konkandhara.com

  • Home
  • महाराष्ट्र
  • मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात महत्त्वाची बैठक; बेटी बचाओ अभियानासह अनेक प्रलंबित विषयांवर चर्चा
Image

मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात महत्त्वाची बैठक; बेटी बचाओ अभियानासह अनेक प्रलंबित विषयांवर चर्चा

मुंबई | महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कुटुंब सल्ला केंद्रांचे प्रलंबित प्रश्न, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा आढावा, चेंबूर येथील अहिल्या भवन, दि चिल्ड्रेन एड सोसायटी, तसेच राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य निवडी संदर्भात महत्त्वाची चर्चा झाली.

बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानावर भर

बैठकीत सांगण्यात आले की या अभियानाअंतर्गत आरोग्य शिबिरे, पथनाट्य, मुलींच्या जन्माचे स्वागत अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते. हे उपक्रम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक प्रभावीपणे राबवावेत, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

कुटुंब सल्ला केंद्रांचे वन स्टॉप सेंटरमध्ये विलिनीकरण

सध्या कार्यरत असलेली ४४ कुटुंब सल्ला केंद्रे ही वन स्टॉप सेंटरमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर केंद्रातील केस वर्कर आणि समुपदेशकांना वन स्टॉप सेंटरमध्येच समुपदेशक पदावर नियुक्त करण्याची सूचना देण्यात आली.

संस्थांना निधी आणि पदभरतीची गरज

विभागाच्या विविध योजना ७९ संस्थांमार्फत राबवल्या जात असून या संस्थांना आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पदभरती करावी, असेही मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले.

चेंबूर येथील अहिल्या भवनावर तातडीची कार्यवाही

बैठकीत चेंबूर येथील अहिल्या भवनाच्या उभारणीबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

अधिकारी उपस्थित

या बैठकीस विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त श्रीमती नयना गुंडे, सहसचिव वि.रा. ठाकूर, सहआयुक्त राहुल मोरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Releated Posts

सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; सरकारकडून सकारात्मक आश्वासनानंतर निर्णय

मुंबई : सुधारीत निवृत्ती वेतन योजनेसह विविध १८ मागण्यांसाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला…

ByByEditorial अप्रैल 26, 2026

मोदी सरकारचा महिला आरक्षणाचा बनाव उघडा; देशाचे तुकडे पाडण्याचे होते कारस्थान – खासदार संजय सिंह

नवी दिल्ली: “देशातील जनतेची दिशाभूल करणे थांबवा आणि गोदी मीडियाचा वापर करून खोट्या बातम्या पसरवणे बंद करा,” अशा…

ByByEditorial अप्रैल 19, 2026

शेकडो कार्यकर्त्यांसह उमेश खताते यांचा शिंदे गट शिवसेनेत प्रवेश, चिपळुणात ठाकरे गटाला मोठा धक्का

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : तालुक्यातील खेर्डी परिसरात तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणीच्या वेळी धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून…

ByByEditorial अप्रैल 8, 2026

रईस अलवी यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या अल्पसंख्याक विभागाची संघटनात्मक आढावा बैठक सोमवार, दि.…

ByByEditorial अप्रैल 8, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे