konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • चिपळूणमध्ये उपोषणस्थळी गोंधळ; पत्रकारावर हल्ला, बहादूरशेख नाका येथील घटनेनंतर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल; तपास डीवायएसपी बेले यांच्याकडे
प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूणमध्ये उपोषणस्थळी गोंधळ; पत्रकारावर हल्ला, बहादूरशेख नाका येथील घटनेनंतर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल; तपास डीवायएसपी बेले यांच्याकडे

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूण : शहरातील बहादूरशेख नाका येथे चिपळूण नागरी पतसंस्थेच्या कथित गैरकारभाराविरोधात सुरू होणाऱ्या उपोषणादरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून, या घटनेप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका फिर्यादीवरून वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारावर मारहाण, शिवीगाळ, दमदाटी आणि साहित्य चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे, तर दुसऱ्या फिर्यादीवरून उपोषणकर्ते रुपेश पवार व रवींद्र पवार यांच्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बेले हे करीत आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २५ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास बहादूरशेख नाका, चिपळूण येथे चिपळूण नागरी पतसंस्थेच्या गैरकारभाराविरोधात रुपेश सुरेश पवार (रा. खेड) हे उपोषणास बसणार होते. या उपोषणाचे वृत्तांकन करण्यासाठी दूरदर्शनचे पत्रकार दीपक दिलीप भागवत हे कॅमेरामन रुपेश साळुंखे यांच्यासह घटनास्थळी गेले होते. त्यावेळी १० ते १५ जणांच्या जमावाने त्यांना अडवून “तू कसला पत्रकार, तू कसले शूटिंग करतो?” असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तक्रारीनुसार, संबंधितांनी हाताच्या थपडा, लाथाबुक्यांनी मारहाण केली, तसेच फिर्यादी दीपक भागवत यांच्या साईड बॅगमधील आयडी कार्ड व इतर साहित्य चोरीस गेल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी पत्रकार दीपक दिलीप भागवत (रा. रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनोळखी १० ते १५ जणांविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ८२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १८९(२), १९०, १९१(२), ३०३(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) तसेच महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियम २०१७ चे कलम ४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस नोंदीनुसार हा गुन्हा दि. २५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६.३६ वा. दाखल करण्यात आला.

दरम्यान, या घटनेप्रकरणी दुसरी फिर्याद अभिषेक चंद्रकांत मोहिते यांनी दिली असून, त्यांच्या तक्रारीवरून उपोषणकर्ते रुपेश पवार व रवींद्र पवार यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीतील नेमके आरोप आणि त्यामागील कारणांचा तपशील पोलीस तपासातून पुढे येणार आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे.

या संपूर्ण घटनेत एकीकडे पत्रकारावर हल्ला आणि वृत्तांकनात अडथळा आणल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे, तर दुसरीकडे आंदोलनकर्त्यांविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्याने हे प्रकरण केवळ स्थानिक वादापुरते मर्यादित राहिलेले नाही. पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनांचे स्वरूप आणि सार्वजनिक ठिकाणी निर्माण होणारा तणाव या तिन्ही अंगांनी ही घटना चर्चेचा विषय ठरत आहे.

दोन्ही गुन्ह्यांचा तपास मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बेले हे करीत असून, या प्रकरणात घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची साक्ष, व्हिडिओ चित्रीकरण आणि संबंधित व्यक्तींची विधाने यांच्या आधारे तपास पुढे नेला जाणार आहे. दोन्ही बाजूंनी गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्यामुळे या घटनेचे नेमके सत्य आणि जबाबदारी कोणाची, हे पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

Releated Posts

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार

रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध…

ByByEditorial मई 15, 2026

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी

प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर सावंतवाडी : भूषण…

ByByEditorial मई 15, 2026

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा सिंधुदुर्ग : भूषण सावंत : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना…

ByByEditorial मई 15, 2026

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे

तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद कोलाड (शरद जाधव ) जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील…

ByByEditorial मई 15, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान