konkandhara.com

  • Home
  • क्राईम
  • आंबा घाटात म्हैस वाहतूक करणाऱ्या चालकाची लूट; देवरूख पोलिसांकडून पाच जणांना बेड्या
आंबा घाटात चालकाची लूट; देवरूख पोलिसांनी ५ आरोपींना अटक

आंबा घाटात म्हैस वाहतूक करणाऱ्या चालकाची लूट; देवरूख पोलिसांकडून पाच जणांना बेड्या

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाटात दख्खननजीक बुधवारी रात्री एक खळबळजनक घटना घडली. बांबावडेकडे बोलेरोमधून म्हैस घेऊन जाणाऱ्या चालकाला आठ जणांच्या टोळीने अडवून त्याच्याकडील २५ हजार रुपये लुटून पोबारा केला. मात्र, देवरूख पोलिसांनी या घटनेचा अत्यंत वेगाने तपास करत ५ आरोपींना तातडीने ताब्यात घेतले असून, उर्वरित ३ जणांचा कसून शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री बोलेरो चालक आंबा घाटमार्गे बांबावडेच्या दिशेने म्हैस घेऊन जात होता. गाडी दख्खन परिसराजवळ आली असता, दबा धरून बसलेल्या ८ जणांच्या टोळीने वाहन अडवले. चालकाला धमकावत या टोळीने त्याच्याकडील २५ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला. घाटातील या धाडसी लुटीच्या बातमीने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

घटनेची माहिती मिळताच लांजा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी तपासाची चक्रे फिरवली. साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम पंदेरे, देवरूखचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर व प्रशांत साळुंखे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांत ५ संशयितांना ताब्यात घेऊन या लुटीचा पर्दाफाश केला.

या गुन्ह्यात सहभागी असलेले अन्य ३ आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. “फरार आरोपींची ओळख पटली असून लवकरच त्यांनाही गजाआड केले जाईल,” असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन तपासाची पाहणी केली. पोलिसांच्या या जलद कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Releated Posts

रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल

रत्‍नागिरी ः प्रतिनिधीपूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची…

ByByEditorial मई 13, 2026

जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांत हाणामारी; सात जणांवर गुन्हा

चिपळूण : तालुक्यातील वेहळे खान मोहल्ला परिसरात जुन्या जमिनीच्या वादातून दोन शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादाने उग्र रूप धारण करत…

ByByEditorial अप्रैल 30, 2026

रत्नागिरी पोलिसांची कारवाई: शिळ मिरजोळे येथे गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त, एक जण अटकेत

रत्नागिरी, दि. ३० एप्रिल २०२६: रत्नागिरी शहर पोलिसांनी शिळ मिरजोळे परिसरात सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड टाकून…

ByByEditorial अप्रैल 30, 2026

आडिवरे येथे महिलेवरील अत्याचारप्रकरणी शिक्षक अटकेत

राजापूर : तालुक्यातील आडिवरे येथे एका महिलेवरील अत्याचारप्रकरणी स्थानिक हायस्कूलमधील शिक्षकाला नाटे (सागरी) पोलिसांनी अटक केली आहे. या…

ByByEditorial अप्रैल 26, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे