konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • उन्हवरे फाट्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर
उन्हवरे फाट्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर

उन्हवरे फाट्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर

प्रतिनिधी : कोकणधारा

दापोली: दापोली तालुक्यातील दापोली-खेड मार्गावर वाकवलीजवळ असलेल्या उन्हवरे फाट्याजवळ मंगळवारी पहाटे एका दुचाकीचा भीषण अपघात होऊन एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मार्च रोजी पहाटे सुमारे ३ वाजता नरेश चंद्रकांत रुके (वय ३४, रा. जालगाव बौद्धवाडी, ता. दापोली) आणि त्यांचा मित्र अमित अरुण माने (वय ३५, रा. काळकाई कोंड, ता. दापोली) हे अ‍ॅक्टिव्हा (क्र. MH 08 BF 3766) दुचाकीवरून प्रवास करत होते. उन्हवरे फाट्याजवळ आल्यावर चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारावर आदळली.

हा अपघात अत्यंत भीषण होता. धडकेमुळे दुचाकीचा पुढील व मागील भाग पूर्णपणे नुकसानग्रस्त झाला. अपघातानंतर दोघेही रस्त्याच्या कडेला गंभीर जखमी अवस्थेत पडले होते.

दरम्यान, नरेश रुके रात्री घरी न परतल्याने त्यांच्या नातेवाईकांनी सकाळी फोन केला असता पोलिसांनी अपघाताची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे दाखल करण्यात आले.

मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर नरेश रुके यांना पहाटे ५:०५ वाजता मृत घोषित केले. गंभीर जखमी अमित माने यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी डेरवण येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार बुरोंडकर करत आहेत.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे