konkandhara.com

2 अप्रैल 2026

मंगेश पेढाबंकर यांना ‘आदर्श प्रशासकीय अधिकारी’ पुरस्कार जाहीर

मंगेश पेढाबंकर यांना ‘आदर्श प्रशासकीय अधिकारी’ पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : चिपळूण नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढाबंकर यांना त्यांच्या कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, लोकाभिमुख आणि संवेदनशील कार्याची दखल घेत नवभारत–नवराष्ट्र वृत्तपत्र समूहातर्फे ‘आदर्श प्रशासकीय अधिकारी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्या या निवडीमुळे चिपळूण परिसरात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रशासनात काम करताना कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या समस्येकडे केवळ कागदोपत्री विषय म्हणून न पाहता, ती एक जबाबदारी म्हणून स्वीकारण्याची त्यांची कार्यशैली विशेष ठरली आहे. सामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्यासाठी तत्परतेने काम करणारा अधिकारी म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच चिपळूणकरांच्या मनात ते एक विश्वासार्ह आणि लोकाभिमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळखले जातात. मंगेश पेढाबंकर यांनी आपल्या सेवाकाळात चिपळूण नगर परिषद, रत्नागिरी नगर परिषद तसेच गुहागर नगर पंचायत येथे विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. बदल्या, पदोन्नती आणि विविध प्रशासकीय जबाबदाऱ्यांच्या प्रवासात त्यांनी नेहमीच कार्यतत्परता, शिस्त आणि जनहिताचा दृष्टिकोन कायम ठेवला. विशेष म्हणजे, संकटसमयी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करणे, नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देणे आणि प्रशासनाला मानवी चेहरा देण्याचा त्यांचा प्रयत्न कायम राहिला आहे. प्रशासकीय सेवेसोबतच त्यांनी सामाजिक, सहकारी आणि सांस्कृतिक क्षेत्रातही सक्रिय योगदान दिले आहे. त्यामुळेच ते केवळ अधिकारी म्हणून नव्हे, तर समाजाशी जोडलेला, माणुसकी जपणारा चेहरा म्हणूनही परिचित आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून जाहीर झालेला ‘आदर्श प्रशासकीय अधिकारी’ हा सन्मान केवळ वैयक्तिक पुरस्कार नसून, प्रामाणिक आणि लोकांसाठी झटणाऱ्या प्रशासनाच्या विचाराला मिळालेली दाद असल्याची भावना व्यक्त होत आहे.

मंगेश पेढाबंकर यांना ‘आदर्श प्रशासकीय अधिकारी’ पुरस्कार जाहीर Read More »

पत्रकार दीपक भागवत हल्लाप्रकरणी अटकेची मागणी; १४ एप्रिलपासून उपोषणाचा इशारा

पत्रकार दीपक भागवत हल्लाप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा; अन्यथा १४ एप्रिलपासून बेमुदत उपोषण, चिपळूणमधील पत्रकारांचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : पत्रकार दीपक भागवत यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा १४ एप्रिल २०२६ पासून चिपळूणमधील पत्रकार बेमुदत उपोषण आंदोलन छेडतील, असा इशारा देत पत्रकारांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, २५ मार्च २०२६ रोजी शहरातील बहादूरशेख नाका येथे भरदिवसा वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकार दीपक भागवत यांच्यावर काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी नियोजनपूर्वक जीवघेणा हल्ला केला. या घटनेची चित्रफीत उपलब्ध असून हल्लेखोर स्पष्टपणे ओळखू येत असतानाही, घटनेला आठ दिवस उलटूनही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. यामुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे पत्रकारांनी नमूद केले आहे. पत्रकारांवर होणारे हल्ले हे भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आघात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित वेगाने तपास व कारवाई होत नसल्यामुळे पत्रकारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली. यावेळी पत्रकारांनी मागणी केली की, या प्रकरणाचा जलदगतीने तपास करून गुन्ह्यातील सर्व आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी. अन्यथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी, १४ एप्रिल रोजी, चिपळूणमधील पत्रकार लोकशाही मार्गाने बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करतील. हे उपोषण चिपळूण येथील मा. प्रांताधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. पत्रकारांनी निवेदनात म्हटले आहे की, संविधान रचणाऱ्या महामानवाच्या जयंतीदिनी न्यायासाठी उपोषण करण्याची वेळ पत्रकारांवर येणे हे अत्यंत दुर्दैवी असून, पोलीस प्रशासनाने या निवेदनाची गंभीर दखल घेऊन तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी चिपळूणमधील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.

पत्रकार दीपक भागवत हल्लाप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा; अन्यथा १४ एप्रिलपासून बेमुदत उपोषण, चिपळूणमधील पत्रकारांचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध : आमदार शेखर निकम | विघ्नसंतोषींना यश नाही

राष्ट्रवादी काँग्रेस परिवार एकसंध; विघ्नसंतोषी प्रवृत्तींना यश मिळणार नाही : आमदार शेखर निकमप्रतिनिधी

प्रतिनिधी: योगेश बांडागळे चिपळूण : आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराने सर्व आव्हानांचा एकजुटीने सामना केला असून, विभाजनानंतरही पक्ष पुन्हा एकदा ताकदीने उभा राहिल्याचा विश्वास चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावरून यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. आमदार निकम यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या प्रवासात प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी परिवारातील सर्व सदस्यांनी अत्यंत खंबीर भूमिका बजावली. पक्षावर आलेल्या विविध राजकीय संकटांनाही कार्यकर्त्यांनी न डगमगता तोंड दिले आणि पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न केले. ते पुढे म्हणाले की, आदरणीय अजितदादा पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादी परिवाराच्या भावना लक्षात घेत आदरणीय श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारले. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी परिवार दुःखातून सावरत असतानाच काही विघ्नसंतोषी प्रवृत्तींनी या परिवारात मतभेद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र अशा प्रवृत्तींना कधीही यश मिळणार नसल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार निकम यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे स्पष्ट केले की, आदरणीय अजितदादांच्या आशीर्वादाने, सुनेत्रावहिनी पवार आणि प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस परिवार आजही एकसंध आहे आणि यापुढेही तसाच राहणार आहे. पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकदिलाने पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी काम करत राहतील, असेही त्यांनी नमूद केले. तसेच, आदरणीय अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी परिवार शेवटपर्यंत लढत राहील, असा निर्धारही आमदार शेखर निकम यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस परिवार एकसंध; विघ्नसंतोषी प्रवृत्तींना यश मिळणार नाही : आमदार शेखर निकमप्रतिनिधी Read More »

सचिन जोशी यांची उमेश सकपाळ यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट | चिपळूण

उपमुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव सचिन जोशी यांचीउमेश सकपाळ यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे स्वीय सचिव सचिन जोशी यांनी चिपळूण दौऱ्यादरम्यान शिवसेना चिपळूण शहर प्रमुख उमेश धोंडीराम सकपाळ यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. या भेटीदरम्यान शिवसेनेच्या संघटनात्मक घडामोडी, विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) अभियान, तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळाली. जिल्ह्यात पक्षसंघटना अधिक सक्षम करण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी संवाद वाढवणे आणि मतदार संपर्क अधिक मजबूत करण्यावरही भर देण्यात आला. या प्रसंगी शिवसेना रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख राजेश मोरे, तसेच विपुल कदम, अनिल नवगणे, स्थानिक नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. सचिन जोशी यांच्या या भेटीमुळे चिपळूणमधील शिवसेना संघटनात्मक हालचालींना अधिक वेग मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

उपमुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव सचिन जोशी यांचीउमेश सकपाळ यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट Read More »

रोह्यात शिवसेनेचा मोठा निर्णय; तालुका कार्यकारिणी बरखास्त, मनोज शिंदे हकालपट्टी

रोह्यात शिवसेनेचा मोठा निर्णय; तालुका कार्यकारिणी बरखास्त,मनोजकुमार शिंदे यांची हकालपट्टी

प्रतिनिधी : कोकणधारा रोहा (प्रतिनिधी) : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात शिवसेनेने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेतला आहे. पक्षांतर्गत शिस्तभंग आणि पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत रोहा तालुका कार्यकारिणी पूर्णपणे बरखास्त करण्यात आली असून, माजी तालुका प्रमुख व माजी उपजिल्हाप्रमुख मनोजकुमार शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहा नगरपालिका निवडणुकीदरम्यान पक्षाच्या अधिकृत धोरणांविरुद्ध जाऊन विरोधकांशी हातमिळवणी केल्याचा संशय मनोजकुमार शिंदे यांच्यावर व्यक्त करण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेला यश मिळाले असले, तरी मागील नगरपालिका निवडणुकीत पक्षाला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. या अपयशामागे पक्षविरोधी वर्तणूक कारणीभूत ठरल्याचा ठपका पक्षाने ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली रोहा येथे पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत तालुक्यातील राजकीय घडामोडी, संघटनात्मक स्थिती आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षबांधणीचा आढावा घेण्यात आला.कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर मनोजकुमार शिंदे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचे निष्पन्न झाल्याने, त्यांच्यावर थेट हकालपट्टीची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचबरोबर, केवळ व्यक्तीवर कारवाई करून न थांबता संपूर्ण रोहा तालुका कार्यकारिणीच बरखास्त करण्याचा निर्णयही बैठकीत जाहीर करण्यात आला. पक्ष संघटना नव्याने उभारण्यासाठी लवकरच निष्ठावान आणि सक्रिय कार्यकर्त्यांची नवीन फळी जाहीर केली जाईल, असे संकेत पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच मनोजकुमार शिंदे यांनी तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता, मात्र आता त्यांच्यावर थेट हकालपट्टीची कारवाई झाल्याने रोहा तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राजा केणी यांचे वक्तव्य“पक्षामध्ये शिस्त असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यांनी पक्षविरोधी काम केले आहे, त्यांच्यावर कारवाई करणे संघटनेच्या हिताचे आहे. लवकरच रोहा तालुक्यात नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाईल.”— राजा केणी, जिल्हाप्रमुख, शिवसेना (रायगड)

रोह्यात शिवसेनेचा मोठा निर्णय; तालुका कार्यकारिणी बरखास्त,मनोजकुमार शिंदे यांची हकालपट्टी Read More »