konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • मुचरी गवळीवाडी–कलबस्ते फाटा रस्ता मंजूर;आमदार शेखर निकम यांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन
मुचरी गवळीवाडी–कलबस्ते फाटा रस्ता मंजूर; आमदार शेखर निकम यांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन

मुचरी गवळीवाडी–कलबस्ते फाटा रस्ता मंजूर;आमदार शेखर निकम यांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन

प्रतिनिधी : कोंकणधारा

चिपळूण/संगमेश्वर : गेल्या सुमारे ३५ वर्षांपासून रखडलेला आणि अत्यंत खराब अवस्थेत असलेला मुचरी गवळीवाडी ते कलबस्ते फाटा हा रस्ता अखेर मंजूर झाला आहे. चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्यासाठी चालू अर्थसंकल्पात तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत असून आमदार निकम यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

यावेळी मुचरी गवळीवाडी येथील थोर समाजसेवक टोपरे साहेब (तालुकाप्रमुख), राजेंद्र पोमेंडकर (वाडी अध्यक्ष), पांडुरंग तटकरे, शांताराम टोपरे, अनंत भोजने, सुजन तटकरे, रघुनाथ भालेकर, संकेत खामकर, अनंत घवाली आदींसह ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत आमदारांचे आभार मानले.

तसेच, आमदार शेखर निकम यांनी गावातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ताही लवकरच करून देण्याचे आश्वासन दिले आहे. या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमदार निकम यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे