konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • महेश काळे यांची मैफल ऐनवेळी रद्द; रत्नागिरीतील प्रेक्षकांमध्ये संताप
महेश काळे यांची मैफल ऐनवेळी रद्द; रत्नागिरीत प्रेक्षकांचा संताप

महेश काळे यांची मैफल ऐनवेळी रद्द; रत्नागिरीतील प्रेक्षकांमध्ये संताप

प्रतिनिधी : कोकणधारा

रत्नागिरी : लोकप्रिय गायक महेश काळे यांच्या गायन मैफिलीचा रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडांगणावर होणारा कार्यक्रम ऐनवेळी रद्द झाल्याने प्रेक्षकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कार्यक्रम रद्द झाल्याची पूर्वसूचना न दिल्यामुळे बाहेरून आलेल्या रसिकांचा मोठा हिरमोड झाला.

रविवारी सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार होता. मात्र, कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती अनेक प्रेक्षकांना रत्नागिरीत आल्यानंतरच मिळाली. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांनी आपली फसवणूक झाल्याची भावना व्यक्त केली आहे.

या कार्यक्रमासाठी तिकीट विक्री स्थानिक पातळीवर तसेच ‘बुक माय शो’द्वारे करण्यात आली होती. कोल्हापूरसह विविध ठिकाणांहून रसिक प्रेक्षक कार्यक्रमासाठी आले होते. त्यांनी तिकीटे खरेदी केली होती; परंतु कार्यक्रम रद्द झाल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

पुण्याचे गंधार जोग आणि दिवेश बापट यांच्या ‘एकदंत थिएटर’ व ‘ताल इंटरटेनमेंट’तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती पाच दिवसांपूर्वीच देण्यात आली होती. तसेच ‘बुक माय शो’लाही याबाबत कळविण्यात आले होते. मात्र, तरीही आदल्या दिवशीपर्यंत तिकीट विक्री सुरू असल्याने गोंधळ उडाला.

या कार्यक्रमासाठी ५०० ते ३५०० रुपये दरम्यान तिकीट दर ठेवण्यात आले होते. तिकीटांचे पैसे जमा झाल्यानंतरही कार्यक्रम रद्द झाल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजी वाढली आहे. दरम्यान, कार्यक्रम रद्द करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कार्यक्रमासाठी आवश्यक तयारी, परवानग्या किंवा व्यवस्था करण्यात आल्याचेही दिसून आले नाही. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फसवणूक व मनस्तापाबाबत अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे