागळे, अजित बांडागळे, वामन बांडागळे, सुभाष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परशुराम चौगुले यांनी करताना या सत्कारामागील भावना व्यक्त केल्या. “गावातील एक तरुण आज तेरा गावांचे म्हणजेच हातिव पंचायत समितीचे प्रतिनिधित्व करत आहे, ही अभिमानाची बाब आहे. आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या विकास कामांमुळे लोकांचा विश्वास संपादन झाला आणि त्याच जोरावर मंगेश बांडागळे विजयी झाले,” असे ते म्हणाले. तसेच कांचन बोरे हिने महाराष्ट्र सुरक्षा दलात स्थान मिळवून गावाचे नाव उज्वल केल्याचे त्यांनी नमूद केले. दिनेश साबळे यांनी निवडणूक काळातील आठवणी सांगताना मंगेश बांडागळे यांच्या अथक परिश्रमांचा उल्लेख केला. “तेरा गावांतून मिळालेला प्रतिसाद आणि आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून झालेली विकास कामे हेच त्यांच्या विजयाचे मुख्य कारण ठरले,” असे त्यांनी सांगितले. रवींद्र बांडागळे गुरुजी यांनी पक्षभेद विसरून गावाच्या विकासासाठी एकत्र येण्याचा संदेश दिला. “आपल्या गावातील तरुण पुढे जात असेल तर त्याला साथ देणे ही आपली जबाबदारी आहे. संपूर्ण मुरादपूर गाव त्यांच्या पाठीशी उभे राहिले, हेच त्यांच्या यशाचे खरे बळ आहे,” असे ते म्हणाले. सरपंच दीक्षा बांडागळे यांनीही शुभेच्छा देत भविष्यातील कार्यासाठी विश्वास व्यक्त केला. गौरवमूर्ती कांचन बोरे हिने आपल्या मनोगतात भावना व्यक्त करताना सांगितले, “पोलीस दलात जाण्याचे स्वप्न होते, मात्र महाराष्ट्र सुरक्षा दलातील वर्दी मिळाल्याचे समाधान आहे. आजचे यश पाहण्यासाठी वडील हवे होते,” असे सांगताना तिचा आवाज दाटून आला. सत्कारमूर्ती मंगेश बांडागळे यांनी आपल्या मनोगतात गावकऱ्यांचे आभार मानत सांगितले की, “संपूर्ण गाव, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबीय यांनी माझ्या विजयासाठी मेहनत घेतली. आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वावर आणि केलेल्या कामांवर विश्वास ठेवून जनतेने मला विजयी केले. हा विश्वास मी कधीच विसरणार नाही.” पुढे ते म्हणाले की, “मुरादपूर ग्रामपंचायत परिसराच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडे दहा लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवला असून पंचायत समिती सदस्य म्हणून माझे पहिले काम गावासाठीच आहे. तेरा गावांत काम करत असतानाही मुरादपूरकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही.” पत्रकार योगेश बांडागळे यांनी मंगेश बांडागळे हे विषय समजून घेतात, अभ्यास करतात, त्यामुळे निश्चितच पहिल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत त्यांच्या अभ्यासपूर्ण कार्याचे दर्शन घडले. गावाने सरपंच केले, पंचायत समिती निवडणुकीत गाव पाठीशी ठामपणे उभा राहिला, हे कधीही विसरू नका, अशी सूचना त्यांनी केली. अध्यक्षीय भाषणात बबन बांडागळे यांनी मंगेश बांडागळे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना सांगितले की, “ग्रामपंचायतीत दहा वर्षे काम केल्यामुळे त्यांना प्रशासनाची चांगली जाण आहे. आता पंचायत समितीच्या माध्यमातून अधिक व्यापक स्तरावर काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी ही संधी साधत विकासाची गती वाढवावी,” असा सल्ला त्यांनी दिला. तसेच भविष्यातही ते राजकीय क्षेत्रात यशाची नवी उंची गाठतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बांडागळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रवींद्र बांडागळे यांनी केले.

गावाच्या विश्वासाला उतराई व्हा, विकासाची नवी दिशा द्या : बबन बांडागळे, मुरादपूरमध्ये पं. स. सदस्य मंगेश बांडागळे यांचा सत्कार; कांचन बोरे हिचाही गौरव Read More »

रायगडमध्ये NCP बॅनर वाद: अजित पवार, सुनेत्रा पवार गायब; तटकरे कुटुंबीयांचे फोटो

रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवार, सुनेत्रा पवार गायब; तटकरे कुटुंबीयांचेच फोटो

प्रतिनिधी : कोकणधारा रोहे: रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमाच्या बॅनरवरून पक्षातील प्रमुख नेते अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो गायब झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघात आयोजित कार्यक्रमात लावलेल्या बॅनरवर मात्र खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांचेच फोटो झळकले. हा कार्यक्रम नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कारासाठी आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे स्वतः उपस्थित होते. तरीही पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांचे फोटो बॅनरवर नसल्याने विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, सुनील तटकरे यांच्यावर यापूर्वीही राष्ट्रवादी पक्षात फूट पाडल्याचे आरोप झाले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शरद पवार गटाकडून वारंवार करण्यात येत आहे. अशा पार्श्वभूमीवर रायगडमधील या बॅनर प्रकरणाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.या घटनेवर प्रतिक्रिया देताना शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. “दादांचा पक्ष ताब्यात घेण्याचे तटकरेंचे मनसुबे आता उघड झाले आहेत. त्याची सुरुवात रायगडमधून होत आहे,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, “हिम्मत असेल तर प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत वेगळा पक्ष काढा किंवा भाजपमध्ये जा,” असा टोला देखील त्यांनी लगावला. या संपूर्ण प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडकीस येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवार, सुनेत्रा पवार गायब; तटकरे कुटुंबीयांचेच फोटो Read More »

राजापुरात पाणीचोरीविरोधात पालिकेची धडक कारवाई

राजापुरात पाणीचोरीविरोधात पालिकेची धडक कारवाईमुख्य जलवाहिनीवरील बेकायदेशीर पाच पंप जप्त; कारवाई सुरूच राहणार : सौरभ खडपे

प्रतिनिधी : कोकणधारा राजापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर बेकायदेशीररीत्या पंप बसवून करण्यात येणाऱ्या पाणीचोरीविरोधात राजापूर नगरपालिकेने आक्रमक पवित्रा घेत धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत बेकायदेशीररीत्या बसविण्यात आलेले पाच पंप जप्त करण्यात आले असून, भविष्यातही अशी मोहीम सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे यांनी दिली. शहरामध्ये जलवाहिन्यांद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये काही ठिकाणी बेकायदेशीररीत्या पंप बसवून पाणीचोरी होत असल्याच्या तक्रारी नगरपालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. या प्रकाराला आळा घालण्यासाठी नगरपालिकेने कठोर भूमिका घेतली असून, पाणीचोरी करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता.त्या अनुषंगाने, पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनाने शहरात सर्वेक्षण मोहीम हाती घेतली. या सर्वेक्षणादरम्यान मुख्य जलवाहिनीवर बेकायदेशीररीत्या बसविण्यात आलेले पाच पंप आढळून आले, ते तात्काळ जप्त करण्यात आले. अशा प्रकारची धडक कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहील, असा इशाराही श्री. खडपे यांनी दिला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे जलसाठ्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, आगामी काळात शहराला पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्यता लक्षात घेऊन नगर पालिकेने आतापासूनच उपाययोजनांचे नियोजन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर विंधन विहिरी, पारंपरिक विहिरी तसेच तळी यांची साफसफाई करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, उन्हाळ्यात नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करता यावा यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही श्री. खडपे यांनी स्पष्ट केले.

राजापुरात पाणीचोरीविरोधात पालिकेची धडक कारवाईमुख्य जलवाहिनीवरील बेकायदेशीर पाच पंप जप्त; कारवाई सुरूच राहणार : सौरभ खडपे Read More »

मुचरी गवळीवाडी–कलबस्ते फाटा रस्ता मंजूर; आमदार शेखर निकम यांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन

मुचरी गवळीवाडी–कलबस्ते फाटा रस्ता मंजूर;आमदार शेखर निकम यांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन

प्रतिनिधी : कोंकणधारा चिपळूण/संगमेश्वर : गेल्या सुमारे ३५ वर्षांपासून रखडलेला आणि अत्यंत खराब अवस्थेत असलेला मुचरी गवळीवाडी ते कलबस्ते फाटा हा रस्ता अखेर मंजूर झाला आहे. चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्यासाठी चालू अर्थसंकल्पात तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत असून आमदार निकम यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी मुचरी गवळीवाडी येथील थोर समाजसेवक टोपरे साहेब (तालुकाप्रमुख), राजेंद्र पोमेंडकर (वाडी अध्यक्ष), पांडुरंग तटकरे, शांताराम टोपरे, अनंत भोजने, सुजन तटकरे, रघुनाथ भालेकर, संकेत खामकर, अनंत घवाली आदींसह ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत आमदारांचे आभार मानले. तसेच, आमदार शेखर निकम यांनी गावातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ताही लवकरच करून देण्याचे आश्वासन दिले आहे. या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमदार निकम यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत.

मुचरी गवळीवाडी–कलबस्ते फाटा रस्ता मंजूर;आमदार शेखर निकम यांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन Read More »

पत्रकारांवर हल्ला; चिपळूणमध्ये आंदोलनाचा इशारा

पत्रकारांवर हल्ला प्रकरण; चिपळूणमध्ये पत्रकार आंदोलनाच्या तयारीत

प्रतिनिधी : कोंकणधारा चिपळूण : शहरातील बहादूरशेख नाका येथे दूरदर्शनचे पत्रकार दीपक भागवत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ला प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याने चिपळूणमधील पत्रकारांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी आंदोलनाची जोरदार तयारी सुरू केली असून, लवकरच रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. बुधवार (दि. २५) रोजी चिपळूण नागरी पतसंस्थेविरोधात बहादूरशेख नाका येथे काहीजण उपोषणास बसणार होते. या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार दीपक भागवत यांच्यावर काही गुंडांनी अचानक हल्ला करत बेदम मारहाण केली. या वेळी त्यांचा मोबाईल आणि अन्य साहित्यही चोरून नेण्यात आले. या घटनेचे व्हिडिओ उपस्थित नागरिकांनी मोबाईलवर चित्रीत केले असून ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये हल्लेखोर स्पष्टपणे दिसत असूनही पोलिसांकडून अद्याप अटकेची कारवाई झालेली नाही, याबाबत पत्रकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी ‘महाराष्ट्र पत्रकार व प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी प्रतिबंध) कायदा, २०१७’ अंतर्गत गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल केला आहे. तरीदेखील अपेक्षित ती तत्पर कारवाई होत नसल्याची भावना पत्रकारांमध्ये आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीत पत्रकारांनी स्पष्ट इशारा दिला की, पुढील चार दिवसांत आरोपींना अटक न झाल्यास प्रथम शहरातून मोर्चा काढण्यात येईल. त्यानंतर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असून, गरज पडल्यास जिल्हास्तरावरही आंदोलन छेडले जाईल. पत्रकारांवरील हल्ला हा केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून तो लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला मानला जातो. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी तातडीने, निष्पक्ष आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकारांकडून होत आहे. तसेच पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

पत्रकारांवर हल्ला प्रकरण; चिपळूणमध्ये पत्रकार आंदोलनाच्या तयारीत Read More »

मंडणगडमध्ये पंप चोरीच्या दोन घटना; चौघांविरोधात गुन्हा दाखल

मंडणगडमध्ये पंप चोरीच्या दोन घटना; चौघांविरोधात गुन्हा दाखल

प्रतिनिधी : कोंकणधारा मंडणगड : तालुक्यातील शिरगाव येथे पाण्याचे इलेक्ट्रिक पंप चोरीच्या दोन घटना उघडकीस आल्या असून या प्रकरणी चार संशयितांविरोधात मंडणगड पोलीस स्थानकात २६ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिकंदर कनोजिया (३०), मोहित कनोजिया (२१) दोघेही रा. महाड, तसेच आकाश पवार (२५) व अविनाश जाधव (२१) दोघेही रा. आकले या चौघांचा यात समावेश आहे. पहिली घटना २५ मार्च रोजी शिरगाव गोमुख येथे घडली. याबाबत सुनील पाटील (४६, व्यवसाय पंपचालक, रा. शिरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी पंपहाऊसच्या दरवाजाच्या खालच्या बाजूच्या फळ्या उचकटून आत प्रवेश केला आणि सुमारे दहा हजार रुपये किंमतीचा पाच एच.पी. क्षमतेचा बंद स्थितीतील पाण्याचा इलेक्ट्रिक पंप चोरून नेला. दुसरी घटना याच दिवशी शिरगाव धर्मा येथे घडली. याबाबत आत्माराम जोंधळे (६२, व्यवसाय शेती, रा. तेरडी सुतारवाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. आरोपींनी पंपहाऊसचा सिमेंटचा दरवाजा उचकटून आत प्रवेश करत सुमारे वीस हजार रुपये किंमतीचा बारा एच.पी. क्षमतेचा दुरुस्तीसाठी ठेवलेला जुना पाण्याचा इलेक्ट्रिक पंप चोरून नेला. दोन्ही प्रकरणांमध्ये एकाच आरोपींचा सहभाग असल्याचा संशय असून त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मंडणगड पोलीस करीत आहेत.

मंडणगडमध्ये पंप चोरीच्या दोन घटना; चौघांविरोधात गुन्हा दाखल Read More »

गुहागरमध्ये एप्रिलमध्ये कासव महोत्सव; पर्यटकांना अनोखा निसर्गानुभव देण्याची तयारी

गुहागरमध्ये एप्रिलमध्ये कासव महोत्सव; पर्यटकांना अनोखा निसर्गानुभव देण्याची तयारी

प्रतिनिधी : कोंकणधारा गुहागर : एप्रिल महिन्यात गुहागर येथे कासव महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय नगर पंचायतीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन व्यावसायिक, पर्यटनप्रेमी आणि नागरिकांना महोत्सवाचे प्रात्यक्षिक कांदळवन प्रतिष्ठानतर्फे दाखविण्यात येणार आहे. गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर सध्या ६ कासव संवर्धन केंद्रे उभारण्यात आली असून, येथून दररोज कासवांची पिल्ले समुद्रात सोडली जातात. हा निसर्गरम्य आणि दुर्मीळ अनुभव पर्यटकांना प्रत्यक्ष पाहता यावा, तसेच वनविभागाच्या शेड्युल ‘अ’ श्रेणीतील ऑलिव्ह रिडले कासवांच्या जीवनचक्राची माहिती मिळावी, यासाठी कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यामुळे गुहागरच्या समुद्र पर्यटनालाही चालना मिळणार आहे. या संदर्भात नगराध्यक्ष नीता मालप, उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल, नगरसेवक, मुख्याधिकारी, पर्यटन व्यावसायिक आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय वनाधिकारी किरण ठाकूर, वेळास कासव महोत्सवाचे प्रणेते भाऊ काटदरे आणि कांदळवन प्रतिष्ठानचे मोहन उपाध्ये उपस्थित होते. भाऊ काटदरे यांनी कासव महोत्सवाच्या यशासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. कासव संवर्धनाशी संबंधित सर्व कामे वनविभाग आणि कांदळवन प्रतिष्ठानकडूनच केली जातील, नागरिकांनी त्यात हस्तक्षेप करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पर्यटकांना योग्य मार्गदर्शन, नियमांचे पालन आणि गुहागरचा इतिहास, निसर्गसौंदर्य, पक्षीनिरीक्षण व धार्मिक पर्यटन यांची जोड देऊन पर्यटकांचा मुक्काम वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले. मोहन उपाध्ये यांनी कासव संवर्धनातील नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज अधोरेखित केली. कासवांच्या पिल्लांना हाताळणे किंवा चुकीच्या पद्धतीने त्यांचा वापर करून जाहिरात करणे टाळावे, तसेच मोठ्या पर्यटन संस्थांकडून होणाऱ्या संभाव्य गैरप्रकारांना सुरुवातीपासूनच आळा घालावा, असे त्यांनी सांगितले.

गुहागरमध्ये एप्रिलमध्ये कासव महोत्सव; पर्यटकांना अनोखा निसर्गानुभव देण्याची तयारी Read More »

आरे-वारे समुद्रकिनारी पर्यटकाचा बुडून मृत्यू; एकाचा जीव वाचला

आरे-वारे समुद्रकिनारी दुर्दैवी घटना; पर्यटकाचा बुडून मृत्यू, एकाचा जीव वाचला

प्रतिनिधी : कोंकणधारा रत्नागिरी : निसर्गरम्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर रविवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबातील दोन सदस्य समुद्रात बुडाले असून, त्यापैकी एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसऱ्या तरुणाला स्थानिकांच्या तत्परतेमुळे वाचवण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, पालघर आणि विरार परिसरातील एक कुटुंब रविवारी सकाळी आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी आले होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास समुद्रात उतरलेल्या संतोष शशिकांत भानुशाली आणि सुयोग राजेश भानुशाली यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ओहोटीच्या प्रवाहाने आत ओढले. त्यामुळे दोघेही बुडू लागले. यावेळी किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी तसेच पोलीस पाटील आदेश कदम यांनी तात्काळ समुद्रात धाव घेत बचावकार्य सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे सुयोग राजेश भानुशाली (वय २१, रा. विरार) याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्याला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. मात्र, संतोष शशिकांत भानुशाली (रा. पालघर) यांचा या घटनेत मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे भानुशाली कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.

आरे-वारे समुद्रकिनारी दुर्दैवी घटना; पर्यटकाचा बुडून मृत्यू, एकाचा जीव वाचला Read More »