konkandhara.com

  • Home
  • क्राईम
  • मंडणगडमध्ये पंप चोरीच्या दोन घटना; चौघांविरोधात गुन्हा दाखल
मंडणगडमध्ये पंप चोरीच्या दोन घटना; चौघांविरोधात गुन्हा दाखल

मंडणगडमध्ये पंप चोरीच्या दोन घटना; चौघांविरोधात गुन्हा दाखल

प्रतिनिधी : कोंकणधारा

मंडणगड : तालुक्यातील शिरगाव येथे पाण्याचे इलेक्ट्रिक पंप चोरीच्या दोन घटना उघडकीस आल्या असून या प्रकरणी चार संशयितांविरोधात मंडणगड पोलीस स्थानकात २६ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिकंदर कनोजिया (३०), मोहित कनोजिया (२१) दोघेही रा. महाड, तसेच आकाश पवार (२५) व अविनाश जाधव (२१) दोघेही रा. आकले या चौघांचा यात समावेश आहे.

पहिली घटना २५ मार्च रोजी शिरगाव गोमुख येथे घडली. याबाबत सुनील पाटील (४६, व्यवसाय पंपचालक, रा. शिरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी पंपहाऊसच्या दरवाजाच्या खालच्या बाजूच्या फळ्या उचकटून आत प्रवेश केला आणि सुमारे दहा हजार रुपये किंमतीचा पाच एच.पी. क्षमतेचा बंद स्थितीतील पाण्याचा इलेक्ट्रिक पंप चोरून नेला.

दुसरी घटना याच दिवशी शिरगाव धर्मा येथे घडली. याबाबत आत्माराम जोंधळे (६२, व्यवसाय शेती, रा. तेरडी सुतारवाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. आरोपींनी पंपहाऊसचा सिमेंटचा दरवाजा उचकटून आत प्रवेश करत सुमारे वीस हजार रुपये किंमतीचा बारा एच.पी. क्षमतेचा दुरुस्तीसाठी ठेवलेला जुना पाण्याचा इलेक्ट्रिक पंप चोरून नेला.

दोन्ही प्रकरणांमध्ये एकाच आरोपींचा सहभाग असल्याचा संशय असून त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मंडणगड पोलीस करीत आहेत.

Releated Posts

चोरीची इको कार अवघ्या २४ तासांत शोधली; दापोली व शिरगाव पोलिसांची तत्पर कारवाई

प्रतिनिधी : कोकणधारा दापोली : येथील व्यापारी अनिल मोरे यांची चोरीला गेलेली चारचाकी इको कार शोधून काढण्यात दापोली…

ByByEditorial अप्रैल 3, 2026

पाचलमध्ये गॅस सिलिंडर काळाबाजार प्रकरण उघड; १०९४ गॅस कार्ड्स जप्त

प्रतिनिधी : कोकणधारा पाचल (वार्ताहर) : राजापूर तालुक्यातील पाचल परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार…

ByByEditorial अप्रैल 1, 2026

सामाईक वाड्याच्या वादातून मायलेकावर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी : कोकणधारा खेड : खेड तालुक्यातील हेदली बाजारवाडी येथे सामाईक वाड्यातील वादातून मायलेकासह सुनेवर लोखंडी पाईपने हल्ला…

ByByEditorial अप्रैल 1, 2026

रत्नागिरीत ज्वेलर्स दुकान फोडून चोरी; चोरट्यांचा शोध सुरू

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी :- शहरातील मारुती मंदिर परिसरातील सुमित्रा ज्वेलर्स येथे अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून चोरी केल्याची…

ByByEditorial मार्च 31, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवळी-जयगड मार्गावर १८ चाकी ट्रेलरचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल
परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी
लक्ष्मी ऑरगॅनिक आंदोलनाला मनसेचा पाठिंबा; राज ठाकरे यांची साथ
RAIDS App चा कमाल; नागपूरमध्ये २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख
पीपास रसायनावरून लोटे MIDCत तणाव; ६ एप्रिलला लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात मोर्चा
पुष्कर कंपनीत गरम मातीने भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; चौघांवर गुन्हा दाखल
साखरपा येथे आराम बसला भीषण आग; ३० प्रवासी सुखरूप बचावले
सुभाषराव चव्हाण यांना ‘आदर्श जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर
रत्नागिरी नगर परिषदेची कारवाई; ११० मालमत्ता सील, ७० नळजोडण्या खंडित