konkandhara.com

ग्राउंड झिरो पोस्ट

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूणमध्ये उपोषणस्थळी गोंधळ; पत्रकारावर हल्ला, बहादूरशेख नाका येथील घटनेनंतर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल; तपास डीवायएसपी बेले यांच्याकडे

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : शहरातील बहादूरशेख नाका येथे चिपळूण नागरी पतसंस्थेच्या कथित गैरकारभाराविरोधात सुरू होणाऱ्या उपोषणादरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून, या घटनेप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका फिर्यादीवरून वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारावर मारहाण, शिवीगाळ, दमदाटी आणि साहित्य चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे, तर दुसऱ्या फिर्यादीवरून उपोषणकर्ते रुपेश पवार व रवींद्र पवार यांच्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बेले हे करीत आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २५ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास बहादूरशेख नाका, चिपळूण येथे चिपळूण नागरी पतसंस्थेच्या गैरकारभाराविरोधात रुपेश सुरेश पवार (रा. खेड) हे उपोषणास बसणार होते. या उपोषणाचे वृत्तांकन करण्यासाठी दूरदर्शनचे पत्रकार दीपक दिलीप भागवत हे कॅमेरामन रुपेश साळुंखे यांच्यासह घटनास्थळी गेले होते. त्यावेळी १० ते १५ जणांच्या जमावाने त्यांना अडवून “तू कसला पत्रकार, तू कसले शूटिंग करतो?” असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तक्रारीनुसार, संबंधितांनी हाताच्या थपडा, लाथाबुक्यांनी मारहाण केली, तसेच फिर्यादी दीपक भागवत यांच्या साईड बॅगमधील आयडी कार्ड व इतर साहित्य चोरीस गेल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पत्रकार दीपक दिलीप भागवत (रा. रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनोळखी १० ते १५ जणांविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ८२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १८९(२), १९०, १९१(२), ३०३(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) तसेच महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियम २०१७ चे कलम ४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस नोंदीनुसार हा गुन्हा दि. २५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६.३६ वा. दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेप्रकरणी दुसरी फिर्याद अभिषेक चंद्रकांत मोहिते यांनी दिली असून, त्यांच्या तक्रारीवरून उपोषणकर्ते रुपेश पवार व रवींद्र पवार यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीतील नेमके आरोप आणि त्यामागील कारणांचा तपशील पोलीस तपासातून पुढे येणार आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. या संपूर्ण घटनेत एकीकडे पत्रकारावर हल्ला आणि वृत्तांकनात अडथळा आणल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे, तर दुसरीकडे आंदोलनकर्त्यांविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्याने हे प्रकरण केवळ स्थानिक वादापुरते मर्यादित राहिलेले नाही. पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनांचे स्वरूप आणि सार्वजनिक ठिकाणी निर्माण होणारा तणाव या तिन्ही अंगांनी ही घटना चर्चेचा विषय ठरत आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बेले हे करीत असून, या प्रकरणात घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची साक्ष, व्हिडिओ चित्रीकरण आणि संबंधित व्यक्तींची विधाने यांच्या आधारे तपास पुढे नेला जाणार आहे. दोन्ही बाजूंनी गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्यामुळे या घटनेचे नेमके सत्य आणि जबाबदारी कोणाची, हे पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

चिपळूणमध्ये उपोषणस्थळी गोंधळ; पत्रकारावर हल्ला, बहादूरशेख नाका येथील घटनेनंतर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल; तपास डीवायएसपी बेले यांच्याकडे Read More »

mumbai-goa-highway-three-toll-plaza-issue

रस्ता अपूर्ण… तरी तीन टोल! मुंबई- गोवा महामार्गावर प्रवाशांचा संताप उफाळला

प्रतिनिधी : कोकणधारा माणगाव : मुंबई–गोवा महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसताना प्रवाशांवर तीन टोल नाक्यांचा भार टाकण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आधीच अपूर्ण रस्ता, निकृष्ट दर्जाचे जोडरस्ते आणि अपुऱ्या सुविधांमुळे त्रस्त असलेल्या वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर या सुमारे ९० किलोमीटरच्या अंतरात खारपाडा आणि खांब येथे दोन टोल नाके उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना एका प्रवासात दोन ठिकाणी टोल भरावा लागण्याची शक्यता आहे. याशिवाय पुढील टप्प्यात पोलादपूरजवळ लोहारे येथेही टोल वसुली सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या ठिकाणी टोल नाका उभारण्यात आला असून सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे “रस्ता पूर्ण नसताना टोल कशासाठी?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. १६ वर्षांपासून रखडलेले काम मुंबई–गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम २०११ साली सुरू झाले. मात्र निधीअभावी, पर्यावरणीय परवानग्या, भूसंपादनातील अडचणी तसेच ठेकेदारांच्या निष्क्रियतेमुळे हे काम वर्षानुवर्षे रखडत गेले. तब्बल १६ वर्षांनंतरही महामार्गाचे अनेक भाग अपूर्ण असून काही ठिकाणी अजूनही काम सुरू आहे. नागोठणे आणि कोलाड परिसरातील पुलांची कामे सुरूच आहेत, तर माणगाव आणि इंदापूर बायपासही अद्याप पूर्ण झालेले नाहीत. अनेक ठिकाणी अपूर्ण रस्त्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत टोल वसुलीची तयारी सुरू झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे. टोल दर अद्याप जाहीर नाहीत टोलचे दर किती असतील याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र लवकरच यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध होण्याची शक्यता असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. टोल सुरू झाल्यास वाहनधारकांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गावांकडे जाणारे रस्ते निकृष्ट पळस्पे ते इंदापूर या टप्प्यात अनेक गावांना जोडणारे रस्ते आहेत. मात्र हे जोडरस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे. काही ठिकाणी ब्लॉक टाकून तात्पुरते रस्ते तयार करण्यात आले असून त्यामुळे ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. सुविधा अपुऱ्या, नागरिकांचा सवाल महामार्गाचे काम पूर्ण झालेले नसताना टोल वसुलीची घाई का केली जात आहे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. अनेक ठिकाणी खड्डे, अपूर्ण पूल, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या सुविधा असताना प्रवाशांकडून टोल आकारणे योग्य नसल्याचे मत व्यक्त होत आहे. मुंबई–गोवा महामार्ग हा कोकणातील लाखो नागरिकांसाठी जीवनरेखा मानला जातो. पर्यटन, व्यापार आणि दैनंदिन प्रवासासाठी या मार्गाचे मोठे महत्त्व आहे. त्यामुळे महामार्ग पूर्ण, सुरक्षित आणि दर्जेदार झाल्यानंतरच टोल आकारणी करावी तसेच सुलभ शौचालय, स्ट्रीट लाईट, चार्जिंग आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अपूर्ण महामार्गावर टोल आकारणीचा निर्णय घेतल्यास तो कोकणवासीयांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरेल, अशी भावना सध्या सर्वत्र व्यक्त होत आहे. तसेच याविरोधात विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

रस्ता अपूर्ण… तरी तीन टोल! मुंबई- गोवा महामार्गावर प्रवाशांचा संताप उफाळला Read More »

मुंबई–गोवा महामार्गावर दुचाकी अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

मुंबई–गोवा महामार्गावर दुचाकी अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

विशेष प्रतिनिधी, कोकणधारा खेड : मुंबई–गोवा महामार्गावर भरणे शिंदेवाडी येथे भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना शनिवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अद्वैत प्रवीण गीते हा तरुण आपल्या मित्रासह रॉयल एनफिल्ड जीटी ६५० (एमएच ०८ बीबी ५७९०) या दुचाकीवरून मुंबई–गोवा महामार्गावरून कळंबनीच्या दिशेने जात होता. भरणे गावाच्या हद्दीत शिंदेवाडी परिसरात दुचाकी भरधाव वेगात असताना चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकी महामार्गावर घसरली. या अपघातात अद्वैत महामार्गाच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरवर जोरात आपटला. डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेला अद्वैतचा मित्रही गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ कळंबनी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अद्वैत गीते हा नवभारत हायस्कूलचे शिक्षक प्रवीण गीते यांचा मुलगा असून त्यांचे मूळ गाव खेड तालुक्यातील तिसंगी आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नातेवाईक, हितचिंतक आणि मित्रपरिवाराने घटनास्थळी धाव घेतली. मात्र अद्वैतचा जागीच मृत्यू झाल्याचे समजताच परिसरात शोककळा पसरली.दरम्यान, अद्वैत आपल्या मित्रांसोबत जेवणासाठी महामार्गावरून कळंबनीच्या दिशेने जात असताना हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

मुंबई–गोवा महामार्गावर दुचाकी अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू Read More »

mahad fire

महाडमध्ये दोन ठिकाणी आगीच्या घटना; लाखोंचं नुकसान

महाड | प्रतिनिधी – दिनेश चाफळकर: महाड शहर आणि नडगाव गावाच्या परिसरात रविवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. या दोन्ही आगीत मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शहरातील एका डायग्नोस्टिक लॅबला आणि नडगाव येथील भंगार गोदामाला आग लागल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. रोहिदास नगरमधील लॅब जळून खाक महाड शहरातील रोहिदास नगर परिसरात प्रगती विराज दळवी यांच्या मालकीच्या ‘आयकॉन डायग्नोसिस लॅब’ला रविवारी मध्यरात्री अचानक आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेतली. दरवाजा तोडून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केल्याची माहिती रहिवासी विराज दळवी यांनी दिली. या आगीत लॅबमधील महागडी इलेक्ट्रॉनिक उपकरणे, फर्निचर, संगणक तसेच एक्स-रे मशिनरी जळून खाक झाली. प्राथमिक अंदाजानुसार या घटनेत सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत तपास सुरू आहे. नडगावमध्ये भंगार गोदामाला आग दुसरी घटना रविवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास नडगाव गावाजवळ घडली. येथील कलाम यांच्या मालकीच्या भंगार गोदामाला आग लागली. आगीमुळे गोदामातील मोठ्या प्रमाणात साहित्य जळून गेले. गोदामाच्या शेजारी असलेल्या पॅलेट तयार करणाऱ्या एका लघुउद्योगालाही या आगीचा फटका बसला. लाकडी भुसा व इतर साहित्य जळून सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती व्यवसायिक शाम सुरेश गुडेकर यांनी दिली. भंगार गोदामाचेही लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाची तत्पर कारवाई दोन्ही घटनांमध्ये अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सध्या दोन्ही घटनांबाबत तपास सुरू असून आग लागण्याचे कारण शोधले जात आहे. सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर महाड शहरात अल्पावधीत दोन आगीच्या घटना घडल्याने स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. व्यापारी आणि नागरिकांनी अग्निसुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. एक्स-रे लॅब आणि भंगार गोदाम या दोन्ही ठिकाणी झालेल्या नुकसानीमुळे संबंधित व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला असून प्रशासनाकडून मदत व तपासाच्या निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाडमध्ये दोन ठिकाणी आगीच्या घटना; लाखोंचं नुकसान Read More »

महाडमध्ये रिक्षा पलटी; २५ वर्षीय युवकाचा मृत्यू

महाडमध्ये भीषण रिक्षा अपघात; २५ वर्षीय युवकाचा मृत्यू

दिनेश चाफळकर, महाड महाड | १२ फेब्रुवारी २०२६:महाड तालुक्यातील दहिवड गावाच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात २५ वर्षीय सुजित सुधीर सकपाळ याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याच्यासह चार जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे महाड परिसरात शोककळा पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुजित सकपाळ हा आपल्या मित्र-मैत्रिणींसह महाड एमआयडीसी परिसरात फिरून परत येत होता. तो स्वतः ऑटो रिक्षा चालवत होता. दहिवड गावाजवळ रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष झाल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा पलटी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघात इतका गंभीर होता की रिक्षा रस्त्याच्या कडेला उलटली. जखमींवर उपचार सुरू या अपघातात समृद्धी सुधीर धायळकर, अनिकेत शशिकांत धायळकर, रोहिणी हिरामण धायळकर आणि अंतरा शशिकांत धायळकर हे जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत सर्व जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणीअंती सुजित सकपाळ याला मृत घोषित केले. इतर जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पोलिसांकडून गुन्हा नोंद या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलिस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 106(1), 281, 125(अ), 125(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. सुरक्षित वाहनचालना गरजेची या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना वेगमर्यादा पाळण्याचे आणि रस्त्यावरील परिस्थितीकडे लक्ष देऊन वाहन चालवण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक नागरिकांनीही या मार्गावर वाहतूक सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. या दुर्दैवी अपघातामुळे सकपाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

महाडमध्ये भीषण रिक्षा अपघात; २५ वर्षीय युवकाचा मृत्यू Read More »

Copy of Nagarpalika 7

ब्रेकिंग: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात मृत्यू — राज्यभर हळहळ

प्रतिनिधी महाड – दिनेश चाफळकर मुंबई/बारामती, दि. २८ जानेवारी २०२६: आज सकाळी राज्याला धक्कादायक वृत्त मिळाले आहे — महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याचे प्रारंभिक वृत्त प्रमुख मध्यजबरी माध्यमांनी दिले आहे. बारामती (पुणे जिल्हा) येथे सकाळी सुमारे ८:४५ वाजेच्या सुमारास चार्टर्ड विमान लँडिंग करताना क्रॅश लँड झाले. या अपघातात पाच ते सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, ज्यात उपमुख्यमंत्री पवार यांचा समावेश असल्याचे अनेक राष्ट्रीय वृत्तसंस्था सांगत आहेत. अपघाताची प्राथमिक माहिती विमान बारामती विमानतळावर लँड करण्याचा प्रयत्न करत असताना रनवे जवळ रस्ता गमावल्यामुळे क्रॅश लँड झाले. विमानाचा तुकडा सुमारे विमानतळापासून काहीच अंतरावर वळणावर सापडला आहे आणि विमान जळून खाक झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले आहे. पुढील तपासणीसाठी डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) आणि स्थानिक प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. कोण कोण सवार होते? प्रारंभिक वृत्तांनुसार,✔️ उपमुख्यमंत्री अजित पवार✔️ पायलट आणि सह-पायलट✔️ सुरक्षा अधिकारी/सहाय्यक✔️ अन्य कर्मचारीया सर्वांचा समावेश विमानात होता; सगळ्यांचे जीव गमावल्याची DGCA आणि पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. घटनास्थळ आणि बचावकार्य अपघात बारामती विमानतळाजवळ झाल्याने घटनास्थळी ताबडतोब पोलीस, अग्निशमन विभाग आणि आरोग्य दल दाखल झाले. घटना स्थळी धूर आणि भयंकर पोस्ट-अपघात वातावरण असल्याचे स्थानिक वृत्तांनी सांगितले आहे. राज्यभर प्रतिक्रिया या भीषण अपघाताच्या बातमीनंतर महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री, मित्रराज्यातील नेते, तसेच विरोधी पक्ष नेत्यांनी देखील शोक निवेदन जारी करणे सुरू केले आहे, अशी माहिती काही वृत्ते देत आहेत. (संपूर्ण प्रतिक्रिया येत आहेत — अपडेट होत आहे.) ❗ तातडीच्या तपासाचे मुद्दे अद्यापही स्पष्टपणे सांगता येत नाही की :अपघाताचे नेमके कारण तांत्रिक दोष होता की लँडिंगमध्ये चूक,विमानाचे मेंटेनन्स, हवामान किंवा इतर कोणत्या कारणांचा भाग आहे,हे सर्व अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. DGCA ने तातडीने तपास सुरू केला आहे. आज सकाळी बारामती येथील विमान अपघाताची बातमी महाराष्ट्रासाठी आणि भारतीय राजकारणासाठी अपरिहार्य धक्का ठरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे एक अनुभवी आणि महत्त्वाचे राजकीय नेतृत्व होते, आणि त्यांच्या अचानक मृत्यूने राज्यात शोकाची लाट पसरली आहे. पहिली प्राथमिक माहिती आणि अधिकारी घोषणांनुसार त्यांच्या सोबत सर्व प्रवाशांचीही प्राणहानी झाली आहे, परंतु अधिकृत पुष्टी चर्चा किंवा अधिकारी अहवाल आल्यानंतर बातमी अधिक विस्तृत स्वरूपात अपडेट केली जाईल. ✍️ कोंकणधारा डेस्क 📌 महत्त्वाचे अपडेट्स अजित पवार विमानापघातात मृत, इतरही प्रवासी मृत (प्राथमिक वृत्त)घटना बारामती विमानतळाजवळच्या लँडिंग दरम्यानDGCA चौकशी करत आहे🔔 ही बातमी अद्यावत होत आहे — जर अधिकृत पुष्टी किंवा अधिक तपशील उपलब्ध झाले तर तो त्वरित समायोजित केला जाईल.

ब्रेकिंग: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात मृत्यू — राज्यभर हळहळ Read More »

WhatsApp Image 2025 10 29 at 11.14.33 PM

अमित शाहांचा नारा — “विरोधक सुफडासाफ व्हावेत!

मुंबई | २८ ऑक्टोबर २०२५:मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या नव्या कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पक्ष कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ‘विरोधकांचा सुफडासाफ करा’ असा स्पष्ट आणि आक्रमक संदेश दिला. महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलत असतानाच शाह यांचे हे भाषण भाजपच्या संघटनात्मक तयारीचे संकेत देणारे ठरले. 🏘️ भाजपच्या नव्या कार्यालयाचं भूमिपूजन आणि संदेशाचा अर्थ मुंबईतील प्रमुख ठिकाणी झालेल्या या भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते. अमित शाह यांनी पक्षाच्या नव्या कार्यालयाला ‘भविष्याच्या विजयांचं केंद्र’ असे संबोधत कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले. “मुंबईसह महाराष्ट्रातील प्रत्येक नगरपरिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीत असा विजय मिळवा की विरोधक ‘दुरबिणीतून’ही दिसणार नाहीत,” असे शाह म्हणाले.त्यांनी यावेळी स्पष्ट केले की, भाजप आता “काट्यांवर चालणार नाही,” तर आपल्या संघटनेच्या शक्तीवर आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आधारित विजय मिळवणार आहे. 🧾 ‘ट्रिपल इंजिन सरकार’ आणि विकासाचा मंत्र अमित शाह यांनी ‘ट्रिपल इंजिन सरकार’चा (केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था) मंत्र पुन्हा अधोरेखित केला. “जेव्हा केंद्रात मोदी सरकार, राज्यात भाजप सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले लोक असतील, तेव्हा विकासाची गती तिपटीने वाढते,” असे त्यांनी सांगितले. शाह यांनी पक्षाच्या कार्यकाळातील प्रगतीचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. त्यांनी ‘परिवारवादी पक्ष’ आणि ‘वंशपरंपरागत राजकारण’ संपवण्याचं लक्ष्य पुन्हा ठळक केलं.“आम्ही विकासाच्या मुद्द्यांवर लढतो, व्यक्तीपूजक राजकारणावर नाही,” असे म्हणत त्यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष टोला दिला. 💬 फडणवीसांचे प्रत्युत्तर आणि युतीचा संदेश या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाह यांच्या भाषणावर प्रत्युत्तर देताना, “अमितभाई म्हणाले, ‘काट्यांवर चालणार नाही’ — पण महाराष्ट्रातील मित्र हे ‘काठी’ नाहीत, तर खांदे आहेत,” असे म्हणत युतीतील एकता दाखवण्याचा प्रयत्न केला.फडणवीस यांनी पुढे सांगितले की, “भाजप-शिवसेना (शिंदे गट) युती ही केवळ राजकीय समीकरण नाही, तर विकासाचा संकल्प आहे.” यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जयघोष करत ‘ट्रिपल इंजिन सरकार’च्या घोषणेला प्रतिसाद दिला. या कार्यक्रमानंतर मुंबई आणि राज्यभरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य दिसून आले. 📊 राजकीय पार्श्वभूमी आणि आगामी निवडणुकांचे गणित मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीसह महाराष्ट्रातील विविध जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपालिकांच्या निवडणुका पुढील काही महिन्यांत होण्याची शक्यता आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने मुंबईत जोरदार कामगिरी केली होती, परंतु शिवसेना (उद्धव ठाकरे गट)ने सत्ता राखली होती.या वेळी भाजप ‘स्वबळावर’ आणि ‘ट्रिपल इंजिन सरकारच्या कामगिरीवर’ भर देत प्रचार करणार आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, शाह यांचे भाषण हे केवळ कार्यकर्त्यांना उत्साही करण्यासाठी नव्हते, तर महाराष्ट्रातील आगामी स्थानिक निवडणुकांपूर्वी विरोधकांना स्पष्ट इशारा देणारे होते. भाजपच्या या आक्रमक भूमिकेकडे मतदारांचंही लक्ष आहे. मुंबईतील मतदारांमध्ये ‘विकास विरुद्ध वंशवाद’ हा निवडणुकीचा मुख्य मुद्दा बनण्याची शक्यता आहे.काही नागरिकांच्या मते, “शाह यांच्या वक्तव्यामुळे निवडणुकीत स्पर्धा अधिक चुरशीची होईल, पण महत्त्वाचं म्हणजे मुंबईच्या समस्यांवर ठोस उपाय सादर केले जातील का?” असा प्रश्न विचारला जातो. मुंबईतील भाजपच्या नव्या कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी अमित शाह यांनी दिलेला ‘विरोधक सुफडासाफ’ करण्याचा नारा महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापवणारा ठरला आहे.शाह यांच्या आक्रमक भाषणातून भाजपचा आत्मविश्वास आणि संघटनात्मक तयारी स्पष्ट दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रत्युत्तरातून युतीतील समन्वयाचा संदेश दिला असला तरी, निवडणुकीत या “खांद्यांचा भार” भाजपला कितपत यश देईल हे आगामी महिन्यांत स्पष्ट होईल.

अमित शाहांचा नारा — “विरोधक सुफडासाफ व्हावेत! Read More »

WhatsApp Image 2025 10 29 at 11.12.56 PM

रायगड ZP निवडणुकीत युती अपयशी; काँग्रेस स्वबळावर लढणार

📰 रायगड ZP निवडणुकीत युती अपयशी; काँग्रेस स्वबळावर लढणार रायगड | २८ ऑक्टोबर २०२५:रायगड जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) यांच्यातील युतीची चर्चा गेल्या काही आठवड्यांपासून रंगत होती; मात्र अखेर ही युती न होण्याचं स्पष्ट झालं असून काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निवडणुकीचं चित्र अधिक चुरशीचं आणि बहुकोणी स्वरूपाचं बनणार आहे. 🏘️ घटनेची पार्श्वभूमी व राजकीय हालचाली रायगड जिल्ह्यात गेल्या काही निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप यांच्यात स्थानिक पातळीवर तडजोडी झाल्या होत्या. दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे काही ठिकाणी सत्ता स्थापन केली होती. मात्र या वेळी सत्ताप्राप्तीच्या समीकरणांवरून, उमेदवारांच्या निवडीवरून आणि गटबाजीच्या पार्श्वभूमीवर मतभेद तीव्र झाले. परिणामी, राष्ट्रवादी आणि शेकाप या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र रणनीती आखण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसने देखील या स्थितीचा आढावा घेत स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे. पक्षाच्या जिल्हा पातळीवरील बैठकींमध्ये “स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचा सन्मान राखत निवडणूक लढविणे” हा सूर ठळकपणे उमटला. या निर्णयामुळे जिल्ह्यातील अनेक प्रभागांत नवे राजकीय समीकरणं तयार होऊ शकतात. 🧾 जनतेची आणि पक्षीय कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया युती अपयशी ठरल्याने स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ आणि असंतोष दिसत आहे. काही कार्यकर्त्यांनी “आघाडीचे उमेदवार ठरवले असते तर सत्तेच्या शक्यता वाढल्या असत्या” अशी प्रतिक्रिया दिली. तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र नवचैतन्य दिसत आहे. “स्वबळाचा निर्णय हा स्थानिक संघटनांना चालना देणारा आहे,” असं रायगड जिल्हा काँग्रेसमधील एका वरिष्ठ नेत्याने कोंकणधाराशी बोलताना सांगितलं. शेकाप आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते मात्र परस्परांवर जबाबदारी ढकलत आहेत. “काही ठिकाणी उमेदवार निश्चितीवरून मतभेद झाले, पण लढत निष्पक्ष राहील,” असं शेकापच्या नेत्याचं म्हणणं आहे. 💻 इतर पक्षांची तयारी आणि निवडणुकीचं संभाव्य चित्र भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांनी निवडणूक मोडमध्ये प्रवेश केला आहे. प्रचार मोहिमा सुरू झाल्या असून ग्रामीण भागात कार्यकर्त्यांना गाठीभेटी देण्यात येत आहेत. काँग्रेसने स्वबळाचा निर्णय घेतल्यामुळे, या निवडणुकीत बहुकोणी स्पर्धा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तज्ञांच्या मते, “युती अपयशी ठरल्यामुळे काँग्रेसचा मतविभाजनाचा धोका वाढला आहे; मात्र लोकप्रिय उमेदवार आणि समाजगटांशी जुळवून घेतल्यास काही ठिकाणी काँग्रेसला आश्चर्यजनक यश मिळू शकतं.” अपक्ष उमेदवार आणि ग्रामपंचायत पातळीवरचे स्थानिक गटसुद्धा या पार्श्वभूमीवर सक्रिय झाले आहेत. विशेषत: पाताळगंगा, पेण, माणगाव, रोहा आणि महाड या तालुक्यांत अपक्ष गट प्रभावी ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. 🧩 प्रशासनिक तयारी आणि पुढील दिशा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर सर्व पक्षांनी उमेदवार निश्चितीच्या हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. नामनिर्देशन दाखल करण्यासाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून, निवडणूक आयोगाने निष्पक्षतेसाठी कठोर नियम लागू केले आहेत. प्रत्येक पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या प्रभागांमध्ये मतदार यादी अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा प्रशासनाने मतदार जागरूकता मोहिमेसह ई-निवडणूक प्रशिक्षणाचे उपक्रमही हाती घेतले आहेत. 🧩 समाप्ती / निष्कर्ष रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका या वेळी ‘बहुकोणी’ स्वरूपाच्या ठरण्याची शक्यता निश्चित झाली आहे. राष्ट्रवादी-शेकाप युती अपयशी ठरल्याने काँग्रेस स्वबळावर लढणार, तर भाजप-शिवसेना गटही आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी झटत आहेत. स्थानिक गटबाजी, समाजगटांची निष्ठा, आणि व्यक्तीगत लोकप्रियता या सर्व घटकांवर या निवडणुकीचं भविष्य ठरणार आहे. राजकीय समीकरणांच्या या बदलत्या चित्रात, जनता कोणाच्या बाजूने मत व्यक्त करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे — कारण या निवडणुकीचा निकाल फक्त सत्तेसाठी नाही, तर स्थानिक राजकीय संतुलनासाठीही निर्णायक ठरणार आहे.

रायगड ZP निवडणुकीत युती अपयशी; काँग्रेस स्वबळावर लढणार Read More »

WhatsApp Image 2025 10 29 at 11.41.07 PM

रायगडमध्ये शिंदे गटाची मोठी खेळी — एनसीपीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश; तटकरे गटावर दबाव वाढला

रायगड जिल्ह्यात आज झालेल्या सामूहिक पक्षप्रवेशाने स्थानिक राजकारणात मोठा भूकंप घडवला आहे.मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र डालवी यांच्या नेतृत्वाखाली, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे जिल्ह्यातील सत्तासमीकरणात नवीन वळण आले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक संघटनांवर याचा गंभीर परिणाम होणार आहे.विशेष म्हणजे, आमदार महेंद्र डालवी यांनी कोंकणधाराला दिलेल्या मुलाखतीत थेट आरोप केला की — “सुनील तटकरे यांनी नेहमीच कार्यकर्त्यांना फसवलं, खोट्या आश्वासनांवर ठेवून आपला स्वार्थ साधला.” या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, रायगडमधील तटकरे विरुद्ध गोगावले–डालवी संघर्ष आता नव्या उंचीवर पोहोचला आहे.प्रश्न एवढाच आहे — हा फक्त पक्षांतर आहे का, की रायगडच्या राजकीय प्रवाहातील नेतृत्वबदलाची सुरुवात? रायगड जिल्ह्यातील राजकारण हे गेल्या काही वर्षांपासून तटकरे–गोगावले संघर्षाभोवती फिरत आलं आहे.सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं जाळं उभं केलं, तर भरत गोगावले आणि महेंद्र डालवी यांनी शिंदे गटाच्या माध्यमातून आपली संघटनशक्ती वाढवली. 2022 च्या शिंदे बंडानंतर रायगडमध्ये शिवसेनेत दोन गट निर्माण झाले —एक तटकरे समर्थक पारंपरिक गट आणि दुसरा शिंदे गटाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा नवा गट. दरम्यान, अजित पवार गटातील अनेक कार्यकर्ते सत्ता वाटप, निधी वितरण आणि स्थानिक नेतृत्वातील दुर्लक्षामुळे नाराज होते.या असंतोषाचा फायदा घेत, गोगावले–डालवी जोडीने जिल्हाभर मोहिम उघडली —“विकासासाठी स्थैर्य, स्थैर्यासाठी शिंदे नेतृत्व.” त्याच मोहिमेचा परिपाक म्हणजे —शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात सामूहिक प्रवेश, ज्यात रोंहा, मुरुड, पोलादपूर, पेण, माणगाव या भागातील प्रमुख गावांतील कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या हालचालीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तळागाळातील संघटनशक्तीला धक्का बसला असून, स्थानिक निवडणुकीपूर्वी शिंदे गटाने संघटनात्मक बळाचे प्रदर्शन केल्याचं चित्र आहे. ही घटना फक्त एक पक्षांतर नाही, तर रायगड जिल्ह्याच्या राजकीय संतुलनातील निर्णायक बदल आहे. 🔸 १. संघटनापेक्षा संवाद महत्त्वाचा ठरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांत “केंद्रित नेतृत्व, पण तळागाळाशी तुटलेला संपर्क” अशी स्थिती निर्माण झाली होती.तटकरे गटाच्या कार्यशैलीविषयी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती — विशेषतः निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आणि स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ होते. त्याउलट, शिंदे गटाने या असंतोषाला दिशा दिली. मंत्री गोगावले आणि आमदार डालवी यांनी थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधून “शिवसेना म्हणजे आपली माती, आपला विकास” हा संदेश दिला.हा संवाद आणि प्रत्यक्ष संपर्कच या प्रवेशाचा पाया ठरला. 🔸 २. तटकरे गटावर वाढलेलं संघटनात्मक दडपण रायगडमध्ये तटकरे कुटुंबाचा दीर्घ काळ प्रभाव राहिला आहे, पण आता परिस्थिती बदलते आहे.गोगावले–डालवी जोडीने संघटनशक्तीच्या बळावर तटकरे गटाच्या प्रभावाला प्रत्यक्ष आव्हान दिलं आहे.विशेष म्हणजे, हे आव्हान वैयक्तिक नाही — तर संघटन पातळीवरील निष्ठा आणि नेतृत्वावरचा विश्वास यावर आधारित आहे. या प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे स्थानिक नेते “तात्कालिक असंतोषाचा परिणाम” म्हणून भूमिका मांडत असले, तरी तळागाळात “तटकरे गटावरील विश्वास कमी होतोय” ही वस्तुस्थिती झाकता येत नाही. 🔸 ३. आगामी निवडणुका आणि नवा सत्तागणित रायगड जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि विधानसभा निवडणुका हे पुढचं रणांगण आहे.गोगावले–डालवी यांच्या गटाने दाखवलेली संघटनशक्ती पाहता, शिंदे गटाचं पारडं सध्या जड दिसतंय.एनसीपी (अजित पवार गट) समोरचं मोठं आव्हान म्हणजे —कार्यकर्त्यांचा विश्वास परत मिळवणं आणि नव्या पिढीशी संवाद साधणं. तटकरे गटाने आता “स्थानिक विकास” आणि “संघटन स्थैर्य” या दोन आघाड्यांवर ठोस पावलं उचलली नाहीत, तर ही फूट आणखी खोल जाईल. 🔸 ४. शिंदे गटाची रणनीती स्पष्ट गोगावले आणि डालवी यांनी गेल्या काही महिन्यांत “शिवसेना पुन्हा गावागावात” ही मोहीम सुरू ठेवली आहे.या प्रवेशाने त्या मोहिमेला प्रत्यक्ष स्वरूप मिळालं आहे.त्यांच्या दृष्टीने हा केवळ पक्षविस्तार नाही, तर “जनतेचा विश्वास परत मिळवण्याचं यशस्वी अभियान” आहे. राजकारणात प्रतीकं महत्त्वाची असतात — आणि आज रायगडमध्ये झालेलं हे सामूहिक पक्षप्रवेशाचं दृश्य,शिंदे गटासाठी राजकीय पुनर्जन्माचं प्रतीक बनलं आहे. ⚖️ तज्ज्ञांचा दृष्टिकोन (170 शब्द): राजकीय विश्लेषक सांगतात —“रायगडमधील सध्याची घडामोड ही महाराष्ट्रातील व्यापक प्रवाहाचा भाग आहे, जिथे ‘नेतृत्वावरचा विश्वास’ हे घटक पक्षनिष्ठेपेक्षा अधिक निर्णायक ठरत आहेत.एनसीपीच्या स्थानिक संघटनांमध्ये गेल्या काही काळात स्थैर्याचा अभाव होता; शिंदे गटाने त्या रिकाम्या जागा तात्काळ भरल्या.” एक वरिष्ठ राजकीय निरीक्षक नमूद करतात,“महेंद्र डालवी यांचं वक्तव्य हे केवळ आरोप नाही, तर तळागाळातील नाराजीचं प्रतिबिंब आहे.रायगडमध्ये आता तटकरे गटाला नव्या राजकीय रणनीतीची गरज आहे — अन्यथा जिल्ह्यातील ‘सत्ता समतोल’ पुढील निवडणुकीत पूर्णपणे बदलू शकतो.” या दोन्ही मतांवरून स्पष्ट होतं की —रायगड जिल्हा महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणात पुन्हा केंद्रस्थानी येतोय. रायगड जिल्ह्यातील आजचा पक्षप्रवेश हा केवळ एका पक्षाच्या कमकुवतपणाचा पुरावा नाही,तर स्थानिक पातळीवरील जनतेच्या अपेक्षांचं पुनर्संरचनाचं चित्र आहे.शिंदे गटाने या संधीचा योग्य फायदा घेतला असून, त्यांनी “संघटन म्हणजे संपर्क” हा मूलमंत्र दाखवून दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) साठी आता ही वेळ आत्मपरीक्षणाची आहे.जर तटकरे गटाने तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद पुन्हा प्रस्थापित केला नाही, तररायगड जिल्ह्यातील राजकीय समतोल कायमचा बदलू शकतो. राजकारणात सत्ता टिकवण्यासाठी निष्ठा नव्हे,विश्वास आणि संवाद हेच सर्वात मोठं शस्त्र ठरतं —आणि रायगडच्या या नव्या समीकरणाने ते पुन्हा अधोरेखित केलं आहे.

रायगडमध्ये शिंदे गटाची मोठी खेळी — एनसीपीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश; तटकरे गटावर दबाव वाढला Read More »