konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त श्रीदेव भैरीला ७५ नारळ, ७५ केळी ७५ विड्यांची आरास
खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त श्रीदेव भैरीला ७५ नारळ, ७५ केळी ७५ विड्यांची आरास

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त श्रीदेव भैरीला ७५ नारळ, ७५ केळी ७५ विड्यांची आरास

प्रतिनिधी : कोकणधारा

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायणराव राणे १० एप्रिल रोजी आपल्या वयाच्या ७५ व्या वर्षात, म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. या विशेष दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीतील त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि चाहत्यांनी विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करण्यास उत्साहात सुरुवात केली आहे.

या औचित्याने आज सकाळी रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी चरणी खा. राणे यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि उदंड आयुष्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. श्री सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ आणि आमदार श्री. निलेश राणे मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत श्री देव भैरीला ७५ नारळ, ७५ केळी आणि ७५ विडे यांची आकर्षक आरास मांडून श्रद्धापूर्वक अर्पण केली.
या धार्मिक कार्यक्रमाला भाजपचे आणि राणे समर्थक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये अशोक वाडेकर, नित्यानंद दळवी, शिवाजी कारेकर, अमोल देसाई, निखिल शेट्ये, अभिलाश पिलणकर, सोहम पिलणकर, विशाल कांबळे, राजू झगडे, नरेश बनसोडे आणि अमृत गोरे यांचा समावेश होता.
खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यात पुढील काही दिवस विविध विधायक उपक्रम राबवले जाणार आहेत.

Releated Posts

सावर्डे विद्यालय कोल्हापूर विभागात प्रथम; सह्याद्रीच्या शिरपेचात मानाचा तुरा

सावर्डे : महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान (टप्पा-3) अंतर्गत खाजगी शाळा विभागाचा निकाल नुकताच जाहीर…

ByByEditorial अप्रैल 11, 2026

घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत

रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी : शासनाच्या वाळू/रेती निर्गती धोरण २०२५ अंतर्गत घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला…

ByByEditorial अप्रैल 11, 2026

संगमेश्वरला समर स्पेशल गाड्यांचा थांबा नाही; प्रवाशांत नाराजी, रिकाम्या सीट्स असूनही दुर्लक्ष, कोकण रेल्वेकडे तातडीची मागणी

प्रतिनिधी : कोकणधारा संगमेश्वर : कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या संगमेश्वर रेल्वे स्टेशनला समर स्पेशल गाड्यांचा थांबा…

ByByEditorial अप्रैल 8, 2026

यवतमाळचे समाजरत्न डॉ. अनिल पटेल यांचा फिरता दवाखाना सोमवारी चिपळूणकरांच्या सेवेसाठी

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : आजच्या बाजारू व्यवस्थेमध्येही सेवाभाव जपणारे काही अवलिया डॉक्टर समाजात कार्यरत आहेत. स्वतःच्या पदरचे…

ByByEditorial अप्रैल 8, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

सावर्डे विद्यालय कोल्हापूर विभागात प्रथम; ‘सुंदर शाळा’ अभियानात अव्वल कामगिरी
घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत
रत्नागिरीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोन्याची चेन लंपास; दुचाकीवरून चोरट्यांचा पळ
आंबा घाटात चालकाची लूट; देवरूख पोलिसांनी ५ आरोपींना अटक
रत्नागिरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दोन घरांतून ३८ हजारांची रोकड लंपास
रत्नागिरीत क्रेडिट कार्ड इन्शुरन्सच्या नावाखाली ८८ हजारांची फसवणूक
रत्नागिरीत महिला विक्रेत्याची ४० हजारांची रोकड लंपास; पोलिस तपास सुरू
देवरुख पोलिसांची धडक कारवाई; दरोड्यातील ५ आरोपी २ तासांत अटकेत
चिपळूणमध्ये RPL 2026 दिमाखात; केदारनाथ खरवते विजेता, विशू इलेव्हन उपविजेता