konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • यवतमाळचे समाजरत्न डॉ. अनिल पटेल यांचा फिरता दवाखाना सोमवारी चिपळूणकरांच्या सेवेसाठी
डॉ. अनिल पटेल यांचा फिरता दवाखाना चिपळूणमध्ये; मोफत आरोग्य सेवा

यवतमाळचे समाजरत्न डॉ. अनिल पटेल यांचा फिरता दवाखाना सोमवारी चिपळूणकरांच्या सेवेसाठी

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूण : आजच्या बाजारू व्यवस्थेमध्येही सेवाभाव जपणारे काही अवलिया डॉक्टर समाजात कार्यरत आहेत. स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून ग्रामीण, गरीब आणि दुर्लक्षित रुग्णांपर्यंत पोहोचून मोफत आरोग्यसेवा देणारे असेच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे यवतमाळचे समाजरत्न डॉ. अनिल पटेल. नाक, कान व घसा तज्ज्ञ असलेले डॉ. पटेल येत्या १३ एप्रिल २०२६ रोजी आपल्या फिरत्या आरोग्य रथासह प्रथमच चिपळूणमध्ये येत असून, चिपळूणकरांना त्यांच्या सेवाभावी कार्याचा लाभ घेण्याची दुर्मिळ संधी मिळणार आहे.

डॉ. अनिल पटेल हे गेली ५० वर्षे नाक, कान व घसा तज्ज्ञ म्हणून कार्यरत असून, गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून ते विविध भागांत मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करून ग्रामीण रुग्णांची सेवा करत आहेत. स्वतःचा व्यवसाय आणि वैद्यकीय सेवा सांभाळत त्यांनी समाजसेवेचा एक वेगळाच आदर्श उभा केला आहे. त्यांच्या या सेवाकार्याचा वारसा त्यांना त्यांच्या आजोबांकडून लाभला. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांचे आजोबा घोड्यावरून गावोगाव फिरून रुग्णांपर्यंत सेवा पोहोचवत असत. त्याच सेवाभावाची परंपरा पुढे नेत डॉ. पटेल यांनीही आपले संपूर्ण आयुष्य रुग्णसेवेला वाहिले आहे.

सोलापूर येथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर परदेशात किंवा मोठ्या शहरात स्थायिक होण्याऐवजी छोट्या गावांमध्ये व ग्रामीण भागात सेवा देण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला. काही वर्षांनंतर आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी पद्मश्री डॉ. कोल्हे यांच्या कार्यातून प्रेरणा घेत मोफत आरोग्य शिबिरे सुरू केली. याच काळात डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. अभय बंग यांच्यासारख्या समाजाभिमुख वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांसोबत त्यांनी कार्याची सुरुवात केली आणि पुढे हे सेवाकार्य देशभर विस्तारले.
डॉ. पटेल यांनी सुरुवातीच्या काळात एसटी बसने प्रवास करून, नंतर स्वतःच्या स्कूटरने, आणि पुढे स्वतःच्या वाहनातून रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा ध्यास घेतला. आज त्यांच्या या सेवाकार्याने मोठे रूप धारण केले असून, त्यांनी काश्मीरपासून आसामपर्यंत तसेच भारतातील सुमारे १२ ते १३ राज्यांमध्ये अशा स्वरूपाची आरोग्य शिबिरे घेतली आहेत. ग्रामीण व कष्टकरी जनतेला सोयीस्कर व्हावे म्हणून अनेक ठिकाणी त्यांनी रात्रीची शिबिरेही आयोजित केली आहेत.

त्यांच्या फिरत्या दवाखान्यात नाक, कान व घसा संबंधित तपासण्या, औषधोपचार तसेच काही शस्त्रक्रियाही केल्या जातात. त्यामुळे दुर्गम भागातील अनेक रुग्णांना शहरात न जाता त्यांच्या गावाजवळच उपचार मिळतात. विशेष म्हणजे, वयाच्या ७४ व्या वर्षीदेखील डॉ. पटेल हे अविरतपणे हे कार्य करत असून, त्यांची ही जिद्द आणि सेवाभाव समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

या सेवाकार्यात त्यांचे सुपुत्रही सहभागी असून, ते स्वतःही नाक, कान व घसा तज्ज्ञ आहेत. वडिलांच्या सामाजिक कार्याला ते सक्रियपणे हातभार लावत आहेत. त्यामुळे ही सेवा केवळ वैद्यकीय कार्य न राहता एक सामाजिक चळवळ बनली आहे.
डॉ. अनिल पटेल यांचा आरोग्य रथ ८ एप्रिल रोजी यवतमाळहून प्रस्थान करून लातूर, मिरज, कोल्हापूर येथे आरोग्य सेवा देत १३ एप्रिल रोजी चिपळूणमध्ये पोहोचणार आहे. चिपळूणमध्ये सकाळी वडनाका येथील सरकारी दवाखान्यात, तर दुपारी लाईफ केअर रुग्णालयात ते रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत. त्यानंतर १४ एप्रिल रोजी सातारा येथे त्यांचे पुढील शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

अशा सेवाभावी, अनुभवी आणि समाजाभिमुख डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटण्याची व त्यांच्या सेवांचा लाभ घेण्याची ही दुर्मिळ संधी असून, चिपळूणकरांनी या उपक्रमाचा पूर्ण लाभ घ्यावा, असे आवाहन सजग स्वास्थ्य क्लिनिकच्या डॉ. श्रुतिका कोतकुंडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सजग स्वास्थ्य क्लिनिक, चिपळूण येथे किंवा ०२३५५-२६०२०० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Releated Posts

सावर्डे विद्यालय कोल्हापूर विभागात प्रथम; सह्याद्रीच्या शिरपेचात मानाचा तुरा

सावर्डे : महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान (टप्पा-3) अंतर्गत खाजगी शाळा विभागाचा निकाल नुकताच जाहीर…

ByByEditorial अप्रैल 11, 2026

घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत

रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी : शासनाच्या वाळू/रेती निर्गती धोरण २०२५ अंतर्गत घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला…

ByByEditorial अप्रैल 11, 2026

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त श्रीदेव भैरीला ७५ नारळ, ७५ केळी ७५ विड्यांची आरास

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायणराव राणे १० एप्रिल…

ByByEditorial अप्रैल 9, 2026

संगमेश्वरला समर स्पेशल गाड्यांचा थांबा नाही; प्रवाशांत नाराजी, रिकाम्या सीट्स असूनही दुर्लक्ष, कोकण रेल्वेकडे तातडीची मागणी

प्रतिनिधी : कोकणधारा संगमेश्वर : कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या संगमेश्वर रेल्वे स्टेशनला समर स्पेशल गाड्यांचा थांबा…

ByByEditorial अप्रैल 8, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

सावर्डे विद्यालय कोल्हापूर विभागात प्रथम; ‘सुंदर शाळा’ अभियानात अव्वल कामगिरी
घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत
रत्नागिरीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोन्याची चेन लंपास; दुचाकीवरून चोरट्यांचा पळ
आंबा घाटात चालकाची लूट; देवरूख पोलिसांनी ५ आरोपींना अटक
रत्नागिरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दोन घरांतून ३८ हजारांची रोकड लंपास
रत्नागिरीत क्रेडिट कार्ड इन्शुरन्सच्या नावाखाली ८८ हजारांची फसवणूक
रत्नागिरीत महिला विक्रेत्याची ४० हजारांची रोकड लंपास; पोलिस तपास सुरू
खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त श्रीदेव भैरीला ७५ नारळ, ७५ केळी ७५ विड्यांची आरास
देवरुख पोलिसांची धडक कारवाई; दरोड्यातील ५ आरोपी २ तासांत अटकेत