konkandhara.com

राजकारण

WhatsApp Image 2025 09 12 at 10.34.25 AM

कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा

कोल्हापूर : कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा मिळाला आहे. याबाबत पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आले असून 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान राज्य सरकारतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. कोल्हापूरच्या शाही दसऱ्याचं वैशिष्ट्यमैसूरच्या शाही दसऱ्याप्रमाणेच कोल्हापूरचा शाही दसरा हा संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. संस्थानकाळापासून चालत आलेल्या या परंपरेत राजेशाही थाट कमी झाला असला तरी उत्साह आणि परंपरा आजही तितक्याच जोमात टिकून आहेत. जुना राजवाडा ते दसरा चौक या मार्गावर निघणारा छबिना, त्यातील लवाजमा आणि करवीरकरांची प्रचंड गर्दी हे या सोहळ्याचे खास आकर्षण आहे. पूर्वी हा सोहळा टेंबलाईवाडीच्या माळावर साजरा होत असे. नंतर तो दसरा चौकात होऊ लागला. शाहू महाराजांच्या काळात हा चौक गावाबाहेर होता. भवानी मंडपातून निघणारा लवाजमा, मार्गावरील प्रचंड गर्दी आणि दसरा चौकातील सोने लुटण्याचा सोहळा यामुळे हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरला. राजेशाही परंपरेचं आजही पालनआजही दसऱ्याच्या आधीपासूनच दसरा चौकात शाही थाटाची तयारी सुरू होते. लाल-पांढरे शामियाने, जरी पटका, दगडी कमान, पानांची सजावट आणि सोने लुटण्याची खास व्यवस्था अशा परंपरांनी हा सोहळा अधिकच भव्य बनतो. सीमोल्लंघनाचा हा सोहळा दरवर्षी कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवतो.

कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा Read More »

WhatsApp Image 2025 09 10 at 9.29.08 AM

रत्नागिरीत बांबू परिषद आणि शेतकरी मेळावा; १०,००० हेक्टरवर बांबू लागवडीचा संकल्प

रत्नागिरी | आज रत्नागिरीतील नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृहात बांबू परिषद व शेतकरी मेळावा पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते. या वेळी बोलताना उदय सामंत म्हणाले की, “बांबू ही फक्त एक पिकाची संकल्पना नसून, उत्पन्न वाढवण्याचा आणि नवे उद्योग निर्माण करण्याचा क्रांतिकारी मार्ग आहे.” 👉 येत्या १७ सप्टेंबरला राज्य सरकार महाराष्ट्राची पहिली बांबू पॉलिसी जाहीर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.👉 योग्य नियोजन व शेतकऱ्यांच्या सहभागाने बांबू लागवडीतून प्रत्येक शेतकऱ्याला दरमहा ₹३०,००० ते ₹४०,००० अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते.👉 रत्नागिरी जिल्ह्यात किमान १०,००० हेक्टरवर बांबू लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे.👉 बांबूपासून फर्निचर, ज्वेलरी, कापड, शूज, मेथेनॉल अशा विविध उद्योगांना चालना मिळू शकते.👉 विमानतळ टर्मिनल बिल्डिंगमधील ५०% फर्निचर बांबूपासून तयार करण्यात येणार आहे, हे कोकणासाठी अभिमानाचे पाऊल असल्याचेही सामंत यांनी सांगितले. “ही परिषद फक्त चर्चा नसून, शेतकऱ्यांच्या आयुष्याला नवा आर्थिक आधार देणारी चळवळ आहे. रत्नागिरी महाराष्ट्रातील सर्वात मोठा बांबू लागवड करणारा जिल्हा बनणार आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी मंडळाध्यक्ष पाशाभाई पटेल, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, अधिकारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बंधू-भगिनी उपस्थित होते.

रत्नागिरीत बांबू परिषद आणि शेतकरी मेळावा; १०,००० हेक्टरवर बांबू लागवडीचा संकल्प Read More »

WhatsApp Image 2025 09 10 at 9.20.39 AM

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून जम्मू-काश्मीर पूरग्रस्तांसाठी मदत ट्रक रवाना

मुंबई | जम्मू-काश्मीरमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्रातून मोठी पुढाकार घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून भाजपा महाराष्ट्र प्रदेशतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे सहाय्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला झेंडा दाखवून रवाना केले. पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य, कपडे आणि आवश्यक सामग्री असलेला हा मदत ट्रक जम्मू-काश्मीरकडे रवाना झाला असून, यामुळे तेथील पुनर्वसन प्रक्रियेला मोठा हातभार लागणार आहे. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून जम्मू-काश्मीर पूरग्रस्तांसाठी मदत ट्रक रवाना Read More »

WhatsApp Image 2025 09 10 at 9.17.03 AM

नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता वितरित; 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 1892 कोटी जमा

मुंबई | राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता वितरित करण्यात आला. या अंतर्गत 91 लाख 65 हजार 156 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1892.61 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी घेतलेल्या या निर्णयासोबतच मंत्रिमंडळ बैठकीत आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 🟢 शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत उपसा जलसिंचन योजनांना पुढील दोन वर्षांसाठी वीज बिलात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. वीजदर सवलत योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. 🟢 पायाभूत सुविधा विकासासाठी कर्ज नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेत हुडकोकडून दोन हजार कोटींचे कर्ज घेण्यात येणार आहे. यामधून छत्रपती संभाजीनगरला 822 कोटी, नागपूरला 268 कोटी, तर मीरा-भाईंदरला 116 कोटींचा निधी मिळणार आहे. 🟢 लघुपाटबंधारे योजनांची दुरुस्ती अकोला जिल्ह्यातील घोंगा आणि कानडी लघुपाटबंधारे योजनांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी घोंगासाठी 4 कोटी 76 लाख, तर कानडीसाठी 4 कोटी 92 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 🟢 इंटेलिजन्स ब्युरोसाठी जमीन केंद्र सरकारच्या इंटेलिजन्स ब्युरोला आसुडगाव–पनवेल येथील जमीन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.

नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता वितरित; 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 1892 कोटी जमा Read More »

WhatsApp Image 2025 09 10 at 9.14.49 AM

रायगडमध्ये आदिवासी घरकुल योजनेसाठी बैठक; तळा-म्हसळा तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना मिळणार घरांचा लाभ

रायगड | रायगड जिल्ह्यातील तळा व म्हसळा तालुक्यातील गावांना आदिवासी घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्राचे माननीय आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत तालुक्यातील सर्व पात्र आदिवासी लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. चर्चेअंती संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मंत्री अशोक उईके यांनी स्पष्ट केले की, पात्र कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असून या प्रक्रियेला गती देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार आहे.

रायगडमध्ये आदिवासी घरकुल योजनेसाठी बैठक; तळा-म्हसळा तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना मिळणार घरांचा लाभ Read More »

WhatsApp Image 2025 09 10 at 8.56.23 AM

मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात महत्त्वाची बैठक; बेटी बचाओ अभियानासह अनेक प्रलंबित विषयांवर चर्चा

मुंबई | महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कुटुंब सल्ला केंद्रांचे प्रलंबित प्रश्न, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा आढावा, चेंबूर येथील अहिल्या भवन, दि चिल्ड्रेन एड सोसायटी, तसेच राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य निवडी संदर्भात महत्त्वाची चर्चा झाली. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानावर भर बैठकीत सांगण्यात आले की या अभियानाअंतर्गत आरोग्य शिबिरे, पथनाट्य, मुलींच्या जन्माचे स्वागत अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते. हे उपक्रम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक प्रभावीपणे राबवावेत, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. कुटुंब सल्ला केंद्रांचे वन स्टॉप सेंटरमध्ये विलिनीकरण सध्या कार्यरत असलेली ४४ कुटुंब सल्ला केंद्रे ही वन स्टॉप सेंटरमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर केंद्रातील केस वर्कर आणि समुपदेशकांना वन स्टॉप सेंटरमध्येच समुपदेशक पदावर नियुक्त करण्याची सूचना देण्यात आली. संस्थांना निधी आणि पदभरतीची गरज विभागाच्या विविध योजना ७९ संस्थांमार्फत राबवल्या जात असून या संस्थांना आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पदभरती करावी, असेही मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले. चेंबूर येथील अहिल्या भवनावर तातडीची कार्यवाही बैठकीत चेंबूर येथील अहिल्या भवनाच्या उभारणीबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. अधिकारी उपस्थित या बैठकीस विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त श्रीमती नयना गुंडे, सहसचिव वि.रा. ठाकूर, सहआयुक्त राहुल मोरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात महत्त्वाची बैठक; बेटी बचाओ अभियानासह अनेक प्रलंबित विषयांवर चर्चा Read More »

WhatsApp Image 2025 09 09 at 11.38.11 AM

नेपाळ सरकारनं सोशल मीडिया बंदी उठवली; आंदोलनात 19 ठार, 100 हून अधिक जखमी

काठमांडू : नेपाळ सरकारनं घातलेली सोशल मीडिया बंदी अखेर उठवण्यात आली आहे. या बंदीविरोधात झालेल्या आंदोलनात किमान 19 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जखमी झाले आहेत. सोशल मीडियावर सुरू असलेल्या “नेपो किड” मोहिमेमुळे राजकीय नेत्यांच्या मुलांच्या ऐशआरामाच्या जीवनशैली आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला जात होता. त्यानंतर सरकारनं फेसबुक, युट्यूबसह 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. बंदीविरोधात हजारो तरुणांनी काठमांडूमध्ये संसदेवर धडक दिली. अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी वॉटर कॅनन, लाठ्या आणि रबर बुलेटचा वापर केला. काही आंदोलकांनी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या घरावर दगडफेक केली. आंदोलकांनी “भ्रष्टाचार थांबवा”, “एनोफ इज एनोफ” असे घोषवाक्य लिहिलेली फलकं दाखवली. पंतप्रधान ओली यांनी हिंसाचाराबद्दल दु:ख व्यक्त केले आणि “विविध स्वार्थी गटांनी आंदोलनात घुसखोरी केली” असा आरोप केला. मृतांच्या कुटुंबियांना मदत व जखमींना मोफत उपचार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, जोरदार टीकेनंतर गृहमंत्री रमेश लेखक यांनी सोमवारी संध्याकाळी राजीनामा दिला. सरकारनं घटनांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

नेपाळ सरकारनं सोशल मीडिया बंदी उठवली; आंदोलनात 19 ठार, 100 हून अधिक जखमी Read More »

WhatsApp Image 2025 09 09 at 11.35.38 AM

अमेरिकन खासदारांनी जाहीर केला जेफ्री एप्स्टीनचा “बर्थडे बुक”, ट्रम्प- क्लिंटनचे संदिग्ध संदेश

नवी दिल्ली : अमेरिकन खासदारांनी दिवंगत वित्ततज्ञ आणि दोषी ठरलेल्या लैंगिक गुन्हेगार जेफ्री एप्स्टीनच्या 2003 मधील “बर्थडे बुक”ची प्रत जाहीर केली आहे. या 238 पानांच्या पुस्तकात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कथित संदेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हाइट हाऊसने हा दावा फेटाळत सांगितले की तो संदेश खोटा असून ट्रम्प यांनी त्यावर स्वाक्षरी केलेली नाही. हे पुस्तक एप्स्टीनच्या 50व्या वाढदिवसानिमित्त त्याची माजी मैत्रीण आणि सह-सहकारी गिसलेन मॅक्सवेल हिने तयार केले होते. यात ट्रम्प व्यतिरिक्त माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, ब्रिटिश राजघराण्याशी संबंधित व्यक्ती, नामवंत व्यावसायिक आणि मॉडेल्सचे संदर्भ आहेत. बिल क्लिंटन यांच्या वतीने सांगण्यात आले की ते एप्स्टीनला ओळखत होते, मात्र त्याच्या गुन्ह्यांबाबत त्यांना काही माहिती नव्हती. त्याचप्रमाणे ब्रिटिश राजकारणी लॉर्ड पीटर मँडेलसन यांचाही संदेश या पुस्तकात आहे. प्रिन्स अँड्र्यूचाही उल्लेख करण्यात आला असून एका महिलेने स्वतः ट्रम्प, क्लिंटन आणि अँड्र्यू यांना एप्स्टीनमार्फत भेटल्याचा दावा केला आहे. या खुलाशांमुळे अमेरिकन राजकारणात पारदर्शकतेची मागणी अधिक तीव्र झाली आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी या प्रकरणाला “फेक” ठरवले असून संबंधित वृत्तपत्राविरोधात 10 अब्ज डॉलर्सची मानहानीची खटला दाखल केला आहे.

अमेरिकन खासदारांनी जाहीर केला जेफ्री एप्स्टीनचा “बर्थडे बुक”, ट्रम्प- क्लिंटनचे संदिग्ध संदेश Read More »

WhatsApp Image 2025 09 09 at 11.20.50 AM

संजय राऊतांचा कृपाल तुमाने यांच्यावर पलटवार : “तुमचं नशीब फुटलंय, ते आधी बघा”शिवसेना आमदारांचे पक्षप्रवेश होणार असल्याचा दावा कृपाल तुमाने; संजय राऊत म्हणाले – “शिवसेना निष्ठावंतांची आहे

मुंबई | शिवसेना शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी दावा केला होता की उद्धव ठाकरे यांचे दोन आमदार सोडले तर सर्व आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत आणि दसऱ्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश होईल. या विधानावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार पलटवार करत तुमाने यांना खोचक टोला लगावला आहे. राऊतांचा हल्लाबोल संजय राऊत म्हणाले,“हे कोण बोलतंय? ज्यांचा आम्ही लोकसभेला दारूण पराभव केला. तुम्ही या लोकांना का महत्व देता? ही त्यांची निराशा आहे. आज शिवसेनेत जे आमदार, खासदार आहेत ते शुद्ध आणि निष्ठावंत आहेत. जे पैशाला विकले, ईडी-सीबीआयच्या धमक्यांना घाबरून गेले ते गेले. आता उरलेले हे खरी शिवसेना आहे. त्यांच्यावर बोलणं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान आहे.” “तुमचं नशीब फुटलंय” राऊत पुढे म्हणाले की,“ज्यांनी हे भाष्य केले ते पूर्वी शिवसेनेचे खासदार होते. आमच्याकडून निवडून आल्यानंतर त्यांचा स्वतःच्या मतदारसंघात पराभव झाला. मग त्यांना मागच्या दाराने विधान परिषदेत आणलं. आता ते शिवसेना फुटणार असल्याचं सांगत आहेत. तुमचं नशीब फुटलंय, ते आधी बघा.” राऊत यांनी असंही म्हटलं की भविष्यात शिंदे गटाचा पक्ष भाजपमध्ये विलीन होणार आहे आणि त्याबाबत चर्चा सुरू आहे.

संजय राऊतांचा कृपाल तुमाने यांच्यावर पलटवार : “तुमचं नशीब फुटलंय, ते आधी बघा”शिवसेना आमदारांचे पक्षप्रवेश होणार असल्याचा दावा कृपाल तुमाने; संजय राऊत म्हणाले – “शिवसेना निष्ठावंतांची आहे Read More »

WhatsApp Image 2025 09 09 at 11.07.51 AM

Washington: ट्रंपच्या डिनरमध्ये हाय-प्रोफाइल अधिकाऱ्यांची धक्कादायक भांडणाची वेळUS Treasury Secretary स्कॉट बेसेंट आणि FHFA डायरेक्टर बिल पल्टे यांच्यातील वाद हातघाईपर्यंत; क्लब को-फाउंडरने परिस्थिती सावरली

वॉशिंगटन | अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या उपस्थितीत झालेल्या एका खास डिनर पार्टीत मोठा गोंधळ उडाला. ट्रेजरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट आणि फेडरल हाऊसिंग फायनान्स एजन्सी (FHFA) चे डायरेक्टर बिल पल्टे यांच्यातील जुना वाद एवढा चिघळला की, थेट हातघाईवर येण्याची वेळ आली. कसा उफाळला वाद? सीएनएनच्या माहितीनुसार, बेसेंट यांनी पल्टेवर आरोप केला की ते ट्रंपकडे त्यांच्या विरोधात वैयक्तिक तक्रारी करत आहेत. यावरून दोघांमध्ये वाद रंगला आणि बेसेंट यांनी पल्टेला शिवीगाळ केली. एवढंच नाही तर त्यांनी धमकी दिली –“किंवा तो इथून निघून जावं, नाहीतर मी बाहेर पडतो. बाहेर चल, नाहीतर तोंडावर मुक्का मारेन.” ही झटापट 3 ऑगस्ट 2025 रोजी वॉशिंगटन डीसीमधील एका खास क्लबमध्ये झाली. परिस्थिती ताणली गेली तेव्हा क्लबचे को-फाउंडर पुढे आले आणि दोन्ही अधिकाऱ्यांना शांत केलं. जुनी वैरभावना हा वाद अचानक उफाळलेला नसून त्यामागे अनेक महिन्यांपासून चालत आलेला सत्ता संघर्ष आहे. बेसेंट, पल्टे आणि कॉमर्स सेक्रेटरी हॉवर्ड लुटनिक यांच्यातील गटबाजी सर्वपरिचित आहे. लुटनिक पल्टेचे जवळचे मानले जातात. अलीकडेच ट्रंप यांनी सार्वजनिक कार्यक्रमात बेसेंट आणि लुटनिक दोघांची स्तुती केली होती, पण त्यांच्यातील अंतर (political gap) सर्वांनाच माहिती आहे. पल्टेचा कद वाढत चालला गेल्या काही आठवड्यांत पल्टेचे ट्रंप प्रशासनात वजन वाढले आहे. कारण, त्यांनी फेडरल रिझर्व्हच्या गव्हर्नर लिसा कुक यांच्यावर मॉर्गेज फ्रॉडचा आरोप केला होता. या आरोपांनंतर ट्रंप यांनी कुक यांना पदावरून हटवलं. त्यानंतर कुक यांनी प्रशासनाविरोधात न्यायालयीन लढाई सुरू केली आहे. यामुळे पल्टेचं महत्त्व ट्रंपजवळ आणखीन वाढलं, आणि याच पार्श्वभूमीवर बेसेंट–पल्टे वाद पुन्हा पेटल्याचं मानलं जात आहे. बेसेंटचे आधीचे वाद हे पहिल्यांदाच नाही. स्कॉट बेसेंट यांचा स्वभाव आक्रमक असल्याचं मानलं जातं. यापूर्वी त्यांनी व्हाईट हाऊसचे माजी सल्लागार एलन मस्क यांच्यासोबतही आयआरएस प्रमुखाच्या नियुक्तीवरून तीव्र वाद घातला होता. रविवारी ते ट्रंपसोबत US Open मध्ये दिसले, पण त्यांना ट्रंपपासून काही सीट्स दूर बसवण्यात आलं होतं.

Washington: ट्रंपच्या डिनरमध्ये हाय-प्रोफाइल अधिकाऱ्यांची धक्कादायक भांडणाची वेळUS Treasury Secretary स्कॉट बेसेंट आणि FHFA डायरेक्टर बिल पल्टे यांच्यातील वाद हातघाईपर्यंत; क्लब को-फाउंडरने परिस्थिती सावरली Read More »