konkandhara.com

महाराष्ट्र

आमदार बाई, पण फोटोबाजीवर स्टॉप! पती अधिकाऱ्याचं धडक पत्र व्हायरल

संभाजीनगर : भाजप आमदार पत्नीला पती अधिकाऱ्याचं थेट पत्र – “माझे फोटो वापरु नका!” संभाजीनगर : ग्रामीण भागात बहुतेक वेळा पत्नी पुढारी पण पती कारभारी असं चित्र दिसून येतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिला आरक्षणाचा फायदा घेत अनेक महिला सरपंचपदावर विराजमान झाल्या असल्या तरी प्रत्यक्ष गावचा कारभार पतीच पाहतो, अशी प्रथा रूढ आहे. अगदी आमदार पातळीवरही हीच परिस्थिती काही वेळा पाहायला मिळते. मात्र, संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघात याच पार्श्वभूमीवर एक वेगळीच घटना घडली आहे. भाजप आमदार अनुराधा चव्हाण यांच्या पतींनी – जे की सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता आहेत – थेट आमदार पत्नीला पत्र लिहून कार्यकर्त्यांना सूचना द्याव्यात, अशी मागणी केली आहे. कारण, मागील काही दिवसांत भाजपच्या विविध कार्यक्रमांमध्ये, वृत्तपत्र जाहिरातींमध्ये आणि बॅनरवर आमदार अनुराधा चव्हाण यांच्यासोबत त्यांचे पती अतुल चव्हाण यांचे फोटो मोठ्या प्रमाणात वापरले जात होते. मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, “माझा फोटो बॅनर किंवा जाहिरातींवर लावल्यामुळे माझ्या विरोधात तक्रारी दाखल होत आहेत तसेच माहिती अधिकारांतर्गत अर्ज येत आहेत. त्यामुळे हे टाळावं.” त्यांनी आमदार पत्नीला उद्देशून लिहिलेल्या पत्रात कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी सूचना करण्याची मागणी केली आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर फुलंब्री मतदारसंघात राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. एका बाजूला पती हा वरिष्ठ अधिकारी, तर पत्नी आमदार – अशा या प्रकरणामुळे प्रशासनिक आचारसंहितेचा मुद्दाही पुढे येतोय. पती-पत्नीच्या या संवादामुळे कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय निर्माण झाला असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आमदार बाई, पण फोटोबाजीवर स्टॉप! पती अधिकाऱ्याचं धडक पत्र व्हायरल Read More »

मराठा आरक्षणावरून छगन भुजबळांचा अजित पवारांना कडाडून विरोध

🌧️ “या वर्षी शेतकऱ्यांचे नुकसानभरपाईचे पैसे थेट नाहीत!” – अतिवृष्टीमुळे शेतकरी नारा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेती, गुरं आणि घर-दार गमावलेल्या शेतकरी कुटुंबांवर संकटाचं विळखं वाढलं आहे. मात्र आता शेतकऱ्यांसाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सांगितले की, यंदाच्या अतिवृष्टीसाठी शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळणार नाहीत. पीकविम्याच्या नव्या नियमानुसार केवळ कापणीअंती उत्पादनावर आधारित नुकसानभरपाई मिळू शकते. त्यामुळे आताच्या अतिवृष्टीतून नुकसान भरपाई मिळणे शक्य नाही. यासाठी शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार मदत करण्यात येईल, असे पापळकर यांनी स्पष्ट केले. याबाबत त्यांनी पंचनाम्यांबाबतही माहिती दिली. जुलै आणि ऑगस्ट महिन्यापर्यंतचे पंचनामे पूर्ण करून त्याचे अंतिम अहवाल सरकारला सादर केले गेले आहेत. आतापर्यंत नुकसानभरपाईसाठी 697 कोटी रुपये मिळाले असून, उर्वरित 721 कोटी रुपये येत्या काही दिवसांत प्राप्त होणार आहेत. जुन्या योजनेत पाच घटकांवर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत होती – उगवण न होणे, स्थानिक आपत्ती, मिड अॅडव्हर्सिटी, पोस्ट हार्व्हेस्टिंग आणि उत्पादन आधारित नुकसान. मात्र नव्या योजनेत केवळ उत्पादनावर आधारित नुकसानभरपाई मिळेल आणि मर्यादा 50 टक्क्यांपर्यंत आहे. या कारणास्तव पूर्वीच्या योजनेप्रमाणे आजच्या अतिवृष्टीसाठी मोठ्या प्रमाणात नुकसानभरपाई मिळणे शक्य नाही. शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई लवकर मिळवण्यासाठी काही महत्त्वाचे पावले उचलली पाहिजेत. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, त्यांनी आपले ई-केवायसी करणे आवश्यक आहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तातडीने नुकसानभरपाई जमा होईल. सरकारकडून आलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यासाठी तालुका पातळीवर कार्यरत एक टीम काम करत आहे. या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना भरलेल्या आर्थिक संकटात या नव्या नियमांनी आणखी मोठा ताण निर्माण केला आहे, त्यामुळे शेतकरी आता सरकारी मदतीवरच अवलंबून आहेत.

मराठा आरक्षणावरून छगन भुजबळांचा अजित पवारांना कडाडून विरोध Read More »

खड्डेमुक्त मुंबई, आरोग्य सेवा आणि गृहनिर्माणाला गती! – मोठी घोषणा

मुंबई : जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात येणारी सर्व विकासकामे उच्च दर्जाची असावीत आणि ठरलेल्या मुदतीत पूर्ण व्हावीत, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. वर्ल्ड ट्रेड सेंटर कॉम्प्लेक्स येथे झालेल्या मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी मुंबईला जागतिक दर्जाचं शहर बनवण्यासाठी गृहनिर्माण, आरोग्य, रस्ते, स्वच्छता आणि रोजगारनिर्मिती या क्षेत्रांवर भर देण्याची घोषणा केली. या बैठकीला मंत्री मंगल प्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, आयुक्त भूषण गगराणी, जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत 2025–26 या वर्षासाठी 553 कोटी रुपयांचा वार्षिक निधी मंजूर करण्यात आला. यात सर्वसाधारण योजनेसाठी 528 कोटी, तर अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 22 कोटी रुपयांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्र्यांनी हा निधी मंजूर प्रकल्पांवर वेळेत खर्च होईल, याची काळजी घेण्याचे आवाहन केले. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “मुंबईतील रखडलेले गृहप्रकल्प प्राधान्याने मार्गी लावले जातील. एसआरए, म्हाडा, एमएमआरडीए, सिडको आणि महानगरपालिका या संस्थांनी समन्वय साधून तातडीने कारवाई करावी.” आरोग्य सेवेत सुधारणा करण्यासाठी “हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना” सुरू करण्यात आली असून, महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये आधुनिक एमआरआय मशीन उपलब्ध करून दिली जाणार आहेत. शहरात स्वच्छता मोहीम, प्रदूषण नियंत्रण, वृक्षारोपण यांना गती देण्याबरोबरच खड्डेमुक्त रस्ते, उद्यानांचे पुनर्वसन आणि पिण्याच्या पाण्याचा सुरळीत पुरवठा या कामांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबईतील पोलिसांच्या घरकुलाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. जिल्हा विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी वार्षिक योजनेतील 33 टक्के निधी राखीव ठेवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सांगितले. 2028 पर्यंत मुंबई जिल्ह्याचा GDP दुप्पट करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात आले असून मत्स्यव्यवसाय, रत्न-दागिने, लेदर, पर्यटन, आरोग्य, वाहतूक आणि रिअल इस्टेट क्षेत्रांवर विशेष भर दिला जाणार आहे.

खड्डेमुक्त मुंबई, आरोग्य सेवा आणि गृहनिर्माणाला गती! – मोठी घोषणा Read More »

तर सरकारला स्वस्त बसू देणार – बच्चू कडूंचा इशारा

चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा सरकारला कठोर शब्दांत इशारा देत माजी आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. “जोपर्यंत शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, तोपर्यंत सरकारला स्वस्त बसू देणार नाही. वेळ आली तर नेपाळसारखे घरात घुसू,” अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला. चंद्रपूर जिल्ह्यातील पाथरी गावात झालेल्या जनसभेत ते बोलत होते. या सभेत कडू यांनी शेतकरी आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. “सरकार शेतकऱ्यांना सातत्याने लुटत आहे. आम्हाला पेटवणं जमणार नाही, पण घरात बांधून ठेवण्याची ताकद आहे,” असं म्हणत त्यांनी सरकारला लक्ष्य केलं. यावेळी कडू यांनी शेतकऱ्यांसाठी 28 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आंदोलनाची रूपरेषाही स्पष्ट केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, शेतमालाला भाव द्यावा यासाठी ते गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मागणी करत आहेत. “देशातील 200 उद्योगपत्यांचे 18 ते 24 लाख कोटी कर्ज सरकार माफ करू शकते, पण शेतकऱ्यांचे 30–40 हजार कोटींचं कर्ज माफ करायला तयार नाही. सोयाबीन, तूर, धान याला 20 टक्के बोनस आणि जीएसटीचा परतावा द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी इशारा दिला की, “15 ऑक्टोबरच्या आत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाली नाही, तर आम्ही सोयाबीन कलेक्टर आणि पालकमंत्र्यांच्या घरात नेऊन ठेवणार.” सभाेत बोलताना बच्चू कडू यांनी पुढे सांगितले, “मी कुठल्याही जातीसाठी बोलणार नाही. प्रत्येक जातीने आपले आरक्षणासाठी लढावं, पण मी फक्त शेतकऱ्यांसाठी लढणार. शेतकरी हा प्रत्येक जाती-धर्मात आहे. त्यांच्यासाठी मी आयुष्य वाहणार आहे.” गोरक्षणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली. “गोरक्षणाच्या नावाखाली काही गुंड-कार्यकर्त्यांचे पोट भरते, पण गाईला शेतकऱ्यांकडे ठेवलं तर काहीच मदत मिळत नाही. गोरक्षकांना अनुदान देता, मग शेतकऱ्यांना का नाही?” असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, गोदावरी पट्टा पूरग्रस्त असतानाही मुख्यमंत्री फडणवीस दौऱ्यावर गेले नाहीत, अशी टीकाही कडू यांनी यावेळी केली. “हेच लोक उद्धव ठाकरेंना नाव ठेवत होते, पण आता स्वतः ऑनलाईन झाले आहेत,” असे म्हणत त्यांनी टोला लगावला.

तर सरकारला स्वस्त बसू देणार – बच्चू कडूंचा इशारा Read More »

मराठवाडा पूरस्थिती गंभीर! आतापर्यंत 8 जणांचा बळी

मुंबई | मराठवाड्यात आलेल्या महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं लागलं आहे. शेती पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून जनावरांचंही मोठं नुकसान झालं आहे. आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक ठिकाणी बचाव पथकं अद्यापही कार्यरत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी सोलापूर आणि लातूर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर, धाराशिव व बीड जिल्ह्यांचा दौरा करतील, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव जिल्ह्यात पूरस्थितीची पाहणी करतील. संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री देखील आपल्या जिल्ह्यांमध्ये पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासूनच्या मुसळधार पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत एकूण 23 टक्के शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हवामान विभागानं पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या परिस्थितीत विरोधकांनी सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे खासदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत जाहीर करण्याची मागणी केली. सुप्रिया सुळे यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करून त्यासाठीचा निधी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरावा, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी मात्र पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत जाहीर केली आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी सांगितले की, पुढील आठ दिवसांत 2,215 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील. तसेच सर्व मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, अनेक आमदार-खासदार पूरग्रस्त भागात उतरले आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी परांडा तालुक्यात एक आजी आणि तिच्या दोन वर्षांच्या नातवाला पूरातून वाचवले. काँग्रेस आमदार अमित देशमुख, शिवसेना आमदार अब्दुल सत्तार, मंत्री गुलाबराव पाटील आणि भाजप आमदार सुरेश धस यांनीही पूरग्रस्त गावांना भेटी देऊन मदतकार्याचा आढावा घेतला आहे. मराठवाड्यातील पूरस्थिती अद्याप गंभीर असून शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे. पुढील काही दिवसांत राज्य सरकार आणि प्रशासन कोणती ठोस पावलं उचलतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

मराठवाडा पूरस्थिती गंभीर! आतापर्यंत 8 जणांचा बळी Read More »

शिर्डी साई संस्थानवर 6 सदस्यीय समितीचा प्रस्ताव रद्द; उच्च न्यायालयाने दिला राज्य सरकारला जबर धक्का!

अहिल्यानगर : शिर्डी साई संस्थान समिती प्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा दणका दिला आहे. सरकारकडून नेमण्यात येणाऱ्या सहा सदस्यीय समितीला न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्य सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. राज्य सरकारने संस्थानवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी सहा सदस्यीय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला होता. या समितीच्या अध्यक्षपदी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती, तर जिल्हाधिकारी सहअध्यक्ष म्हणून काम पाहणार होते. याशिवाय, स्थानिक आमदार, नगराध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी समितीत सदस्य म्हणून सहभागी होणार होते. या प्रस्तावावर आधारित संस्थानकडून उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांना शिफारस पाठविण्यात आली होती. मात्र, याविरोधात सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी याचिका दाखल केली होती. सुनावणीत न्यायालयाने समितीच्या नेमणुकीवर आक्षेप घेत स्पष्ट स्थगिती दिली. दरम्यान, सुनावणीदरम्यान शिर्डी साई संस्थाननेच माघार घेतली. शासनाच्या सूचनेनुसार प्रस्ताव पुढे नेण्यात आला होता, पण न्यायालयीन प्रक्रियेत संस्थानने प्रस्ताव मागे घेतल्याने राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. देशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिर्डी साईबाबा संस्थान सध्या त्रिसदस्यीय समितीकडे चालवले जाते. व्यवस्थापन आणि कार्यान्वयन अधिक प्रभावी करण्यासाठी सहा सदस्यीय समितीची शिफारस करण्यात आली होती. मात्र, न्यायालयीन स्थगितीनंतर आता संस्थानच्या कारभाराचे भवितव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानवर नवीन विश्वस्त मंडळ स्थापन केले जाईल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकारला न्यायालयीन झटका बसल्यानंतर पुढील पावले काय असतील याची उत्सुकता वाढली आहे.

शिर्डी साई संस्थानवर 6 सदस्यीय समितीचा प्रस्ताव रद्द; उच्च न्यायालयाने दिला राज्य सरकारला जबर धक्का! Read More »

मेट्रो मार्ग 4 व 4अ: ठाणे-मुंबईकरांसाठी वेळ आणि ऊर्जा वाचवणारा विकासमार्ग!

ठाणे – ठाणे आणि मुंबईकरांसाठी बहुप्रतीक्षित मेट्रो मार्ग 4 व 4अचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत एमएमआरडीएकडून गायमुख ते विजय गार्डन स्टेशनदरम्यान मेट्रोची तांत्रिक तपासणी व चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. 👉 प्रकल्पाची वैशिष्ट्ये : मुख्यमंत्री फडणवीस यांनी एमएमआरडीएच्या प्रयत्नांचे कौतुक करत काम अधिक वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. ठाणेकर व मुंबईकरांना या सोयीचा लवकरात लवकर लाभ मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी सांगितले की, ठाणे रिंग मेट्रोला केंद्र सरकारची मान्यता मिळाली असून हा प्रकल्प देखील भविष्यातील वाहतूक सोयीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मेट्रो मार्ग 4 व 4अ: ठाणे-मुंबईकरांसाठी वेळ आणि ऊर्जा वाचवणारा विकासमार्ग! Read More »

हाके यांचा ऑडिओ क्लिप वाद | नितीन गडकरींच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया

ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनात आघाडीवर असलेले नेते लक्ष्मण हाके पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांचा एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यात एका तरुणाशी झालेल्या संभाषणात हाके यांनी आपला ड्रायव्हरचा यूपीआय नंबर देऊन पैसे घेण्याची तयारी दाखवल्याचा आरोप आहे. या संभाषणात तरुणाने “तुम्ही समाजासाठी एवढं धावताय, पेट्रोलसाठी मदत करतो” असं सांगत एक लाख रुपयांपर्यंत UPI द्वारे पाठवण्याची तयारी दर्शवली. त्यावर हाके यांनी “मी अकाउंटवर पैसे घेत नाही, ड्रायव्हरचा नंबर देतो” असं म्हटल्याचं ऐकायला मिळतं. परंतु शेवटी त्याच तरुणाने हाके यांना सुनावत, “तुम्ही सुपाऱ्या घेऊन समाजविरोधी काम करता, लाज कशी वाटत नाही?” अशी टीका करत फोन कट केल्याचं क्लिपमध्ये आहे. या क्लिपवर प्रतिक्रिया देताना हाके म्हणाले, “हा माझा नव्हे तर मला पैसे देणाऱ्या व्यक्तीचा हेतू संशयास्पद आहे. मला मुद्दाम बदनाम करण्यासाठी अशा क्लिप्स व्हायरल केल्या जात आहेत. ओबीसींचा आवाज दाबण्यासाठी हे षडयंत्र आहे, पण माझं आंदोलन थांबणार नाही.” दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात “मी ब्राह्मण जातीचा आहे, आमच्यावर परमेश्वराने सर्वात मोठा उपकार केला तर तो म्हणजे आम्हाला आरक्षण नाही” असे वक्तव्य केले होते. यावर हाके यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, “मीही देवाला प्रार्थना करीन की पुढच्या जन्मी मला ब्राह्मण समाजात जन्म द्या, तेव्हाच त्यांना कळेल.” हाके यांनी पुढे मनोज जरांगेवरही टीका करत, “जरांगे यांनी दिल्ली नाही तर आफ्रिकेत आंदोलन करायला हवं, तिथे जास्त गरज आहे” असं म्हटलं.

हाके यांचा ऑडिओ क्लिप वाद | नितीन गडकरींच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया Read More »

नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांचा आदर्श निर्णय – स्वतःची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल!

नंदुरबार | शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक संदेश देणारा आणि पालकांना प्रेरणा देणारा आदर्श निर्णय जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी घेतला आहे. त्यांनी स्वतःच्या मुलांना जिल्हा परिषदेच्या (ZP) शाळेत दाखल करून ग्रामीण भागातील शाळांची गुणवत्ता आणि विश्वासार्हतेबाबतचा ठाम संदेश दिला आहे. सामान्यतः अधिकारी वर्ग व नागरी समाजातील अनेक पालक आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये प्रवेश देण्यास प्राधान्य देतात. मात्र, जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी स्वतःच्या वर्तनातून ‘ZP शाळा केवळ गरजूंसाठी नाहीत, तर सक्षम व दर्जेदार शिक्षण देऊ शकतात’ हे दाखवून दिले आहे. त्यांच्या या निर्णयाचे जिल्ह्यातील पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वागत होत असून, सरकारी शाळांकडे नव्या नजरेने पाहण्याची प्रेरणा मिळत आहे.

नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांचा आदर्श निर्णय – स्वतःची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल! Read More »

गणेशोत्सवासाठी एसटीचा नवा विक्रम : ५.९६ लाख कोकणवासीयांचा सुरक्षित प्रवास, २३.७७ कोटींचं उत्पन्न

यंदाच्या गणेशोत्सवात कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून तब्बल ५ लाख ९६ हजारांहून अधिक प्रवाशांनी एसटीद्वारे सुखरूप प्रवास केला. या विशेष सेवेतून एसटीला २३ कोटी ७७ लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी ५ हजार जादा एसटी बसेसची सोय करण्यात आली होती. या बसेसनी १५,३८८ फेऱ्या पूर्ण केल्या. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “गणेशोत्सवासाठी आप-आपल्या गावी पोहोचलेल्या लाखो कोकणवासीयांचा सुखरूप प्रवास शक्य करून दाखवणारे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी आणि मार्गदर्शन करणारे अधिकारी खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत.” एसटी महामंडळाने या प्रवाशांची अपघात विरहित सुरक्षित वाहतूक करून नवा इतिहास रचला आहे.

गणेशोत्सवासाठी एसटीचा नवा विक्रम : ५.९६ लाख कोकणवासीयांचा सुरक्षित प्रवास, २३.७७ कोटींचं उत्पन्न Read More »