konkandhara.com

27 मार्च 2026

जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत सावर्डे विद्यालयाची उत्तुंग भरारी

जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत सावर्डे विद्यालयाची उत्तुंग भरारी

प्रतिनिधी : कोकणधारा सावर्डे, दि. २७ मार्च : भारत सरकारच्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत विद्यालयातील आठ विद्यार्थ्यांची निवड होऊन त्यांचा जवाहर नवोदय विद्यालय, पडवे येथे प्रवेशासाठी मार्ग मोकळा झाला आहे. या परीक्षेसाठी विद्यालयातील इयत्ता पाचवीचे एकूण ११ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.त्यापैकी स्वराज कर्डिले, समर्थ सोनवणे, ओम सावर्डेकर, शार्दुल गोरे, अथर्व बंडगर, दर्शन कदम, श्रीपाद धुरी आणि वसुंधरा पाटील या विद्यार्थ्यांनी यश मिळवून विद्यालयाचा नावलौकिक उंचावला आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६ अंतर्गत नवोदय विद्यालयांची स्थापना करण्यात आली असून, नवोदय विद्यालय समिती (NVS) या स्वायत्त संस्थेमार्फत या शाळांचे संचालन केले जाते. येथे विद्यार्थ्यांना पूर्णतः निवासी व मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.विद्यार्थ्यांच्या या यशामागे विभागप्रमुख साजिद चिकटे यांच्यासह प्रशांत सपकाळ, सुधीर कदम, अमित साळवी, मंगेश दाते, दीपक भुवड, सौ. सिद्धी सावंत, सौ. शिल्पा राजेशिर्के आणि सौ. श्रुती जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार शेखरजी निकम, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, उपाध्यक्ष युगंधराताई राजेशिर्के, प्रशांतजी निकम, डॉ. इसाक खतीब, सर्व संचालक, सेक्रेटरी महेश महाडिक, स्कूल कमिटी चेअरमन शांताराम खानविलकर, प्राचार्य राजेंद्र वारे आणि उपप्राचार्य विजय चव्हाण यांनी अभिनंदन करून कौतुक केले आहे.

जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत सावर्डे विद्यालयाची उत्तुंग भरारी Read More »

खेर्डीत रंगणार भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार

खेर्डीत रंगणार भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार

प्रतिनिधी : कोकणधारा चिपळूण : दिशा फाऊंडेशन पुरस्कृत राष्ट्रवादी युवक काँग्रेस, खेर्डी यांच्या वतीने खेर्डीतील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व मा. श्री. अनिलशेठ दाभोळकर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि. ३० मार्च २०२६ ते बुधवार दि. १ एप्रिल २०२६ या कालावधीत खेर्डी बाजारपेठेतील “कै. अजित दादा पवार क्रीडानगरी” येथे भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिशा फाऊंडेशन पुरस्कृत राष्ट्रवादी युवक काँग्रेस, खेर्डी यांच्या माध्यमातून गेल्या सलग तीन वर्षांपासून या स्पर्धेचे उत्कृष्ट व नियोजनबद्ध आयोजन केले जात असून, यंदाचे हे चौथे पर्व ठरणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमुळे खेर्डी परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण होणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सोमवार, दि. ३० मार्च २०२६ रोजी रात्री ९ वाजता उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम, जयंद्रथशेठ खताते, अनिलशेठ खताते, सौ. दिशाताई दाभोळकर, नितीन (अबुशेठ) ठसाळे, दशरथ शेठ दाभोळकर, प्रकाश शेठ साळवी यांच्यासह खेर्डीतील प्रमुख राजकीय, सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना बुधवार, दि. १ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी खेळविण्यात येणार असून, याच दिवशी प्रमुख पाहुणे, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांच्या उपस्थितीत अनिलशेठ दाभोळकर यांचा ७० वा वाढदिवस केक कापून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत चिपळूण तालुक्यातील १६ नामांकित संघ सहभागी होणार असून, स्पर्धा रंगतदार आणि चुरशीची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खेर्डी तसेच संपूर्ण चिपळूण तालुक्यातील कबड्डी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा थरार अनुभवावा, असे आवाहन दिशा फाऊंडेशन व राष्ट्रवादी युवक काँग्रेस, खेर्डी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

खेर्डीत रंगणार भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार Read More »

उद्योजक श्रीधर (अण्णा) जाधव यांचे निधन

उद्योजक श्रीधर (अण्णा) जाधव यांचे निधन

प्रतिनिधी : कोकणधारा देवरुख, दि. २७ मार्च : संगमेश्वर तालुक्यातील असुर्डे गावचे सुपुत्र व मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक श्रीधर मुकुंद (अण्णा) जाधव यांचे प्रदीर्घ आजाराने काल रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.श्रीधर जाधव हे मुंबई महानगर पालिकेच्या शिवसेनेच्या माजी महापौर तथा माजी नगरसेविका श्रद्धा जाधव यांचे पती होत. तसेच ते युवासेना कार्यकारिणी सदस्य पवन जाधव यांचे वडील आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रचना महाडीक यांचे बंधू होत. त्यांचे पार्थिव आज दुपारी १ ते ३ या वेळेत अंत्यदर्शनासाठी ओमकार वेदा, ग. द. आंबेकर मार्ग, राष्ट्रीय मिल मजदूर संघ कार्यालयाजवळ, भोईवाडा, मुंबई येथे ठेवण्यात येणार आहे. श्रीधर (अण्णा) जाधव यांच्या निधनाबद्दल संगमेश्वर-चिपळूण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उबाठा) पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी तसेच तालुक्यातील विविध स्तरांतील नागरिकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उद्योजक श्रीधर (अण्णा) जाधव यांचे निधन Read More »

देवरुख फिश मार्केटसाठी लवकरात लवकर जागा निश्चित करावी - मंत्री नितेश राणे मुंबई, दि. २७ मार्च : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत देवरुख नगरपंचायत कार्यक्षेत्रात फिश मार्केट उभारण्यासाठी योग्य जागा लवकरात लवकर निश्चित करून प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, तसेच लवकरच भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत देवरुख नगरपंचायत कार्यक्षेत्रातील मत्स्यबाजार (फिश मार्केट) विकसित करण्याबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, मुख्याधिकारी प्रशांत भोसले तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तर रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदाल हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते. मंत्री राणे यांनी सांगितले की, फिश मार्केटचे नियोजन करताना स्थानिक नागरिक आणि मच्छी विक्रेत्यांच्या सोयीचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक ठिकाणी आधुनिक बाजारपेठ उभारल्यानंतरही पारंपरिक ठिकाणे सोडून विक्रेते नव्या ठिकाणी स्थलांतरित होत नाहीत. त्यामुळे नवीन बाजारपेठेची जागा निवडताना लोकांची ये-जा, व्यवहाराची सोय आणि स्थानिक सवयी लक्षात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी प्रशासनाला जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नगरपंचायत पातळीवर समन्वय साधून योग्य जागा निश्चित करण्याच्या सूचना दिल्या. तसेच इस्टिमेट, प्रस्ताव आणि तांत्रिक मान्यता यांसारख्या प्रक्रिया तातडीने पूर्ण कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. मत्स्यव्यवसाय विभागाकडून आवश्यक त्या सर्व प्रकारची मदत करण्यात येईल, असे आश्वासनही मंत्री राणे यांनी दिले. देवरुखमध्ये आधुनिक आणि सोयीस्कर फिश मार्केट उभारल्यास मच्छी विक्रेत्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्याबरोबरच नागरिकांनाही स्वच्छ, नियोजित आणि सुसज्ज बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाकडे स्थानिक पातळीवर उत्सुकतेने पाहिले जात आहे.

देवरुख फिश मार्केटसाठी लवकरात लवकर जागा निश्चित करावी – मंत्री नितेश राणे

प्रतिनिधी : कोकणधारा मुंबई, दि. २७ मार्च : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत देवरुख नगरपंचायत कार्यक्षेत्रात फिश मार्केट उभारण्यासाठी योग्य जागा लवकरात लवकर निश्चित करून प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, तसेच लवकरच भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत देवरुख नगरपंचायत कार्यक्षेत्रातील मत्स्यबाजार (फिश मार्केट) विकसित करण्याबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, मुख्याधिकारी प्रशांत भोसले तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तर रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदाल हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते. मंत्री राणे यांनी सांगितले की, फिश मार्केटचे नियोजन करताना स्थानिक नागरिक आणि मच्छी विक्रेत्यांच्या सोयीचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक ठिकाणी आधुनिक बाजारपेठ उभारल्यानंतरही पारंपरिक ठिकाणे सोडून विक्रेते नव्या ठिकाणी स्थलांतरित होत नाहीत. त्यामुळे नवीन बाजारपेठेची जागा निवडताना लोकांची ये-जा, व्यवहाराची सोय आणि स्थानिक सवयी लक्षात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी त्यांनी प्रशासनाला जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नगरपंचायत पातळीवर समन्वय साधून योग्य जागा निश्चित करण्याच्या सूचना दिल्या. तसेच इस्टिमेट, प्रस्ताव आणि तांत्रिक मान्यता यांसारख्या प्रक्रिया तातडीने पूर्ण कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. मत्स्यव्यवसाय विभागाकडून आवश्यक त्या सर्व प्रकारची मदत करण्यात येईल, असे आश्वासनही मंत्री राणे यांनी दिले. देवरुखमध्ये आधुनिक आणि सोयीस्कर फिश मार्केट उभारल्यास मच्छी विक्रेत्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्याबरोबरच नागरिकांनाही स्वच्छ, नियोजित आणि सुसज्ज बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाकडे स्थानिक पातळीवर उत्सुकतेने पाहिले जात आहे.

देवरुख फिश मार्केटसाठी लवकरात लवकर जागा निश्चित करावी – मंत्री नितेश राणे Read More »