konkandhara.com

उद्योजक श्रीधर (अण्णा) जाधव यांचे निधन

उद्योजक श्रीधर (अण्णा) जाधव यांचे निधन

प्रतिनिधी : कोकणधारा

देवरुख, दि. २७ मार्च : संगमेश्वर तालुक्यातील असुर्डे गावचे सुपुत्र व मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक श्रीधर मुकुंद (अण्णा) जाधव यांचे प्रदीर्घ आजाराने काल रात्री दुःखद निधन झाले.

त्यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
श्रीधर जाधव हे मुंबई महानगर पालिकेच्या शिवसेनेच्या माजी महापौर तथा माजी नगरसेविका श्रद्धा जाधव यांचे पती होत. तसेच ते युवासेना कार्यकारिणी सदस्य पवन जाधव यांचे वडील आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रचना महाडीक यांचे बंधू होत.

त्यांचे पार्थिव आज दुपारी १ ते ३ या वेळेत अंत्यदर्शनासाठी ओमकार वेदा, ग. द. आंबेकर मार्ग, राष्ट्रीय मिल मजदूर संघ कार्यालयाजवळ, भोईवाडा, मुंबई येथे ठेवण्यात येणार आहे.

श्रीधर (अण्णा) जाधव यांच्या निधनाबद्दल संगमेश्वर-चिपळूण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उबाठा) पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी तसेच तालुक्यातील विविध स्तरांतील नागरिकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे