konkandhara.com

महाराष्ट्र

WhatsApp Image 2025 09 06 at 10.45.20 PM

संकटावर मात करत कोल्हापूरची प्रियांका खोत भारतीय सैन्यात लेफ्टनंटदिवंगत जवान निलेश खोत यांच्या पत्नीचा प्रेरणादायी प्रवास; चेन्नईत OTA मधून पासिंग आऊट परेड

कोल्हापूर – संकटावर मात करत धैर्य आणि चिकाटीच्या जोरावर भारतीय सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या कोल्हापूरच्या प्रियांका खोत यांचा आजचा (दि.6) दिवस अभिमानास्पद ठरला. चेन्नई येथील ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीमध्ये (OTA) पार पडलेल्या पासिंग आऊट परेडमध्ये त्यांना लेफ्टनंट पद मिळाले. प्रियांका खोत या दिवंगत नाईक निलेश खोत यांच्या पत्नी आहेत. निलेश खोते सिग्नल्स कॉर्प्समध्ये कार्यरत होते. 2022 मध्ये हेडक्वार्टर्समध्ये सेवेत असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्याआधीच प्रियांका यांनी वडिलांना गमावले होते. या दुहेरी आघाताने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मात्र या परिस्थितीत खचून न जाता प्रियांका यांनी भारतीय सैन्यात सेवा करण्याचा निर्धार केला. त्यांनी ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन कठोर परिश्रम केले. आज त्या परेडनंतर लेफ्टनंट म्हणून भारतीय सैन्यात दाखल झाल्या. दरम्यान, या यशाबद्दल प्रियांका म्हणाल्या – “निलेश यांनी कायम देशसेवा केली. त्यांचा वारसा पुढे नेणं हेच माझं ध्येय आहे. कुटुंब आणि देशासाठी ताकदीने उभं राहणं हेच खरं समाधान आहे.” कोल्हापूर आणि राज्यभरातून प्रियांकाचे अभिनंदन होत असून त्यांच्या प्रवासाने अनेकांना प्रेरणा दिली आहे.

संकटावर मात करत कोल्हापूरची प्रियांका खोत भारतीय सैन्यात लेफ्टनंटदिवंगत जवान निलेश खोत यांच्या पत्नीचा प्रेरणादायी प्रवास; चेन्नईत OTA मधून पासिंग आऊट परेड Read More »

WhatsApp Image 2025 09 06 at 10.21.34 PM

मराठा आरक्षणानंतर भाजपची ‘देवाभाऊ’ बॅनरबाजी; शिंदेंची प्रतिक्रियामुंबई-ठाण्यात फडणवीसांचे पोस्टर झळकले; “श्रेयवादाच्या लढाईत नाही” – मुख्यमंत्री

मुंबई/ठाणे – राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी तीन महत्त्वाचे जीआर काढल्यानंतर भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा पुढे करण्याची मोहीम सुरू झाली आहे. मुंबई आणि ठाण्यात ‘देवाभाऊ’ असा उल्लेख असलेले बॅनर झळकले आहेत. त्याचबरोबर प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावरही अशाच जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. सरकारने मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या मान्य करत जीआर काढले होते. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपसमितीने घेतलेल्या निर्णयानंतर जरांगे यांनी समाधान व्यक्त करत शासनाचे आभार मानले. यानंतर लगेचच भाजपकडून ‘देवाभाऊ’ मोहिम पुढे आल्याचं स्पष्ट होत आहे. या बॅनरवर “कोणीही निंदा करो, कितीही टीका करो, तरीही गोरगरीब जनतेला न्याय देणारा देव माणूस एकच – देवेंद्रजी फडणवीस” असं लिहिलं आहे. तसेच “छत्रपती शिवरायांचा विचारांचा वारसदार, ना जातीचा, ना पातीचा, ना भाषेचा – देवाभाऊ” असाही मजकूर देण्यात आला आहे. मात्र हे पोस्टर नेमके कुणी लावले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तरीदेखील ही बॅनरबाजी भाजपकडूनच राबवली गेल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, या घडामोडींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं – “श्रेयवादाच्या लढाईत आम्ही नाही. मराठा आणि ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम महायुती सरकारने एकत्रितपणे केलं आहे. देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून पुढे काम करणार आहोत. सर्वसामान्यांचा विकास हाच आमचा अजेंडा आहे.” राजकीय वर्तुळात या हालचालींना आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्व दिलं जात आहे.

मराठा आरक्षणानंतर भाजपची ‘देवाभाऊ’ बॅनरबाजी; शिंदेंची प्रतिक्रियामुंबई-ठाण्यात फडणवीसांचे पोस्टर झळकले; “श्रेयवादाच्या लढाईत नाही” – मुख्यमंत्री Read More »

WhatsApp Image 2025 09 05 at 2.28.49 PM

अजित पवारांचा फोन, IPS अंजना कृष्णांची ठाम भूमिका, आणि मिटकरींचा बॉम्ब!

पूजा खेडकर प्रकरणानंतर अंजना कृष्णांच्या नेमणुकीवरही संशय? मुंबई :सोलापूरच्या कुर्डू गावातील अवैध मुरूम उत्खनन प्रकरणातून राज्यात मोठा वादंग उफाळलाय. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महिला पोलीस अधिकारी IPS अंजना कृष्णा यांना व्हिडिओ कॉलवरून दम दिल्याचा आरोप आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडलं; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उलट अंजना कृष्णांच्याच नेमणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून नवा स्फोटक मुद्दा उचलला आहे. “पूजा खेडकरप्रमाणेच घोळ” – मिटकरी अकोल्यात बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, “अंजना कृष्णा या मग्रूर अधिकारी आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना ओळखत नाही असं म्हणणं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. पूजा खेडकर प्रकरणात जसा गोंधळ झाला, तसाच गोंधळ अंजना कृष्णांच्या UPSC निवड प्रक्रियेत झाला असावा, अशी आमची शंका आहे. त्यामुळे याची चौकशी झालीच पाहिजे.” IPS अंजना कृष्णा कोण? मूळ केरळमधील त्रिवेंद्रमच्या UPSC 2023 मध्ये 355 वा क्रमांक, IPS केडर सुरुवातीला केरळमध्ये एसीपी पदावर काम सध्या सोलापूर ग्रामीण पोलिसात नियुक्ती प्रोबेशन काळातच करमाळा व माढा येथे अवैध व्यवसायाविरोधात मोठी कारवाई नुकत्याच मुरूम उपसा प्रकरणात ठाम भूमिका घेतल्याने चर्चेत पवारांच्या दबावाखाली कारवाई? मिटकरींच्या वक्तव्यामुळे नवा वाद पेटलाय. अजित पवारांना अडचणीत आणणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले, तर दुसरीकडे IPS अंजना कृष्णांच्या नेमणुकीवरच प्रश्न उपस्थित करून राष्ट्रवादी काँग्रेसने बचावात्मक भूमिका घेतल्याचं स्पष्ट होतंय.

अजित पवारांचा फोन, IPS अंजना कृष्णांची ठाम भूमिका, आणि मिटकरींचा बॉम्ब! Read More »

WhatsApp Image 2025 09 05 at 2.25.51 PM

एका तासात दोन जीआर! सरकारच्या घाईगडबडीवर भुजबळांचा स्फोटक सवाल

मुंबई :मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांवर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. एका तासाच्या आत दोन वेगवेगळे जीआर काढले गेल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ ओबीसी नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. पहिल्या जीआरमध्ये “मराठा समाजातील पात्र व्यक्ती” असा उल्लेख होता. मात्र मनोज जरांगेंच्या आक्षेपानंतर हा शब्द वगळून तात्काळ दुसरा जीआर काढला गेला. “जर चुकीचं होत असेल तर मी कसा काय गप्प राहू? मी माझं मत मांडणार,” असा इशारा भुजबळांनी दिला. शब्दांची हेराफेरी की धोरणात्मक गोंधळ? भुजबळांनी सरकारवर शब्दांची हेराफेरी करून आंदोलन शमवण्याचा आरोप केला. ते म्हणाले, “सरसकट हा शब्द काढून जीआरमध्ये शब्दांशी खेळ केला गेला. पण यामुळे ओबीसींच्या हक्कावर गदा येणार आहे. मराठा समाज ही रुलिंग कम्युनिटी आहे. कोर्टानेही स्पष्ट केलंय की ते सामाजिक दृष्ट्या मागास नाहीत.” ओबीसींचा वाटा कमी होणार? भुजबळांच्या मते, आधीच ओबीसी समाजाला मिळणाऱ्या आरक्षणातला मोठा हिस्सा मराठा समाजाकडे जाण्याचा धोका आहे. “एका घरात दहा लोक आहेत, त्यांना बाहेर काढलं नाही; पण आणखी दहा बसवले, तर धक्का बसणारच,” असं त्यांनी स्पष्ट केलं. दिशाभूल केल्याचा थेट आरोप भुजबळांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीचा उल्लेख करत, “सरसकट शब्द काढून हैदराबाद गॅझेट लागू करण्याचं ठरवलंय असं सांगण्यात आलं. पण माझ्याकडे दाखले आहेत की कुणबी आणि मराठा या वेगळ्या जात आहेत. जीआर माझ्या सल्ल्याने काढला अशी दिशाभूल करू नका,” असा थेट निशाणा सरकारवर साधला. सरकार दबावाखाली? “एका तासात दोन जीआर निघाले, सचिवांच्या सह्या आहेत. हा बदल दबावाखाली झाला की प्रेमाखाली? सरकारनं स्पष्ट केलं पाहिजे,” असा खोचक सवाल भुजबळांनी उपस्थित केला.

एका तासात दोन जीआर! सरकारच्या घाईगडबडीवर भुजबळांचा स्फोटक सवाल Read More »

WhatsApp Image 2025 09 05 at 2.22.52 PM

गरीब मराठ्यांची लढाई आम्हीच लढतोय; कुणाच्याही खोडीला काही होणार नाही” – मनोज जरांगे पाटील

छत्रपती संभाजीनगर | मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की, मराठा समाज आरक्षणात जाणारच आणि यावर आता कुठलाही संभ्रम नाही. “कुणाच्या खोडीला काही होणार नाही. सरकारने काढलेला जीआर योग्य असून, त्यात जर त्रुटी असतील तर दुरुस्त केल्या जातील,” असं ठाम विधान त्यांनी केलं. सध्या उपचार घेत असताना त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवरही जोरदार हल्लाबोल केला. 🔹 “मुलं मुंबईतून जिवंत करून आली” जरांगे म्हणाले –“जर आमचा सरकारवर, फडणवीसांवर राग असता, तर आमची मुलं निब्बर बनियानवर असती. पण त्यांनी मुंबईत जिवंत परत येऊन दाखवलं.” 🔹 जीआर मान्य, पण त्रुटी दुरुस्त “जीआरमध्ये काही त्रुटी आहेत, पण त्या दुरुस्त करू. सुधारित जीआर लवकरच निघेल.” “प्रक्रिया, टाइम बॉंड आणि सुरुवातीची तारीख याबाबत मुख्यमंत्री व विखे पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे.” “आम्ही सरसकट आरक्षण नको म्हणत नाही, पण गरीब मराठे थेट आरक्षणात जातील.” 🔹 संजय राऊत व इतरांना प्रत्युत्तर “हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हाताळलं, दुसऱ्या कुणी नाही.” “उपोषण आम्ही करायचं आणि श्रेय दुसऱ्यांनी घ्यायचं? हे आम्ही मान्य करणार नाही.” “संजय राऊत फार बोलत आहेत, एवढं बार जाऊ द्या.” 🔹 भुजबळांवर खोचक टोला “आम्ही ओबीसींमध्ये गेलो नाही, तर ते आमच्यात आले आहेत. भुजबळांना माहिती होतं की मराठा समाजाला आरक्षण मिळणारच. त्यांनी अनेक पक्ष हाताळलेत, त्यामुळे जीआर त्यांना नीट कळतो. पण मराठा समाजाला ‘घुसखोर’ म्हणणं योग्य नाही. हे अधिकृत आहे,” असा टोला जरांगेंनी लगावला. 🔹 “मंडल आयोगावर चॅलेंज करू” “भुजबळ कोर्टात गेले तरी काही होणार नाही. हैद्राबाद गॅझेट हा सरकारी दस्तऐवज आहे.” “जर कोर्टात प्रश्न निर्माण झाले तर मी मंडल आयोगालाच चॅलेंज करेन.” 👉 एकंदर जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाच्या ठाम भूमिकेची पुनरावृत्ती केली आणि विरोधकांना थेट इशारा दिला –“गरीब मराठ्यांची लढाई आम्हीच लढतोय. यात कुणाच्याही खोडीला काही होणार नाही.

गरीब मराठ्यांची लढाई आम्हीच लढतोय; कुणाच्याही खोडीला काही होणार नाही” – मनोज जरांगे पाटील Read More »

WhatsApp Image 2025 09 05 at 2.19.24 PM

काँग्रेसकडे फक्त १६ आमदार, पण सरकारला घाम फोडू शकतो – विश्वजित कदमांचा इशारा

सांगली | काँग्रेस पक्ष आज संघर्षाच्या काळातून जात असला तरी आमच्यात अद्याप ताकद आहे. राज्यातील जनतेशी अन्याय झाला, चुकीचे निर्णय झाले, तर पुढच्या पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांचा घाम काढण्याची ताकद आमच्यात आहे, असा इशारा काँग्रेस आमदार व माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिला. कडेगाव तालुक्यातील वांगी येथे स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या ‘लोकतीर्थ’ स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज (बंटी) पाटील, विजय वडेट्टीवार व खासदार विशाल पाटील उपस्थित होते. “फक्त १६ आमदार आहोत, पण…” “आज काँग्रेसचे केवळ १६ आमदार असले तरी पक्षाच्या विचारांवर उभे राहून लढणारी ताकद आमच्यात आहे. सत्ताधाऱ्यांनी जनतेविरुद्ध पावले उचलली, तर काँग्रेस शांत बसणार नाही,” असे विश्वजित कदम म्हणाले. ते पुढे म्हणाले की, “मी पतंगराव कदम यांचा मुलगा आहे. बंटी पाटील आमचा वाघ आहे. विजय वडेट्टीवार विदर्भाचे वाघ आहेत. खासदार विशाल पाटील दिल्लीमध्ये काँग्रेसच्या विचारांसाठी लढत आहेत.” “1980 मध्ये कार्यकर्त्यांनी दगडे झेलली” कदम यांनी आठवण करून दिली की,“1980-85 च्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी पतंगराव कदम यांच्यासाठी दगडे झेलली आहेत. त्याग करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठीच मी पुढे काम करणार आहे. आपला पक्ष सत्तेत नसल्यामुळे कामे होत नाहीत, ही कार्यकर्त्यांची नाराजी खरी आहे. पण आजही काँग्रेस कार्यकर्त्यांची ताकद अबाधित आहे.” विशाल पाटील तिकीट वाद कदम म्हणाले की,“विशाल पाटील यांना तिकीट नाकारल्याने आम्ही उठाव केला. त्या वेळी सांगलीने माझं वेगळं रूप पाहिलं. आमच्यातील एकोपा आणि लढण्याची वृत्ती अजूनही कायम आहे.” 👉 काँग्रेस राज्यात आज चौथ्या क्रमांकावर असली, तरी “सरकारला घाम फोडण्याची ताकद आमच्यात आहे” हा विश्वजित कदमांचा दावा पक्ष कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करणारा ठरतोय.

काँग्रेसकडे फक्त १६ आमदार, पण सरकारला घाम फोडू शकतो – विश्वजित कदमांचा इशारा Read More »

WhatsApp Image 2025 09 05 at 2.15.05 PM

सिंधुदुर्ग | करुळ घाटात दरड कोसळली, १२ सप्टेंबरपर्यंत वाहतूक बंद!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करुळ घाट पुन्हा धोक्यात! गुरुवारी सकाळी ८ वाजता मोठी दरड कोसळून संपूर्ण घाट मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने निर्णय घेत, १२ सप्टेंबरपर्यंत घाट बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. 🪨 काय घडलं? दरड कोसळून रस्त्यावर मोठमोठे दगड व चिखल साचला. त्यामुळे घाट मार्गावरची संपूर्ण वाहतूक थांबली. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू. 👷 आठ दिवसांचं अवघड काम घाटात यापूर्वीही दरडी कोसळण्याचे प्रकार. रस्त्यावर व आसपासच्या भागात मोठ्या भेगा पडल्या आहेत. सैल खडक हटवण्यासाठी तज्ज्ञ अभियंते दाखल. हे काम पूर्ण व्हायला किमान ८ दिवस लागणार. 📢 नागरिकांना आवाहन करुळ घाट पूर्णपणे बंद राहणार. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन निर्णय. 👉 करुळ घाट हा सिंधुदुर्गला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असला, तरी वारंवार दरडी कोसळण्यामुळे तो प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. यंदा मात्र, प्रशासनाने “सुरक्षितता प्रथम” म्हणत घाट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

सिंधुदुर्ग | करुळ घाटात दरड कोसळली, १२ सप्टेंबरपर्यंत वाहतूक बंद! Read More »

WhatsApp Image 2025 09 05 at 2.12.19 PM

गणेश विसर्जनासाठी मुंबई पोलिसांचा हायटेक किल्ला

मुंबईत गणेशोत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे विसर्जन मिरवणुकीत लाखो भाविकांचा महासागर उसळतो. यंदा या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा सुरक्षा आराखडा तयार केला आहे. 👮 १८ हजार पोलीस दल सज्ज यावर्षी विसर्जन दिवशी तब्बल १८ हजार पोलिसांचा ताफा रस्त्यावर तैनात राहणार आहे. महिला पोलीस, ट्रॅफिक पोलीस, क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) यांचा समावेश. गर्दी हाताळण्यासाठी अतिरिक्त SRPF, होमगार्ड्स यांचीही नेमणूक. 📸 १० हजार कॅमेरे + ड्रोन नजर शहरातल्या प्रमुख विसर्जन मार्गांवर १० हजार CCTV कॅमेरे बसवले आहेत. ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे आकाशातून थेट निगराणी ठेवली जाणार आहे. गर्दीची हालचाल, आपत्कालीन परिस्थिती व वाहतूक कोंडी त्वरित टिपता येणार. 🤖 पहिल्यांदाच AI ची एंट्री मुंबई पोलिसांनी यंदा पहिल्यांदाच Artificial Intelligence (AI) प्रणालीचा वापर केला आहे. AI कॅमेऱ्यांमधून मिळालेल्या फीडचा विश्लेषण करून गर्दी कुठे धोकादायक पातळीवर आहे, कुठे संभाव्य गोंधळ निर्माण होऊ शकतो, याची माहिती अलर्ट स्वरूपात पोलिस कंट्रोल रूमला मिळणार. Facial recognition आणि suspicious activity detection चा वापरही होणार असल्याची माहिती. 🚦 ट्रॅफिकसाठी स्वतंत्र आराखडा विसर्जन मार्गावरील ट्रॅफिक व्यवस्थापनासाठी स्पेशल कोऑर्डिनेशन सेल उभारण्यात आला आहे. BEST बसेस, मेट्रो सेवा व लोकल ट्रेन यांचे वेळापत्रक बदलून गर्दी वाहतूक व्यवस्थापनाला हातभार. 🗣️ पोलिसांचा इशारा मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, शक्यतो पायी विसर्जन मिरवणुकीत सहभागी व्हावं. वाहनं विसर्जन मार्गावर लावू नयेत. कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा वस्तू दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावी. 🏷️ निष्कर्ष गणेश विसर्जन म्हणजे मुंबईचं सांस्कृतिक वैभव, पण त्याचबरोबर पोलिसांसाठी गर्दी व्यवस्थापनाची सर्वात मोठी परीक्षा.👉 १८ हजार पोलीस, १० हजार कॅमेरे, ड्रोन आणि आता AI — मुंबई पोलीस यंदा विसर्जनात हायटेक सज्ज आहेत.

गणेश विसर्जनासाठी मुंबई पोलिसांचा हायटेक किल्ला Read More »

WhatsApp Image 2025 09 05 at 2.06.50 PM

मुंबई लोकल: नवी AC रेल्वे, पण प्रवाशांना खरंच हवी होती का?

मुंबईकरांसाठी “जीवनवाहिनी” म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन आता मेट्रो-स्टाईल AC गाड्यांमध्ये अपग्रेड होणार आहे. रेल्वे मंत्रालयानं २३८ नवी AC लोकल देण्याचा निर्णय घेतला असून, या गाड्यांमध्ये कुशन सीट्स, मोबाईल चार्जिंग पोर्ट्स, इन्फोटेन्मेंट सिस्टीम आणि १३० किमी वेगानं धावणारे डबे असतील.सरकार या निर्णयाचं मोठं यश म्हणून ढोल वाजवतंय, पण खरं चित्र वेगळंच सांगतं. 🚆 प्रवासी कुठे? सध्या मुंबईत दररोज ६० लाखांहून अधिक प्रवासी Non-AC लोकलने प्रवास करतात. तर AC लोकलचा वापर करणारे प्रवासी फक्त २ लाख (म्हणजे एकूण प्रवाशांपैकी ४%).👉 म्हणजे सरकारनं पैसा खर्च केला तो बहुसंख्य मुंबईकरांसाठी नाही, तर त्या ४% साठी! 💰 महसूल कुठून? कमी प्रवासी असूनही AC लोकल वार्षिक २१५ कोटींचा महसूल, म्हणजे पश्चिम रेल्वेच्या महसूलात तब्बल २२% वाटा देते.👉 त्यामुळे सरकारचा कल “कमाई करणाऱ्या” AC गाड्यांकडे, सामान्य Non-AC प्रवाशांकडे नाही, असं चित्र दिसतं. ⚡ “गर्दीत श्वास गुदमरणाऱ्या” Non-AC ला उपाय कुठे? मुंबईकरांना रोजच्या प्रवासात सर्वात मोठी समस्या म्हणजे गर्दी, खचाखच भरलेले डबे, तासन्तास उभं राहणं आणि सुरक्षिततेचा अभाव. ९६% प्रवासी Non-AC लोकलमध्येच प्रवास करतात. तरीही तिथं नवीन डब्यांची संख्या अपुरी, अपग्रेड्स मर्यादित. मग प्रश्न असा —सरकारला खरंच लोककल्याण महत्त्वाचं आहे का, की महसूल वसूल करणारा AC वर्ग? 🏷️ राजकीय गणित? नवे AC लोकल ट्रेनना “विकासाचं पॅकेज” म्हणून सादर करण्यात आलं आहे. मेट्रो-स्टाईल डिझाईन, एअर-कंडिशनिंग, लक्सरी इमेज — हे शहरी मध्यमवर्गीय व पर्यटकांना लुभावणारं पॅकेज. पण रोजच्या प्रवासात सामान्य प्रवासी अजूनही जुन्या Non-AC लोकलमध्येच कोंबले जातील. 👉 त्यामुळे टीकाकारांचं स्पष्ट मत —“गर्दी Non-AC मध्ये, कमाई AC मध्ये… आणि सरकारचं लक्ष महसुलावर, प्रवाशांच्या वेदनांवर नाही.”

मुंबई लोकल: नवी AC रेल्वे, पण प्रवाशांना खरंच हवी होती का? Read More »

WhatsApp Image 2025 09 05 at 2.05.14 PM

मुंबई लोकल: AC विरुद्ध Non-AC – गर्दी कुठे, कमाई कुठे?

मुंबईकरांच्या जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमध्ये आता AC विरुद्ध Non-AC असा नवा वाद उभा राहतो आहे. प्रवासी कुठे जास्त आहेत, महसूल कुठून येतोय आणि भविष्यातील प्रवासाची दिशा काय असेल? याचा मागोवा घेणारा डेटा काही रोचक वास्तव उघड करतो. 🚆 प्रवासी संख्या AC लोकल: दररोज सुमारे २ लाख प्रवासी Non-AC लोकल: तब्बल ६० लाखांहून अधिक प्रवासी👉 म्हणजे एकूण लोकल प्रवाशांपैकी AC मध्ये फक्त ४%, तर Non-AC मध्ये तब्बल ९६% प्रवास करतात. 💰 महसूल (Revenue) AC लोकल: पश्चिम रेल्वेवर एकट्या AC सेवांतून वार्षिक ₹२१५ कोटी महसूल. Non-AC लोकल: प्रवासी प्रचंड, पण तिकिट दर कमी असल्याने महसूल तुलनेने कमी.👉 कमी प्रवासी असूनही AC लोकल महसूलात २२% वाटा उचलते. 🚉 सेवा (Services) Western Railway: दररोज १०९ AC लोकल, बाकी सुमारे १३०० Non-AC सेवा Central Railway: दररोज ६६ AC लोकल, बाकी हजारो Non-AC सेवा👉 AC सेवा वाढल्या असल्या तरी पोहोच अजूनही मर्यादितच आहे. 📈 वाढती लोकप्रियता Western Railway AC प्रवासी: मार्च २०२५ मध्ये दररोज ~१.६३ लाख (मागील वर्षी ~१.०८ लाख) Central Railway AC प्रवासी: २०२५ मध्ये दररोज ~७७ हजार (मागील वर्षी ~५६ हजार)👉 उष्णतेमुळे व प्रवासाच्या सोयींमुळे AC लोकलची मागणी हळूहळू वाढते आहे. 🏷️ निष्कर्ष Non-AC लोकल: अजूनही मुंबईकरांसाठी मुख्य आधारस्तंभ. AC लोकल: प्रवासी कमी, पण महसूल जास्त आणि लोकप्रियता वेगाने वाढती. 👉 मुंबई लोकलची खरी कहाणी म्हणजे –“गर्दी Non-AC मध्ये, कमाई AC मध्ये!”

मुंबई लोकल: AC विरुद्ध Non-AC – गर्दी कुठे, कमाई कुठे? Read More »