konkandhara.com

क्राईम

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूणमध्ये बंद फ्लॅट आणि दुकानांवर चोरट्यांचा डल्ला; सीसीटीव्हीत दोघे कैद

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : शहरातील पागमळा परिसरातील दोन बंद फ्लॅट तसेच मार्कंडी भागातील तीन दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी अद्याप अधिकृत तक्रार दाखल झालेली नसली तरी चिपळूण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी संबंधित ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याचा बारकाईने अभ्यास सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पागमळा येथील एकाच अपार्टमेंटमधील दोन बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी रोख रक्कम लांबविली. तर मार्कंडी परिसरात तीन दुकानांच्या शटरची पट्टी वाकवून चोरी करण्यात आली.दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन संशयित चोरटे चोरीचा प्रयत्न करताना दिसून आले असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून वेगाने हालचाली सुरू आहेत. या घटनेचा तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

चिपळूणमध्ये बंद फ्लॅट आणि दुकानांवर चोरट्यांचा डल्ला; सीसीटीव्हीत दोघे कैद Read More »

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूणमध्ये उपोषणस्थळी गोंधळ; पत्रकारावर हल्ला, बहादूरशेख नाका येथील घटनेनंतर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल; तपास डीवायएसपी बेले यांच्याकडे

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : शहरातील बहादूरशेख नाका येथे चिपळूण नागरी पतसंस्थेच्या कथित गैरकारभाराविरोधात सुरू होणाऱ्या उपोषणादरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून, या घटनेप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका फिर्यादीवरून वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारावर मारहाण, शिवीगाळ, दमदाटी आणि साहित्य चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे, तर दुसऱ्या फिर्यादीवरून उपोषणकर्ते रुपेश पवार व रवींद्र पवार यांच्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बेले हे करीत आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २५ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास बहादूरशेख नाका, चिपळूण येथे चिपळूण नागरी पतसंस्थेच्या गैरकारभाराविरोधात रुपेश सुरेश पवार (रा. खेड) हे उपोषणास बसणार होते. या उपोषणाचे वृत्तांकन करण्यासाठी दूरदर्शनचे पत्रकार दीपक दिलीप भागवत हे कॅमेरामन रुपेश साळुंखे यांच्यासह घटनास्थळी गेले होते. त्यावेळी १० ते १५ जणांच्या जमावाने त्यांना अडवून “तू कसला पत्रकार, तू कसले शूटिंग करतो?” असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तक्रारीनुसार, संबंधितांनी हाताच्या थपडा, लाथाबुक्यांनी मारहाण केली, तसेच फिर्यादी दीपक भागवत यांच्या साईड बॅगमधील आयडी कार्ड व इतर साहित्य चोरीस गेल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पत्रकार दीपक दिलीप भागवत (रा. रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनोळखी १० ते १५ जणांविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ८२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १८९(२), १९०, १९१(२), ३०३(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) तसेच महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियम २०१७ चे कलम ४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस नोंदीनुसार हा गुन्हा दि. २५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६.३६ वा. दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेप्रकरणी दुसरी फिर्याद अभिषेक चंद्रकांत मोहिते यांनी दिली असून, त्यांच्या तक्रारीवरून उपोषणकर्ते रुपेश पवार व रवींद्र पवार यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीतील नेमके आरोप आणि त्यामागील कारणांचा तपशील पोलीस तपासातून पुढे येणार आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. या संपूर्ण घटनेत एकीकडे पत्रकारावर हल्ला आणि वृत्तांकनात अडथळा आणल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे, तर दुसरीकडे आंदोलनकर्त्यांविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्याने हे प्रकरण केवळ स्थानिक वादापुरते मर्यादित राहिलेले नाही. पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनांचे स्वरूप आणि सार्वजनिक ठिकाणी निर्माण होणारा तणाव या तिन्ही अंगांनी ही घटना चर्चेचा विषय ठरत आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बेले हे करीत असून, या प्रकरणात घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची साक्ष, व्हिडिओ चित्रीकरण आणि संबंधित व्यक्तींची विधाने यांच्या आधारे तपास पुढे नेला जाणार आहे. दोन्ही बाजूंनी गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्यामुळे या घटनेचे नेमके सत्य आणि जबाबदारी कोणाची, हे पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

चिपळूणमध्ये उपोषणस्थळी गोंधळ; पत्रकारावर हल्ला, बहादूरशेख नाका येथील घटनेनंतर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल; तपास डीवायएसपी बेले यांच्याकडे Read More »

konkandhara 59

लोटे परिसरात रासायनिक सांडपाण्याचा टँकर पकडला; PFAS असल्याचा संशय, कारवाईची मागणी

प्रतिनिधी : कोकणधारा लोटे : खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील CETP (सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) परिसरात लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीचा रासायनिक सांडपाण्याने भरलेला टँकर स्थानिक ग्रामस्थांनी पकडल्याची घटना घडली आहे. या सांडपाण्यात PFAS (Per- and Polyfluoroalkyl Substances) या घातक रसायनाचा अंश असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राजेंद्र आंब्रे, रवी गोवळकर, सचिन चाळके, गंगाराम चाळके, नितीन कडू, अजय चाळके, संजय चाळके, रोशन कालेलकर, सचिन काते, अंकुश चाळके, नंदू काते, अक्षय दिवेकर, संकेत हुमणे आदी ग्रामस्थांनी हा टँकर अडवला. संबंधित टँकर CETP प्रकल्पात सांडपाणी सोडण्यासाठी आणण्यात आला होता. मात्र प्रकल्प व्यवस्थापनाने तपासणीनंतर हे सांडपाणी स्वीकारण्यास नकार दिला. ग्रामस्थांनी टँकर पकडूनही पोलीस प्रशासन घटनास्थळी उपस्थित असताना पंचनामा न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. प्रशासनाच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे. PFAS हे मानवी आरोग्य आणि पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक रसायन मानले जाते. त्यामुळे या सांडपाण्याच्या सुरक्षित विल्हेवाटीबाबत कंपनीकडून करण्यात आलेले दावे संशयास्पद ठरत असल्याचा आरोप आहे.यापूर्वीही ग्रामपंचायतींनी CETP मध्ये अशा प्रकारचे रेसिड्यू सोडण्यास विरोध दर्शवला होता. मात्र प्रत्यक्ष टँकर पकडल्याने हा प्रकार अधिक गंभीर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने माजी खासदार हुसेन दलवाई यांनी या घटनेची दखल घेत संबंधित सर्व यंत्रणांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने टँकर जप्त करून नमुना तपासणी करावी, जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामा करावा, तसेच पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, घातक कचरा व्यवस्थापन नियम 2016 आणि BNS 2023 अंतर्गत कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाईची तरतूद असल्याचेही त्यांनी नमूद केले. PFAS सारख्या घातक रसायनांबाबत स्पष्ट व कठोर धोरण आखून दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे.

लोटे परिसरात रासायनिक सांडपाण्याचा टँकर पकडला; PFAS असल्याचा संशय, कारवाईची मागणी Read More »

चिपळूण-तिवरे एसटीत मद्यधुंद प्रवाशाचा धुडगूस; चालक-वाहकास मारहाण

चिपळूण-तिवरे एसटीत मद्यधुंद प्रवाशाचा धुडगूस; चालक-वाहकास मारहाण

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : चिपळूण-तिवरे एस.टी. बसमध्ये मद्यधुंद प्रवाशाने चालक आणि वाहकासोबत हुज्जत घालत मारहाण केल्याची धक्कादायक घटना कळकवणे फाट्याजवळ घडली. या प्रकारामुळे काही काळ बसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, १९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास (क्र. एमएच २० बीएल २४३७) ही एसटी बस तिवरे गावाकडे जात असताना प्रवासी प्रकाश बाबा कोकरे (वय ३१, रा. नांदिवसे) हा दारूच्या नशेत प्रवास करत होता. त्याचे तिकीट कळकवणे फाट्यापर्यंत असल्याने वाहक पाराजी सरवदे यांनी त्याला खाली उतरण्यास सांगितले. यावरून आरोपीने संतापून चालक उमेश सुखदेव हजारे (वय ३६) व वाहकासोबत वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपीने चालकाला मारहाण केली. या झटापटीत चालकाच्या चेहऱ्यावर नख लागून दुखापत झाली असून त्यांचा शर्टही फाटला. तसेच वाहकासोबत झालेल्या धक्काबुक्कीत त्यांच्या खिशातील सुमारे ८०० रुपये गहाळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी चालक उमेश हजारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात आरोपी प्रकाश कोकरे याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे व मारहाण केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा (रजिस्टर नं. १२/२०२६) दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

चिपळूण-तिवरे एसटीत मद्यधुंद प्रवाशाचा धुडगूस; चालक-वाहकास मारहाण Read More »

आगवे येथे अवैध शस्त्रसाठा जप्त; एकास अटक चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणे, वाहतूक व वापर यावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाई तीव्र केली असून सावर्डे पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली आहे. आगवे (ता. चिपळूण) येथून अवैध शस्त्रसाठा जप्त करून एका संशयितास अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथक १८ मार्च २०२६ रोजी पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार आगवे येथील महेश महेंद्र जाधव (वय ३५, रा. बौद्धवाडी) हा अवैध दारू विक्रीसोबतच शस्त्र बाळगत असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून छापा टाकला असता संबंधित इसम घराच्या मागील बाजूस गोठ्याजवळील लाकडी खोपटीत बंदुकीची साफसफाई करताना आढळला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे कोणताही शस्त्र परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. झडतीदरम्यान पोलिसांनी एक सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक, एक जुनी नादुरुस्त ठासणीची बंदूक व ९ जिवंत काडतुसे असा एकूण ₹७०,९०० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात गु.र. नं. २४/२०२६ नोंद करून शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३(१), २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पोलीस अंमलदार विजय आंबेकर, दिपराज पाटील, विवेक रसाळ व अतुल कांबळे यांनी सहभाग घेतला.

आगवे येथे अवैध शस्त्रसाठा जप्त; एकास अटक

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणे, वाहतूक व वापर यावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाई तीव्र केली असून सावर्डे पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली आहे. आगवे (ता. चिपळूण) येथून अवैध शस्त्रसाठा जप्त करून एका संशयितास अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथक १८ मार्च २०२६ रोजी पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार आगवे येथील महेश महेंद्र जाधव (वय ३५, रा. बौद्धवाडी) हा अवैध दारू विक्रीसोबतच शस्त्र बाळगत असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून छापा टाकला असता संबंधित इसम घराच्या मागील बाजूस गोठ्याजवळील लाकडी खोपटीत बंदुकीची साफसफाई करताना आढळला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे कोणताही शस्त्र परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. झडतीदरम्यान पोलिसांनी एक सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक, एक जुनी नादुरुस्त ठासणीची बंदूक व ९ जिवंत काडतुसे असा एकूण ₹७०,९०० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात गु.र. नं. २४/२०२६ नोंद करून शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३(१), २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पोलीस अंमलदार विजय आंबेकर, दिपराज पाटील, विवेक रसाळ व अतुल कांबळे यांनी सहभाग घेतला.

आगवे येथे अवैध शस्त्रसाठा जप्त; एकास अटक Read More »

konkandhara 37 1

राजापूरात गुरांची क्रूर वाहतूक उघड; टेम्पोसह चालक ताब्यात, तिघांवर गुन्हा

प्रतिनिधी : कोकणधाराराजापूर : तालुक्यात गुरांची अमानुष पद्धतीने वाहतूक करणाऱ्या टेम्पोसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मुंबई-गोवा महामार्गावरील नेरकेवाडी येथे करण्यात आली.याबाबतची फिर्याद अक्षय सुनिल घुमे (रा. बंगालवाडी, ता. राजापूर) यांनी दिली आहे. त्यानुसार चंद्रकांत महादेव कुर्ले (रा. कोंढेतड, ता. राजापूर), तबरेज चांदमियाँ ठाकूर (रा. परटवली, ता. राजापूर) आणि एका अनोळखी इसमाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, दि. १६ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता आरोपी क्रमांक १ हा आपल्या ताब्यातील महिंद्रा मॅक्सिमो (क्र. एमएच ०४ एफडी २४१६) या वाहनातून तीन गोवंश जनावरांची वाहतूक करत होता. या जनावरांना पाणी व खाद्य न देता, दोरीने घट्ट बांधून वेदना होईल अशा पद्धतीने हौद्यात कोंबून कत्तलीसाठी पाठविण्याच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. या प्रकरणी प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६०, प्राणी संरक्षण अधिनियम १९७६, प्राण्यांचे परिवहन नियम १९७८, महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा सायंकाळी ६.२४ वाजता नोंदविण्यात आला. पोलिसांनी कारवाईदरम्यान एक महिंद्रा मॅक्सिमो वाहन व तीन गोवंश जनावरे असा एकूण सुमारे ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

राजापूरात गुरांची क्रूर वाहतूक उघड; टेम्पोसह चालक ताब्यात, तिघांवर गुन्हा Read More »

konkandhara 36 1

फेसबुक मैत्रीतून अल्पवयीन मुलीचा गैरफायदा; अश्लील व्हिडिओ प्रकरणी तिघांवर गुन्हा, आरोपी अटकेत

प्रतिनिधी : कोकणधारा राजापूर : तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीशी फेसबुकवर ओळख निर्माण करून तिचा गैरफायदा घेत शारीरिक अत्याचार व अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी तिघांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात घडल्याने राजापूर पोलिसांनी शून्य क्रमांकाने गुन्हा नोंद करून पुढील तपासासाठी वैभववाडी पोलिसांकडे वर्ग केला आहे. या प्रकरणातील तिन्ही संशयितांना वैभववाडी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलीची फेसबुकद्वारे ओंकार सुर्वे (रा. नेर्ले, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग) याच्याशी ओळख झाली होती. जुलै २०२५ मध्ये ती ओंकार सुर्वे व त्याचा चुलत भाऊ मयूर सुर्वे यांच्यासोबत वैभववाडी तालुक्यातील नापणे येथील धबधबा परिसरात गेली होती. वेळ झाल्याने ती मयूर सुर्वे यांच्या जुन्या घरी नेण्यात आली. त्या ठिकाणी मयूर सुर्वे याने गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला, तर ओंकार सुर्वे याने जबरदस्तीने संबंध ठेवले. तसेच तिच्या नकळत मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले. त्यानंतर दि. १४ मार्च २०२६ रोजी पंकज पवार (रा. ताम्हणे, ता. राजापूर) याने संबंधित मुलीशी संपर्क साधून तो अश्लील व्हिडिओ पाठवत धमकी दिली. “माझी मागणी मान्य केली नाही तर व्हिडिओ व्हायरल करीन,” असे सांगून दबाव टाकल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने आपल्या बहिणीला संपर्क करून सर्व घटना सांगितली. बहिणीच्या धीरामुळे तिने दि. १५ मार्च रोजी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी बीएनएस कलम ६४(१), ७४, ७९, ३५१(२), पोस्को कायदा कलम ४, ८, १२ तसेच आयटी कायदा कलम ६७, ६७(अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनास्थळ वैभववाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पुढील तपास तेथे सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली.

फेसबुक मैत्रीतून अल्पवयीन मुलीचा गैरफायदा; अश्लील व्हिडिओ प्रकरणी तिघांवर गुन्हा, आरोपी अटकेत Read More »

konkan dhara

भरघोस परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक; TWJ चे नार्वेकर दाम्पत्य अटकेत

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : गुंतवणूकदारांना भरघोस परताव्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी टीडब्ल्यूजे (TWJ) कंपनीचा मुख्य व्यवस्थापक समीर सुभाष नार्वेकर व संचालक नेहा समीर नार्वेकर या दाम्पत्याला रत्नागिरी आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, नार्वेकर दाम्पत्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती मिळताच फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी न्यायालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.टीडब्ल्यूजे कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहा ३ ते ४ टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवून अनेक गुंतवणूकदारांकडून लाखो रुपयांची गुंतवणूक करून घेण्यात आली होती. काही काळ परतावा दिल्यानंतर कंपनीचा मुख्य व्यवस्थापक समीर नार्वेकर व संचालक नेहा नार्वेकर यांनी गुंतवणूकदारांना आर्थिक गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी ठेकेदार प्रतीक माटे यांना दरमहा परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ३ लाख ५० हजार रुपये तसेच त्यांच्या बहिणीकडून २५ लाख रुपये अशी एकूण २८ लाख ५० हजार रुपयांची रक्कम घेत फसवणूक केल्याची तक्रार चिपळूण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी नार्वेकर दाम्पत्यासह कंपनीच्या दोन प्रतिनिधींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर अनेक गुंतवणूकदार पुढे येत असून त्यांनी चिपळूण तसेच रत्नागिरी येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. गुंतवणूकदारांची संख्या आणि गुंतवणुकीची रक्कम लक्षात घेता या फसवणुकीची व्याप्ती कराडपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास रत्नागिरी आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. या प्रकरणात यापूर्वी संकेश घाग याला अटक करण्यात आली आहे. तसेच समीर नार्वेकर व नेहा नार्वेकर यांच्यावर राज्यातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल असून काही दिवसांपूर्वी त्यांना ठाणे येथे अटक करण्यात आली होती. चिपळूण शहरातील बायपास मार्गावर टीडब्ल्यूजे कंपनीचे आलिशान कार्यालय असून त्याठिकाणी मोठा कर्मचारी वर्ग कार्यरत होता. मात्र फसवणुकीचा प्रकार उघड होताच हे कार्यालय बंद करण्यात आले. गुंतवणूकदारांच्या तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने या कार्यालयाची तपासणी करून काही महत्त्वाची कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत.

भरघोस परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक; TWJ चे नार्वेकर दाम्पत्य अटकेत Read More »

गुहागरमध्ये अवैध शस्त्रांसह इसम ताब्यात; १.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

गुहागरमध्ये अवैध शस्त्रांसह इसम ताब्यात; १.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी : कोकणधारा गुहागर : जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणे, त्यांची वाहतूक व वापराविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून या मोहिमेअंतर्गत गुहागर येथे एका इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गावठी कट्टा, बंदूक आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध शस्त्रांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथक शनिवारी (१४ मार्च २०२६) गुहागर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी गुहागर ते शृंगारतळी मार्गावर संशयास्पदरीत्या दुचाकीवरून जाणाऱ्या संजय श्रीधर फनगुसकर (रा. वेलदूर, ता. गुहागर) याला पोलिसांनी अडवून तपासणी केली. झडतीदरम्यान त्याच्याकडे अवैधरित्या बाळगलेली शस्त्रे आढळून आली. पोलिसांनी आरोपीकडून एक सिंगल बॅरल बंदूक, एक गावठी कट्टा, आठ जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १ लाख ६० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम १९५९च्या कलम ३ (२५) अन्वये गुहागर पोलीस ठाणे येथे गुन्हा (रजिस्टर क्र. १९/२०२६) दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बोरकर, पोलीस हवालदार विनायक राजवैद्य, प्रवीण खांबे, गणेश सावंत तसेच चालक अतुल कांबळे यांच्या पथकाने केली.

गुहागरमध्ये अवैध शस्त्रांसह इसम ताब्यात; १.६० लाखांचा मुद्देमाल जप्त Read More »

konkandhara 26

शिमगोत्सवातील वादातून चाकू हल्ला; रत्नागिरीत व्यक्ती गंभीर जखमी

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा रत्नागिरी, ७ मार्च : शिमगोत्सवातील किरकोळ वादाचा राग मनात धरून तिघांनी मिळून एका व्यक्तीवर चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (७ मार्च) सकाळी सुमारे ११ वाजता मिरकरवाडा जेटीच्या पहिल्या गेटजवळ घडली. या हल्ल्यात जयेंद्र दत्ताराम नार्वेकर (५५, रा. भाटिमिऱ्या, रत्नागिरी) गंभीर जखमी झाले आहेत. जखमी नार्वेकर यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी शशांक सावंत, संजू आणि रुपेश सावंत उर्फ छोटा भाई (तिघेही रा. सडामिऱ्या, रत्नागिरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी (१ मार्च) रात्री सुमारे १० वाजता शिमगोत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी पालखी येणार असल्याने भाटिमिऱ्या येथील दत्त मंदिराजवळ रस्त्यावर मंडप उभारणे आणि रांगोळी काढण्याचे काम सुरू होते. त्यावेळी तीन मुली दुचाकीवरून जात असताना त्यांच्या दुचाकीचा धक्का मंडपाचे काम करणाऱ्या फिर्यादींच्या भाचा विरेंद्र किरला याला लागला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्या वादादरम्यान एका मुलीने “मी सडामिऱ्या गावातील लोकांना बोलावते,” अशी धमकी दिली. काही वेळाने शशांक सावंत, संजू आणि अन्य काहीजण तेथे आले आणि वादाचे रूपांतर गंभीर वादात झाले. मात्र, त्या वेळी जयेंद्र नार्वेकर, रुपेश कमलाकर सावंत, मनोज सावंत, परेश सावंत व इतर प्रतिष्ठित नागरिकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. त्यामुळे शहर पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. दरम्यान, शनिवारी (७ मार्च) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जयेंद्र नार्वेकर हे आपल्या एमएच-०८-बीएफ-२३२३ क्रमांकाच्या दुचाकीवरून मिरकरवाडा जेटी येथे बोटीचे काम पाहण्यासाठी जात होते. ते जेटीच्या पहिल्या गेटजवळ आले असता संशयित शशांक सावंत आणि संजू यांनी दुचाकी त्यांच्या समोर आडवी लावून त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर दोघांनीही चाकूने त्यांच्या पाठीवर, हातावर व खांद्यावर सपासप वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर नार्वेकर खाली कोसळले. त्याच वेळी रुपेश सावंत उर्फ छोटा भाई दुचाकीवरून घटनास्थळी आला आणि त्यानेही चाकूने त्यांच्या पाठीवर वार केले. परिसरात गर्दी वाढू लागल्याने तिघेही संशयित तेथून पसार झाले. जखमी अवस्थेत नार्वेकर यांनी तेथे उपस्थित असलेल्या एका दुचाकीस्वाराला आपल्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्याची विनंती केली. दरम्यान, त्यांच्या ओळखीचे राहुल नावाचे व्यक्तीही तेथे आल्याने दोघांनी मिळून नार्वेकर यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामूनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर आणि शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने घेतले असून या प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

शिमगोत्सवातील वादातून चाकू हल्ला; रत्नागिरीत व्यक्ती गंभीर जखमी Read More »