konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी भूषण सावंत, विष्णू धावडे, शैलेश मयेकर यांची निवड
व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी भूषण सावंत, विष्णू धावडे, शैलेश मयेकर यांची निवड

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी भूषण सावंत, विष्णू धावडे, शैलेश मयेकर यांची निवड

कार्याध्यक्ष पदी संजय पिळणकर, सचिव पदी अमित पालव तर जनसंपर्क पदी दीपक पटेकर यांची निवड

दोडामार्ग / भूषण सावंत : पत्रकारांच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि सर्वांगीण कल्याणासाठी कार्यरत असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ इंटरनॅशनल फोरम (व्ही ओ एम) या आंतरराष्ट्रीय संघटनेची सिंधुदुर्ग जिल्हा तिसरी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या हक्काचे संरक्षण करण्याचा निर्धार नव्या टीमने व्यक्त केला आहे.

अवघ्या पाच वर्षांत जगातील तब्बल ९८ देशांमध्ये विस्तारलेल्या या संघटनेने सिंधुदुर्गमध्ये अधिक मजबूत पाय रोवले आहेत. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ इंटरनॅशनल फोरम (व्ही ओ एम) प्रदेश कार्याध्यक्ष तसेच कोकण विभागीय अध्यक्ष कुमार कडलग यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. पत्रकारितेच्या बदलत्या आव्हानांमध्ये पत्रकारांच्या सामाजिक, आर्थिक आणि मानसिक प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून ही नवी टीम कार्य करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
नव्या कार्यकारिणीत भूषण सावंत, विष्णू धावडे, शैलेश मयेकर यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सिंधुदुर्गच्या विस्तीर्ण भौगोलिक रचनेचा विचार करून संघटनेने जिल्ह्याचे उत्तर आणि दक्षिण अशा दोन भागांत प्रभावी संघटनात्मक विभागणी केली आहे. कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या ४ तालुक्याच्या जिल्हाध्यक्ष पदी भूषण सावंत तर वैभववाडी, देवगड, कणकवली आणि मालवण या ४ तालुक्यासाठी विष्णू धावडे यांची जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली तसेच जिल्हा मुख्यालय साठी शैलेश मयेकर यांची जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनेच्या बळकटीकरणासाठी संजय पिळणकर, मिलिंद धुरी, भूषण देसाई यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच सुयोग पंडित, राजा दळवी, तुळशीदास कुडतरकर आणि जय भोसले हे उपाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. अमित पालव यांच्याकडे सरचिटणीसपद, तर संजय भाईप यांच्याकडे सह सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आर्थिक नियोजन आणि संघटनात्मक स्थैर्यासाठी आनंद कांडरकर यांची खजिनदार म्हणून नियुक्ती झाली आहे. संघटनेच्या विस्तारासाठी वासुदेव (नयनेश) गावडे, शंकर जाधव, चिन्मय घोगळे आणि विवेक परब यांची संघटक म्हणून निवड करण्यात आली आहे. विजय सावंत, नागेश दुखंडे आणि मकरंद मेस्त्री हे कार्यवाह म्हणून काम पाहणार असून दिपक पटेकर यांच्याकडे जनसंपर्क व प्रसिद्धी प्रमुखपदाची धुरा देण्यात आली आहे.
याशिवाय सदस्य म्हणून गणेश कोळेकर, रणजीत जाधव आणि समीर चव्हाण यांचा समावेश करण्यात आला आहे. महिला विंगमध्ये सहयोगी सदस्य म्हणून रुपाली खपाले, प्रिया मिश्रा,रेवती वालावलकर, सानिका वायंगणकर आणि सौ.जान्हवी सावंत यांना स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे संघटनेत महिला पत्रकार आणि सहयोगी सदस्यांचाही सक्रिय सहभाग वाढणार असल्याचे चित्र आहे.
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ही केवळ पदांची संघटना नसून पत्रकारांचे जागतिक कुटुंब आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. पत्रकारितेच्या क्षेत्रातील आर्थिक असुरक्षितता, सामाजिक दबाव, मानसिक ताण आणि व्यावसायिक संरक्षण या प्रमुख मुद्द्यांवर संघटना ‘पंचसूत्री’च्या माध्यमातून काम करत आहे. पत्रकार बांधवांना न्याय, संरक्षण, प्रशिक्षण, नेटवर्किंग आणि सन्मान मिळवून देणे हा संघटनेचा प्रमुख उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना, मान-सन्मानाच्या पलीकडे जाऊन पत्रकार बांधवांच्या चौफेर विकासासाठी काम करा,राज्यात चांदा ते बांदा असा विस्तार असलेल्या या संघटनेच्या प्रत्येक पत्रकारापर्यंत संघटनेचा आधार पोहोचवा, असे आवाहन करण्यात आले. या नव्या कार्यकारिणी मुळे सिंधुदुर्गातील पत्रकारांना एक मजबूत व्यासपीठ मिळाले आहे. जिल्ह्यात पत्रकारांच्या प्रश्नांवर अधिक प्रभावी आवाज निर्माण झाला आहे. सध्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ इंटरनॅशनल फोरम (व्ही ओ एम) च्या पदाधिकारी पत्रकारांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी दत्तक घेणे, मोफत प्रवेश देणे सुरु आहे. जुन्या सर्व पदाधिकारी यांना विभाग आणि राज्य टीममध्ये घेतले जाणार आहे असे कडलग यांनी सांगितले.

Releated Posts

वेंगुर्ल्यात दी १२ एप्रिल रोजी ‘विशाल सकल हिंदू संमेलन’ची जय्यत तयारी — संस्कृती, एकता आणि परंपरेचा भव्य उत्सव!

संजय पिळणकर | वेंगुर्ले :सनातन हिंदू धर्म, भारतीय संस्कृती आणि समाजातील ऐक्य दृढ करण्याच्या उद्देशाने वेंगुर्ले येथे रविवार…

ByByEditorial अप्रैल 11, 2026

सावर्डे विद्यालय कोल्हापूर विभागात प्रथम; सह्याद्रीच्या शिरपेचात मानाचा तुरा

सावर्डे : महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान (टप्पा-3) अंतर्गत खाजगी शाळा विभागाचा निकाल नुकताच जाहीर…

ByByEditorial अप्रैल 11, 2026

घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत

रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी : शासनाच्या वाळू/रेती निर्गती धोरण २०२५ अंतर्गत घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला…

ByByEditorial अप्रैल 11, 2026

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त श्रीदेव भैरीला ७५ नारळ, ७५ केळी ७५ विड्यांची आरास

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायणराव राणे १० एप्रिल…

ByByEditorial अप्रैल 9, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

वेंगुर्ल्यात १२ एप्रिलला ‘विशाल सकल हिंदू संमेलन’; संस्कृती आणि एकतेचा भव्य उत्सव
State-level cricket tournament opening ceremony in India, cricket ground with stage setup, crowd of spectators, banners and decorations, chief guest former cricketer giving speech, players in cricket uniforms standing in line, evening lighting, stadium atmosphere, Maharashtra small city setting, festive sports event
सावर्डे विद्यालय कोल्हापूर विभागात प्रथम; ‘सुंदर शाळा’ अभियानात अव्वल कामगिरी
घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत
रत्नागिरीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोन्याची चेन लंपास; दुचाकीवरून चोरट्यांचा पळ
आंबा घाटात चालकाची लूट; देवरूख पोलिसांनी ५ आरोपींना अटक
रत्नागिरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दोन घरांतून ३८ हजारांची रोकड लंपास
रत्नागिरीत क्रेडिट कार्ड इन्शुरन्सच्या नावाखाली ८८ हजारांची फसवणूक
रत्नागिरीत महिला विक्रेत्याची ४० हजारांची रोकड लंपास; पोलिस तपास सुरू