konkandhara.com

11 अप्रैल 2026

वेंगुर्ल्यात १२ एप्रिलला ‘विशाल सकल हिंदू संमेलन’; संस्कृती आणि एकतेचा भव्य उत्सव

वेंगुर्ल्यात दी १२ एप्रिल रोजी ‘विशाल सकल हिंदू संमेलन’ची जय्यत तयारी — संस्कृती, एकता आणि परंपरेचा भव्य उत्सव!

संजय पिळणकर | वेंगुर्ले :सनातन हिंदू धर्म, भारतीय संस्कृती आणि समाजातील ऐक्य दृढ करण्याच्या उद्देशाने वेंगुर्ले येथे रविवार दि. १२ एप्रिल रोजी “विशाल सकल हिंदू संमेलन” भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणून धर्म, संस्कृती आणि मूल्यांचे संवर्धन व संरक्षण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. सध्याच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत देश, धर्म आणि संस्कृतीसमोरील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी हिंदू समाजाने एकत्र येणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर हे संमेलन एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. 📍 स्थळ व वेळ:वेंगुर्ले येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे🕓 सायंकाळी ४ ते ७ या वेळेत कार्यक्रम पार पडणार आहे. 🎤 प्रमुख मान्यवरांची उपस्थिती:श्री. विवेक जोशी (प्रवचनकार, गोवा)डॉ. वसुंधरा मोरे (आंतरराष्ट्रीय योग गुरु)ह.भ.प. श्री. सावळाराम कुलकर्णी बुवा (प्रमुख अतिथी) संमेलनातील विशेष आकर्षणे:पारंपरिक समई नृत्य👉 जोशपूर्ण पोवाडा सादरीकरणरंगतदार शेतकरी नृत्य👉 इतिहासकालीन शस्त्रे व पुस्तकांचे भव्य प्रदर्शन या सर्वांमुळे संमेलनाला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक रंगत लाभणार आहे. सर्व नागरिकांनी कुटुंबियांसह उपस्थित राहून या भव्य सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

वेंगुर्ल्यात दी १२ एप्रिल रोजी ‘विशाल सकल हिंदू संमेलन’ची जय्यत तयारी — संस्कृती, एकता आणि परंपरेचा भव्य उत्सव! Read More »

व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी भूषण सावंत, विष्णू धावडे, शैलेश मयेकर यांची निवड

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी भूषण सावंत, विष्णू धावडे, शैलेश मयेकर यांची निवड

कार्याध्यक्ष पदी संजय पिळणकर, सचिव पदी अमित पालव तर जनसंपर्क पदी दीपक पटेकर यांची निवड दोडामार्ग / भूषण सावंत : पत्रकारांच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि सर्वांगीण कल्याणासाठी कार्यरत असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ इंटरनॅशनल फोरम (व्ही ओ एम) या आंतरराष्ट्रीय संघटनेची सिंधुदुर्ग जिल्हा तिसरी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या हक्काचे संरक्षण करण्याचा निर्धार नव्या टीमने व्यक्त केला आहे. अवघ्या पाच वर्षांत जगातील तब्बल ९८ देशांमध्ये विस्तारलेल्या या संघटनेने सिंधुदुर्गमध्ये अधिक मजबूत पाय रोवले आहेत. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ इंटरनॅशनल फोरम (व्ही ओ एम) प्रदेश कार्याध्यक्ष तसेच कोकण विभागीय अध्यक्ष कुमार कडलग यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. पत्रकारितेच्या बदलत्या आव्हानांमध्ये पत्रकारांच्या सामाजिक, आर्थिक आणि मानसिक प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून ही नवी टीम कार्य करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.नव्या कार्यकारिणीत भूषण सावंत, विष्णू धावडे, शैलेश मयेकर यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सिंधुदुर्गच्या विस्तीर्ण भौगोलिक रचनेचा विचार करून संघटनेने जिल्ह्याचे उत्तर आणि दक्षिण अशा दोन भागांत प्रभावी संघटनात्मक विभागणी केली आहे. कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या ४ तालुक्याच्या जिल्हाध्यक्ष पदी भूषण सावंत तर वैभववाडी, देवगड, कणकवली आणि मालवण या ४ तालुक्यासाठी विष्णू धावडे यांची जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली तसेच जिल्हा मुख्यालय साठी शैलेश मयेकर यांची जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.संघटनेच्या बळकटीकरणासाठी संजय पिळणकर, मिलिंद धुरी, भूषण देसाई यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच सुयोग पंडित, राजा दळवी, तुळशीदास कुडतरकर आणि जय भोसले हे उपाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. अमित पालव यांच्याकडे सरचिटणीसपद, तर संजय भाईप यांच्याकडे सह सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.आर्थिक नियोजन आणि संघटनात्मक स्थैर्यासाठी आनंद कांडरकर यांची खजिनदार म्हणून नियुक्ती झाली आहे. संघटनेच्या विस्तारासाठी वासुदेव (नयनेश) गावडे, शंकर जाधव, चिन्मय घोगळे आणि विवेक परब यांची संघटक म्हणून निवड करण्यात आली आहे. विजय सावंत, नागेश दुखंडे आणि मकरंद मेस्त्री हे कार्यवाह म्हणून काम पाहणार असून दिपक पटेकर यांच्याकडे जनसंपर्क व प्रसिद्धी प्रमुखपदाची धुरा देण्यात आली आहे.याशिवाय सदस्य म्हणून गणेश कोळेकर, रणजीत जाधव आणि समीर चव्हाण यांचा समावेश करण्यात आला आहे. महिला विंगमध्ये सहयोगी सदस्य म्हणून रुपाली खपाले, प्रिया मिश्रा,रेवती वालावलकर, सानिका वायंगणकर आणि सौ.जान्हवी सावंत यांना स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे संघटनेत महिला पत्रकार आणि सहयोगी सदस्यांचाही सक्रिय सहभाग वाढणार असल्याचे चित्र आहे.‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ही केवळ पदांची संघटना नसून पत्रकारांचे जागतिक कुटुंब आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. पत्रकारितेच्या क्षेत्रातील आर्थिक असुरक्षितता, सामाजिक दबाव, मानसिक ताण आणि व्यावसायिक संरक्षण या प्रमुख मुद्द्यांवर संघटना ‘पंचसूत्री’च्या माध्यमातून काम करत आहे. पत्रकार बांधवांना न्याय, संरक्षण, प्रशिक्षण, नेटवर्किंग आणि सन्मान मिळवून देणे हा संघटनेचा प्रमुख उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना, मान-सन्मानाच्या पलीकडे जाऊन पत्रकार बांधवांच्या चौफेर विकासासाठी काम करा,राज्यात चांदा ते बांदा असा विस्तार असलेल्या या संघटनेच्या प्रत्येक पत्रकारापर्यंत संघटनेचा आधार पोहोचवा, असे आवाहन करण्यात आले. या नव्या कार्यकारिणी मुळे सिंधुदुर्गातील पत्रकारांना एक मजबूत व्यासपीठ मिळाले आहे. जिल्ह्यात पत्रकारांच्या प्रश्नांवर अधिक प्रभावी आवाज निर्माण झाला आहे. सध्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ इंटरनॅशनल फोरम (व्ही ओ एम) च्या पदाधिकारी पत्रकारांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी दत्तक घेणे, मोफत प्रवेश देणे सुरु आहे. जुन्या सर्व पदाधिकारी यांना विभाग आणि राज्य टीममध्ये घेतले जाणार आहे असे कडलग यांनी सांगितले.

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी भूषण सावंत, विष्णू धावडे, शैलेश मयेकर यांची निवड Read More »

State-level cricket tournament opening ceremony in India, cricket ground with stage setup, crowd of spectators, banners and decorations, chief guest former cricketer giving speech, players in cricket uniforms standing in line, evening lighting, stadium atmosphere, Maharashtra small city setting, festive sports event

राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्या चिपळुणात उद्घाटन; सुनील मोरे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

चिपळूण : चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेला रविवार, दि. १२ एप्रिलपासून चिपळूण येथे सुरुवात होत आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास मुंबईचे माजी रणजीपटू व निवड समिती सदस्य सुनील मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर यांनी दिली. शहरातील पवन तलाव मैदानावर ही स्पर्धा होणार आहे. उद्घाटन समारंभाला आमदार शेखर निकम, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, सभापती सूर्यकांत खेतले, उपसभापती संदेश आयरे यांच्यासह सर्व नगरसेवक विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. क्रिकेट क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, तंत्रशुद्ध फलंदाजी आणि मुंबई क्रिकेटमधील भक्कम कारकीर्द यामुळे सुनील मोरे हे नाव क्रिकेटप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेला अधिक प्रतिष्ठा प्राप्त होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. सुनील मोरे यांनी १९९२ ते १९९६ या कालावधीत मुंबई संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली. त्या काळात सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, संजय मांजरेकर आणि अमोल मुझुमदार यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीत त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. त्यांनी २५ प्रथम श्रेणी सामन्यांत ४४ च्या सरासरीने १५०३ धावा केल्या असून, संघाला अनेकदा भक्कम सुरुवात करून दिली. मुंबईतील स्थानिक क्रिकेटमध्येही त्यांनी नॅशनल क्रिकेट क्लब आणि दादर युनियन स्पोर्टिंग क्लबकडून टाइम्स शिल्ड व कांगा लीगसारख्या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच त्यांनी इंग्लंडमधील सॉमरसेट संघाकडून काउंटी क्रिकेटचा अनुभवही घेतला आहे. विशेष म्हणजे, १९९० च्या दशकात चिपळूण येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतही त्यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे अनेक वर्षांनंतर त्यांचे पुन्हा चिपळूणमध्ये आगमन होत असल्याने स्थानिक क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या तरुण खेळाडूंना सुनील मोरे यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूला प्रत्यक्ष पाहण्याची व त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेचा दर्जा उंचावण्यास निश्चितच मदत होणार आहे.

राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्या चिपळुणात उद्घाटन; सुनील मोरे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती Read More »

सावर्डे विद्यालय कोल्हापूर विभागात प्रथम; ‘सुंदर शाळा’ अभियानात अव्वल कामगिरी

सावर्डे विद्यालय कोल्हापूर विभागात प्रथम; सह्याद्रीच्या शिरपेचात मानाचा तुरा

सावर्डे : महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान (टप्पा-3) अंतर्गत खाजगी शाळा विभागाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, सह्याद्री शिक्षण संस्थेच्या गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सलग तिसऱ्या वर्षी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाने रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत विभागस्तरावरही अव्वल स्थान मिळवले आहे. रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील प्रथम क्रमांकाच्या शाळांमधून सावर्डे विद्यालयाने बाजी मारत सह्याद्री शिक्षण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. 3 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत राज्यभर हे अभियान राबविण्यात आले. विद्यालयाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शालेय व सहशालेय उपक्रमांचे प्रभावी सादरीकरण केले. पायाभूत सुविधा, शासन धोरणांची अंमलबजावणी आणि शैक्षणिक गुणवत्ता या निकषांवर पीपीटी, पीडीएफ व प्रत्यक्ष पाहणीद्वारे मूल्यांकन करण्यात आले. या यशात पंचायत समिती चिपळूणचे गटशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरीचे शिक्षणाधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी व शिक्षणप्रेमी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.विद्यालयाने पहिल्या वर्षी विभागात द्वितीय क्रमांक मिळवत 15 लाखांचे पारितोषिक पटकावले होते. दुसऱ्या वर्षी जिल्ह्यात प्रथम आणि तिसऱ्या वर्षी विभागात प्रथम येत 21 लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले आहे. या यशाबद्दल प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार शेखर निकम, उपाध्यक्षा युगंधराताई राजेशिर्के, उपाध्यक्ष प्रशांत निकम, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, सचिव महेश महाडिक, तसेच सर्व पदाधिकारी, पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.सुव्यवस्थित पायाभूत सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण व नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या जोरावर सावर्डे विद्यालयाने ‘आदर्श शाळा’ म्हणून प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.

सावर्डे विद्यालय कोल्हापूर विभागात प्रथम; सह्याद्रीच्या शिरपेचात मानाचा तुरा Read More »

konkandhara 9

घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत

रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी : शासनाच्या वाळू/रेती निर्गती धोरण २०२५ अंतर्गत घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, पात्र लाभार्थ्यांना स्थानिक वापरासाठी कमाल 5 ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी दिली. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण टप्पा 1 व 2), पी.एम. जनमन आवास, रमाई आवास, शबरी आवास, पारधी आवास, अटल बांधकाम कामगार आवास, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत तसेच मोदी आवास योजना या योजनांतील लाभार्थ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. महसूल व वन विभागाच्या 30 एप्रिल 2025 च्या शासन निर्णयानुसार, लिलावात न गेलेल्या वाळू गटांमधून तसेच अवैध उत्खनन प्रकरणांमध्ये जप्त केलेली वाळू रॉयल्टी न आकारता उपलब्ध करून दिली जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी गट विकास अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाल्यानंतर तहसिलदारांकडून ऑनलाईन वाळू पासेस जारी करण्यात येणार असून, लाभार्थ्यांना स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही.हे पास ग्राम महसूल अधिकारी व ग्रामसेवक/ग्राम विकास अधिकारी यांच्या मार्फत 15 दिवसांच्या आत लाभार्थ्यांना घरपोच देण्यात येतील. पास मिळाल्यानंतर एका महिन्याच्या आत वाळू उचलणे बंधनकारक असून, अन्यथा पास रद्द होईल. तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास ऑफलाईन पासेस देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे घरकुल बांधकामाचा खर्च कमी होऊन ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत Read More »