konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • भरघोस परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक; TWJ चे नार्वेकर दाम्पत्य अटकेत
konkan dhara

भरघोस परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक; TWJ चे नार्वेकर दाम्पत्य अटकेत

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूण : गुंतवणूकदारांना भरघोस परताव्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी टीडब्ल्यूजे (TWJ) कंपनीचा मुख्य व्यवस्थापक समीर सुभाष नार्वेकर व संचालक नेहा समीर नार्वेकर या दाम्पत्याला रत्नागिरी आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

दरम्यान, नार्वेकर दाम्पत्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती मिळताच फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी न्यायालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
टीडब्ल्यूजे कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहा ३ ते ४ टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवून अनेक गुंतवणूकदारांकडून लाखो रुपयांची गुंतवणूक करून घेण्यात आली होती. काही काळ परतावा दिल्यानंतर कंपनीचा मुख्य व्यवस्थापक समीर नार्वेकर व संचालक नेहा नार्वेकर यांनी गुंतवणूकदारांना आर्थिक गंडा घातल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी ठेकेदार प्रतीक माटे यांना दरमहा परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ३ लाख ५० हजार रुपये तसेच त्यांच्या बहिणीकडून २५ लाख रुपये अशी एकूण २८ लाख ५० हजार रुपयांची रक्कम घेत फसवणूक केल्याची तक्रार चिपळूण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी नार्वेकर दाम्पत्यासह कंपनीच्या दोन प्रतिनिधींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर अनेक गुंतवणूकदार पुढे येत असून त्यांनी चिपळूण तसेच रत्नागिरी येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. गुंतवणूकदारांची संख्या आणि गुंतवणुकीची रक्कम लक्षात घेता या फसवणुकीची व्याप्ती कराडपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास रत्नागिरी आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

या प्रकरणात यापूर्वी संकेश घाग याला अटक करण्यात आली आहे. तसेच समीर नार्वेकर व नेहा नार्वेकर यांच्यावर राज्यातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल असून काही दिवसांपूर्वी त्यांना ठाणे येथे अटक करण्यात आली होती.

चिपळूण शहरातील बायपास मार्गावर टीडब्ल्यूजे कंपनीचे आलिशान कार्यालय असून त्याठिकाणी मोठा कर्मचारी वर्ग कार्यरत होता. मात्र फसवणुकीचा प्रकार उघड होताच हे कार्यालय बंद करण्यात आले.

गुंतवणूकदारांच्या तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने या कार्यालयाची तपासणी करून काही महत्त्वाची कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे