konkandhara.com

  • Home
  • क्राईम
  • देवरुख पोलिसांची धडक कारवाई; दरोड्यातील ५ आरोपी २ तासांत जेरबंद
देवरुख पोलिसांची धडक कारवाई; दरोड्यातील ५ आरोपी २ तासांत अटकेत

देवरुख पोलिसांची धडक कारवाई; दरोड्यातील ५ आरोपी २ तासांत जेरबंद

प्रतिनिधी : कोकणधारा

देवरुख : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाट परिसरात गाडी अडवून चाकूचा धाक दाखवत चालकाकडून २५ हजार रुपये लुटणाऱ्या टोळीतील पाच आरोपींना देवरुख पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक केली. या प्रकरणातील आणखी तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश तानाजी दळवी (रा. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) हे बोलेरो गाडीतून वेतोशी (ता. रत्नागिरी) येथून शिराळा (जि. सांगली) येथे म्हैस घेऊन जात असताना आंबा घाटातील दख्खन परिसरात दोन गाड्यांनी त्यांची गाडी अडवली. आरोपींनी त्यांना खाली उतरवून मारहाण, शिवीगाळ करत चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने इनोव्हा गाडीत बसवले.

त्यानंतर साखरपा येथील गंद्रे पेट्रोलपंपाजवळ नेऊन फिर्यादीला अर्ध्या वाटेत सोडून आरोपींनी पळ काढला. यावेळी आरोपींनी ५० हजार रुपयांची मागणी करत गाडीतील २५ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले तसेच पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी साखरपा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होताच देवरुख पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून पाच आरोपींना अटक केली. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
या गुन्ह्यात फरहान रशीद मुल्ला (४२), प्रथमेश सचिन भाटकर (२४), सर्वेश सुभाष किर (२२), धर्मलिंगम विजयकुमार नाडर (२६) व भूषण बिपेंद्र सावंत (२६, सर्व रा. रत्नागिरी) यांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम व पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Releated Posts

रत्नागिरीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणाची सोन्याची चेन लांबवली

रत्नागिरी : प्रतिनिधी शहरातील हिंदू कॉलनी परिसरातून गुरुवारी सकाळी 8.15 वा.सुमारास एका युवकाच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून दोन…

ByByEditorial अप्रैल 9, 2026

आंबा घाटात म्हैस वाहतूक करणाऱ्या चालकाची लूट; देवरूख पोलिसांकडून पाच जणांना बेड्या

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाटात दख्खननजीक बुधवारी रात्री एक खळबळजनक घटना घडली. बांबावडेकडे बोलेरोमधून म्हैस घेऊन जाणाऱ्या…

ByByEditorial अप्रैल 9, 2026

रत्नागिरीत दिवसाढवळ्या दोन घरे फोडली; ३८ हजारांची रोकड लंपास

रत्नागिरी : प्रतिनिधीतालुक्यातील तरवळ मायंगडेवाडी येथ्ाील दोन घरे फोडून रोख 38 हजार रुपये लांबवले. घरफोडीची ही घटना रविवार…

ByByEditorial अप्रैल 9, 2026

रत्नागिरीत ‘क्रेडिट कार्ड इन्शुरन्स’च्या नावाखाली तरुणाला ८८ हजारांचा गंडा

रत्नागिरी : प्रतिनिधीएसबीआय क्रेडिट कार्डचे इन्शूरन्स डिॲक्टिवेट करण्याची प्रोसेस सांगण्याच्या नावाखाली अज्ञाताने तरुणाचे तब्बल 88 हजार रुपयांची ऑनलाईन…

ByByEditorial अप्रैल 9, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

सावर्डे विद्यालय कोल्हापूर विभागात प्रथम; ‘सुंदर शाळा’ अभियानात अव्वल कामगिरी
घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत
रत्नागिरीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोन्याची चेन लंपास; दुचाकीवरून चोरट्यांचा पळ
आंबा घाटात चालकाची लूट; देवरूख पोलिसांनी ५ आरोपींना अटक
रत्नागिरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दोन घरांतून ३८ हजारांची रोकड लंपास
रत्नागिरीत क्रेडिट कार्ड इन्शुरन्सच्या नावाखाली ८८ हजारांची फसवणूक
रत्नागिरीत महिला विक्रेत्याची ४० हजारांची रोकड लंपास; पोलिस तपास सुरू
खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त श्रीदेव भैरीला ७५ नारळ, ७५ केळी ७५ विड्यांची आरास
चिपळूणमध्ये RPL 2026 दिमाखात; केदारनाथ खरवते विजेता, विशू इलेव्हन उपविजेता