konkandhara.com

राजकारण

WhatsApp Image 2025 09 09 at 11.04.23 AM

बिहार निवडणुकीत जागावाटपावरून काँग्रेस-आरजेडीमध्ये पेच; काँग्रेसला फक्त ५० जागा?

नवी दिल्ली | बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) यांच्यात जागावाटपावरून पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसने सुमारे ६० जागांची मागणी केली आहे, मात्र आरजेडी फक्त ५० जागांवरच तडजोडीला तयार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दिल्लीमध्ये काँग्रेसची महत्त्वाची बैठक काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी दिल्लीमध्ये बिहार काँग्रेसचे प्रभारी, प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आरजेडीसोबतच्या जागावाटपावरील चर्चेसह पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. तसेच राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली नुकतीच पार पडलेली ‘वोटर अधिकार यात्रा’ याचे पुनरावलोकनही होणार आहे. आरजेडी का कमी जागा देत आहे? मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ७० जागांवर लढून केवळ १९ जागा जिंकल्या होत्या. यावेळी विरोधी आघाडीत वीआयपी, जेएमएम आणि पशुपति पारस गट यांचा समावेश झाल्यामुळे काँग्रेसवर कमी जागांवर लढण्याचा दबाव आहे. त्याचबरोबर सीपीआय-एमएलने ३० जागांची मागणी केली आहे, जे मागील वेळेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आरजेडी स्वतः १४० जागा लढण्याच्या तयारीत असून उर्वरित मित्रपक्षांना जागा वाटण्याची योजना आखत आहे. काँग्रेसचा हक्क मजबूत जागांवर? काँग्रेस काही जागा सोडण्यास तयार आहे, मात्र त्याबदल्यात विरोधी समीकरणात प्रभावी ठरतील अशा मजबूत जागा मिळाव्यात, अशी तिची मागणी आहे. मात्र आरजेडीने अद्याप ती मागणी मान्य केलेली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या वाट्याला अखेरीस फक्त ५० जागा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बिहार निवडणुकीत जागावाटपावरून काँग्रेस-आरजेडीमध्ये पेच; काँग्रेसला फक्त ५० जागा? Read More »

WhatsApp Image 2025 09 09 at 10.57.57 AM

पटना तख्त श्री हरमंदिर साहिबला आरडीएक्सने उडवण्याची धमकी; परिसरात हाई अलर्ट

पटना | बिहारची राजधानी पटना येथील तख्त श्री हरमंदिर साहिब गुरुद्वाराला आरडीएक्सने उडवण्याची धमकी मिळाल्याने परिसरात मोठा गोंधळ उडाला. जीमेलवर आलेल्या या धमकीनंतर त्वरित प्रशासनाला माहिती देण्यात आली आणि संपूर्ण परिसरात हाई अलर्ट जारी करण्यात आला. धमकीनंतर प्रशासन सतर्क धमकीची माहिती मिळाल्यानंतर प्रबंधन समितीने जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि चौक पोलीस ठाण्याला कळवले. तत्काळ बम निरोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि गुरुद्वाराच्या प्रत्येक कोपऱ्याची तपासणी केली. ई-मेलमध्ये काय लिहिलं होतं? प्रबंधन समितीचे सदस्य जगजीत सिंह यांनी सांगितले की, मेलमध्ये लिहिलं होतं – “आपल्या गुरु लंगर कक्षात चार RDX आधारित IEDs ठेवण्यात आले आहेत. विस्फोटापूर्वी व्हीआयपी आणि कर्मचारी तातडीने बाहेर निघून जा.” या संदेशानंतर गुरुद्वारा परिसरात क्षणात खळबळ उडाली. तपासात काहीही संशयास्पद सापडले नाही बम निरोधक पथकाने संपूर्ण तपास केला, मात्र काहीही संशयास्पद आढळले नाही. प्राथमिक तपासातून हे मेल एखाद्या शरारती व्यक्तीकडून पाठवले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिस आता या ई-मेलचा स्त्रोत आणि प्रेषकाचा शोध घेत आहेत.

पटना तख्त श्री हरमंदिर साहिबला आरडीएक्सने उडवण्याची धमकी; परिसरात हाई अलर्ट Read More »

WhatsApp Image 2025 09 09 at 10.59.39 AM

देशाला आज मिळणार नवा उपराष्ट्रपती; सी. पी. राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत

नवी दिल्ली | देशात आज (मंगळवार) 15व्या उपराष्ट्रपती पदासाठी मतदान पार पडणार असून याच दिवशी निकालही जाहीर केला जाणार आहे. म्हणजेच संध्याकाळपर्यंत देशाला नवा उपराष्ट्रपती कोण होणार हे स्पष्ट होईल. पद रिक्त कसं झालं? माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी ऑगस्ट 2022 मध्ये पदभार स्वीकारला होता. त्यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट 2027 पर्यंत राहणार होता. मात्र 21 जुलै रोजी त्यांनी आरोग्य कारणांमुळे राजीनामा दिल्याने पद रिक्त झाले आणि नव्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. उमेदवार कोण? या निवडणुकीत एनडीएकडून सी. पी. राधाकृष्णन मैदानात आहेत, तर विरोधी INDIA आघाडीकडून जस्टिस बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नंबर गेम कोणाच्या बाजूने? एकूण 782 प्रतिनिधी मतदान करणार आहेत. त्यापैकी सुमारे 420 पेक्षा जास्त मते एनडीएच्या बाजूने असल्याचा अंदाज आहे, तर INDIA ब्लॉककडे जवळपास 312 मते आहेत. दरम्यान, काही पक्षांनी मतदानात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याने 48 मते दोन्ही गटांना मिळणार नाहीत. शर्यत रोचक का आहे? बहुमत एनडीएकडे असलं तरी निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राधाकृष्णन आणि सुदर्शन रेड्डी यांच्या कार्यक्षेत्रात काही साम्य असलं, तरी अनेक मुद्द्यांवर दोघेही परस्परविरोधी आहेत. त्यामुळे या निवडणुकीला राजकीय वर्तुळात वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

देशाला आज मिळणार नवा उपराष्ट्रपती; सी. पी. राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत Read More »

WhatsApp Image 2025 09 09 at 10.55.51 AM

देशाच्या १७व्या उपराष्ट्रपतीपदासाठी मतदानाला सुरुवात; मोदींनी टाकला पहिला मत

नवी दिल्ली | देशाच्या १७व्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज संसद भवनात मतदान प्रक्रिया सुरू झाली. सकाळी १० वाजता मतदानास प्रारंभ झाला असून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. मंगळवार उशिरापर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोदींनी टाकला पहिला मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान करून या निवडणुकीची सुरुवात केली. मतदानानंतर ते हिमाचल आणि पंजाबमधील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राजग विरुद्ध विरोधक या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रीय जनतांत्रिक आघाडीचे (राजग) उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांचा थेट सामना विरोधकांचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांच्याशी होत आहे. मतदान प्रक्रिया आणि सदस्यसंख्या मतदान संसद भवनातील एफ-१०१ वसुधा कक्षात पार पडत आहे. या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्य सहभागी होतात. राज्यसभेतील २३३ निवडून आलेले सदस्य (सध्या ५ जागा रिक्त) १२ मनोनीत सदस्य लोकसभेतील ५४३ निवडून आलेले सदस्य (सध्या १ जागा रिक्त) एकूण ७८८ सदस्यांपैकी सध्या ७८१ सदस्य मतदानासाठी पात्र आहेत.

देशाच्या १७व्या उपराष्ट्रपतीपदासाठी मतदानाला सुरुवात; मोदींनी टाकला पहिला मत Read More »

WhatsApp Image 2025 09 09 at 9.36.19 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘फिनिक्स विशेष सन्मान’ पुरस्काराने गौरव

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज मराठी पत्रकार संघाकडून ‘फिनिक्स विशेष सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले. मुंबईत आयोजित सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वांचे आभार मानले. राज्याच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मराठी पत्रकार संघाकडून देण्यात येणारा हा पुरस्कार राज्यातील कार्यक्षमता, नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन प्रदान केला जातो.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘फिनिक्स विशेष सन्मान’ पुरस्काराने गौरव Read More »

WhatsApp Image 2025 09 06 at 11.37.59 PM

जेएनपीएत देशातील सर्वांत मोठं कंटेनर टर्मिनल सुरू; महाराष्ट्र समुद्री महासत्ता बनेल : फडणवीसपीएसए इंडियाच्या सहकार्याने उभारलेलं प्रकल्प; वार्षिक हाताळणी क्षमता दुप्पट होऊन 4.8 दशलक्ष टीईयू

