konkandhara.com

  • Home
  • क्राईम
  • चोरीची इको कार अवघ्या २४ तासांत शोधली; दापोली व शिरगाव पोलिसांची तत्पर कारवाई
चोरीची इको कार २४ तासांत शोधली; दापोली-शिरगाव पोलिसांची तत्पर कारवाई

चोरीची इको कार अवघ्या २४ तासांत शोधली; दापोली व शिरगाव पोलिसांची तत्पर कारवाई

प्रतिनिधी : कोकणधारा

दापोली : येथील व्यापारी अनिल मोरे यांची चोरीला गेलेली चारचाकी इको कार शोधून काढण्यात दापोली आणि शिरगाव पोलिसांना अवघ्या २४ तासांत यश आले आहे. या कारवाईमुळे पोलिसांच्या तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २९ मार्च रोजी दोन अज्ञात इसमांनी अनिल मोरे यांची इको कार चोरून नेली होती. या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत शोधमोहीम सुरू केली होती.
दरम्यान, गुहागर-विजापूर मार्गावरील पोफळी तांबे कॅन्टीन परिसरात एक चारचाकी गाडी संशयास्पद अवस्थेत उभी असल्याचे अलोरे-शिरगाव पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती दापोली पोलिसांना दिली.

घटनेची खातरजमा करण्यासाठी दापोली पोलिसांनी फिर्यादी अनिल मोरे यांना सोबत घेऊन शिरगाव पोलिस ठाणे गाठले. तेथे उभी असलेली गाडी आपलीच असल्याची खात्री मोरे यांनी दिल्यानंतर पोलिसांनी रीतसर पंचनामा करून सदर वाहन त्यांच्या ताब्यात सुपूर्द केले.

प्राथमिक माहितीनुसार, गुहागर-विजापूर मार्गावरील एका वळणावर ही गाडी सोडून चोरटे पसार झाले होते. चोरीची घटना घडल्यानंतर केवळ एका दिवसात तपासाची दिशा निश्चित करून वाहन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

आपली गाडी सुखरूप परत मिळाल्याने व्यापारी अनिल मोरे यांनी दापोली पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत. दरम्यान, वाहन हस्तगत करण्यात यश आले असले तरी ही चोरी करणारे दोन अज्ञात इसम कोण होते आणि त्यांच्या मागचा नेमका उद्देश काय होता, याचा सखोल तपास दापोली पोलिसांकडून सुरू आहे.

Releated Posts

पाचलमध्ये गॅस सिलिंडर काळाबाजार प्रकरण उघड; १०९४ गॅस कार्ड्स जप्त

प्रतिनिधी : कोकणधारा पाचल (वार्ताहर) : राजापूर तालुक्यातील पाचल परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार…

ByByEditorial अप्रैल 1, 2026

सामाईक वाड्याच्या वादातून मायलेकावर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी : कोकणधारा खेड : खेड तालुक्यातील हेदली बाजारवाडी येथे सामाईक वाड्यातील वादातून मायलेकासह सुनेवर लोखंडी पाईपने हल्ला…

ByByEditorial अप्रैल 1, 2026

रत्नागिरीत ज्वेलर्स दुकान फोडून चोरी; चोरट्यांचा शोध सुरू

प्रतिनिधी : कोकणधारा रत्नागिरी :- शहरातील मारुती मंदिर परिसरातील सुमित्रा ज्वेलर्स येथे अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून चोरी केल्याची…

ByByEditorial मार्च 31, 2026

मंडणगडमध्ये पंप चोरीच्या दोन घटना; चौघांविरोधात गुन्हा दाखल

प्रतिनिधी : कोंकणधारा मंडणगड : तालुक्यातील शिरगाव येथे पाण्याचे इलेक्ट्रिक पंप चोरीच्या दोन घटना उघडकीस आल्या असून या…

ByByEditorial मार्च 29, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

RAIDS App चा कमाल; नागपूरमध्ये २ तासांत अज्ञात मृतदेहाची ओळख
पीपास रसायनावरून लोटे MIDCत तणाव; ६ एप्रिलला लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात मोर्चा
पुष्कर कंपनीत गरम मातीने भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; चौघांवर गुन्हा दाखल
साखरपा येथे आराम बसला भीषण आग; ३० प्रवासी सुखरूप बचावले
सुभाषराव चव्हाण यांना ‘आदर्श जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर
रत्नागिरी नगर परिषदेची कारवाई; ११० मालमत्ता सील, ७० नळजोडण्या खंडित
खेड तालुकाध्यक्ष स.तु. कदम यांचा राजीनामा; राष्ट्रवादीसमोर संघटनात्मक आव्हान
मंगेश पेढाबंकर यांना ‘आदर्श प्रशासकीय अधिकारी’ पुरस्कार जाहीर
पत्रकार दीपक भागवत हल्लाप्रकरणी अटकेची मागणी; १४ एप्रिलपासून उपोषणाचा इशारा