हे पुरुषा, बरं झालं तुला मोठे स्तन नाहीत!
लेखीका : लक्ष्मी यादव समाजातील स्त्री-पुरुषांवरील दुहेरी निकष, शरीरावरून होणारी थट्टा आणि महिलांना सहन करावा लागणारा मानसिक त्रास यावर आधारित हा लेख तुम्हाला नवा दृष्टिकोन देईल. तुला असतेच जर मोठे स्तनतर तुलाही तुझ्या कपड्यांवरून दिसणाऱ्यास्तनांच्या आकाराची चर्चा करणाऱ्यातुझ्याच देशबांधवांची शरम वाटली असतीतुझ्या कपड्यातून त्यांनी तुझं शरीरआरपार नग्न करून पाहिलंहे ऐकून तुझ्या अंगावर घृणेचे शहारे उमटले असते तू असतास स्त्री तरतुझ्या स्तनांच्या अब्रूचं मोलतू कोण आहेस यावरून ठरवलं गेलं असतंवेश्येचे स्तन दिसले तरच किंमतमुस्लीमचे दिसले तर हराम आहेमातंग बाईचे तर आधीच बदनाम आहेनाचणारणीचे टंच हवेतबायकोचे इतर पुरुषाला दिसू नयेतमंत्र्यांसंत्र्याच्या पत्नीचे स्तन तर फारच मौल्यवानलोकांना दिसले तर मंत्र्याचीच अब्रु जाणारतुला तुझी बायको सांभाळता येत नसेलतर जीव दे असं लोक म्हणणारमग तुझ्या लक्षात आलं असतंपुरुषाच्या नजरेतील तुझं बाई म्हणूनचं मूल्य असतेच तुला मोठे स्तन पुरुषातर कुरवाळलं असतं त्यांना कित्येक पुरुषांनीतू घातलेल्या अंगभर कपड्यांमधूनसुद्धाधक्का दिला असता तुलाही गर्दीतकुणा अनोळखी पुरूषानंनेमका स्तनांना त्यांचा स्पर्श होईल असाआणि हसला असता तुझ्याकड पाहून तोअगदीच निर्विकार बेफिकीर तुलाही वाटली असती तुझ्या स्तनांची लाजउड्या मारताना चालतानात्याची टोकांनी बिचाऱ्या पुरुषांच्या नजरा चाळवू नये म्हणून तूही घातल्या असत्या पॅडेड ब्राखांदे तुटेपर्यंततूही धरला असतास स्वतःचा गळा आवळूनखाली वाकतानातूही प्रयत्न केले असतेस रात्रंदिनतुझे स्तन कुणा पुरुषाच्या नजरेस पडू नयेत यासाठीतुझ्या नितंबांच्या आकारानं तेसंकोचले जातातपुरुषांनी बनवलेली धर्म संस्कृती भ्रष्ट होऊ नयेम्हणूनम्हणून झाकत बसला असतास घोळदार कपड्यातस्वतःचं नॉर्मल शरीर तुझ्या स्तनांना सावरणारी ब्रापुरुष पाहतील या भीतीनंतू उन्हात सुकत घातली नसतीतुझ्या अंडरगारमेंटसारखी गल्लीत तुला एकट्याला पाहून आलं असतं कुणीतरी मागूनझडप घालून चुरगाळंलं असत तुझ्या स्तनांनाआणि पसार झालं असतं क्षणार्धातया धक्क्यातून तू कधीच सावरला नसतातुला ती गल्ली आणि तुझे दुखरे स्तन रोज आठवत राहिली असते तू ऊसाच्या फडात गवत काढत असतानातुझ्या स्तनांवर लक्ष ठेवून असणाऱ्याशेजारच्या बांधावरच्या एखाद्या दादानंसाधला असता डावतुला काही कळण्याआधीतुला ढेकळात लोळवूनतो बिनदिक्कतपणे निघूनही गेला असता तू रस्त्यावरून बायकोला घेऊन जातानाचार पुरुष जमले असतेहातात कॅमेरे घेऊनचारी बाजूंनी खेचले असते तुझे स्तनमन भरेेस्तोवर निदयीपणेतू जीव मुठीत धरून पळून गेला असतासपुन्हा कधीही त्या वाटेवर न येण्यासाठी आले असते बार वेश्यालयातमोठ्या स्तनांचे असंख्य शौकीनओरबाडलं असतं तुझ्या स्तनांना दारू पिण्याच्याकागदी नोटांच्या बदल्याततुझं माणूसपण मरताना पाहूनडोळे मारले असते त्यांनी आनंदानं चित्कारत रोज रात्री रस्त्याच्या कडेला दिव्याखालीतुझ्या वाढवलेल्या स्तनांचा आकार दाखवत तूही उभी असतासपुरुषांनी हातांनी चाचपून आकाराची खात्री करतमोजले असते तुझ्यासोबतच्या मैथुनाचे दाम कुणीतरी उरावर बसतं आहे म्हणूनतूही दचकून उठला असतास रेबेहिशेबी रात्री बेरात्रीतूही खाल्ल्या असत्या गोळ्याअन मारले असते खेटेडिप्रेशनच्या गोळ्यांसाठी डॉक्टरकडे तुलाही भीती वाटली असतीप्रत्येक गल्ली बोळाचीऊसाच्या फडाचीदेवळाचीपुरुषांचीतू जपत राहिला असतास स्वतःला सीता बनूनदेत राहिला असतास अग्निपरीक्षापुरुष मात्र नागवत राहिले असतेतुला भर दरबारातमग श्रीकृष्णाच्या साडीनेही वाचवली नसती तुझी आब्रुअशावेळी सगळेच पुरुष दुःशासन झाले असते! हे पुरुषा,एक गोष्ट नीट ऐकतू बाई झाला असतास किंवा तुला मोठे स्तन असतेतर तुझ्या स्तनांवर पुरुषांनीच झडप घातली असतीबाईनं नाही!बाईला कुणाचे स्तन किती मोठेकुण्या बाई पुरुषानं काय कपडे घातलेकी न घातलेयानं काहीही फरक पडत नाही! बरं झालं पुरुषा,तुला मोठे स्तन नाहीतहेही बरंच झालं पुरुषातू स्त्री म्हणून जन्मला नाहीस!वाचलास! पण आता तू एक गोष्ट करू शकतो का बघतुला बाईसारखे मोठे स्तन असते तरअसा विचार करूनबाईच्या मोठ्या स्तनाचे भोग समजून घे बाईला वाटू नये स्तनांचं ओझंबाई असल्याचा होऊ नये पश्चात्तापतुझ्या निर्मळ नजरेनंकरशील का आश्वस्त बाईलादेशील तुझी साथफक्त माणूस म्हणून?जमेल एवढं?जमव.तोवर मी चालत राहीनस्वतः निवडलेल्या वाटेवरूनएकटीच. बिनधास्त! लेखिका लिंग, लैंगिकता, संवाद, मानवी हक्क व महिलांचे हक्क या विषयांवर त्या कार्यरत आहेत.
हे पुरुषा, बरं झालं तुला मोठे स्तन नाहीत! Read More »