konkandhara.com

Image

घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत

रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी : शासनाच्या वाळू/रेती निर्गती धोरण २०२५ अंतर्गत घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, पात्र लाभार्थ्यांना स्थानिक वापरासाठी कमाल 5 ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी दिली.

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण टप्पा 1 व 2), पी.एम. जनमन आवास, रमाई आवास, शबरी आवास, पारधी आवास, अटल बांधकाम कामगार आवास, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत तसेच मोदी आवास योजना या योजनांतील लाभार्थ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

महसूल व वन विभागाच्या 30 एप्रिल 2025 च्या शासन निर्णयानुसार, लिलावात न गेलेल्या वाळू गटांमधून तसेच अवैध उत्खनन प्रकरणांमध्ये जप्त केलेली वाळू रॉयल्टी न आकारता उपलब्ध करून दिली जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी गट विकास अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाल्यानंतर तहसिलदारांकडून ऑनलाईन वाळू पासेस जारी करण्यात येणार असून, लाभार्थ्यांना स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
हे पास ग्राम महसूल अधिकारी व ग्रामसेवक/ग्राम विकास अधिकारी यांच्या मार्फत 15 दिवसांच्या आत लाभार्थ्यांना घरपोच देण्यात येतील. पास मिळाल्यानंतर एका महिन्याच्या आत वाळू उचलणे बंधनकारक असून, अन्यथा पास रद्द होईल. तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास ऑफलाईन पासेस देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे घरकुल बांधकामाचा खर्च कमी होऊन ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

Releated Posts

सावर्डे विद्यालय कोल्हापूर विभागात प्रथम; सह्याद्रीच्या शिरपेचात मानाचा तुरा

सावर्डे : महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान (टप्पा-3) अंतर्गत खाजगी शाळा विभागाचा निकाल नुकताच जाहीर…

ByByEditorial अप्रैल 11, 2026

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त श्रीदेव भैरीला ७५ नारळ, ७५ केळी ७५ विड्यांची आरास

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायणराव राणे १० एप्रिल…

ByByEditorial अप्रैल 9, 2026

संगमेश्वरला समर स्पेशल गाड्यांचा थांबा नाही; प्रवाशांत नाराजी, रिकाम्या सीट्स असूनही दुर्लक्ष, कोकण रेल्वेकडे तातडीची मागणी

प्रतिनिधी : कोकणधारा संगमेश्वर : कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या संगमेश्वर रेल्वे स्टेशनला समर स्पेशल गाड्यांचा थांबा…

ByByEditorial अप्रैल 8, 2026

यवतमाळचे समाजरत्न डॉ. अनिल पटेल यांचा फिरता दवाखाना सोमवारी चिपळूणकरांच्या सेवेसाठी

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : आजच्या बाजारू व्यवस्थेमध्येही सेवाभाव जपणारे काही अवलिया डॉक्टर समाजात कार्यरत आहेत. स्वतःच्या पदरचे…

ByByEditorial अप्रैल 8, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

सावर्डे विद्यालय कोल्हापूर विभागात प्रथम; ‘सुंदर शाळा’ अभियानात अव्वल कामगिरी
रत्नागिरीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोन्याची चेन लंपास; दुचाकीवरून चोरट्यांचा पळ
आंबा घाटात चालकाची लूट; देवरूख पोलिसांनी ५ आरोपींना अटक
रत्नागिरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दोन घरांतून ३८ हजारांची रोकड लंपास
रत्नागिरीत क्रेडिट कार्ड इन्शुरन्सच्या नावाखाली ८८ हजारांची फसवणूक
रत्नागिरीत महिला विक्रेत्याची ४० हजारांची रोकड लंपास; पोलिस तपास सुरू
खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त श्रीदेव भैरीला ७५ नारळ, ७५ केळी ७५ विड्यांची आरास
देवरुख पोलिसांची धडक कारवाई; दरोड्यातील ५ आरोपी २ तासांत अटकेत
चिपळूणमध्ये RPL 2026 दिमाखात; केदारनाथ खरवते विजेता, विशू इलेव्हन उपविजेता