अलिबाग : महाराष्ट्र समुद्री क्षेत्रात मोठी झेप घेत आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPA) येथे देशातील सर्वांत मोठ्या कंटेनर टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, वाढवण बंदर कार्यान्वित झाल्यावर जेएनपीए जगातील पहिल्या दहा बंदरांमध्ये स्थान मिळवेल. पुढील शंभर वर्षांसाठी महाराष्ट्र समुद्री महासत्ता म्हणून उदयास येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उद्घाटन सोहळा गुरुवार, 4 सप्टेंबर रोजी झालेल्या या उद्घाटन सोहळ्यास केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आ. महेश बालदी, आ. प्रशांत ठाकूर, पराग शहा आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती लावली. तसेच, भारत आणि सिंगापूर दरम्यान नवीन करारनाम्यांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. अत्याधुनिक टर्मिनलची वैशिष्ट्ये पीएसए इंटरनॅशनलद्वारे चालवलं जाणारं हे टर्मिनल 100% अक्षय ऊर्जेवर कार्यरत आहे. हे समर्पित फ्रेट कॉरिडॉर (DFC) अनुरूप असलेलं भारतातील पहिलं कंटेनर टर्मिनल आहे. फेज-2 विस्तारामुळे क्षमता 2.4 दशलक्ष टीईयू वरून दुप्पट होऊन 4.8 दशलक्ष टीईयू झाली आहे. घाटाची लांबी 2000 मीटरपर्यंत वाढली असून, 24 घाट क्रेन आणि 72 रबर-टायर्ड गॅन्ट्री क्रेन (RTG) यांचा समावेश आहे. हे टर्मिनल रस्ते व रेल्वेद्वारे 63 हून अधिक इनलँड कंटेनर डेपो (ICD) शी जोडले गेले आहे, ज्यामुळे हे देशातील सर्वात व्यापक मल्टीमॉडल नेटवर्क ठरलं आहे. उद्योगक्षेत्रातील अपेक्षा उद्योग तज्ञांनी या प्रकल्पाला “गेम-चेंजर” म्हटलं आहे. अत्याधुनिक उपकरणे आणि मजबूत पायाभूत सुविधा यामुळे पीएसए मुंबई भारताच्या सागरी विकासाचा प्रमुख चालक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. Quote “वाढवण बंदर कार्यान्वित झाल्यावर जेएनपीए जगातील पहिल्या दहा बंदरांमध्ये स्थान मिळवेल. पुढील शंभर वर्षांसाठी महाराष्ट्र समुद्री महासत्ता म्हणून उदयास येईल.”– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जेएनपीएत देशातील सर्वांत मोठं कंटेनर टर्मिनल सुरू; महाराष्ट्र समुद्री महासत्ता बनेल : फडणवीसपीएसए इंडियाच्या सहकार्याने उभारलेलं प्रकल्प; वार्षिक हाताळणी क्षमता दुप्पट होऊन 4.8 दशलक्ष टीईयू Read More »

WhatsApp Image 2025 09 06 at 11.24.49 PM

KDMC News : 27 गावांच्या भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह – सुप्रीम कोर्टात याचिका, निवडणुका लांबणीवर?७ ऑक्टोबरला सुनावणी; सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचा ठाम पवित्रा

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) क्षेत्रातील 27 गावांना महापालिकेतून वगळण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या गावांना स्वतंत्र महापालिका मिळावी यासाठी सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे केडीएमसीच्या आगामी निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुनावणीची तारीख ७ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे. काय आहे याचिका? समितीच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेत पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत : 27 पैकी 18 गावे वगळण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती; ती रद्द करावी या 27 गावांमध्ये निवडणूक घेऊ नये प्रकरणावर तातडीने सुनावणी घेऊन निर्णय द्यावा 3,500 पेक्षा जास्त हरकती केडीएमसी निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर, फक्त या 27 गावांतूनच तब्बल 3,500 हरकती दाखल झाल्या आहेत. बहुतांश हरकतींमधून गावकऱ्यांनी महापालिकेतून वेगळे होण्याची मागणी नोंदवली आहे. 42 वर्षांचा संघर्ष समितीचे सहसचिव सुमित वझे यांनी सांगितले की, “आम्ही गेल्या 42 वर्षांपासून 27 गावांच्या विकासासाठी लढा देत आहोत. केडीएमसी ही गावांच्या विकासाला खीळ घालणारी ‘दरोडेखोर’ महापालिका आहे. कै. दि. बा. पाटील आणि रतन म्हात्रे यांनी या वेगळेपणासाठी संघर्ष केला. आता भिवंडीचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांच्या पुढाकाराने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.” पुढे काय? या प्रकरणातील सुप्रीम कोर्टाचा निर्णय 27 गावांच्या राजकीय आणि प्रशासकीय भवितव्याचा मार्ग निश्चित करेल. दरम्यान, निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेत आहे.

KDMC News : 27 गावांच्या भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह – सुप्रीम कोर्टात याचिका, निवडणुका लांबणीवर?७ ऑक्टोबरला सुनावणी; सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचा ठाम पवित्रा Read More »

WhatsApp Image 2025 09 06 at 11.21.50 PM

मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहिण’ योजनेत गैरव्यवहार उघड – राज्यभरात 26.30 लाख महिलांची घराघरांतून पडताळणीअपात्र लाभार्थ्यांना ओळखण्यासाठी अंगणवाडी सेविका तैनात; शहरी भागात अपूर्ण पत्त्यांमुळे पडताळणीला अडथळे

मुंबई – मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहिण’ (Majhi Ladki Bahin Yojana) योजनेत झालेल्या कथित गैरव्यवहारानंतर राज्य सरकारने मोठी कारवाई सुरू केली आहे. एकूण 26.30 लाख महिला लाभार्थ्यांची घराघरांत जाऊन पडताळणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या कामाची जबाबदारी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली आहे. काय आढळलं प्राथमिक तपासणीत? माहिती तंत्रज्ञान विभागाने केलेल्या प्राथमिक विश्लेषणात अनेक अनियमितता उघडकीस आल्या. एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी नोंदणी केली वयोमर्यादेचे उल्लंघन काही पुरुषांनी खोट्या पद्धतीने लाभ घेतला या प्रकारांमुळे राज्य सरकारने व्यापक तपासणीचा निर्णय घेतला आहे. पडताळणीत मोठ्या अडचणी पडताळणी मोहिमेत सेविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, विशेषतः शहरी भागात. सरकारकडून मिळालेल्या यादीत केवळ शहर आणि जिल्ह्याचे नाव असून, संपूर्ण पत्ते नाहीत अनेक पत्त्यांवर घरमालक उपलब्ध नाहीत काही पत्ते चुकीचे निघत आहेत या कारणामुळे पडताळणीची प्रक्रिया विलंबात अडकली असून, दीड महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही काम अपूर्ण आहे. तपासणीचे मुख्य निकष विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, पडताळणी पुढील महत्त्वाच्या निकषांवर केली जात आहे: लाभार्थीचे वय 21 ते 65 वर्षांदरम्यान असणे आवश्यक एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 महिलांना लाभ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे का याची चौकशी लाभार्थी महिला सरकारी कर्मचारी नाही ना याची खात्री पडताळणी पथके प्रत्येक घरात जाऊन वैवाहिक स्थिती, रोजगार तपशील आणि कुटुंब रचनेची माहिती गोळा करत आहेत. आढळत आहेत नियमबाह्य गोष्टी या पडताळणीतून आतापर्यंत अनेक नियमबाह्य प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे खऱ्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा फायदा पोहोचवण्याची प्रक्रिया अधिक काटेकोर केली जात आहे.

मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहिण’ योजनेत गैरव्यवहार उघड – राज्यभरात 26.30 लाख महिलांची घराघरांतून पडताळणीअपात्र लाभार्थ्यांना ओळखण्यासाठी अंगणवाडी सेविका तैनात; शहरी भागात अपूर्ण पत्त्यांमुळे पडताळणीला अडथळे Read More »

WhatsApp Image 2025 09 07 at 10.22.21 PM

Rohit Pawar News: देवेंद्र फडणवीसांच्या ‘देवाभाऊ’ जाहिरातीवरून रोहित पवारांचा टोला”सरकारकडे योजना बंद करण्याइतके पैसे नाहीत, मग कोट्यवधींच्या जाहिराती कुणी दिल्या?” – रोहित पवार

मुंबई | गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘देवाभाऊ’ शीर्षकाची जाहिरात झळकली. काही ठिकाणी फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी पुष्प अर्पण करताना दिसत होते, तर काही ठिकाणी ते गणपती बाप्पाला वंदन करताना दाखवले गेले. या जाहिरातींवर प्रकाशकाचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी भाजप आणि सरकारवर जोरदार टीका केली. नेमकं काय म्हणाले रोहित पवार? “तुम्ही 40 कोटी, 400 कोटी किंवा 4000 कोटींच्या जाहिराती दिल्या तरी आम्हाला हरकत नाही. पण या निनावी जाहिराती नेमक्या का दिल्या गेल्या? याबाबत आमचा आक्षेप आहे,” असे रोहित पवार म्हणाले. ते पुढे म्हणाले, “जर या जाहिराती सरकारने दिल्या असतील, तर एका बाजूला पैसे नसल्याचे कारण देऊन योजना बंद केल्या जात आहेत, कंत्राटदारांची बिले प्रलंबित आहेत आणि काहीजण आत्महत्या करत आहेत. अशा वेळी कोट्यवधींच्या जाहिराती छापणे म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी नाही का?” “90 कोटींचा दंड माफ केलेल्या कंपनीने जाहिरात दिली का?” रोहित पवार यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, “भाजपने जाहिरात दिली असेल तर नावाने का दिली नाही? नाही दिली, तर मग एखाद्या कंपनीने किंवा मित्रपक्षातील अडचणीत सापडलेल्या नेत्याने उपकाराची परतफेड म्हणून दिली का? उदाहरण द्यायचं झालं तर, ज्या कंपनीचा 90 कोटी रुपयांचा दंड महसूलमंत्री म्हणून तुम्ही माफ केला होता, त्या कंपनीने या जाहिराती दिल्या का?” याशिवाय, “जर या जाहिरातींमध्ये काहीही काळेबेरं नसेल, तर एवढे कोट्यवधी रुपये खर्च करून जाहिराती कुणी दिल्या हे जाहीर करा,” असे आव्हानही पवारांनी दिले.

Rohit Pawar News: देवेंद्र फडणवीसांच्या ‘देवाभाऊ’ जाहिरातीवरून रोहित पवारांचा टोला”सरकारकडे योजना बंद करण्याइतके पैसे नाहीत, मग कोट्यवधींच्या जाहिराती कुणी दिल्या?” – रोहित पवार Read More »

WhatsApp Image 2025 09 07 at 10.03.16 PM

धाराशिव | गणेशोत्सवात पेटला जुना वैर! निंबाळकर विरुद्ध पाटील संघर्ष पुन्हा रंगमंचावर

गणरायाला निरोप देतानाही धाराशिवमध्ये राजकारणाचा ज्वालामुखी फूटला. विसर्जनाच्या मिरवणुकीत पुन्हा एकदा समोरासमोर आले – खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार पुत्र मल्हार पाटील. जिल्ह्यातील जुना वैर असलेला निंबाळकर विरुद्ध पाटील संघर्ष आता नव्या पिढीत अधिक पेटताना दिसतोय. तीन पिढ्यांचा वैर धाराशिवचं राजकारण म्हणजे एक घराणं, दोन परंपरा आणि एक दीर्घकाळ धगधगत असलेला संघर्ष. पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर – हे चुलत भाऊ पण राजकारणात कट्टर प्रतिस्पर्धी. 2006 मध्ये पवनराजेंची हत्या झाली आणि त्या प्रकरणात पद्मसिंह पाटलांवर आरोप झाले. त्यानंतर दोन्ही घराण्यातील वैर अधिकच गहिरं झालं. राजकारणाचा रणांगण पित्याच्या निधनानंतर ओमराजे राजकारणात आले आणि 2009 पासून त्यांनी राणा जगजीतसिंह पाटील यांना थेट टक्कर दिली. त्यानंतर जिल्ह्यात राजकारण दोन गटात विभागलं – निंबाळकर गट विरुद्ध पाटील गट. प्रशासनापासून निवडणुकांपर्यंत या संघर्षाचा प्रभाव स्पष्ट दिसतो. पुढच्या पिढीतला संघर्ष गेल्या काही वर्षांत या संघर्षात उतरलेत पाटील कुटुंबाची पुढची पिढी – मल्हार पाटील. वडिलांवर ओमराजेंनी टीका केली तेव्हा मल्हारांनी थेट पलटवार करत त्यांची ‘औकात’ काढली. प्रत्युत्तरादाखल ओमराजेंनीही थेट इशारा दिला – “राजकारणामुळे माझ्या वडिलांना संपवलं. आता तुमचं राजकारण संपवणार!” निवडणुकीतून मिरवणुकीत अलीकडच्या लोकसभा निवडणुकीतही हा वैर रंगला – मल्हार पाटलांच्या आई राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभ्या होत्या तर त्यांच्या समोर होते ओमराजे निंबाळकर. आता गणेश विसर्जन मिरवणुकीत दोघे पुन्हा समोरासमोर आले आणि धाराशिवकरांनी जुना ‘कलगीतुरा’ प्रत्यक्ष अनुभवला. जनता मात्र हवालदिल या सततच्या संघर्षात जिल्ह्याचा विकास मात्र मागे पडला आहे. राजकीय, कौटुंबिक वैर बाजूला ठेवून एकत्रित काम करण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करतात. “तुमचं भांडण बाजूला ठेवा, जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सुबुद्धी दे बाप्पा!” अशीच धाराशिवकरांची मनापासून प्रार्थना आहे.

धाराशिव | गणेशोत्सवात पेटला जुना वैर! निंबाळकर विरुद्ध पाटील संघर्ष पुन्हा रंगमंचावर Read More »