konkandhara.com

  • Home
  • क्राईम
  • रत्नागिरीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणाची सोन्याची चेन लांबवली
रत्नागिरीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोन्याची चेन लंपास; दुचाकीवरून चोरट्यांचा पळ

रत्नागिरीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणाची सोन्याची चेन लांबवली

रत्नागिरी : प्रतिनिधी


शहरातील हिंदू कॉलनी परिसरातून गुरुवारी सकाळी 8.15 वा.सुमारास एका युवकाच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून दोन अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरुन पोबारा केला. सायंकाळी उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात याबाबत कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती.


सकाळच्या सुमारास घडलेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.हिंदू कॉलनी येथील रहिवासी कांचन जैन हे गुरुवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास परिसरात असताना दुचाकीवरून दोन अज्ञात तरुण त्यांच्याजवळ आले. यावेळी चोरट्यांनी त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा केला. जैन यांना काही समजण्यापूर्वीच दुचाकीवर मागे बसलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या चेनवर झडप घातली आणि ती हिसकावून घेतली. चेन हातात लागताच चोरट्यांनी आपल्या काळ्या रंगाच्या दुचाकीवरून वेगाने पलायन केले.चोरीसाठी वापरलेली दुचाकी काळ्या रंगाची असून दोन्ही आरोपी सडपातळ बांध्याचे होते. यातील एकाने तोंडाला रुमाल बांधला होता, तर एक जण उंचीने जास्त होता. हे दोन्ही चोरटे तरुण असून ते एकमेकांशी मराठी भाषेत संवाद साधत होते, असे वर्णन समोर आले आहे.


या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. भरवस्तीत आणि वर्दळीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे चोरट्यांचे धाडस वाढल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी या वर्णनाचे तरुण कुठेही संशयास्पदरीत्या दिसून आल्यास किंवा या घटनेबाबत कोणतीही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Releated Posts

रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल

रत्‍नागिरी ः प्रतिनिधीपूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची…

ByByEditorial मई 13, 2026

जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांत हाणामारी; सात जणांवर गुन्हा

चिपळूण : तालुक्यातील वेहळे खान मोहल्ला परिसरात जुन्या जमिनीच्या वादातून दोन शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादाने उग्र रूप धारण करत…

ByByEditorial अप्रैल 30, 2026

रत्नागिरी पोलिसांची कारवाई: शिळ मिरजोळे येथे गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त, एक जण अटकेत

रत्नागिरी, दि. ३० एप्रिल २०२६: रत्नागिरी शहर पोलिसांनी शिळ मिरजोळे परिसरात सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड टाकून…

ByByEditorial अप्रैल 30, 2026

आडिवरे येथे महिलेवरील अत्याचारप्रकरणी शिक्षक अटकेत

राजापूर : तालुक्यातील आडिवरे येथे एका महिलेवरील अत्याचारप्रकरणी स्थानिक हायस्कूलमधील शिक्षकाला नाटे (सागरी) पोलिसांनी अटक केली आहे. या…

ByByEditorial अप्रैल 26, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे