konkandhara.com

  • Home
  • कोकणची बातमी
  • पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शनिवारी विकास कामांचे उद्घाटन, साहित्यिकांचा सन्मान व काव्यवाचन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव होणार
uday-samant-chiplun-vikas-kam-udghatan-sahityik-samman

पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शनिवारी विकास कामांचे उद्घाटन, साहित्यिकांचा सन्मान व काव्यवाचन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव होणार

प्रतिनिधी : कोकणधारा

चिपळूण : मराठी भाषा दिनानिमित्त चिपळूण नगर परिषदेच्या वतीने आयोजित काव्यवाचन स्पर्धेचे बक्षीस वितरण व साहित्यिकांचा सत्कार सोहळा शनिवार दि. १४ मार्च रोजी पार पडणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष उमेश सपकाळ यांनी दिली.

लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा चिपळूण यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून नगर परिषदेच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात खुल्या गटातील काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली होती. मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेला उजाळा देण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेला कवी व साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे, प्रा. सुहास बारटक्के, स्मिताताई देवधर, अरुण इंगवले, प्रा. संतोष गोणबरे, मुजफ्फर सय्यद, डॉ. प्रशांत पटवर्धन, राष्ट्रपाल सावंत, धीरज वाटेकर, रविंद्र गुरव, संत साहित्याचे अभ्यासक धनंजय चितळे तसेच प्रकाश (आप्पा) जाधव या मान्यवर साहित्यिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच काव्यवाचन स्पर्धेतील विजेत्यांचा व सहभागी कवींचा गौरव सोहळा या कार्यक्रमात पार पडणार आहे.

हा कार्यक्रम पेठमाप येथे (इंडियन जिमसमोर) आयोजित करण्यात आला असून नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपनगराध्यक्ष रूपालीताई दांडेकर, मुख्याधिकारी संजय जाधव, तसेच सर्व सभापती व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.

मराठी भाषा आणि साहित्याचा गौरव करणाऱ्या या कार्यक्रमाला चिपळूणमधील विद्यार्थी, साहित्यप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी केले आहे.

Releated Posts

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा

कोलाड २६ मे (शरद जाधव) कृषी, आरोग्य, शैक्षणिक आणि शेती क्षेत्रासह शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून लोकांच्या जीवनात बदल…

ByByEditorial मई 27, 2026

अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड

कोलाड २६ मे (शरद जाधव) पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा कुमार गट खो-खो निवड चाचणी स्पर्धेत…

ByByEditorial मई 27, 2026

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे

सिंधुदुर्ग – भूषण सावंत महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार…

ByByEditorial मई 27, 2026

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा

सिंधुदुर्ग : भूषण सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली…

ByByEditorial मई 27, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

निवी परिसरात पाणलोट बंधाऱ्यांचा उपक्रम; शेतकऱ्यांना दिलासा
अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा खो-खो संघात निवड
मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध : नितेश राणे
सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा
पावसाळ्यापूर्वीच वीज विभागाच्या कारभारावर संताप; २५ मे रोजी कुडाळ येथे विज ग्राहकांचा जाब विचारणा आंदोलन
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे