konkandhara.com

  • Home
  • क्राईम
  • जुन्या वादातून तरुणाला रॉडने बेदम मारहाण; रत्नागिरीतील राजीवडा येथे घटना
रत्नागिरीत तरुणाला रॉडने मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

जुन्या वादातून तरुणाला रॉडने बेदम मारहाण; रत्नागिरीतील राजीवडा येथे घटना

प्रतिनिधी : कोंकणधारा

रत्नागिरी : जुन्या वादातून तसेच एका तरुणीशी बोलतोय या संशयातून २९ वर्षीय तरुणाला चौघांनी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना शहरातील राजीवडा येथील पुलाखाली गुरुवारी रात्री घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अरमान नझीर होडेकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रमजान नवाज मिरकर, साजिद बावा मिरकर, अझरुद्दीन अलीमिया मुजावर आणि महम्मद बावा मिरकर (सर्व रा. राजीवडा पुलाखाली, रत्नागिरी) या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरमान होडेकर आणि आरोपी हे सर्व एकाच परिसरातील रहिवासी असून परस्पर परिचित आहेत. जैतापूर (ता. राजापूर) येथील एका सामायिक मैत्रिणीने रमजान मिरकर याचे काही सामान अरमान यांच्याकडे दिले होते. ते सामान पोहोचवण्यासाठी जात असताना, फिर्यादी त्या तरुणीला का भेटतो आणि तिच्याशी का बोलतो, असा संशय रमजान मिरकर याने घेतला.

याच कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. पुढे या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या वेळी रमजान मिरकर याला इतर तिघांनी साथ देत चौघांनी मिळून अरमान याला रॉडने मारहाण केली.

Releated Posts

रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल

रत्‍नागिरी ः प्रतिनिधीपूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची…

ByByEditorial मई 13, 2026

जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांत हाणामारी; सात जणांवर गुन्हा

चिपळूण : तालुक्यातील वेहळे खान मोहल्ला परिसरात जुन्या जमिनीच्या वादातून दोन शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादाने उग्र रूप धारण करत…

ByByEditorial अप्रैल 30, 2026

रत्नागिरी पोलिसांची कारवाई: शिळ मिरजोळे येथे गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त, एक जण अटकेत

रत्नागिरी, दि. ३० एप्रिल २०२६: रत्नागिरी शहर पोलिसांनी शिळ मिरजोळे परिसरात सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड टाकून…

ByByEditorial अप्रैल 30, 2026

आडिवरे येथे महिलेवरील अत्याचारप्रकरणी शिक्षक अटकेत

राजापूर : तालुक्यातील आडिवरे येथे एका महिलेवरील अत्याचारप्रकरणी स्थानिक हायस्कूलमधील शिक्षकाला नाटे (सागरी) पोलिसांनी अटक केली आहे. या…

ByByEditorial अप्रैल 26, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे