konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • लोटे परिसरात रासायनिक सांडपाण्याचा टँकर पकडला; PFAS असल्याचा संशय, कारवाईची मागणी
Image

लोटे परिसरात रासायनिक सांडपाण्याचा टँकर पकडला; PFAS असल्याचा संशय, कारवाईची मागणी

प्रतिनिधी : कोकणधारा

लोटे : खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील CETP (सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) परिसरात लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीचा रासायनिक सांडपाण्याने भरलेला टँकर स्थानिक ग्रामस्थांनी पकडल्याची घटना घडली आहे. या सांडपाण्यात PFAS (Per- and Polyfluoroalkyl Substances) या घातक रसायनाचा अंश असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


राजेंद्र आंब्रे, रवी गोवळकर, सचिन चाळके, गंगाराम चाळके, नितीन कडू, अजय चाळके, संजय चाळके, रोशन कालेलकर, सचिन काते, अंकुश चाळके, नंदू काते, अक्षय दिवेकर, संकेत हुमणे आदी ग्रामस्थांनी हा टँकर अडवला. संबंधित टँकर CETP प्रकल्पात सांडपाणी सोडण्यासाठी आणण्यात आला होता. मात्र प्रकल्प व्यवस्थापनाने तपासणीनंतर हे सांडपाणी स्वीकारण्यास नकार दिला.


ग्रामस्थांनी टँकर पकडूनही पोलीस प्रशासन घटनास्थळी उपस्थित असताना पंचनामा न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. प्रशासनाच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

PFAS हे मानवी आरोग्य आणि पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक रसायन मानले जाते. त्यामुळे या सांडपाण्याच्या सुरक्षित विल्हेवाटीबाबत कंपनीकडून करण्यात आलेले दावे संशयास्पद ठरत असल्याचा आरोप आहे.
यापूर्वीही ग्रामपंचायतींनी CETP मध्ये अशा प्रकारचे रेसिड्यू सोडण्यास विरोध दर्शवला होता. मात्र प्रत्यक्ष टँकर पकडल्याने हा प्रकार अधिक गंभीर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने माजी खासदार हुसेन दलवाई यांनी या घटनेची दखल घेत संबंधित सर्व यंत्रणांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने टँकर जप्त करून नमुना तपासणी करावी, जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामा करावा, तसेच पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, घातक कचरा व्यवस्थापन नियम 2016 आणि BNS 2023 अंतर्गत कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाईची तरतूद असल्याचेही त्यांनी नमूद केले. PFAS सारख्या घातक रसायनांबाबत स्पष्ट व कठोर धोरण आखून दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे.

Releated Posts

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार

रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध…

ByByEditorial मई 15, 2026

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी

प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर सावंतवाडी : भूषण…

ByByEditorial मई 15, 2026

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा सिंधुदुर्ग : भूषण सावंत : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना…

ByByEditorial मई 15, 2026

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे

तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद कोलाड (शरद जाधव ) जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील…

ByByEditorial मई 15, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान