konkandhara.com

  • Home
  • क्राईम
  • कुलूप न तोडता कपाटातील चावीनेच दागिने लंपास; संगमेश्वरात चोरीचा प्रकार
कुलूप न तोडता कपाटातील चावीनेच दागिने लंपास; संगमेश्वरात चोरीचा प्रकार

कुलूप न तोडता कपाटातील चावीनेच दागिने लंपास; संगमेश्वरात चोरीचा प्रकार

प्रतिनिधी : कोंकणधारा

संगमेश्वर : तालुक्यातील निवे बुद्रुक-शिंदेवाडी येथे घराचे किंवा कपाटाचे कोणतेही कुलूप न तोडता कपाटातच ठेवलेल्या चावीचा वापर करून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

ही घटना २४ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२६ या कालावधीत घडली असून ५ मार्च रोजी ती उघड झाली. याबाबत सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर २७ मार्च रोजी देवरूख पोलिस स्थानकात फिर्याद नोंदवण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष दौलत पाल्ये (वय ५६) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांचे निवे बुद्रुक येथे सामायिक घर असून, घटनेच्या वेळी कपाटाच्या लॉकरची चावी घरातच ठेवलेली होती. चोरट्याने याचाच फायदा घेत कपाट उघडून दोन तोळे सोन्याचा हार आणि दोन तोळे सोन्याची चेन, असे एकूण चार तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले.

घरामध्ये कोणत्याही प्रकारची तोडफोड किंवा जबरदस्तीच्या खुणा आढळून न आल्यामुळे, घरातील व्यवस्था आणि चाव्यांची माहिती असलेल्या एखाद्या जवळच्या किंवा परिचित व्यक्तीनेच ही चोरी केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, पोलिसांनी या घटनेची दखल घेत परिसरातील संशयितांची चौकशी सुरू केली असून पुढील तपास देवरूख पोलिसांकडून सुरू आहे.

Releated Posts

चोरीची इको कार अवघ्या २४ तासांत शोधली; दापोली व शिरगाव पोलिसांची तत्पर कारवाई

प्रतिनिधी : कोकणधारा दापोली : येथील व्यापारी अनिल मोरे यांची चोरीला गेलेली चारचाकी इको कार शोधून काढण्यात दापोली…

ByByEditorial अप्रैल 3, 2026

पाचलमध्ये गॅस सिलिंडर काळाबाजार प्रकरण उघड; १०९४ गॅस कार्ड्स जप्त

प्रतिनिधी : कोकणधारा पाचल (वार्ताहर) : राजापूर तालुक्यातील पाचल परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार…

ByByEditorial अप्रैल 1, 2026

सामाईक वाड्याच्या वादातून मायलेकावर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी : कोकणधारा खेड : खेड तालुक्यातील हेदली बाजारवाडी येथे सामाईक वाड्यातील वादातून मायलेकासह सुनेवर लोखंडी पाईपने हल्ला…

ByByEditorial अप्रैल 1, 2026

रत्नागिरीत ज्वेलर्स दुकान फोडून चोरी; चोरट्यांचा शोध सुरू

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी :- शहरातील मारुती मंदिर परिसरातील सुमित्रा ज्वेलर्स येथे अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून चोरी केल्याची…

ByByEditorial मार्च 31, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

chiplun-water-pipeline-burst-repair-nihar-kovale-action
nivli-jaigad-road-trailer-accident-driver-case-filed
निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल
परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी
लक्ष्मी ऑरगॅनिक आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; राज ठाकरे यांची साथ
RAIDS App चा कमाल; नागपूरमध्ये २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख
पीपास रसायनावरून लोटे MIDCत तणाव; ६ एप्रिलला लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात मोर्चा
पुष्कर कंपनीत गरम मातीने भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; चौघांवर गुन्हा दाखल
साखरपा येथे आराम बसला भीषण आग; ३० प्रवासी सुखरूप बचावले