konkandhara.com

Editorial

चिपळूणच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; मिनी थिएटरही उभारू – पालकमंत्री उदय सामंत

चिपळूणच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; मिनी थिएटरही उभारू – पालकमंत्री उदय सामंत

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : चिपळूण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण व इतर विकास कामांसाठी सुमारे ५०० कोटी रुपयांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. चिपळूण शहरावर माझे विशेष प्रेम आहे. नगराध्यक्ष उमेश सकपाळ जेवढा निधी मागतील तेवढा देऊ, शहराच्या विकासासाठी एकही रुपया कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी दिली. चिपळूण नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांसह रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन शनिवारी सायंकाळी पेठमाप येथे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या वेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी चिपळूणमध्ये रत्नागिरीप्रमाणे सुमारे २०० आसन क्षमतेचे मिनी थिएटर उभारण्याची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्री सामंत यांनी चिपळूणमध्ये मिनी थिएटर उभारले जाईल, अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सांगितले की, हा कार्यक्रम दोन वेळा पुढे ढकलावा लागला. मात्र शहरासाठी निधी उपलब्ध करून देणाऱ्या पालकमंत्र्यांच्याच हस्ते भूमिपूजन व्हावे, हा आमचा आग्रह होता. मराठी भाषा दिनानिमित्त होणाऱ्या साहित्यिक सन्मान सोहळ्यासाठीही त्यांची उपस्थिती असावी, अशी नगर परिषदेची इच्छा होती. पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असून शहराच्या विकासासाठी ते निधी कमी पडू देणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच नगर परिषदेने सादर केलेल्या सर्व प्रस्तावांना मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजप नेते प्रशांत यादव, उपनगराध्यक्ष प्रा. रूपाली दांडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, मुख्याधिकारी संजय जाधव, बांधकाम सभापती कपिल शिर्के, पाणीपुरवठा समिती सभापती निहार कोवळे, शिक्षण समिती सभापती हर्षाली पवार, शिवसेनेचे नगर पालिकेतील गटनेते अंकुश आवले यांच्यासह शिवसेना-भाजपचे नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहिद खेरटकर यांनी केले. दरम्यान मराठी भाषा दिनानिमित्त चिपळूण नगर परिषद, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय आणि अखिल भारतीय नाट्य परिषद, शाखा चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित काव्यवाचन स्पर्धेचे बक्षीस वितरण, तसेच ज्येष्ठ साहित्यिकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. चिपळूणमधील साहित्य चळवळीला चालना देणाऱ्या साहित्यिकांचा यावेळी मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये प्रा. सुहास बारटक्के, अरुण इंगवले, प्रा. संतोष गोणबरे, मुजफ्फर सय्यद, डॉ. प्रशांत पटवर्धन, राष्ट्रपाल सावंत, धनंजय चितळे, प्रकाश (आप्पा) जाधव, रवींद्र गुरव, धीरज वाटेकर यांचा समावेश होता. काव्यवाचन स्पर्धेतील विजेतेकाव्यवाचन स्पर्धेत प्रदीप मोहिते (प्रथम), पल्लवी भावे (द्वितीय), विशाखा चितळे (तृतीय), कुमार कोवळे व संदेश पवार (उत्तेजनार्थ) यांनी यश मिळवले. त्यांनाही पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमामुळे शहरातील विकास कामांचा शुभारंभ होत असतानाच साहित्यिकांचा गौरव आणि काव्यवाचन स्पर्धेच्या माध्यमातून चिपळूणच्या सांस्कृतिक चळवळीला नवी ऊर्जा मिळाल्याचे वातावरण निर्माण झाले.

चिपळूणच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; मिनी थिएटरही उभारू – पालकमंत्री उदय सामंत Read More »

चिपळूणच्या वाघजाई कोळकेवाडी संघाने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०२६ मध्ये ब्रह्मा स्पोर्ट्स नाशिक संघावर मात करत स्व. राजाभाऊ देसाई स्मृती चषक जिंकला.

वाघजाई कोळकेवाडी संघाचा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजय

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०२६ मध्ये चिपळूण येथील वाघजाई कोळकेवाडी संघाने दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत नाशिक येथील ब्रह्मा स्पोर्ट्स संघावर मात करून स्व. राजाभाऊ देसाई स्मृती चषक २०२६ आपल्या नावावर केला. अंतिम सामना अत्यंत रंगतदार आणि चुरशीचा झाला. दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत प्रेक्षकांना थरारक सामना अनुभवायला दिला. मात्र निर्णायक क्षणी वाघजाई कोळकेवाडी संघाच्या खेळाडूंनी अचूक चढाया आणि भक्कम बचावाचे प्रदर्शन करत ब्रह्मा स्पोर्ट्स संघावर मात केली. या विजयामुळे चिपळूण तालुक्यातील वाघजाई कोळकेवाडी संघाने राज्यस्तरावर आपली ताकद सिद्ध केली आहे. या यशानंतर क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्थानिक कबड्डीपटूंना या विजयामुळे नवी प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. राजाभाऊ देसाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यातील विविध भागांतील संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम फेरीतील विजयासह वाघजाई कोळकेवाडी संघाने स्पर्धेचे विजेतेपद पटकावत मानाचा चषक पटकावला.

वाघजाई कोळकेवाडी संघाचा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजय Read More »

गुहागरमध्ये अवैध शस्त्रांसह इसम ताब्यात; १.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

गुहागरमध्ये अवैध शस्त्रांसह इसम ताब्यात; १.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी : कोकणधारा गुहागर : जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणे, त्यांची वाहतूक व वापराविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून या मोहिमेअंतर्गत गुहागर येथे एका इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गावठी कट्टा, बंदूक आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध शस्त्रांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथक शनिवारी (१४ मार्च २०२६) गुहागर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी गुहागर ते शृंगारतळी मार्गावर संशयास्पदरीत्या दुचाकीवरून जाणाऱ्या संजय श्रीधर फनगुसकर (रा. वेलदूर, ता. गुहागर) याला पोलिसांनी अडवून तपासणी केली. झडतीदरम्यान त्याच्याकडे अवैधरित्या बाळगलेली शस्त्रे आढळून आली. पोलिसांनी आरोपीकडून एक सिंगल बॅरल बंदूक, एक गावठी कट्टा, आठ जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १ लाख ६० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम १९५९च्या कलम ३ (२५) अन्वये गुहागर पोलीस ठाणे येथे गुन्हा (रजिस्टर क्र. १९/२०२६) दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बोरकर, पोलीस हवालदार विनायक राजवैद्य, प्रवीण खांबे, गणेश सावंत तसेच चालक अतुल कांबळे यांच्या पथकाने केली.

गुहागरमध्ये अवैध शस्त्रांसह इसम ताब्यात; १.६० लाखांचा मुद्देमाल जप्त Read More »

konkandhara 28 1

महिला दिनानिमित्त आयएमएतर्फे प्रेरणादायी कार्यक्रम; चिपळूणमध्ये विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सावरकर सभागृह येथे इंडियन मेडिकल असोसिएशन आणि वुमन्स डॉक्टर विंग, चिपळूण शाखेतर्फे १० मार्च रोजी प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच कष्टकरी महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. डॉ. अंजली शारंगपाणी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मार्गदर्शनपर व्याख्यानांनी झाली. अ‍ॅडव्होकेट वृषाली सावंत यांनी ‘महिलांची सुरक्षा आणि सायबर क्राईम’ या विषयावर मार्गदर्शन करत डिजिटल युगात महिलांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत माहिती दिली. त्यानंतर स्त्रीरोग तज्ज्ञ समीना दलवाई यांनी मासिक पाळीतील तक्रारी, लक्षणे व उपचार तसेच मेनोपॉज काळातील शारीरिक व मानसिक बदलांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमात चिपळूणची लेक समृद्धी देवळेकर हिचा विशेष सन्मान करण्यात आला. फ्रीडायविंग या अनोख्या जलक्रीडेत तिने उल्लेखनीय यश मिळवले असून ती प्रमाणित फ्रीडायविंग इन्स्ट्रक्टर बनली आहे. एका श्वासावर खोल समुद्रात डुबकी मारण्याच्या या क्रीडाप्रकारात ती सध्या सुमारे १२० फूटांहून अधिक खोल डाइव्ह करू शकते आणि चार मिनिटांहून अधिक वेळ श्वास रोखून ठेवू शकते. याचबरोबर कालुस्ते खुर्द येथील समरीन जमालुद्दीन कादरी हिचाही सन्मान करण्यात आला. वक्तृत्व, निबंध, कथा कथन आणि पुस्तक परीक्षण स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल तिला डी.बी.जे. महाविद्यालयच्या ‘अभिमान पुरस्कार २०२५-२६’ने गौरविण्यात आले आहे. तसेच श्रम साफल्य महिला स्वयंसहायता संघाच्या सचिव पल्लवी रहाटे आणि चिपळूण पंचायत समितीच्या हॉटेल कँटीन चालक सारिका मेढेकर या कष्टकरी महिलांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेणाऱ्या रहिमत जबले यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी ज्योती यादव, आयएमएचे चेअरमन अब्बास जबले, सेक्रेटरी अरविंद पोतदार, वुमन्स डॉक्टर विंगच्या चेअरमन मनीषा वाघमारे, व्हाईस चेअरमन वनिता सानप तसेच विविध डॉक्टर, परिचारिका व आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महिला दिनानिमित्त आयएमएतर्फे प्रेरणादायी कार्यक्रम; चिपळूणमध्ये विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान Read More »

‘स्वर तरंग’च्या सुरेल मैफलीने चिपळू‘स्वर तरंग’च्या सुरेल मैफलीने चिपळूणकर रसिक मंत्रमुग्धणकर रसिक मंत्रमुग्ध

‘स्वर तरंग’च्या सुरेल मैफलीने चिपळूणकर रसिक मंत्रमुग्ध

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : अखिल भारतीय नाट्य परिषद, शाखा चिपळूण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वर तरंग’ या महिलांच्या विशेष गायन कार्यक्रमाने चिपळूणकर रसिकांना सुरेल संगीताची अविस्मरणीय मेजवानी दिली. स्थानिक महिलांनी आपल्या मधुर आवाजात विविध गीते सादर करत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात सुरांची मनमोहक लहर निर्माण केली. महिलांसाठी महिलांनीच सादर केलेल्या या कार्यक्रमाला महिलांची लक्षणीय उपस्थिती लाभली आणि प्रत्येक सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. संगीत शिक्षिका वीणा कुंटे, उत्तरा साडविलकर, मंदा संकपाळ, नाट्य परिषदेच्या सचिव डॉ. मीनल ओक आणि खजिनदार ॲड. विभावरी रजपूत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, उपाध्यक्ष योगेश बांडागळे आणि संगीत शिक्षक सतीश कुंटे यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात विभावरी वाडकर, मानसी शिंदे, अमृता नायर, दीपा ओडल, निकिता सावंत, दीपा गद्रे, मनस्वी राजवाडे, सारिका यादव, सरला शिंदे, स्वाती कार्ले, वीणा परंजपे, अनघा जोशी, मेघना बेहेरे, अदिती तांबे आदींनी विविध गीते सादर करत रसिकांची मने जिंकली. तसेच गंधाली ग्रुप यांनी सादर केलेल्या भजनाने वातावरण भक्तिमय झाले. गायनाला हार्मोनियमवर उत्तरा साडविलकर व निकिता सावंत यांनी साथ दिली. तबल्यावर यदुवीर चोगले, श्रुतिका शिगवण आणि शुभ्रा वाघमारे यांनी सुरेल साथ केली, तर साइड रीदमवर आरुश कुडाळकर यांनी प्रभावी साथ दिली. या कार्यक्रमातील सहभागी कलाकारांना कोकण गंधर्व राजाभाऊ शंबेकर, डॉ. मिलिंद गोखले यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कलाकारांना मेघना गोखले व राहुल साडविलकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे निवेदन अपर्णा नातू आणि संगीता जोशी यांनी केले, तर उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा दामले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छाया पोटे यांच्यासह नाट्य परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. सुरेल वातावरण, कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग आणि रसिकांचा भरभरून प्रतिसाद यामुळे ‘स्वर तरंग’ ही मैफल संस्मरणीय ठरली.

‘स्वर तरंग’च्या सुरेल मैफलीने चिपळूणकर रसिक मंत्रमुग्ध Read More »

महिलांनी कायदेशीर हक्कांबाबत जागरूक व्हावे – जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे

महिलांनी कायदेशीर हक्कांबाबत जागरूक व्हावे – जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : महिलांनी त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत जागरूक राहणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी केले. तालुका विधी सेवा समिती व सह्याद्री तंत्रनिकेतन महाविद्यालय, सावर्डे (ता. चिपळूण) यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित शिबिरात त्या बोलत होत्या. यावेळी प्राचार्य मंगेश भोसले, प्रा. लिना जावकर, अॅड. वृषाली सावंत तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या अनुजा भोसले उपस्थित होत्या. डॉ. नेवसे यांनी विद्यार्थिनींना ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून का साजरा केला जातो याची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली. गेल्या १२० वर्षांच्या कालखंडात महिलांनी आपल्या हक्कांसाठी संघर्ष करत विविध स्तरांवर लढा दिला असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी त्यांनी महिलांना घटनेने दिलेले अधिकार तसेच महिलांसाठी असलेल्या विविध कायद्यांच्या तरतुदींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. हुंडाबळी, छेडछाड, लैंगिक छळ, कौटुंबिक हिंसाचार, स्त्रीधन, संपत्ती हक्क यांसारख्या विषयांवर माहिती देत महिलांच्या संरक्षणासाठी अस्तित्वात असलेले कायदे महत्त्वाचे मार्गदर्शक ठरतात, असे त्यांनी सांगितले. हुंडा प्रतिबंधक कायदा, पोटगीच्या तरतुदी, मुस्लिम महिला संरक्षण कायदा, हिंदू वारसा कायदा, हिंदू दत्तक व भरणपोषण कायदा, गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा तसेच कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदी त्यांनी सोप्या भाषेत स्पष्ट केल्या. समाजातील सर्व स्तरांतील महिलांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण झाल्यास संरक्षण यंत्रणांना त्यांना मदत करणे अधिक सोपे होईल, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात विद्यार्थिनींना प्रेरणा देण्यासाठी त्यांनी कांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना समर्पित “पंख माया मुक्तीचे सावित्रीबाई फुले” ही कविता सादर केली.कार्यक्रमाला तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे नियोजन तालुका विधी सेवा समितीचे कनिष्ठ लिपिक श्री. जुगधर तसेच शिपाई श्री. मरके व श्री. इंगळे यांनी केले.

महिलांनी कायदेशीर हक्कांबाबत जागरूक व्हावे – जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे Read More »

konkandhara 25 1

गॅस बुकिंग नोंदणीसाठी ‘आपले सरकार सेवा केंद्रां’ची मदत घ्या | रत्नागिरी प्रशासन

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : जिल्ह्यात गॅस बुकिंग नोंदणीसाठी नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्रां’मार्फत ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील गॅस ग्राहकांना गॅस बुकिंग नोंदणी व ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी सेवा केंद्रांनी मदत करावी, अशा सूचना उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) विश्वजीत गाताडे यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात काही कारणास्तव गॅस टंचाईचा प्रश्न निर्माण होत असल्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रारी प्राप्त होत आहेत. गॅस बुकिंगसाठी नागरिकांना वितरकांकडे रांगेत उभे राहावे लागत असल्याने ग्राहक व वितरक या दोघांचाही वेळ वाया जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे. याची दखल घेत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी जिल्ह्यातील नागरिकांना गॅस बुकिंग नोंदणी ऑनलाईन करण्यासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्रां’मार्फत मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रक्रियेत काही अडचणी उद्भवल्यास संबंधित सेवा केंद्राला जबाबदार धरले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

गॅस बुकिंग नोंदणीसाठी ‘आपले सरकार सेवा केंद्रां’ची मदत घ्या | रत्नागिरी प्रशासन Read More »

भाजप महिला मोर्चा चिपळूण तालुकाध्यक्षपदी आदिती गुडेकर

भाजप महिला मोर्चा चिपळूण तालुकाध्यक्षपदी आदिती गुडेकर

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण (प्रतिनिधी) : भाजप महिला मोर्चा चिपळूण तालुकाध्यक्षपदी सौ. आदिती अविनाश गुडेकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, चिपळूण तालुका मंडळ अध्यक्ष विनोद भुरण तसेच जिल्हा विशेष निमंत्रित सदस्य सौ. स्वप्ना यादव यांच्या हस्ते खेर्डी येथील ‘स्वामिनी’ निवासस्थानी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या निवडीबद्दल सौ. आदिती गुडेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. भिले गावच्या सरपंच म्हणून काम करताना त्यांनी गावाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवत त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय भूमिका निभावली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत भाजपने त्यांच्यावर महिला मोर्चा चिपळूण तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. या प्रसंगी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत शहा, उपनगराध्यक्ष सौ. रूपाली दांडेकर, नगरसेवक शशिकांत मोदी, महिला मोर्चा शहराध्यक्ष व नगरसेविका सौ. रसिका देवळेकर, नगरसेविका सौ. वैशाली निमकर, नगरसेवक संदीप भिसे, नगरसेविका सौ. अंजली कदम, खेर्डीच्या सरपंच सुगंधा माळी, माजी सरपंच प्रकाश पाथरूड, बाळा दाते, कुणाल आंबेकर आदी उपस्थित होते. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

भाजप महिला मोर्चा चिपळूण तालुकाध्यक्षपदी आदिती गुडेकर Read More »

चिपळूण : शहरातील क्रीडाप्रेमी युवकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आमदार शेखर निकम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पवन तलाव येथील खेळाचे मैदान विकसित करण्यासाठी १ कोटी १४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून अनेक वर्षांपासून पडून असलेल्या इमारतीचे सुशोभीकरण करण्यात येणार असून मैदानाचा सर्वांगीण विकास केला जाणार आहे. तसेच येथे कॉमेंट्री बॉक्स आणि इनडोअर स्टेडियम उभारण्याचेही नियोजन आहे. या कामामुळे चिपळूणमधील क्रीडापटूंना सराव व स्पर्धांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध होणार असून स्थानिक क्रीडा संस्कृतीला मोठी चालना मिळणार आहे. आमदार शेखर निकम यांच्या या प्रयत्नांमुळे चिपळूणच्या क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा आणि दिशा मिळेल, अशी भावना क्रीडाप्रेमी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

चिपळूणच्या क्रीडापटूंना दिलासा, पवन तलाव मैदान विकासासाठी १.१४ कोटी

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : शहरातील क्रीडाप्रेमी युवकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आमदार शेखर निकम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पवन तलाव येथील खेळाचे मैदान विकसित करण्यासाठी १ कोटी १४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून अनेक वर्षांपासून पडून असलेल्या इमारतीचे सुशोभीकरण करण्यात येणार असून मैदानाचा सर्वांगीण विकास केला जाणार आहे. तसेच येथे कॉमेंट्री बॉक्स आणि इनडोअर स्टेडियम उभारण्याचेही नियोजन आहे. या कामामुळे चिपळूणमधील क्रीडापटूंना सराव व स्पर्धांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध होणार असून स्थानिक क्रीडा संस्कृतीला मोठी चालना मिळणार आहे. आमदार शेखर निकम यांच्या या प्रयत्नांमुळे चिपळूणच्या क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा आणि दिशा मिळेल, अशी भावना क्रीडाप्रेमी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

चिपळूणच्या क्रीडापटूंना दिलासा, पवन तलाव मैदान विकासासाठी १.१४ कोटी Read More »

चिपळूणमध्ये उद्या महिलांच्या गायनाचा ‘स्वर तरंग’ कार्यक्रम | नाट्य परिषद आयोजन

चिपळूणमध्ये उद्या स्थानिक महिलांच्या गायनाचा स्वर तरंग कार्यक्रम नाट्य परिषद शाखा चिपळूणचे आयोजन

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा चिपळूणच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या गायनाचा स्वर तरंग हा विशेष कार्यक्रम शनिवार, दि. १४ मार्च रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, महिला व बालकल्याण समिती सभापती रसिका देवळेकर, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती हर्षाली पवार, तसेच गायिका उत्तरा भागवत-साडविलकर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठीची निवड प्रक्रिया दि. ४ मार्च रोजी संस्थेच्या कार्यालयात पार पडली. या निवड प्रक्रियेत एकूण २६ महिला तसेच काही गटांनी सहभाग नोंदवला होता. परीक्षक म्हणून श्री. सतीश कुंटे, श्री. राहुल साडविलकर आणि कोकण गंधर्व श्री. राजाभाऊ शेंबेकर यांनी काम पाहिले. या प्रक्रियेतून एकूण १६ महिलांची अंतिम निवड करण्यात आली. प्रथमच स्थानिक महिलांसाठी अशा प्रकारचा गायनाचा कार्यक्रम नाट्य परिषदेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असून निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. श्री. सतीश कुंटे यांनी सहभागी महिलांना मोलाचे मार्गदर्शनही केले. उद्या स्थानिक महिलांच्या गायनाच्या होणाऱ्या या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी केले आहे.

चिपळूणमध्ये उद्या स्थानिक महिलांच्या गायनाचा स्वर तरंग कार्यक्रम नाट्य परिषद शाखा चिपळूणचे आयोजन Read More »