konkandhara.com

  • Home
  • क्राईम
  • चिपळूण बसस्थानकातील १४.६१ लाखांच्या दागिने चोरीचा उलगडा; आरोपी महिला खंडाळ्यातून अटक
चिपळूण बसस्थानक दागिने चोरीचा उलगडा; आरोपी महिला अटकेत

चिपळूण बसस्थानकातील १४.६१ लाखांच्या दागिने चोरीचा उलगडा; आरोपी महिला खंडाळ्यातून अटक

चिपळूण : येथील भोगाळे मध्यवर्ती बसस्थानकावर घडलेल्या तब्बल १४.६१ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिने चोरीप्रकरणाचा चिपळूण पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत यशस्वी उलगडा केला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी मंगल उर्फ शोभा अंकुश साठे (६०, रा. खंडाळा, जि. सातारा) हिला चोरीच्या सर्व मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे.

या कारवाईत चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
या संदर्भात वैष्णवी विश्वनाथ शिंदे (४७, रा. कावीळतळी, चिपळूण) यांनी ११ एप्रिल २०२६ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या आपल्या मुलीसह तिवरे गावी नातेवाईकांच्या लग्नासाठी जात असताना दुपारी सुमारे ३:२० वाजता बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात महिलेने त्यांच्या खांद्याला अडकवलेल्या पर्समधून ११ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले.

चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये गंठण, सोनसाखळ्या, हार, कर्णफुले आणि बांगड्यांचा समावेश होता. तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक महिला संशयास्पदरीत्या ऑटो रिक्षातून पसार होताना दिसून आली. त्यानुसार रिक्षाचालकाचा शोध घेण्यात आला. चौकशीत संबंधित महिलेने फरशी तिथ्यावर उतरल्याचे आणि त्याच्या मोबाईलवरून एका व्यक्तीला कॉल केल्याचे समोर आले.

त्या कॉलच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा ठरवली आणि हा कॉल सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील भाटघर येथील एका व्यक्तीला केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर डीबी पथकाने थेट खंडाळा येथे जाऊन तपास केला. संबंधित व्यक्तीच्या मदतीने आरोपी महिलेच्या घराचा शोध घेण्यात आला.
पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत घराची झडती घेतली असता चोरीस गेलेले सर्व दागिने हस्तगत करण्यात आले. आरोपी महिलेने गुन्ह्याची कबुली दिली असून फिर्यादी महिलेनेही दागिने ओळखले आहेत.

या प्रकरणाचा अवघ्या चार दिवसांत उलगडा करून आरोपीसह मुद्देमाल जप्त करण्यात आल्यामुळे चिपळूण पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Releated Posts

रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल

रत्‍नागिरी ः प्रतिनिधीपूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची…

ByByEditorial मई 13, 2026

जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांत हाणामारी; सात जणांवर गुन्हा

चिपळूण : तालुक्यातील वेहळे खान मोहल्ला परिसरात जुन्या जमिनीच्या वादातून दोन शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादाने उग्र रूप धारण करत…

ByByEditorial अप्रैल 30, 2026

रत्नागिरी पोलिसांची कारवाई: शिळ मिरजोळे येथे गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त, एक जण अटकेत

रत्नागिरी, दि. ३० एप्रिल २०२६: रत्नागिरी शहर पोलिसांनी शिळ मिरजोळे परिसरात सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टीवर धाड टाकून…

ByByEditorial अप्रैल 30, 2026

आडिवरे येथे महिलेवरील अत्याचारप्रकरणी शिक्षक अटकेत

राजापूर : तालुक्यातील आडिवरे येथे एका महिलेवरील अत्याचारप्रकरणी स्थानिक हायस्कूलमधील शिक्षकाला नाटे (सागरी) पोलिसांनी अटक केली आहे. या…

ByByEditorial अप्रैल 26, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे