konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • सावर्डे विद्यालय कोल्हापूर विभागात प्रथम; सह्याद्रीच्या शिरपेचात मानाचा तुरा
सावर्डे विद्यालय कोल्हापूर विभागात प्रथम; ‘सुंदर शाळा’ अभियानात अव्वल कामगिरी

सावर्डे विद्यालय कोल्हापूर विभागात प्रथम; सह्याद्रीच्या शिरपेचात मानाचा तुरा

सावर्डे : महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान (टप्पा-3) अंतर्गत खाजगी शाळा विभागाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, सह्याद्री शिक्षण संस्थेच्या गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सलग तिसऱ्या वर्षी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाने रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत विभागस्तरावरही अव्वल स्थान मिळवले आहे.

रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील प्रथम क्रमांकाच्या शाळांमधून सावर्डे विद्यालयाने बाजी मारत सह्याद्री शिक्षण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

3 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत राज्यभर हे अभियान राबविण्यात आले. विद्यालयाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शालेय व सहशालेय उपक्रमांचे प्रभावी सादरीकरण केले. पायाभूत सुविधा, शासन धोरणांची अंमलबजावणी आणि शैक्षणिक गुणवत्ता या निकषांवर पीपीटी, पीडीएफ व प्रत्यक्ष पाहणीद्वारे मूल्यांकन करण्यात आले.

या यशात पंचायत समिती चिपळूणचे गटशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरीचे शिक्षणाधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी व शिक्षणप्रेमी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
विद्यालयाने पहिल्या वर्षी विभागात द्वितीय क्रमांक मिळवत 15 लाखांचे पारितोषिक पटकावले होते. दुसऱ्या वर्षी जिल्ह्यात प्रथम आणि तिसऱ्या वर्षी विभागात प्रथम येत 21 लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले आहे.

या यशाबद्दल प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार शेखर निकम, उपाध्यक्षा युगंधराताई राजेशिर्के, उपाध्यक्ष प्रशांत निकम, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, सचिव महेश महाडिक, तसेच सर्व पदाधिकारी, पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
सुव्यवस्थित पायाभूत सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण व नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या जोरावर सावर्डे विद्यालयाने ‘आदर्श शाळा’ म्हणून प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे