konkandhara.com

Editorial

प्रतिनिधी : कोकणधारा

जगबुडी पुलावर भीषण अपघात; कार कठड्यावर आदळली, मोठा अनर्थ टळला

प्रतिनिधी : कोकणधारा खेड (प्रतिनिधी): रत्नागिरीच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या कारवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट जगबुडी नदीवरील पुलाच्या संरक्षक कठड्यावर जाऊन आदळल्याची घटना घडली. या अपघातात कारचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, कारचा वेग अधिक असल्याने चालकाचा ताबा सुटला आणि गाडी रस्त्यावरून घसरत थेट पुलाच्या कठड्यावर चढली. जर ही कार कठड्यावर अडकली नसती, तर ती थेट सुमारे शंभर ते दीडशे फूट खोल जगबुडी नदीत कोसळली असती. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त केली जात आहे.अपघाताचा आवाज ऐकून इतर वाहनधारक व स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. काही काळासाठी या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरील वाढता वेग आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

जगबुडी पुलावर भीषण अपघात; कार कठड्यावर आदळली, मोठा अनर्थ टळला Read More »

furus-accident-khed-dapoli-highway-father-death-daughter-injured

फुरूस येथे भीषण अपघात; वडिलांचा जागीच मृत्यू, मुलगी गंभीर जखमी

प्रतिनिधी : कोकणधारा खेड (प्रतिनिधी): खेड-दापोली महामार्गावरील फुरूस येथे गुरुवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात फुरूस बुलेश्वर वाडी येथील सचिन खामकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या सोबत असलेली मुलगी गंभीर जखमी झाली आहे. सचिन खामकर हे आपल्या मुलीसह ॲक्टिव्हा दुचाकीवरून प्रवास करत असताना एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक अत्यंत भीषण असल्याने खामकर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या मुलीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत खेड-दापोली महामार्गावर रस्ता रोको केला. सुमारे तीन ते चार तास चाललेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती आणि दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी एका संशयित वाहनाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

फुरूस येथे भीषण अपघात; वडिलांचा जागीच मृत्यू, मुलगी गंभीर जखमी Read More »

पाग उद्यानाच्या दुरवस्थेवर नगराध्यक्ष सकपाळ संतप्त; ८ दिवसांत सुधारणा आदेश

पाग येथील उद्यानाच्या दुरवस्थेवर नगराध्यक्ष सकपाळ संतप्त; आठ दिवसांत सुधारणा करण्याचे आदेश

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : चिपळूण नगर परिषदेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी बुधवारी सायंकाळी पाग येथील उद्यानाला भेट देत तेथील दुरवस्थेबाबत उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. उद्यानातील स्वच्छतेचा अभाव, बंद असलेले स्वच्छतागृह, वाढलेले गवत आणि अपुऱ्या सुविधांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या वेळी नगराध्यक्षांनी उद्यान परिसर स्वच्छ ठेवण्याच्या, नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या तसेच उद्यान सकाळी व सायंकाळी नियमित सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या. “मी दिलेल्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करा, आठ दिवसांनंतर पुन्हा पाहणी करणार,” असा इशाराही त्यांनी दिला. भेटीदरम्यान उद्यानात स्वच्छता करण्यात आल्याचे दिसून आले. मात्र, स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी ही स्वच्छता नेहमीच असते का, असा प्रश्न विचारला असता नागरिकांनी नकारार्थी उत्तर दिले. त्यामुळे नगराध्यक्षांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच स्वच्छता करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. उद्यानात विजेची सुविधा नसल्याचे निदर्शनास आल्याने तातडीने वीज पुरवठ्याची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी विद्युत विभागाला दिल्या. वीज उपलब्ध झाल्यानंतर सायंकाळी होणारे गैरप्रकार रोखता येतील, असेही त्यांनी सांगितले. तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पेव्हर ब्लॉक दुरुस्त करण्याचे, उद्यानाची दोन्ही गेट्स सुरू ठेवण्याचे व इतर अनधिकृत प्रवेश मार्ग बंद करण्याचे निर्देश दिले. स्वच्छतागृहाची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश देताना उद्यान विभागाचे प्रमुख बापू साडविलकर यांनाही दुरवस्थेबाबत सुनावले. आरोग्य सभापती शुभम पिसे यांनीही आरोग्य व उद्यान विभागाला आवश्यक त्या सूचना केल्या. या पाहणीवेळी आरोग्य सभापती शुभम पिसे, नगरसेविका शितल रानडे, शिवसेना उपशहर प्रमुख सुयोग चव्हाण, माजी नगरसेविका सई चव्हाण, तसेच विपुल कांबळी, नयन चव्हाण, संदेश गोरीवले, गणेश किंजळकर, प्रसाद शिंदे, सोहम चव्हाण, अमोल तटकरी, प्रितेश सुतार, हेमंत केळसकर, धिरज तांबडे, प्रथमेश कांबळी, अथर्व चव्हाण आदी उपस्थित होते.

पाग येथील उद्यानाच्या दुरवस्थेवर नगराध्यक्ष सकपाळ संतप्त; आठ दिवसांत सुधारणा करण्याचे आदेश Read More »

चिपळूण : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर चिपळूण अर्बन बँकेच्या प्रधान कार्यालय व मुख्य शाखेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन चिपळूण शहरातील बाजारपेठेत उत्साहात पार पडले. या उद्घाटनप्रसंगी राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी बँकेच्या पारदर्शक व समन्वयातून चालणाऱ्या कारभाराचे कौतुक करत, “चिपळूण अर्बन बँक ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरावी अशी संस्था आहे,” असे गौरवोद्गार काढले. उद्घाटनानंतर राजाभाऊ रेडीज सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते, आमदार भास्करशेठ जाधव, आमदार शेखर निकम, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, माजी आमदार सदानंद चव्हाण, बँकेचे अध्यक्ष मोहनशेठ मिरगल, उपाध्यक्ष अजय खातू, कोअर कमिटी सदस्य उमेश काटकर, दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयंत जालगावकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, शौकत मुकादम, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाबू तांबे, माजी नगरसेवक विलास खेराडे, उदय गांधी, सतीशअप्पा खेडेकर, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, तहसीलदार प्रवीण लोकरे, अॅड. भाऊ दळी, मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार सूर्यवंशी, राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष शशिकांत सुतार यांच्यासह बँकेचे संचालक, अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक लोकप्रतिनिधी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ना. उदय सामंत पुढे म्हणाले की, बँकेचा कारभार पूर्णपणे पारदर्शक असून संचालक मंडळ सर्वपक्षीय समन्वयाने काम करत आहे. बँकेच्या प्रगतीसाठी राजकारण बाजूला ठेवून कार्य केले जाते, ही बाब विशेष कौतुकास्पद आहे. चेअरमन व व्हाइस चेअरमन यांची एकच केबिन असणे ही देखील एक वेगळी आणि प्रेरणादायी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. १९३३ साली स्थापन झालेल्या या बँकेला ९३ वर्षांचा समृद्ध इतिहास लाभला असून, या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्याची संधी मिळाल्याचा आनंद असल्याचे त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक करताना अध्यक्ष मोहनशेठ मिरगल यांनी सांगितले की, रावसाहेब खातू यांनी ९३ वर्षांपूर्वी सहकाराचे छोटे रोपटे लावले आणि आज त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. दूरदृष्टी ठेवून उभारलेली ही आधुनिक वास्तू भविष्यात बँकेच्या प्रगतीस नवे बळ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सांगितले की, १९३३ साली अवघ्या ५०-६० रुपयांत सुरू झालेली ही बँक आज सुमारे ७०० कोटींच्या व्यवहारांपर्यंत पोहोचली आहे, ही प्रगती अभिमानास्पद आहे. आमदार शेखर निकम यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेत संचालक मंडळाच्या कार्याचे कौतुक केले, तर आमदार भास्करशेठ जाधव यांनी रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वीच १९३३मध्ये बँकेची स्थापना झाली, ही तत्कालीन नेतृत्वाची दूरदृष्टी असल्याचे सांगितले. “या बँकेचा पाया भक्कम असून भविष्यातही सहकार क्षेत्रात ती यशाचा झेंडा फडकवत राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच अध्यक्ष मोहनशेठ मिरगल यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करत त्यांच्या प्रामाणिक व कष्टाळू नेतृत्वाचे कौतुक केले. यावेळी बँकेच्या ९३ वर्षांच्या इतिहासाचा आढावा घेणाऱ्या “स्मृतिगंध” या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच इमारत उभारणीत मोलाचा वाटा उचलणारे प्रशासन विभाग प्रमुख समीर जंगम व संबंधित ठेकेदारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष अजय खातू यांनी मानले.

चिपळूण अर्बन बँक पारदर्शक कारभाराचा आदर्श : ना. उदय सामंत, नूतन इमारतीचे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उद्घाटन

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर चिपळूण अर्बन बँकेच्या प्रधान कार्यालय व मुख्य शाखेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन चिपळूण शहरातील बाजारपेठेत उत्साहात पार पडले. या उद्घाटनप्रसंगी राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी बँकेच्या पारदर्शक व समन्वयातून चालणाऱ्या कारभाराचे कौतुक करत, “चिपळूण अर्बन बँक ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरावी अशी संस्था आहे,” असे गौरवोद्गार काढले. उद्घाटनानंतर राजाभाऊ रेडीज सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते, आमदार भास्करशेठ जाधव, आमदार शेखर निकम, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, माजी आमदार सदानंद चव्हाण, बँकेचे अध्यक्ष मोहनशेठ मिरगल, उपाध्यक्ष अजय खातू, कोअर कमिटी सदस्य उमेश काटकर, दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयंत जालगावकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, शौकत मुकादम, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाबू तांबे, माजी नगरसेवक विलास खेराडे, उदय गांधी, सतीशअप्पा खेडेकर, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, तहसीलदार प्रवीण लोकरे, अॅड. भाऊ दळी, मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार सूर्यवंशी, राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष शशिकांत सुतार यांच्यासह बँकेचे संचालक, अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक लोकप्रतिनिधी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ना. उदय सामंत पुढे म्हणाले की, बँकेचा कारभार पूर्णपणे पारदर्शक असून संचालक मंडळ सर्वपक्षीय समन्वयाने काम करत आहे. बँकेच्या प्रगतीसाठी राजकारण बाजूला ठेवून कार्य केले जाते, ही बाब विशेष कौतुकास्पद आहे. चेअरमन व व्हाइस चेअरमन यांची एकच केबिन असणे ही देखील एक वेगळी आणि प्रेरणादायी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. १९३३ साली स्थापन झालेल्या या बँकेला ९३ वर्षांचा समृद्ध इतिहास लाभला असून, या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्याची संधी मिळाल्याचा आनंद असल्याचे त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक करताना अध्यक्ष मोहनशेठ मिरगल यांनी सांगितले की, रावसाहेब खातू यांनी ९३ वर्षांपूर्वी सहकाराचे छोटे रोपटे लावले आणि आज त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. दूरदृष्टी ठेवून उभारलेली ही आधुनिक वास्तू भविष्यात बँकेच्या प्रगतीस नवे बळ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सांगितले की, १९३३ साली अवघ्या ५०-६० रुपयांत सुरू झालेली ही बँक आज सुमारे ७०० कोटींच्या व्यवहारांपर्यंत पोहोचली आहे, ही प्रगती अभिमानास्पद आहे. आमदार शेखर निकम यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेत संचालक मंडळाच्या कार्याचे कौतुक केले, तर आमदार भास्करशेठ जाधव यांनी रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वीच १९३३मध्ये बँकेची स्थापना झाली, ही तत्कालीन नेतृत्वाची दूरदृष्टी असल्याचे सांगितले. “या बँकेचा पाया भक्कम असून भविष्यातही सहकार क्षेत्रात ती यशाचा झेंडा फडकवत राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच अध्यक्ष मोहनशेठ मिरगल यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करत त्यांच्या प्रामाणिक व कष्टाळू नेतृत्वाचे कौतुक केले. यावेळी बँकेच्या ९३ वर्षांच्या इतिहासाचा आढावा घेणाऱ्या “स्मृतिगंध” या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच इमारत उभारणीत मोलाचा वाटा उचलणारे प्रशासन विभाग प्रमुख समीर जंगम व संबंधित ठेकेदारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष अजय खातू यांनी मानले.

चिपळूण अर्बन बँक पारदर्शक कारभाराचा आदर्श : ना. उदय सामंत, नूतन इमारतीचे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उद्घाटन Read More »

konkandhara 38 2

चिपळूण अर्बन बँकेच्या नव्या इमारतीचे उद्या उद्घाटन

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : दी चिपळूण अर्बन को-ऑप. बँक लि., चिपळूण यांच्या प्रधान कार्यालय व मुख्य शाखेच्या नव्या इमारतीचा भव्य उद्घाटन सोहळा बुधवार दि. १९ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे उद्घाटन उद्योग मंत्री (महाराष्ट्र राज्य) तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदय सामंत यांच्या हस्ते होणार असून खासदार मा. नारायण राणे प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. तसेच माजी मंत्री आ. भास्करराव जाधव, आमदार शेखर निकम, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे आणि चिपळूण नगर परिषदेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. चिपळूण अर्बन को-ऑप. बँकेचे अध्यक्ष मोहन मिरगल, उपाध्यक्ष धनंजय खातू, मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार सूर्यवंशी, तसेच संचालक मंडळ व कर्मचारी वृंद यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. बँकेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनानिमित्त सर्व सभासद, खातेदार व हितचिंतकांना उपस्थित राहण्याचे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.याच निमित्ताने गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या शुभेच्छाही बँकेच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

चिपळूण अर्बन बँकेच्या नव्या इमारतीचे उद्या उद्घाटन Read More »

konkandhara 37 2

अंजनवेल किनाऱ्यावर बेकायदेशीर मासेमारीवर कारवाई; दोन नौकांना लाखोंचा दंड

रत्नागिरी (प्रतिनिधी) – गुहागर तालुक्यातील अंजनवेल दीपस्तंभासमोर समुद्रात बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या दोन नौकांवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई करत लाखोंचा दंड ठोठावला आहे. ही कारवाई शुक्रवारी (१३ मार्च) रात्री सुमारे १० वाजता करण्यात आली. सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाच्या पथकाने नवदुर्गा गस्ती नौकेतून समुद्रात गस्त घालत असताना ही कारवाई केली. परवाना अधिकारी स्वप्निल चव्हाण, पर्यवेक्षक विनायक शिंदे, सुरक्षारक्षक अक्षय मयेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अंजनवेल किनाऱ्यापासून सुमारे २० वाव अंतरावर संशयास्पद हालचाली करणाऱ्या नौकांची पाहणी केली. यावेळी रत्नागिरीतील ए. आर. मयेकर यांच्या मालकीची ‘श्री सद्गुरू कृपा’ ही नौका एलईडी प्रकाशाचा वापर करून मासेमारी करताना आढळली. तसेच गुजरातमधील दीव येथील ट्रॉलिंग नौकाही बेकायदेशीररीत्या मासेमारी करताना सापडली. दोन्ही नौकांना ताब्यात घेऊन दाभोळ बंदरात अटकावून ठेवण्यात आले. यानंतर परवाना अधिकाऱ्यांनी अभिनिर्णय अधिकारी तथा सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त सागर कुवेस्कर यांच्या न्यायालयात अहवाल सादर केला. मंगळवारी झालेल्या सुनावणीत अभिनिर्णय अधिकारी सागर कुवेस्कर यांनी निर्णय देत एलईडी मासेमारी करणाऱ्या ‘श्री सद्गुरू कृपा’ नौकेचे मालक ए. आर. मयेकर यांना ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला. तसेच गुजरातमधील ट्रॉलिंग नौकेचे मालक विनोद सोळंखी यांना ३ लाख २७ हजार ८०० रुपयांचा दंड भरण्याचे आदेश देण्यात आले. या कारवाईमुळे बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून मत्स्यव्यवसाय विभागाने अशा कारवाया पुढेही सुरू राहतील, असा इशारा दिला आहे.

अंजनवेल किनाऱ्यावर बेकायदेशीर मासेमारीवर कारवाई; दोन नौकांना लाखोंचा दंड Read More »

konkandhara 36 2

संगमेश्वरात जाखमाता देवीचा ‘शिंपणे’ उत्सव जल्लोषात साजरा

संगमेश्वर (प्रतिनिधी) – संगमेश्वर तालुक्यातील कसबा परिसरात देवी जाखमातेचा पारंपरिक ‘शिंपणे’ उत्सव बुधवारी अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावात पार पडला. राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविकांनी या उत्सवासाठी हजेरी लावत परिसर भक्तिमय आणि रंगमय झाला. उत्सवाची सुरुवात ढोल-ताशांच्या गजरात काढल्या जाणाऱ्या पारंपरिक फेऱ्यांनी झाली. सकाळी ६ वाजल्यापासून रंगांच्या उधळणीला प्रारंभ झाला होता. दुपारी सुमारे ३ वाजता मोठ्या वाहनांमधून लाल रंगाचे पाणी आणून फेऱ्यांमध्ये सहभागी भाविकांवर उधळण्यात आले. रस्त्यांवर तसेच घरांच्या गच्च्यांवरूनही रंगांची बरसात होत असल्याने संपूर्ण कसबा परिसर लाल रंगाने न्हाऊन निघाला. दुपारनंतर उत्सवाला अधिकच रंग चढला. ढोल-ताशा, झांज पथक आणि डीजेच्या तालावर हजारो भाविकांनी नृत्य करत आनंद लुटला. जवळपास पाच ते सहा तास हा जल्लोष सुरू होता. उत्सवादरम्यान प्रत्येक घरात मटण-भाकरी, वडे यांसारख्या पारंपरिक पदार्थांचा बेत करण्यात आला होता. कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांना रंगवत आनंद साजरा करत होते. विशेषतः ‘जावई’ मानाचा असल्याने त्याला रंगवण्याची परंपरा मोठ्या उत्साहात पार पडली. महिलांचाही सहभाग लक्षणीय होता. धार्मिक विधींचा भाग म्हणून कसबा येथील चंडिका मंदिर, संगमेश्वर येथील निनावी व जाखमाता मंदिर तसेच फणसवणे येथील मूळ जाखमाता मंदिरात भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केली होती. दुपारनंतर देवाला ‘रखवाली’ देण्याची परंपरा पार पडली. यामध्ये नारळ, कोंबडे व बकऱ्यांचा समावेश होता. यापासून तयार करण्यात आलेला प्रसाद आणि रात्री हौद फोडल्यानंतरचा प्रसाद एकत्र करून हजारो भाविकांना मटण-भाकरीचे वाटप करण्यात आले. रात्री सुमारे १० वाजता पारंपरिक विधीनुसार मानकरी मंडळींच्या उपस्थितीत पाण्याचा हौद फोडण्यात आला. त्यानंतर प्रसाद वाटपाने उत्सवाची सांगता करण्यात आली. उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्व कार्यक्रम शांततेत पार पडल्याबद्दल उत्सव समितीने भाविकांचे आभार मानले.

संगमेश्वरात जाखमाता देवीचा ‘शिंपणे’ उत्सव जल्लोषात साजरा Read More »

khed-khan-chemical-blast-death-toll-3

खेडमध्ये खान केमिकल स्फोटातील मृतांचा आकडा तीनवर; आणखी एका कामगाराचा मृत्यू

प्रतिनिधी : कोकणधारा खेड : तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील खान केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात गंभीर जखमी झालेल्या आणखी एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सुजन गोपाल दास (वय २९, मूळ रा. बंगाल, सध्या रा. आवाशी, खेड) असे मृत कामगाराचे नाव असून, या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता तीन झाली आहे. ६ मार्च रोजी खान केमिकल कंपनीत रिॲक्टरचा स्फोट झाला होता. या स्फोटामुळे गरम रसायन कामगारांच्या अंगावर उडाले, तसेच छप्पर कोसळल्याने एकूण अकरा कामगार जखमी झाले होते. यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नवी मुंबईतील ऐरोली येथील नॅशनल बर्न रुग्णालयात हलवण्यात आले होते. या दुर्घटनेत यापूर्वी ११ मार्च रोजी मुरडे येथील रघुनाथ खंडू खामकर (वय ५७) यांचा, तर १२ मार्च रोजी लातूर येथील असद खान यांचा मृत्यू झाला होता. उपचार सुरू असलेल्या कामगारांपैकी सुजन दास याने सोमवारी (१६ मार्च) उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. सुजन दास यांचे कुटुंब मूळचे बंगालमधील असून, मागील ३० वर्षांपासून ते आवाशी येथे वास्तव्यास आहे. वडील गोपाल दास यांनी मेहनतीने कुटुंबाचा उदरनिर्वाह करत येथे घर उभारले. सुजनचे शिक्षणही स्थानिक पातळीवर झाले होते. काही दिवसांपूर्वीच त्याच्या बहिणीचा विवाह पार पडला होता. आनंदाचे वातावरण असतानाच सुजनच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, जखमी कामगारांवर अद्याप उपचार सुरू आहेत.

खेडमध्ये खान केमिकल स्फोटातील मृतांचा आकडा तीनवर; आणखी एका कामगाराचा मृत्यू Read More »

असुर्डे खापरेवाडीतील ग्रामस्थांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

असुर्डे खापरेवाडीतील ग्रामस्थांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण: तालुक्यातील कोकरे जिल्हा परिषद गटातील असुर्डे खापरेवाडी येथील ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच चर्चा रंगली असून शिवसेना (उबाठा) पक्षाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. या प्रवेश सोहळ्यात सोमा खापरे, काशिनाथ खापरे, संतोष खापरे, अजित खापरे, सुमित खापरे, राजेंद्र खापरे, प्रमोद खापरे, प्राजक्ता खापरे, अंकित खापरे, वंदना खापरे, शशिकांत खापरे, सुगंधा खापरे, योगेश खापरे, आरती खापरे, स्वाती खापरे, आयुष आग्रे, आर्यन खापरे, दिनेश खेराडे, सुजाता खेराडे, नरेंद्र खापरे, मानसी खापरे, राजेश आग्रे, कृष्णा आग्रे, अरुण आग्रे, अर्चना आग्रे, सायली आग्रे, मंगेश खापरे, गणपत खापरे, मिनाक्षी खापरे, अंजली खापरे, मारुती खापरे, प्रणय खापरे, बापूजी खापरे, सुजाता खापरे, महेंद्र खापरे, सुस्मिता खापरे, पांडूरंग खापरे, प्रतिभा खापरे, महेश खापरे, शांताराम शिगवण, विशाल शिगवण, दत्ताराम खापरे, कृष्णा खापरे, सुरज खापरे, सावी खापरे, रेश्मा खापरे, शर्मिला भुवड, धोंडू भुवड, संदेश खापरे, पारस खापरे, गणेश खापरे, सृष्टी खापरे, नारायण खापरे, ओम खापरे, सार्थक खापरे, निखील खापरे, ओम भुवड यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आमदार शेखर निकम यांनी सर्व नवप्रवेशितांचे संपर्क कार्यालयात मनापासून स्वागत करत त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला. ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेत त्या सोडवण्यासाठी आणि विकासात्मक कामांना गती देण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रवेशामुळे पक्ष संघटना अधिक मजबूत होईल, असेही त्यांनी नमूद केले. नवनिर्वाचित सावर्डे जिल्हा परिषद सदस्या पुजा निकम यांनीही प्रवेशकर्त्यांचे स्वागत करत पक्षवाढीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कोकरे जि.प. गट सदस्य संजय कदम यांनीही ग्रामस्थांचे स्वागत करून भविष्यात विकासकामांबाबत ठामपणे पाठीशी उभे राहण्याचा शब्द दिला. या कार्यक्रमास राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष दत्ताराम गुजर, आरडीसीसी संचालक राजेंद्र सुर्वे, सरपंच पंकज साळवी, सुधीर राजेशिर्के, निलेश खापरे यांच्यासह कोकरे जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा प्रवेश केवळ राजकीय बदल नसून विकासाच्या दिशेने उचललेले ठोस पाऊल असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली परिसराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

असुर्डे खापरेवाडीतील ग्रामस्थांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश Read More »

गोवळकोट रोडवरील ख्रिश्चन स्मशानभूमीची नगराध्यक्षांकडून पाहणी; स्वच्छता व कंपाउंड वॉलसाठी सूचना

गोवळकोट रोडवरील ख्रिश्चन स्मशानभूमीची नगराध्यक्षांकडून पाहणी; स्वच्छता व कंपाउंड वॉलसाठी सूचना

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : शहरातील गोवळकोट रोड येथे असलेल्या ख्रिश्चन समाजाच्या स्मशानभूमीची स्वच्छता व संरक्षक भिंत उभारण्याबाबत मागणी होत असताना नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष स्थळी पाहणी केली. या वेळी त्यांनी संबंधित विभागाला स्मशानभूमी परिसर तातडीने स्वच्छ करणे, कंपाउंड वॉल उभारणे, तसेच आवश्यक तेथे भराव करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन लवकरात लवकर कामे मार्गी लावावीत, असेही त्यांनी सांगितले. या पाहणीवेळी उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, भाजपचे गटनेते शशिकांत मोदी, नगरसेविका वैशाली निमकर, अंजली कदम, नगरसेवक उदय जुवळे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

गोवळकोट रोडवरील ख्रिश्चन स्मशानभूमीची नगराध्यक्षांकडून पाहणी; स्वच्छता व कंपाउंड वॉलसाठी सूचना Read More »