konkandhara.com

महाराष्ट्र

मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहिण’ योजनेत गैरव्यवहार उघड – राज्यभरात 26.30 लाख महिलांची घराघरांतून पडताळणीअपात्र लाभार्थ्यांना ओळखण्यासाठी अंगणवाडी सेविका तैनात; शहरी भागात अपूर्ण पत्त्यांमुळे पडताळणीला अडथळे

मुंबई – मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहिण’ (Majhi Ladki Bahin Yojana) योजनेत झालेल्या कथित गैरव्यवहारानंतर राज्य सरकारने मोठी कारवाई सुरू केली आहे. एकूण 26.30 लाख महिला लाभार्थ्यांची घराघरांत जाऊन पडताळणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या कामाची जबाबदारी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली आहे. काय आढळलं प्राथमिक तपासणीत? माहिती तंत्रज्ञान विभागाने केलेल्या प्राथमिक विश्लेषणात अनेक अनियमितता उघडकीस आल्या. एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी नोंदणी केली वयोमर्यादेचे उल्लंघन काही पुरुषांनी खोट्या पद्धतीने लाभ घेतला या प्रकारांमुळे राज्य सरकारने व्यापक तपासणीचा निर्णय घेतला आहे. पडताळणीत मोठ्या अडचणी पडताळणी मोहिमेत सेविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, विशेषतः शहरी भागात. सरकारकडून मिळालेल्या यादीत केवळ शहर आणि जिल्ह्याचे नाव असून, संपूर्ण पत्ते नाहीत अनेक पत्त्यांवर घरमालक उपलब्ध नाहीत काही पत्ते चुकीचे निघत आहेत या कारणामुळे पडताळणीची प्रक्रिया विलंबात अडकली असून, दीड महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही काम अपूर्ण आहे. तपासणीचे मुख्य निकष विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, पडताळणी पुढील महत्त्वाच्या निकषांवर केली जात आहे: लाभार्थीचे वय 21 ते 65 वर्षांदरम्यान असणे आवश्यक एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 महिलांना लाभ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे का याची चौकशी लाभार्थी महिला सरकारी कर्मचारी नाही ना याची खात्री पडताळणी पथके प्रत्येक घरात जाऊन वैवाहिक स्थिती, रोजगार तपशील आणि कुटुंब रचनेची माहिती गोळा करत आहेत. आढळत आहेत नियमबाह्य गोष्टी या पडताळणीतून आतापर्यंत अनेक नियमबाह्य प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे खऱ्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा फायदा पोहोचवण्याची प्रक्रिया अधिक काटेकोर केली जात आहे.

मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहिण’ योजनेत गैरव्यवहार उघड – राज्यभरात 26.30 लाख महिलांची घराघरांतून पडताळणीअपात्र लाभार्थ्यांना ओळखण्यासाठी अंगणवाडी सेविका तैनात; शहरी भागात अपूर्ण पत्त्यांमुळे पडताळणीला अडथळे Read More »

Rohit Pawar News: देवेंद्र फडणवीसांच्या ‘देवाभाऊ’ जाहिरातीवरून रोहित पवारांचा टोला”सरकारकडे योजना बंद करण्याइतके पैसे नाहीत, मग कोट्यवधींच्या जाहिराती कुणी दिल्या?” – रोहित पवार

मुंबई | गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘देवाभाऊ’ शीर्षकाची जाहिरात झळकली. काही ठिकाणी फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी पुष्प अर्पण करताना दिसत होते, तर काही ठिकाणी ते गणपती बाप्पाला वंदन करताना दाखवले गेले. या जाहिरातींवर प्रकाशकाचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी भाजप आणि सरकारवर जोरदार टीका केली. नेमकं काय म्हणाले रोहित पवार? “तुम्ही 40 कोटी, 400 कोटी किंवा 4000 कोटींच्या जाहिराती दिल्या तरी आम्हाला हरकत नाही. पण या निनावी जाहिराती नेमक्या का दिल्या गेल्या? याबाबत आमचा आक्षेप आहे,” असे रोहित पवार म्हणाले. ते पुढे म्हणाले, “जर या जाहिराती सरकारने दिल्या असतील, तर एका बाजूला पैसे नसल्याचे कारण देऊन योजना बंद केल्या जात आहेत, कंत्राटदारांची बिले प्रलंबित आहेत आणि काहीजण आत्महत्या करत आहेत. अशा वेळी कोट्यवधींच्या जाहिराती छापणे म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी नाही का?” “90 कोटींचा दंड माफ केलेल्या कंपनीने जाहिरात दिली का?” रोहित पवार यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, “भाजपने जाहिरात दिली असेल तर नावाने का दिली नाही? नाही दिली, तर मग एखाद्या कंपनीने किंवा मित्रपक्षातील अडचणीत सापडलेल्या नेत्याने उपकाराची परतफेड म्हणून दिली का? उदाहरण द्यायचं झालं तर, ज्या कंपनीचा 90 कोटी रुपयांचा दंड महसूलमंत्री म्हणून तुम्ही माफ केला होता, त्या कंपनीने या जाहिराती दिल्या का?” याशिवाय, “जर या जाहिरातींमध्ये काहीही काळेबेरं नसेल, तर एवढे कोट्यवधी रुपये खर्च करून जाहिराती कुणी दिल्या हे जाहीर करा,” असे आव्हानही पवारांनी दिले.

Rohit Pawar News: देवेंद्र फडणवीसांच्या ‘देवाभाऊ’ जाहिरातीवरून रोहित पवारांचा टोला”सरकारकडे योजना बंद करण्याइतके पैसे नाहीत, मग कोट्यवधींच्या जाहिराती कुणी दिल्या?” – रोहित पवार Read More »

धाराशिव | गणेशोत्सवात पेटला जुना वैर! निंबाळकर विरुद्ध पाटील संघर्ष पुन्हा रंगमंचावर

गणरायाला निरोप देतानाही धाराशिवमध्ये राजकारणाचा ज्वालामुखी फूटला. विसर्जनाच्या मिरवणुकीत पुन्हा एकदा समोरासमोर आले – खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार पुत्र मल्हार पाटील. जिल्ह्यातील जुना वैर असलेला निंबाळकर विरुद्ध पाटील संघर्ष आता नव्या पिढीत अधिक पेटताना दिसतोय. तीन पिढ्यांचा वैर धाराशिवचं राजकारण म्हणजे एक घराणं, दोन परंपरा आणि एक दीर्घकाळ धगधगत असलेला संघर्ष. पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर – हे चुलत भाऊ पण राजकारणात कट्टर प्रतिस्पर्धी. 2006 मध्ये पवनराजेंची हत्या झाली आणि त्या प्रकरणात पद्मसिंह पाटलांवर आरोप झाले. त्यानंतर दोन्ही घराण्यातील वैर अधिकच गहिरं झालं. राजकारणाचा रणांगण पित्याच्या निधनानंतर ओमराजे राजकारणात आले आणि 2009 पासून त्यांनी राणा जगजीतसिंह पाटील यांना थेट टक्कर दिली. त्यानंतर जिल्ह्यात राजकारण दोन गटात विभागलं – निंबाळकर गट विरुद्ध पाटील गट. प्रशासनापासून निवडणुकांपर्यंत या संघर्षाचा प्रभाव स्पष्ट दिसतो. पुढच्या पिढीतला संघर्ष गेल्या काही वर्षांत या संघर्षात उतरलेत पाटील कुटुंबाची पुढची पिढी – मल्हार पाटील. वडिलांवर ओमराजेंनी टीका केली तेव्हा मल्हारांनी थेट पलटवार करत त्यांची ‘औकात’ काढली. प्रत्युत्तरादाखल ओमराजेंनीही थेट इशारा दिला – “राजकारणामुळे माझ्या वडिलांना संपवलं. आता तुमचं राजकारण संपवणार!” निवडणुकीतून मिरवणुकीत अलीकडच्या लोकसभा निवडणुकीतही हा वैर रंगला – मल्हार पाटलांच्या आई राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभ्या होत्या तर त्यांच्या समोर होते ओमराजे निंबाळकर. आता गणेश विसर्जन मिरवणुकीत दोघे पुन्हा समोरासमोर आले आणि धाराशिवकरांनी जुना ‘कलगीतुरा’ प्रत्यक्ष अनुभवला. जनता मात्र हवालदिल या सततच्या संघर्षात जिल्ह्याचा विकास मात्र मागे पडला आहे. राजकीय, कौटुंबिक वैर बाजूला ठेवून एकत्रित काम करण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करतात. “तुमचं भांडण बाजूला ठेवा, जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सुबुद्धी दे बाप्पा!” अशीच धाराशिवकरांची मनापासून प्रार्थना आहे.

धाराशिव | गणेशोत्सवात पेटला जुना वैर! निंबाळकर विरुद्ध पाटील संघर्ष पुन्हा रंगमंचावर Read More »

अदाणी एंटरप्रायजेसला दिलासा; दिल्ली न्यायालयाने पत्रकार-एनजीओंना बदनामीकारक मजकूर हटवण्याचे आदेशपडताळणी न केलेला मजकूर प्रकाशित करण्यास मज्जाव; पुढील सुनावणी ९ ऑक्टोबरला

नवी दिल्ली – अदाणी समूहाच्या अदाणी एंटरप्रायजेस लिमिटेड (AEL) कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली न्यायालयाने काही पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय एनजीओंना (NGOs) कंपनीविरुद्ध बदनामीकारक आणि पडताळणी न केलेला मजकूर प्रकाशित करण्यास रोखले आहे. तसेच विद्यमान लेख, सोशल मीडिया पोस्ट आणि व्हिडिओमधील वादग्रस्त मजकूर काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. काय आहे प्रकरण? अदाणी एंटरप्रायजेसने दाखल केलेल्या दाव्यानुसार, काही विशिष्ट वेबसाइट्स व व्यक्तींच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात नकारात्मक आणि हेतुपुरस्सर मजकूर प्रसारित केला जात होता. यात ‘paranjoy.in’, ‘adaniwatch.org’ आणि ‘adanifiles.com.au’ या संकेतस्थळांचा समावेश आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या मजकुराचा उद्देश त्यांच्या जागतिक स्तरावरील प्रतिमेला धक्का पोहोचवणे आणि व्यवसायिक कामकाजात अडथळे आणणे हा होता. या प्रकरणातील प्रतिवादींमध्ये परंजय गुहा ठाकुर्ता, रवी नायर, अबीर दासगुप्ता, अयस्कंता दास, आयुष जोशी, बॉब ब्राउन फाउंडेशन, ड्रीमस्केप नेटवर्क इंटरनॅशनल प्रा. लि., गेटअप लि., डोमेन डायरेक्टर्स प्रा. लि. (इन्स्ट्रा) आणि जॉन डो यांचा समावेश आहे. न्यायालयाचे निरीक्षण वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश अनुज कुमार सिंह यांनी सुनावणीदरम्यान निरीक्षण नोंदवले की : “अदाणी एंटरप्रायजेसच्या बाजूने प्रकरण प्रथमदर्शनी योग्य दिसते. सततचा बदनामीकारक मजकूर, रिट्विट आणि ट्रोलिंगमुळे त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेवर गंभीर परिणाम होऊ शकतो आणि मीडिया ट्रायलला बळी पडावे लागू शकते.” न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत प्रतिवादींना पडताळणी न केलेला व बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करण्यापासून रोखले आहे. तसेच, ५ दिवसांच्या आत सोशल मीडिया पोस्ट्स व लेखांमधून वादग्रस्त मजकूर काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. जर मजकूर हटवणे शक्य नसेल, तर संपूर्ण पोस्ट/लेख हटवावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. टेक कंपन्यांनाही आदेश जर प्रतिवादींनी आदेशाचे पालन केले नाही, तर गूगल, युट्यूब, आणि एक्स (माजी ट्विटर) यांसारख्या मध्यस्थांना (Intermediaries) ३६ तासांच्या आत मजकूर हटवणे किंवा वापर थांबवणे बंधनकारक असेल, असे न्यायालयाने निर्देश दिले आहेत.

अदाणी एंटरप्रायजेसला दिलासा; दिल्ली न्यायालयाने पत्रकार-एनजीओंना बदनामीकारक मजकूर हटवण्याचे आदेशपडताळणी न केलेला मजकूर प्रकाशित करण्यास मज्जाव; पुढील सुनावणी ९ ऑक्टोबरला Read More »

बीड शहर पहिल्यांदाच रेल्वे नकाशावर; १७ सप्टेंबरला धावणार पहिली रेल्वेमराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ऐतिहासिक क्षण; उपमुख्यमंत्री अजित पवार करतील उद्घाटन

बीड – बीडकरांचे दशकांपासूनचे स्वप्न अखेर साकार होणार आहे. बीड–अहिल्यानगर रेल्वे मार्गाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून, येत्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पहिल्यांदाच रेल्वे बीड जिल्ह्यातून धावणार आहे. या निमित्तानं बीड शहर प्रथमच रेल्वेच्या नकाशावर झळकणार असून, जिल्ह्याच्या इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदला जाणार आहे. रेल्वेच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. उद्घाटनाच्या तयारीसाठी बीड रेल्वे स्टेशनवर कामाला वेग आला असून, प्लॅटफॉर्मपासून विद्युतीकरणापर्यंत सर्व कामं अंतिम टप्प्यात आहेत. बीडकरांचं स्वप्न अखेर साकार गेल्या अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्यात रेल्वेची मागणी होत होती. शहरात रेल्वे सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवास, व्यापार आणि उद्योगक्षेत्रावर त्याचा परिणाम होत होता. आता या मार्गामुळे बीडकरांना थेट रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. उद्घाटनाची उत्सुकता शिगेला बीड शहरात उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू आहे. स्थानिक पातळीवर रेल्वे धावणार या ऐतिहासिक क्षणाचं स्वागत करण्यासाठी नागरिक, व्यापारी आणि विविध सामाजिक संघटना सज्ज होत आहेत. “बीड जिल्ह्यासाठी १७ सप्टेंबर हा केवळ मराठवाडा मुक्ती संग्राम दिन राहणार नाही, तर बीडकरांच्या आयुष्यात रेल्वेचं नवं पर्व सुरू होणार आहे. दशकानुदशकांचं स्वप्न अखेर पूर्ण होतंय,” असं स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलं.

बीड शहर पहिल्यांदाच रेल्वे नकाशावर; १७ सप्टेंबरला धावणार पहिली रेल्वेमराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ऐतिहासिक क्षण; उपमुख्यमंत्री अजित पवार करतील उद्घाटन Read More »

पुण्यात नाना पेठेत रक्तरंजित टोळीयुद्ध; आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्यागणेशोत्सवाच्या सुरक्षेनंतर अवघ्या दोन तासांत गडबड; रोहित पवारांचा सरकारवर संताप

पुणे – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. ५) शहरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवून रूट मार्च काढला होता. मात्र, या बंदोबस्तानंतर अवघ्या दोन तासांतच पुण्याच्या नाना पेठ परिसरात टोळीयुद्ध उफाळले आणि रक्तरंजित थरार घडला. आंदेकर टोळी व कोमकर गटातील वर्चस्वाच्या संघर्षातून आयुष कोमकर (Ayush Komkar) याची पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गेल्या वर्षी १ सप्टेंबर २०२४ रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांची हत्या झाली होती. या हत्येच्या प्रकरणात आरोपी असलेल्या गणेश कोमकर (Ganesh Komkar) याचा मुलगा आयुष याच्यावर शुक्रवारी संध्याकाळी पार्किंगमध्ये घात झाला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी अवस्थेत त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. रोहित पवारांचा सरकारवर निशाणा या घटनेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर ताशेरे ओढले. त्यांनी एक्सवर लिहिलं – “लाखो भक्तांच्या उपस्थितीत जगातील सर्वात मोठा गणेशोत्सव पुण्यात साजरा होत असताना टोळीयुद्धाचा भडका उडतो. एक टोळी दुसऱ्यावर धडधडीतपणे गोळ्या चालवते आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून रक्तरंजित होळी खेळली जाते. प्रचंड दहशतीखाली असलेला सामान्य माणूस जीव मुठीत धरून बसलाय. अशा परिस्थितीत लोक विचारत आहेत — कुठे आहेत ‘नव्या पुण्याचे शिल्पकार’?” नेमकं काय आहे प्रकरण? १ सप्टेंबर २०२४ रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा वर्चस्वाच्या वादातून खून झाला. आंदेकर टोळी बदला घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना तीन दिवसांपूर्वीच मिळाली होती. आंबेगाव पठार भागात टोळी रेकी करत असल्याचं समोर आलं होतं, मात्र कारवाई असूनही हल्ला शहराच्या मध्यवर्ती भागातच घडला.

पुण्यात नाना पेठेत रक्तरंजित टोळीयुद्ध; आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्यागणेशोत्सवाच्या सुरक्षेनंतर अवघ्या दोन तासांत गडबड; रोहित पवारांचा सरकारवर संताप Read More »

याला तणाव नाही, दादागिरी म्हणतात” – अजित पवार प्रकरणावर संजय राऊतांचा हल्लाबोलIPS अंजना कृष्णा प्रकरणावरून संजय राऊतांचे सरकारवर निशाणा – “90% मंत्रिमंडळ नैतिकतेवर टिकणार नाही”

मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि महिला पोलीस अधिकारी अंजना कृष्णा (IPS Anjana Krishna) यांच्यातील वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. “याला तणाव म्हणत नाहीत, दादागिरी म्हणतात,” असा टोला राऊतांनी लगावला. बेकायदेशीर काम करणाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांना फोन करणं म्हणजे ते त्यांच्या जवळचेच लोक असल्याचा आरोपही त्यांनी केला. बेकायदेशीर कामांना संरक्षण देण्याचा प्रयत्न? संजय राऊत म्हणाले, “बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना फोन केला. याचा अर्थ ते त्यांचीच माणसं होती. पोलिसांना कारवाई थांबवायला सांगणं म्हणजे नियमांबाहेरचं काम. याला तणाव नाही, दादागिरी म्हणतात.” राऊतांनी अजित पवारांच्या भाषणातील मुद्दाही आठवला. “अजित पवार नेहमी म्हणतात मी नियमबाह्य काही करत नाही. मग या घटनेत पोलिसांना बेकायदेशीर कामांना संरक्षण का द्यावं लागलं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महिला अधिकाऱ्याचं काय चुकलं? या प्रकरणात IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना लक्ष्य करणाऱ्या आमदारांच्या पत्रावरही राऊतांनी टीका केली. “त्या महिला अधिकाऱ्याचं काय चुकलं? नियम आणि कायदा सांगणं हेच त्यांचं काम आहे. उपमुख्यमंत्र्यांना कायद्याचं भान करून दिलं म्हणून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जातेय. हे दुर्दैवी आहे.” “90% मंत्रिमंडळ खाली जाईल” संजय राऊतांनी सरकारवर मोठा घणाघात करताना म्हटलं – “नैतिकतेवर बोलायचं झालं तर महाराष्ट्रातील 90% मंत्रिमंडळ घरी जाईल. शिंदे गटाचे सर्व मंत्री पदावर राहणार नाहीत. अजित पवारांचे मंत्रीसुद्धा टिकणार नाहीत. प्रत्येकावर आरोप आहेत, प्रत्येक जण बेकायदेशीर कामांत गुंतलेला आहे.”

याला तणाव नाही, दादागिरी म्हणतात” – अजित पवार प्रकरणावर संजय राऊतांचा हल्लाबोलIPS अंजना कृष्णा प्रकरणावरून संजय राऊतांचे सरकारवर निशाणा – “90% मंत्रिमंडळ नैतिकतेवर टिकणार नाही” Read More »

दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र? उद्धवांसोबत राज ठाकरे येण्याची शक्यता“मुंबईत मराठी माणूस टिकवण्यासाठी उद्धव-राज यांचे मिलन गरजेचे” – सचिन अहिर

मुंबई – येत्या दसरा मेळाव्यात मोठी राजकीय घडामोड घडण्याचे संकेत ठाकरे गटाने दिले आहेत. यंदाच्या शिवतीर्थावरील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत मनसेप्रमुख राज ठाकरे हेदेखील स्टेजवर दिसू शकतात. ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शनिवारी यासंदर्भात महत्त्वपूर्ण इशारा दिला. “दसऱ्याला तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कदाचित राज ठाकरे यांना आमच्या पक्षाकडून दसरा मेळाव्याचे निमंत्रण दिले जाऊ शकते,” असे सचिन अहिर म्हणाले. “दसरा मेळावा – न भूतो न भविष्यती” सचिन अहिर यांनी एबीपी माझाच्या न्यूजरूममध्ये दिलेल्या छोटेखानी मुलाखतीत सांगितले – “उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणे ही फक्त दोन पक्षांची गरज नाही, तर राज्यासाठी आवश्यक आहे. दसऱ्याला कार्यकर्त्यांना दिशा देण्याचं काम होतं. यावेळचा मेळावा ‘न भूतो न भविष्यती’ स्वरुपाचा असेल.” त्यांनी पुढे सांगितले की, राज आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांकडे कायम पाहत असतात. दोघं स्टेजवर एकत्र दिसतील का, हे सांगता येणार नाही. मात्र त्यांना आमंत्रित करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई महानगरपालिकेची लढाई आणि मराठी माणसाचा प्रश्न मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचा उल्लेख करताना सचिन अहिर म्हणाले – “मुंबईची भौगोलिक परिस्थिती बदलत चालली आहे. त्यामुळे ही निवडणूक मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई असेल. मी काँग्रेस-राष्ट्रवादीत 15 वर्ष होतो, पण महानगरपालिका उत्तम चालवू शकणारा पक्ष फक्त शिवसेना आहे, असं आम्हाला नेहमी वाटलं.” त्यांनी पुढे भर दिला – “मुंबईत मराठी माणूस टिकवायचा असेल तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र नेतृत्व करणे ही काळाची गरज आहे.”

दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र? उद्धवांसोबत राज ठाकरे येण्याची शक्यता“मुंबईत मराठी माणूस टिकवण्यासाठी उद्धव-राज यांचे मिलन गरजेचे” – सचिन अहिर Read More »

Ratnagiri Crime: बिअर शॉपीत बोलवून गर्लफ्रेंडची हत्या, ६० फूट दरीत मृतदेह सापडलातीन खून प्रकरणातील गूढ उलगडले; पोलिस तपास सुरु

रत्नागिरी: जिल्ह्यातील एका बिअर शॉपीतून तरुणीला बोलवून नेल्याचा प्रकार समोर आला. नंतर तिचा मृतदेह ६० फूट खोल दरीत सापडला, आणि तपासात पोलिसांना तीन खून प्रकरणांची गुंतागुंत उघड झाली. प्रकरणाचा तपशील स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक युवतीला तिच्या मित्राने किंवा ओळखीच्या व्यक्तीने बिअर शॉपीमध्ये बोलवले. काही तासांनंतर तिचा मृतदेह दरीत सापडला. प्राथमिक तपासात, मृत्यूचे कारण सावरलेले शारीरिक दुखापत असल्याचे लक्षात आले. पोलिसांचा तपास रत्नागिरी पोलीस तपास करत आहेत आणि आरोपींच्या संपर्क व हालचालींवर लक्ष ठेवले आहे. तपासात असे आढळले की, मृत्यूच्या मागे तीन खून प्रकरणांची गुंतागुंत आहे. पोलिसांनी घटनास्थळी साक्षीदारांची चौकशी सुरू केली असून, डिजिटल पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. स्थानिक प्रशासनाची प्रतिक्रिया पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, आरोपींना लवकरात लवकर पकडून न्यायालयीन कारवाईसाठी तयार केले जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Ratnagiri Crime: बिअर शॉपीत बोलवून गर्लफ्रेंडची हत्या, ६० फूट दरीत मृतदेह सापडलातीन खून प्रकरणातील गूढ उलगडले; पोलिस तपास सुरु Read More »

इंग्रजी लोणच्यासारखं, पण मातृभाषेला मान द्या” – गुलाबराव पाटील यांचा शिक्षकांना सल्लाआदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात मंत्री पाटील यांची प्रतिक्रिया; मराठी शाळांची पटसंख्या वाढवण्याचे आवाहन

जळगाव – “जेवणात जसं लोणचं लागतं, तसंच थोडं इंग्रजी यायला हरकत नाही. पण आपल्या मातृभाषेचा आदर राखलाच पाहिजे,” असा अनोखा सल्ला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिक्षकांना दिला. शिक्षक दिनानिमित्त जळगाव येथे आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमात त्यांनी पुढाऱ्यांची मुलं विरुद्ध शिक्षकांची मुलं यांच्यातील तुलना मांडली. “आदर्श शिक्षकांची मुलं मोठ्या पदावर असतात. पण पुढाऱ्यांची मुलं फार मोठ्या ठिकाणी नसतात. राजकारण्यांकडे प्रॉपर्टी असते, पण शिक्षकांची खरी प्रॉपर्टी म्हणजे त्यांची घडलेली मुलं,” असे ते म्हणाले. “इंग्रजी मीडियमची मुलं फोडून मराठी शाळेत घ्या” गुलाबराव पाटील यांनी शाळांच्या पटसंख्येवर भाष्य करताना म्हटलं – “जशी भाजप कोणालाही पक्षात घेत असते, तशीच तुम्ही इंग्रजी मीडियमची मुलं फोडून जिल्हा परिषद शाळेत घ्या. मराठी शाळांची पटसंख्या वाढली तरच आदर्श शिक्षक घडतील.” त्यांनी हेही सांगितले की पटसंख्या कमी झाल्यामुळे शिक्षक भरती रखडली आहे. मराठी शाळांची स्थिती आता पूर्वीपेक्षा सुधारली आहे, मात्र अजूनही पटसंख्या टिकवण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आदर्श शिक्षक आणि कुटुंबाचा वाटा सोहळ्यात पाटील म्हणाले – “आदर्श शिक्षक होण्यात पत्नींचाही मोठा वाटा आहे. कारण त्यांच्या आधारामुळेच गुरुजी आपलं कर्तव्य पार पाडू शकतात. आदर्श शिक्षकांवर कोणी टीका करत नाही. ते समाजात विद्यार्थी घडवण्याचं महान काम करतात.” शिक्षकांसाठी ड्रेसकोडची मागणी शाळांमधील शिक्षकांच्या शिस्तीवर बोलताना पाटील म्हणाले – “पूर्वीचे शिक्षक नेहमी ड्रेसकोडमध्ये असायचे. आता तसं नाही. पण शाळेत तरी शिक्षकांचा ड्रेसकोड असायलाच हवा. कारण गुरु हा देवाच्या स्थानी असतो.”

इंग्रजी लोणच्यासारखं, पण मातृभाषेला मान द्या” – गुलाबराव पाटील यांचा शिक्षकांना सल्लाआदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात मंत्री पाटील यांची प्रतिक्रिया; मराठी शाळांची पटसंख्या वाढवण्याचे आवाहन Read More »