konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • राजापुरात पाणीचोरीविरोधात पालिकेची धडक कारवाईमुख्य जलवाहिनीवरील बेकायदेशीर पाच पंप जप्त; कारवाई सुरूच राहणार : सौरभ खडपे
राजापुरात पाणीचोरीविरोधात पालिकेची धडक कारवाई

राजापुरात पाणीचोरीविरोधात पालिकेची धडक कारवाईमुख्य जलवाहिनीवरील बेकायदेशीर पाच पंप जप्त; कारवाई सुरूच राहणार : सौरभ खडपे

प्रतिनिधी : कोकणधारा

राजापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर बेकायदेशीररीत्या पंप बसवून करण्यात येणाऱ्या पाणीचोरीविरोधात राजापूर नगरपालिकेने आक्रमक पवित्रा घेत धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत बेकायदेशीररीत्या बसविण्यात आलेले पाच पंप जप्त करण्यात आले असून, भविष्यातही अशी मोहीम सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे यांनी दिली.

शहरामध्ये जलवाहिन्यांद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये काही ठिकाणी बेकायदेशीररीत्या पंप बसवून पाणीचोरी होत असल्याच्या तक्रारी नगरपालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. या प्रकाराला आळा घालण्यासाठी नगरपालिकेने कठोर भूमिका घेतली असून, पाणीचोरी करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता.
त्या अनुषंगाने, पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनाने शहरात सर्वेक्षण मोहीम हाती घेतली. या सर्वेक्षणादरम्यान मुख्य जलवाहिनीवर बेकायदेशीररीत्या बसविण्यात आलेले पाच पंप आढळून आले, ते तात्काळ जप्त करण्यात आले. अशा प्रकारची धडक कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहील, असा इशाराही श्री. खडपे यांनी दिला.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे जलसाठ्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, आगामी काळात शहराला पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्यता लक्षात घेऊन नगर पालिकेने आतापासूनच उपाययोजनांचे नियोजन सुरू केले आहे.

या पार्श्वभूमीवर विंधन विहिरी, पारंपरिक विहिरी तसेच तळी यांची साफसफाई करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, उन्हाळ्यात नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करता यावा यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही श्री. खडपे यांनी स्पष्ट केले.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे