संजय पिळणकर | वेंगुर्ले :
सनातन हिंदू धर्म, भारतीय संस्कृती आणि समाजातील ऐक्य दृढ करण्याच्या उद्देशाने वेंगुर्ले येथे रविवार दि. १२ एप्रिल रोजी “विशाल सकल हिंदू संमेलन” भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणून धर्म, संस्कृती आणि मूल्यांचे संवर्धन व संरक्षण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
सध्याच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत देश, धर्म आणि संस्कृतीसमोरील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी हिंदू समाजाने एकत्र येणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर हे संमेलन एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
📍 स्थळ व वेळ:
वेंगुर्ले येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे
🕓 सायंकाळी ४ ते ७ या वेळेत कार्यक्रम पार पडणार आहे.
🎤 प्रमुख मान्यवरांची उपस्थिती:
श्री. विवेक जोशी (प्रवचनकार, गोवा)
डॉ. वसुंधरा मोरे (आंतरराष्ट्रीय योग गुरु)
ह.भ.प. श्री. सावळाराम कुलकर्णी बुवा (प्रमुख अतिथी)
संमेलनातील विशेष आकर्षणे:
पारंपरिक समई नृत्य
👉 जोशपूर्ण पोवाडा सादरीकरण
रंगतदार शेतकरी नृत्य
👉 इतिहासकालीन शस्त्रे व पुस्तकांचे भव्य प्रदर्शन
या सर्वांमुळे संमेलनाला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक रंगत लाभणार आहे.
सर्व नागरिकांनी कुटुंबियांसह उपस्थित राहून या भव्य सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
















