konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • जगबुडी पुलावर भीषण अपघात; कार कठड्यावर आदळली, मोठा अनर्थ टळला
प्रतिनिधी : कोकणधारा

जगबुडी पुलावर भीषण अपघात; कार कठड्यावर आदळली, मोठा अनर्थ टळला

प्रतिनिधी : कोकणधारा

खेड (प्रतिनिधी): रत्नागिरीच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या कारवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट जगबुडी नदीवरील पुलाच्या संरक्षक कठड्यावर जाऊन आदळल्याची घटना घडली. या अपघातात कारचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, कारचा वेग अधिक असल्याने चालकाचा ताबा सुटला आणि गाडी रस्त्यावरून घसरत थेट पुलाच्या कठड्यावर चढली. जर ही कार कठड्यावर अडकली नसती, तर ती थेट सुमारे शंभर ते दीडशे फूट खोल जगबुडी नदीत कोसळली असती.

त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
अपघाताचा आवाज ऐकून इतर वाहनधारक व स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. काही काळासाठी या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता.

घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरील वाढता वेग आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे