konkandhara.com

  • Home
  • क्राईम
  • रत्नागिरीत दिवसाढवळ्या दोन घरे फोडली; ३८ हजारांची रोकड लंपास
रत्नागिरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दोन घरांतून ३८ हजारांची रोकड लंपास

रत्नागिरीत दिवसाढवळ्या दोन घरे फोडली; ३८ हजारांची रोकड लंपास

रत्नागिरी : प्रतिनिधी
तालुक्यातील तरवळ मायंगडेवाडी येथ्ाील दोन घरे फोडून रोख 38 हजार रुपये लांबवले. घरफोडीची ही घटना रविवार 5 एप्रिल रोजी दुपारी 2.30 वा.सुमारास घडली आहे.
आदित्य देवचंद कांबळे (26,रा.बालाजी अपार्टमेंट कारवांचीवाडी फाटा,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात विरेश प्रकाश मायंगडे (29),प्रज्योत रविंद्र मायंगडे (23,दोन्ही रा.तरवळ मायंगडेवाडी,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.

त्यानुसार, संशयिताने विरेश मायंगडे यांच्या घराचा मुख्य दरवाजाचा कोयंडा कोणत्यातरी हत्याराने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटाच्या ड्रॉव्हरमधील रोख 33 हजार रुपये चोरुन नेले. तर प्रज्योत मायंगडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयिताने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलुप तोडून घरातील भिंतीमध्ये असलेल्या उघड्या कपाटातील छोट्या पाकिटात ठेवलेले रोख 5 हजार रुपये लांबवले. दरम्यान, या घरफोड्या करुन पळून जात असताना संशयित आदित्य कांबळेला विरेश मायंगडे आणि सर्वेश मायंगडे यांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांना धक्काबुक्की करुन पळ काढला.

Releated Posts

रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल

रत्‍नागिरी ः प्रतिनिधीपूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची…

ByByEditorial मई 13, 2026

जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांत हाणामारी; सात जणांवर गुन्हा

चिपळूण : तालुक्यातील वेहळे खान मोहल्ला परिसरात जुन्या जमिनीच्या वादातून दोन शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादाने उग्र रूप धारण करत…

ByByEditorial अप्रैल 30, 2026

रत्नागिरी पोलिसांची कारवाई: शिळ मिरजोळे येथे गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त, एक जण अटकेत

रत्नागिरी, दि. ३० एप्रिल २०२६: रत्नागिरी शहर पोलिसांनी शिळ मिरजोळे परिसरात सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड टाकून…

ByByEditorial अप्रैल 30, 2026

आडिवरे येथे महिलेवरील अत्याचारप्रकरणी शिक्षक अटकेत

राजापूर : तालुक्यातील आडिवरे येथे एका महिलेवरील अत्याचारप्रकरणी स्थानिक हायस्कूलमधील शिक्षकाला नाटे (सागरी) पोलिसांनी अटक केली आहे. या…

ByByEditorial अप्रैल 26, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे