konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • वेंगुर्लेतील आंतरराज्य हॉलीबॉल स्पर्धेतून राज्यस्तरीय खेळाडू निर्माण होतील : प्रितेश राऊळ
वेंगुर्लेतील आंतरराज्य व्हॉलीबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; राज्यस्तरीय खेळाडू घडतील – प्रितेश राऊळ

वेंगुर्लेतील आंतरराज्य हॉलीबॉल स्पर्धेतून राज्यस्तरीय खेळाडू निर्माण होतील : प्रितेश राऊळ

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

संजय पिळणकर | वेंगुर्ले :
भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस वेंगुर्लेसह संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. वेंगुर्ले तालुक्यात व्हॉलीबॉल स्पर्धेसह दशावतारी नाट्य महोत्सव, कबड्डी स्पर्धा, आरोग्य शिबिर असे विविध उपक्रम राबवले जात आहेत.

या आंतरराज्य हॉलीबॉल स्पर्धेतून राज्यस्तरीय खेळाडू निर्माण होतील, असा विश्वास जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी व्यक्त केला.

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त “संसद कोकण समृद्धी महोत्सव २०२६” अंतर्गत भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा आणि जय मानसीश्वर संघ यांच्या वतीने भव्य खुली आंतरराज्य पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

स्पर्धेचे उद्घाटन भाजपा प्रदेश सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ बोलत होते.

या कार्यक्रमाला प्रसन्ना (बाळू) देसाई, विष्णू उर्फ पप्पू परब, शरद चव्हाण, वसंत तांडेल, नगराध्यक्ष राजन गिरप, आकांक्षा परब, शितल आंगचेकर, रिया केरकर, गौरी माईणकर, यशवंत उर्फ दाजी परब, सचिन शेटये, प्राचार्य धनराज गोस्वामी, प्रा. जे.वाय. नाईक, प्रा. बी.जी. गायकवाड, अनंत केळूसकर, जयंत मोंडकर, प्रणव वायंगणकर, भूषण आंगचेकर, मनोहर तांडेल, कौस्तुभ वायंगणकर, सॅमसंग फर्नांडिस, तुषार साळगांवकर, भूषण सारंग, हेमंत तुळसकर, संदीप शेटये, नामदेव सरमळकर, पंच हेमंत गावडे, राधाकृष्ण उर्फ दादा पेडणेकर, अमित हर्डीकर, दाजी नाईक, महेंद्र मातोंडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोवा येथील अनेक संघ सहभागी झाले आहेत.

नगराध्यक्ष राजन गिरप यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, वेंगुर्ले येथे अनेक वर्षांपासून हॉलीबॉल खेळला जात असून अशा स्पर्धांमुळे खेळाला नवी ऊर्जा मिळते. स्पर्धेचे नियोजन नेहमीप्रमाणे उत्कृष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत तांडेल यांनी केले, स्वागत प्रणव वायंगणकर यांनी केले तर आभार प्रसन्ना (बाळू) देसाई यांनी मानले.

स्पर्धेचे नियोजन युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले असून, संपूर्ण वेंगुर्ले शहरात झेंडे आणि बॅनर्स लावून उत्साहाचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे