konkandhara.com

रत्नागिरीत भाजप कार्यकर्ता संमेलन उत्साहात; SIR मार्गदर्शनावर भर

रत्नागिरीत भाजप कार्यकर्ता संमेलन उत्साहात संपन्न

रत्नागिरी: रत्नागिरी तालुका दक्षिण येथे भारतीय जनता पार्टीतर्फे SIR मार्गदर्शन व सक्रिय कार्यकर्ता संमेलन जिल्हा कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुका अध्यक्ष दादा दळी यांनी भूषवले.

निवडणूक आयोगाकडून सध्या सुरू असलेल्या मतदार यादी पुनर्लोकनाच्या पार्श्वभूमीवर, भाजपच्या BLO 2 कार्यकर्त्यांनी आपल्या बूथवर कोणत्या पद्धतीने प्रभावी काम करावे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन दादा दळी यांनी केले. तसेच 6 एप्रिल रोजी साजऱ्या झालेल्या भाजप स्थापना दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचा आढावा घेत, संघटन विस्तार आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना दिशा दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष राजेश पाथरे यांनी केले, तर प्रास्ताविक अवधूत कळंबटे यांनी मांडले. यावेळी माजी महिला आघाडी अध्यक्षा ऐश्वर्या जठार यांनीही मार्गदर्शन केले.

या संमेलनाला सुशांत पाटकर, महेश खानविलकर, अनघा साळवी, भाई जठार, चिराग खटकुळ, संतोष बोरकर यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे