konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • आदर्श जीवनगौरव पुरस्काराने सुभाषराव चव्हाण यांचा सन्मान
सुभाषराव चव्हाण यांना ‘आदर्श जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर

आदर्श जीवनगौरव पुरस्काराने सुभाषराव चव्हाण यांचा सन्मान

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूण : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा संस्थेला गेली अनेक वर्षे प्रगतीपथावर नेणारे ज्येष्ठ सहकार नेते आदरणीय श्री. सुभाषराव चव्हाण यांना ‘नवभारत–नवराष्ट्र समूहातर्फे आदर्श जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या सहकार, सामाजिक आणि संस्थात्मक कार्याचा गौरव म्हणून हा सन्मान प्रदान करण्यात येत असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सुभाषराव चव्हाण यांनी जिल्हा बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत असताना आपल्या कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि लोकाभिमुख कामकाजाची छाप उमटवली.

सेवेत असतानाच त्यांनी सहकार क्षेत्रातील दूरदृष्टी आणि लोकहिताचा विचार डोळ्यासमोर ठेवून चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली. पुढे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी या पतसंस्थेला केवळ चिपळूणपुरते मर्यादित न ठेवता कोकणासह महाराष्ट्रातील विविध भागांत नावारूपाला आणले.

पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी आर्थिक व्यवहारांच्या पलीकडे जाऊन अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या, तसेच अनेक युवक-युवतींना स्वावलंबी होण्यासाठी दिशा आणि बळ दिले. संकटाच्या काळात लोकांच्या मदतीला धावून जाणारे, गरजूंना आधार देणारे आणि सामाजिक जाणीव जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

महापूर आणि कोरोना काळात सुभाषराव चव्हाण यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून समाजाप्रती आपली बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला. विविध सामाजिक उपक्रम, जनहिताचे निर्णय आणि लोककेंद्री कामामुळे त्यांनी सहकार क्षेत्रात एक वेगळी छाप निर्माण केली आहे.

पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी उभारलेले कार्य, सहकार क्षेत्रातील योगदान, सामाजिक बांधिलकी आणि अनेकांना दिलेला आधार याचा सर्वांगीण विचार करून त्यांना ‘आदर्श जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे